The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबाईलशिवाय आता आपलं जगणं अशक्य झालंय, पण त्याचा इतिहास माहिती आहे का..?

by द पोस्टमन टीम
22 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मोबाईलचं आज आपल्या जीवनात काय स्थान आहे, हे काही आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. आत्ता हा लेखसुद्धा कदाचित तुम्ही तुमच्या मोबाईलवरच वाचत असाल. आज आपण मोबाईल तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास थोड्या विस्तृत स्वरूपात जाणून घेणार आहोत.

मोबाईल तंत्रज्ञानाचा उगम हा साधारण १९०८ च्या सुमारास झाला. अमेरिकेतल्या केंटुकी इथं वायरलेस टेलिफोनसाठी पहिलं पेटंट दिलं गेलं ते याच वर्षी. त्यानंतर १९२६ साली बर्लिन ते हॅम्बुर्ग दरम्यान फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. १९४० सालच्या सुमारास AT&T कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर्सनी हे तंत्रज्ञान आणखी विकसित केलं. त्याकाळातले मोबाईल हे मुळात मोबाईल नव्हतेच. ते दुतर्फा रेडिओसारखेच होते. त्याकाळी आपत्कालीन सेवेतील कर्मचारी व टॅक्सीचालक यांनाच या सेवेचा वापर करायची परवानगी होती. १९४६ साली शिकागो इथं रेडिओ-टेलिफोनवरून पहिला कॉल करण्यात आला.

१९५६ साली स्वीडन या देशात खाजगी वाहनांसाठी मोबाईल फोन यंत्रणा विकसित केली गेली. या मोबाईल फोनचे त्याकाळी स्टॉकहोम व गटेनबर्ग या दोन शहरांत मिळून सुमारे १२५ ग्राहक होते.

हा मोबाईल तेव्हा कारमध्येच बसवावा लागत असे, आणि तेव्हा त्याचं वजन होतं चक्क ४० किलो!

१९६९ या वर्षी नॉर्डिक मोबाईल टेलिफोन ग्रुपची स्थापना डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि नॉर्वे या चार देशांनी एकत्र येऊन केली. मोबाईल टेलिफोनचं जाळं अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे परंतु अधिक सोप्या रीतीने उभारणं हा यामागचा उद्देश होता.



त्यानंतर, ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मार्टिन कूपर यांनी आता आपण जो वापरतो, त्या मोबाईलच्या पहिल्या स्वरूपाचा शोध लावला. साधारण आपल्याकडे अगदी सुरवातीला असायचा ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनचा मोबाईल तसा. त्याकाळातले मोबाईल हे झिरो जनरेशन मोबाईल (0G) म्हणून ओळखले जात. (आज आपण आता 4G मधून 5G कडे वाटचाल करतोय) पण त्या मोबाईलचं वजनही जवळपास १.१ किलो इतकं होतंच. जगातला पहिलावहिला पब्लिक मोबाईल फोन कॉल करण्याचं श्रेय जातं ते, कॉमेडियन अर्नी वाईजला, तो कॉलही त्याने केला होता, तो व्होडाफोनच्या मुख्यालयात.

१९८७ साली GSM टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली, ज्यात देशाच्या सीमेबाहेरही कमी खर्चात चांगल्या प्रकारे संपर्क करता येणं हा प्रमुख उद्देश होता. तर १९९२ मध्ये जगातला पहिला SMS पाठवला गेला. २२ वर्षांचा नील पॅपवर्थ यानं व्होडाफोनसाठी ही सुविधा विकसित केली. पहिला SMS त्याने पाठवला तो, व्होडाफोनचे डायरेक्टर रिचर्ड जर्विस यांना. त्यात लिहिलेले शब्द होते, ‘Merry Christmas’.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१९९६ साली व्होडाफोनची प्रीपेड सेवा सुरू झाली. १९९८ मध्ये पहिला मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणार कंटेंट अर्थात रिंगटोन्सची सुरुवात झाली. क्रेझी फ्रॉग ही पहिली रिंगटोन होती आणि त्यावेळी ती विकत घ्यावी लागत होती.

१९९९ हे वर्ष मोबाईल तंत्रासाठी अतिशय महत्त्वाचं होतं, कारण याच वर्षी मोबाईलच्या बाजारात ‘ब्लॅकबेरी’ हा एक तगडा स्पर्धक उतरला होता, ज्यानं मोबाईल विश्वात क्रांतीच घडवून आणली.

बसल्या जागीच ई-मेल वाचता व पाठवता येणं शक्य झाल्यानं कॉर्पोरेट जगात हा फोन प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाला. याच वर्षी जपानमध्ये शिगेताका कुरीता यांनी इमोजीचा शोध लावला. त्यावेळेस इमोजी हे चित्रांच्या रुपात तयार करण्यात आले.

२००० साली फिनलँडच्या नोकिया या मोबाईल कंपनीचा Nokia 3310 हा हँडसेट बाजारात आला, ज्याने सुमारे १२ करोड हँडसेट्स इतक्या प्रचंड मोठ्या विक्रीसह पूर्ण बाजारपेठ काबीज केली. त्याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जपानमध्ये जगातला पहिला कॅमेरा फोन लॉंच झाला. पण तो केवळ जपानपुरताच मर्यादित राहिला. युरोपमध्ये मात्र कॅमेरा फोन यायला आणखी दोन वर्षं गेली. २००२ मध्ये आलेला Nokia 6750 हा युरोपमधला पहिला कॅमेरा फोन होता. २००३ सालात 3Gचा प्रवेश झाला, आणि मोबाईल इंटरनेटला वेग आला. आपल्या आशिया खंडात नेपाळ या देशानं 3Gला सर्वप्रथम स्वीकारलं. अगदी तिथं जगप्रसिद्ध असलेल्या माऊंट एव्हरेस्ट वरही 3G नेट सुरू झालं.

२००७ मध्ये ॲपल कंपनीनं पहिला आयफोन लॉंच केला. त्या पाठोपाठ पुढच्याच वर्षी २००८ मध्ये गुगलच्या अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमवरती आधारलेला पहिला अँड्रॉईड मोबाईलही बाजारात आला. २००९ मध्ये अमेरिकेत 4Gची सुरुवात झाली. साधारणत: 150MB इतका स्पीड त्यावेळी त्याचा होता (आपलं ब्रॉडबँडही कदाचित एवढ्या स्पीडचं नसेल). याचवर्षी व्हॉट्सऍप्प दाखल झालं.

त्यानंतर २०१० मध्ये साऊथ कोरियाच्या सॅमसंग कंपनीनं आपला गॅलॅक्सी सीरिजमधला पहिला ‘स्मार्टफोन’ बाजारात आणला. अगदी आजही स्मार्टफोन्समध्ये सॅमसंगचे गॅलॅक्सी सिरीजचे फोन बरेचसे लोकप्रिय आहेत. जेव्हा आयफोन व अँड्रॉईड फोन हे दोन्ही बाजारात आले, तेव्हा त्यांच्या बरोबरीनेच ॲपलचं ॲप स्टोअर आणि गुगलचं अँड्रॉईड मार्केट (नंतर त्याचं नाव गुगल प्ले स्टोअर असं बदललं गेलं) हे दोन्ही दाखल झाले.

सध्या आपण वापरतो, त्यात आयफोनव्यतिरिक्त बरेच फोन हे अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. अँड्रॉईड ही मुळात एक कंपनी होती, जी गुगलनं २००५ मध्ये विकत घेतली. मुळात अँड्रॉईड ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित आहे. आजवर अँड्रॉईडची बरीच व्हर्जन्स आलेली आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांची नावं आपण पाहिली, तर दोन गोष्टी दिसतात, एक म्हणजे यातली बरीच नावं ही कुठल्यातरी गोड पदार्थांच्या नावावरुन ठेवली आहेत आणि दुसरं म्हणजे ती अल्फाबेटिक म्हणजे A-B-C-D या क्रमानं ठेवण्यात आली आहेत. चला एक नजर टाकूया –

  • Cupcake
  • Donut
  • Eclair
  • Froyo
  • Gingerbread
  • Honeycomb
  • Icecream Sandwitch
  • Jellybean
  • KitKat
  • Lollypop
  • Marshmallow
  • Nougat
  • Oreo
  • Pie

आलं ना लक्षात? अँड्रॉईड ही मुळात फोनचं सूत्रसंचालन करणारी मूलभूत यंत्रणा आहे. त्याशिवाय गरजेनुसार त्यात इतर प्रकारची ॲप्स आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची असतात. आजच्या घडीला आपल्या गरजेनुसार हव्या त्या प्रकारची ॲप्स आपण डाऊनलोड करुन वापरु शकतो.

तर असा आहे आपल्या मोबाईलचा आजवरचा प्रवास. यात पुढेही काळानुरूप अनेक बदल घडत जाणार आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या भामट्याने एक नाही तर दोन वेळा आयफेल टॉवर विकला होता

Next Post

पाकिस्तानचं हे प्रवासी विमान हवेत तर झेपावलं पण कधीच लँड नाही झालं..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पाकिस्तानचं हे प्रवासी विमान हवेत तर झेपावलं पण कधीच लँड नाही झालं..!

दीपक चहरने त्यावेळी ग्रेग चॅपलचं ऐकलं असतं तर आपण एका अष्टपैलू खेळाडूला मुकलो असतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.