The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही एक वेळ स्वतःला विसरू शकता पण टपरवेअरचा डब्बा विसरून घरी नाही येऊ शकत

by द पोस्टमन टीम
5 June 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक ,युट्युब


एखादी कल्पना डोक्यात आल्यानंतर ती कल्पना सत्यात उतरवणे अवघडच आहे. पण त्यापेक्षाही अवघड आहे ती सत्यात उतरलेली गोष्ट लोकांपर्यंत पोहचवणे. यासाठी जाहिरातीची गरज पडते. जाहिरात क्षेत्र आज झपाट्याने वाढत आहे. काही वर्षांपुर्वी जाहिरात क्षेत्राचा विकास झालेला नसताना घरगुती उपाय शोधले जात असत. अशीच एक घरगुती आणि अतिशय रंजक पध्दत एका कंपनीने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी वापरली.

या कंपनीचे नाव आहे टपरवेअर.

घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तु बनवणारी ही कंपनी आज आपल्या सर्वांच्या ओळखीची आहे. रसायनतज्ञ असलेल्या अर्ल टपर यांनी ही कंपनी स्थापन केली. परंतु सुरुवात झाली तेव्हा या कंपनीला आपली ओळख बनवण्यासाठी अतिशय नविन अशी पध्दत अंमलात आणावी लागली होती.

दुसऱ्या महायु*द्धाची झळ अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचली. अन्न-धान्याची कमतरता जाणवू लागली. त्यातच उरलेले पदार्थ बंद करुन ठेवण्यासाठी प्लास्टीकच्या डब्यांना झाकण उपलब्ध नसल्यामुळे अन्न खराब होत. त्यामुळे बरेचसे अन्न फेकून द्यावे लागत होते. यातूनच एका प्लास्टीकच्या कारखान्यात काम करणाऱ्या अर्ल टपर यांना प्लास्टीकचे झाकण बनवण्याची कल्पना सुचली.

परंतु, सुरुवातीला प्रयत्न करुनही या उत्पादनांना कोणीही विकत घेत नव्हते. या कंपनीच्या जाहिरातीचे एक आगळेवेगळे माध्यम होते आणि ते म्हणजे टपरवेअर मेजवान्या.



१९५० च्या दशकात कोणत्याही छोट्या शहरातील घरात जाऊन बघितले तर काही स्त्रिया एकत्र येऊन खेळ खेळताना, प्लास्टिकच्या भांड्याना इकडेतिकडे फेकताना तसेच शहरातील घडामोडी आणि स्वत:च्या आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसत असत.

उच्चभ्रू समाजातील महिलांसाठी या मेजवान्या अतिशय महत्त्वाच्या असत. वरवर जरी या मेजवान्यांत फक्त महिलांचे एकत्रीकरण दिसत असले तरी या मेजवान्या आयोजित करणाऱ्या बऱ्याचशा महिला टपरवेअरसाठी मार्केटींग करत, आणि त्यात सहभागी असलेल्या महिला फक्त गप्पा न करता तिथे असलेल्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या अन्नाला जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी केलेले प्रयोग तपासून बघत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९५०च्या दशकात अनेक स्त्रियांनी स्वत:चे टपरवेअरचे उद्योग सुरु केले. उद्योग क्षेत्रातील पुरूषांचे असलेले वर्चस्व यामुळे काही प्रमाणात का असेना पण कमी झाले.

हे उत्पादन विकायचे असेल तर महिलांची या उत्पादनाशी ओळख करुन देणे अतिशय गरजेचे होते. आधी वापरात असलेल्या भांड्यांपेक्षा टपरवेअर वेगळे दिसत होते. प्लास्टीकचा येणारा वास, आणि खराब निर्मिती या गोष्टी टपरवेअरच्या बाबतीत बोलल्या जाऊ लागल्या. तसेच टपरवेअरचे मुख्य वैशिष्ट असलेले घट्ट झाकण घट्ट बसत नसल्याच्या तक्रारी सुरु झाल्या. कंपनीला लवकर काहीतरी करणे आवश्यक होते. टपरवेअरने पॉली-टीचा शोध लावला.

स्टँले होम या कंपनीने ‘होम पार्टी’ नावाची जाहिरातीची पध्दत सुरु केली होती. यामध्ये महिलांना थेट घरी जाऊन उत्पादन विकत घेता येत होते. टपरवेअरने मात्र नेहमीच थेट ग्राहकांना विक्रीची संकल्पना टाळली होती. त्यापेक्षा दुकानात उत्पादने विक्रीसाठी ठेवणे त्यांना योग्य वाटत होते.

तेव्हा ‘होम पार्टी’ची पध्दत वापरुन ‘ब्रॉवनी वाईज’ या महिलेने टपरवेअरची उत्पादने विकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या इतर मैत्रीणींना प्रशिक्षण देऊन टपरवेअरबरोबरच बाकीच्या उत्पादनांची विक्रीही सुरु केली.

विक्री वाढवण्याच्या उद्देशाने टपरवेअरने अनेक प्रयत्न केले. अनुभव नसलेल्या बऱ्याच लोकांना त्यांनी कामावर नियुक्त करून बघितले. पण, कशानेच काहीच फरक पडत नव्हता.

वाईजबद्दल कळताच टपरवेअरने त्यांना विक्रेत्यांच्या गटाची प्रमुख म्हणून नेमली. टपरवेअरच्या उत्पादनांना कसे विकायचे याची कल्पना वाईज यांना चांगल्या प्रकारे माहीत होती. त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची पद्धत वेगळी आणि कलात्मक होती. प्लास्टिक तुटत नाही हे ग्राहकांना पटवून देण्यासाठी त्या प्लास्टिक भिंतीवर फेकून मारत असत.

त्यातच दुसऱ्या महायु*द्धानंतर लहान बाळांची संख्या वाढत गेली. नुकत्याच आई झालेल्या महिला म्हणजे टपरवेअरसाठी मुख्य ग्राहक बनल्या.

टपरवेअरच्या मेजवान्या म्हणजे जुन्या मित्रांना भेटण्याचे माध्यम बनले. नवीन मित्रही बनू लागले. वाढत चाललेल्या अर्थव्यवस्थेचा भाग होण्यासाठी अतुर असलेल्या प्रत्येकासाठी त्या अतिशय महत्त्वाच्या स्थान बनल्या होत्या. तसेच बाहेर जाऊन काम करु न शकणाऱ्या महिलांसाठी या मेजवान्या अतिशय उपयुक्त ठरल्या.

टपरवेअरने त्या महिलांना किचनच्या बाहेर आणले. त्यांना कार्यप्रणालीत गुंतवले. घराबाहेरच्या विश्वात त्यांना स्थान मिळवून दिले. काही टपरवेअरच्या विक्रेत्यांनी या मेजवान्यांचे रुपांतर मोठ्या उद्योगांत केले. चांगली कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना भरघोस बक्षीस दिले जात असे. या बक्षिसांमध्ये मोत्याच्या अंगठ्या, महागडे कपडे यांचा समावेश होता.

या मेजवान्या फक्त छोट्या शहरांमध्ये आणि श्वेतवर्णीय स्त्रियांमध्येच नाही तर कृष्णवर्णीय स्त्रियांमध्येही प्रसिध्द झाल्या. सिंगल मदर्स, घटस्फोट झालेल्या महिला यासुध्दा टपरवेअरसाठी काम करत असत.

पुढे, वाईजचा अर्ल टपर यांच्याशी वाद झाला. १९५८ मध्ये याच कारणामुळे टपरवेअरमधून काढण्यात आले. कंपनीचा कसलाही भाग त्यांना दिला गेला नाही. कोणत्याही व्यावसायिक कागदपत्रांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख न होऊ देण्याची खबरदारी अर्ल टपर यांनी घेतलीच होती. काही दिवसांनी अर्ल यांनी कंपनी रेक्झाल या औषध कंपनीला विकली. परंतु टपरवेअरचे नाव आणि मेजवान्या मात्र तशाच चालू राहिल्या.

झाकणांची निर्मिती करण्यासाठी सुरु झालेली ही कंपनी आज प्लास्टीकच्या जवळजवळ  सगळ्याच घरगुती उत्पादनांची निर्मिती करते. महिलांना रोजगार पुरवणाऱ्या या कंपनीने आज १००पेक्षाही जास्त देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

सगळ्यात जास्ती उत्पन्न कंपनीला इंडोनेशियातून येतं. अर्ध्यापेक्षाही जास्त उत्पन्न परदेशी उत्पादनातून येतं ही एक उल्लेखनीय बाब. आता या मेजवान्या कमी झाल्या असल्या तरी त्यावेळी मात्र अमेरीकन महिलांच्या स्वप्नांना भरारी देण्याचे काम या कंपनीने केले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

माओच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नामुळेच लाखो चीनी नागरिकांचे आयुष्य धुळीस मिळाले होते

Next Post

मराठी माणसाला भागोजी कीर माहित नाहीत हे आपलं दुर्दैव आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मराठी माणसाला भागोजी कीर माहित नाहीत हे आपलं दुर्दैव आहे

भारताची मान जगभरात उंचावणारे हे अज्ञात खेळाडू आपल्याला माहीत असायलाच हवेत!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.