The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

by द पोस्टमन टीम
21 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सध्याच्या काळात तंबाखू सेवन आणि धूम्र*पान ही जगातल्या सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक समस्या ठरली आहे. आधुनिक जीवनशैलीचं, बिनधास्त मनोवृत्तीचं आणि काही अंशी पौरुषत्वाचं प्रतीक म्हणून धू*म्रपानाकडे बघितलं जात आहे. स्त्रियादेखील मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणून धू*म्रपानाकडे वळल्या आहेत. मात्र, या प्रतिकात्मकतेच्या हव्यासापोटी धू*म्रपान करणाऱ्यांमधले बहुसंख्य लोक घसा, फुप्फुसं अशा अनेक प्रकारच्या गंभीर कर्करोगाच्या विकारांना बळी पडत आहेत. तंबाखू खाण्यामुळे होणारे तोंडासारख्या अवयवांचे कर्करोग तर आहेतच.

उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तंबाखू सेवन आणि धूम्र*पानामुळे जगभरात दरवर्षी किमान ७० लाख जणांचा बळी जात आहे. याशिवाय १२ लाख जण त्यांचा काही दोष नसताना इतरांच्या धूम्र*पानामुळे त्याचा धूर शरीरात जाऊन अप्रत्यक्ष धूम्र*पानाचे बळी ठरत आहेत. जगात धूम्र*पान करणाऱ्यांची संख्या तब्बल १३० कोटी एवढी प्रचंड असून त्यापैकी ८० टक्के लोक गरीब आणि विकसनशील देशातले नागरिक आहेत. धू*म्रपानामुळे होणारी मनुष्यहानी; विशेषतः युवावर्गाची हानी टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक शासकीय आणि स्वयंसेवी संस्था जगभरात कार्यरत आहेत

वर्णश्रेष्ठत्वातून लाखो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून अमा*नुष पद्धतीने मारणारा क्रूर*कर्मा म्हणून जर्मनीचा हुकू*मशहा ॲ*डॉल्फ हि*टल*र हा जगभरात निंदनीय असला तरी धूम्रपान*विरोधी चळवळी चालवणाऱ्यांनी मात्र, त्याचा आदर्श घेणं आवश्यक आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

विश्वास बसणं कठीण आहे पण एकेकाळी ‘चेनस्मो*कर’ असणाऱ्या हि*टल*रने त्याचे दुष्परिणाम ओळखून स्वतः धूम्र*पान करणं तर सोडलंच, शिवाय ना*झी पक्षाच्या वतीने जर्मनीमध्ये जगातली पहिली धूम्रपा*नविरोधी चळवळ सुरू केली. ना*झी जर्मनीमध्ये तर त्याने तंबाखूवर कठोर निर्बंध लादले.

वास्तविक, हि*टल*रला धूम्र*पानाच्या दुष्परिणामांचा साक्षात्कार होण्यापूर्वी त्याने ना*झी पक्षाच्या खजिन्यात भर घालण्यासाठी सन १९३२ साली पक्षाचीच ‘स्टर्म सिगा*रेट कंपनी’ स्थापन केली होती. या कंपनीच्या सिगा*रेटचा प्रसार करण्यासाठी आणि खप वाढवण्यासाठी हिं*सक मार्गाचा वापर करून स्पर्धक कंपन्यांना ना*झी कार्यकर्ते पळवून लावायचे.



याशिवाय आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही हि*टल*रने या सिगा*रेटचा वापर करून घेतला. या सिगा*रेटच्या पाकिटाबरोबर ना*झी तत्त्वज्ञानाचं प्रचारसाहित्य ग्राहकांना दिलं जायचं. या सिगा*रेट व्यवसायातून हि*टल*रने बक्कळ पैसा कमावला आणि पक्षाचा प्रचारही करवून घेतला.

जर्मनीची निरंकुश सत्ता हस्तगत करण्याच्या काही काळापूर्वी धूम्र*पानाचा कडवा विरोधक बनलेला हि*टल*र स्वतः त्याच्या वयाच्या विशीपर्यंत ‘चेनस्मो*कर’ होता. तो दिवसाला तब्बल ४० सिगा*रेट ओढत असल्याची नोंद आहे. त्यानंतर मात्र धूम्र*पान हा केवळ ‘पैशाचा अपव्यय’ असल्याचा साक्षात्कार त्याला झाला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ना*झी पक्षाच्या वतीने त्याने तंबाखूविरोधी चळवळ हाती घेतली. सुरुवातीला ही चळवळ सौम्य स्वरूपाची होती. ना*झी पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी तंबाखू आणि धूम्र*पानाचे दुष्परिणाम स्पष्ट करणारी पत्रकं वाटली जायची. भित्तिपत्र चिकटवली जायची. ना*झी नेते, कार्यकर्ते प्रसारमाध्यमात लेख लिहून तंबाखूविरोधी प्रचार करायचे.

जर्मनीत ना*झी पक्षाची सत्ता आल्यावर धूम्र*पान आणि तंबाखूसेवनावरचे निर्बंध कडक करण्यात आले. ना*झी पक्षाच्या कार्यालयांमध्ये धूम्र*पानाला बंदीच घालण्यात आली. त्याचप्रमाणे ट्रॅमसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांमध्ये, लष्करी आस्थापनांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये धूम्र*पानाला बंदी होती. अशा ठिकाणी धूम्र*पानासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले.

सैनिकांना ‘रेशन’मध्ये दिल्या जाणाऱ्या सिगा*रेटचे प्रमाण दिवसाला ६ सिगा*रेट, एवढं कमी करण्यात आलं. सिगा*रेट, तंबा*खूवरच्या करातही मोठी वाढ करण्यात आली.

स्वतः ‘चेनस्मो*कर’ असलेला हि*टल*र कट्टर धूम्र*पानविरोधी बनला यालाही काही कारणं आहेत. तंबा*खूसेवन अथवा धूम्र*पान फुप्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचा शोध जर्मनीमध्येच प्रथम सन १९३९ साली लागला. ‘पॅसिव्ह स्मोकींग’ अर्थात अप्रत्यक्ष धूम्र*पान ही संकल्पना जर्मनीतच प्रथम शोधण्यात आली. स्वतः धूम्र*पान करत नसूनही आजूबाजूला धूम्र*पान करणारे लोक असल्यास त्यांचा धूर शरीरात जाऊन धूम्र*पानाचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे धूम्र*पान आणि एकूणच तंबा*खूविरोधी चळवळीचं मूळ पहिल्यांदा जर्मनीतच रुजलं.

‘जगाला मद्यप्राशनाची सवय लावल्याबद्दल गव्हाळवर्णीय लोकांनी गोऱ्या लोकांवर उगवलेला सूड म्हणजे धूम्र*पान होय,’ असं हिट*लर म्हणत असे. हि*टल*रने धू*म्रपानाचा त्याग केला. तो कधीही मद्यपान करत नसे. त्याचप्रमाणे त्याने मांसाहाराचा त्याग करून शाकाहारही स्वीकारला होता.

जगातले आणखी महत्त्वाचे हुकूम*शहा मुसोलिनी आणि फ्रँको हे देखील धूम्र*पान करत नव्हते त्या उलट महायु*द्धकाळातील ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलचे मद्यपान आणि धूम्र*पान केल्याशिवाय पान देखील हलत नसे. स्टॅलिन आणि रुझवेल्ट हे देखील धूम्र*पानाचे भोक्ते होते.

हि*टल*रने आपल्या वर्णवर्चस्वाच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही धूम्र*पानाचा चाणाक्षपणे वापर करून घेतला.

‘धूम्र*पान ही ज्यू, जिप्सी आणि कृष्णवर्णियांची घाणेरडी सवय आहे. धूम्र*पान करणाऱ्या महिलांची पत्नी किंवा माता होण्याची लायकी नाही. धूम्र*पान हे जनुकीय विष आहे. त्याच्यामुळे जर्मनांच्या श्रेष्ठ आणि शुद्ध ‘आर्य’ जनुकांना भ्रष्ट केलं जात आहे,’ अशा अर्थाचा प्रचार ना*झी राज्यातल्या आरोग्य संस्थांकडून केला जात असे.

जर्मनीमध्ये सन १९३३ ते ३७ या काळात धूम्र*पान प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. ना*झी कार्यकाळात घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे ते मोठ्या प्रमाणावर कमी झालं. मात्र, महायु*द्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर जर्मनीत सिगा*रेट्स पुन्हा मोठ्या प्रमाणात मिळायला सुरुवात झाली. अमेरिकेने आपल्या सिगा*रेट उत्पादकांना चालना देण्यासाठी सन १९४९ साली जर्मनीत तब्बल ६९ हजार टन सिगा*रेट्स आणून ओतल्या. एका अर्थाने पराभूत हिट*लर आणि ना*झी जर्मनीवर त्यांनी उगवलेला हा सूडच होता.

हिट*लरचं धू*म्रपानाला समर्थन, स्वतःची सिगा*रेट कंपनी स्थापन करून लोकांना स्वस्तात सिगा*रेट उपलब्ध करू देणं, त्याद्वारे पक्षाची आणि स्वतःची लोकप्रियता वाढवून घेणं, पक्षाच्या तिजोरीत भर घालणं; त्याचबरोबर कालांतराने त्याचा धूम्र*पानाला विरोध आणि त्याचाही राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी उपयोग करून घेणं हे त्याच्यातल्या चाणाक्ष राजकीय नेत्याचं निदर्शक आहे.

अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी हिट*लरच्या धूम्र*पान समर्थन आणि विरोधाचं राजकीय विश्लेषण न करता त्याच्यासारखा कट्टर आणि हेकट विचाराचा आणि ‘हम करे सो कायदा’ या हुकूमशाही वृत्तीचा माणूसही बदलत्या काळानुसार बदलू शकतो आणि ‘चेनस्मो*कर’ ते धूम्र*पानविरोधी चळवळीचा उद्गाता असा विरुद्ध टोकाचा प्रवास करू शकतो, एवढंच लक्षात घेऊया.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

Next Post

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.