The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्युटेलाने दुसऱ्या महायु*द्धात सैनिकांची भूक भागवली होती..!

by द पोस्टमन टीम
22 August 2025
in आरोग्य, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपल्याकडे सकाळी न्याहारी म्हणजे पोहे, उप्पीट. काही ठिकाणी इडली तर कुठे पराठे किंवा भाकर वगैरे. पण बाहेर इतका साग्रसंगीत नाश्ता क्वचितच बघायला मिळेल. एखादा डोनट, ब्रेड सँडविच किंवा फळ असा काहीसा नाश्ता युरोप-अमेरिकेत बघायला मिळतो.

यातही सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ब्रेड आणि न्यूटेला.

न्युटेला हे जगातलं सगळ्यात लोकप्रिय ब्रेडस्प्रेड आहे. पिडमाँटच्या अल्बा या शहरात १९६४ साली जेव्हा पहिल्यांदा न्यूटेला विक्रीसाठी ठेवलं तेव्हा हे चॉकलेट स्प्रेड इतकं जगप्रसिद्ध होईल असे कोणाला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.

पण या छोट्याशा बरणीत येणाऱ्या साध्याशा चॉकलेट स्प्रेडचा स्वतःचा एक इतिहास आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.



१९५०च्या काळात दुसऱ्या महायु*द्धामुळे इटलीमध्ये चॉकलेटचा तुटवडा निर्माण झाला होता. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बेकर बनलेल्या न्यूटेलाच्या कर्त्याधर्त्या Michelle Ferrero ची यामुळे खूप मोठी पंचाईत झाली.

इटलीमध्ये सुरुवातीपासूनच हेझलनट मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. कोकोचा तुटवडा आणि वाढलेली किंमत यामुळे त्यांनी या क्रिममध्ये हेझलनटचा वापर करण्यास सुरुवात केली.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

तसं बघायला गेलं तर हेझलनट चॉकलेट क्रिम हे Ferrero च्या आधीही इटलीमध्ये खाल्ले जात होते. १८०६ मध्ये नेपोलियनचे दक्षिण अमेरिकेसोबतच्या यु*द्धाच्या काळात देखील कोकोच्या बिया अव्वाच्या सव्वा भावाने विकल्या जात होत्या. या कारणाने तिथल्या चॉकलेट व्यापाऱ्यांचा धंदा ठप्प होण्याच्या मार्गावर होता आणि तेव्हाच खरी हेझलनट चॉकलेटची निर्मिती झाली.

Michelle चे वडील Pietro Ferrero यांनी १९४६ मध्ये Ferrero कंपनी स्थापन केली. हेझलनट, साखर आणि थोडं कोको यांचं मिश्रण करून त्यांनी एक क्रिमी पेस्ट बनवली जेणेकरून ब्रेडसोबत खायला सोयीचे होईल. त्याला त्यांनी “Giandujot” असे नाव दिले.

याच रेसिपीवर थोडे अजून प्रयोग करून Michelle ने हेझलनट-कोको क्रिमचा पहिला जार बनवला आणि त्याला नाव दिलं Nutella.

इटलीमध्ये न्युटेला प्रचंड लोकप्रिय झालं. तिथून त्याचा जगाचा प्रवास सुरु झाला आणि ते जर्मनीत येऊन पोहोचले. जर्मन लोक या न्युटेलाच्या प्रेमातच पडले. तिथून फ्रान्स आणि नंतर संपूर्ण युरोपात घरोघरी पोहचल्यावर न्युटेलाची बरणी ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पोहोचली आणि Lithgow, Sydney येथे युरोपबाहेरील पहिली न्युटेलाची फॅक्टरी उघडण्यात आली.

तिथून अमेरिका, आशिया खंड असे करत संपूर्ण जगभरात न्युटेलाची जादू पसरली आणि ब्रेड-न्युटेला सगळ्यात आवडता नाश्ता बनला.

न्युटेलाच्या बरण्या आजही सुरुवातीला बनलेल्या बरणीसारख्याच बनवल्या जातात आणि लगेच ओळखू येतात.

न्युटेलाची बरणी कोणी संपवली यावरून घरात, हॉस्टेलमध्ये तर भांडणं होतातच. पण या सगळ्यांच्या लाडक्या ब्रेडस्प्रेडवरून इटली-फ्रान्समध्ये सुद्धा भांडण होता होता राहिलं होतं. झालं असं की २०१५ साली फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री रॉयल यांनी न्युटेला खाणं त्यांच्या नागरिकांसाठी आणि पर्यावरणासाठी चांगलं नाही आणि आपण ते खाणं बंद केले पाहिजे असे वक्तव्य केले होते.

यावरून इटलीच्या मंत्र्यांनी त्यांना हे खाणं तुम्ही बंद करून टाका आणि इटलीचे कुठलेच पदार्थ खाऊ नका, असे प्रत्युत्तर दिले.

रॉयल यांनी असे वक्तव्य करण्यामागचे कारण हे होते की, पॅरिस climate summit मध्ये त्यावेळी पाम तेलाच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवरून घमासान चर्चा उसळली होती आणि न्युटेलामध्ये ते वापरले जात असल्याने ते योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते.

पुढे २०१७ मध्ये पाम तेलाला शाश्वत उत्पादन म्हणून मान्यता मिळाली आणि न्युटेला खाणाऱ्यांच्या जीवात जीव आला.

Sara Rosso या न्युटेलाप्रेमी ब्लॉगरने न्युटेलासाठी एक खास दिवस असावा असे सुचवले आणि २००७ पासून ५ फेब्रुवारी न्युटेला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. न्युटेलाची लोकप्रियता इतकी जास्त आहे की, एका दाम्पत्याने आपल्या मुलीचे नावच न्युटेला ठेवले आहे. आता बोला!

२०१४ मध्ये आपल्या लाडक्या न्युटेलाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी Michelle Ferrero इटली मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. कितीही आर्थिक मंदी आली तरी त्याचा Ferrero कंपनीवर फारसा परिणाम झाला नाही.

नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशा न्युटेलाला पुढच्या वेळी ब्रेडला लावताना त्याचा हा इतिहास नक्की आठवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: nutella
ShareTweet
Previous Post

अटलजींचा पराभव करून ही महिला संसदेत गेली होती

Next Post

सरकार मंदिरांची संपत्ती ताब्यात घेऊ शकतं का..?

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
Next Post

सरकार मंदिरांची संपत्ती ताब्यात घेऊ शकतं का..?

अमेरिकेत लोकांनी मास्क विरोधी चळवळ उभी केली होती

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.