The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बराच लांबचा प्रवास करून गुलाब जामून आपल्या ताटात आलाय

by द पोस्टमन टीम
12 February 2025
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपल्याकडे कुठलाही सण असो की कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या मेजवानीला पूर्णत्व देण्यासाठी गोड पदार्थ असतातच. त्यातही गुलाबजामून हा सर्वात लोकप्रिय गोड पदार्थ आहे.

गुलाबजामूनचा नुसता उल्लेख मात्र तोंडाला पाणी आणायला पुरेसा आहे. मैद्यापासून तयार केले जाणारे हे लहान गोलाकार गुलाबजाम जेव्हा पाकात बुडवून खायला समोर ठेवले जातात, तेव्हा त्यांच्या अस्वादाने मिळणारा आनंदच वेगळा असतो.

भारतीय पक्वान्नात गुलाबजामचे स्थान मोठे आहे. परंतु आपल्याला माहिती आहे का गुलाबजाम हा पदार्थ आपल्या गोड चवीबरोबरच एका मोठ्या इतिहासाचा देखील धनी राहिलेला आहे. आज आपण बहूसंख्य लोकांच्या जिभेची तृष्णा भागवणाऱ्या या मिष्ठान्नाच्या इतिहासावर एक नजर टाकणार आहोत.

इतिहासात गुलाबजाम संदर्भात अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथा देखील इतकीच रंजक आहे. मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.



पर्शियन बमियाह आणि तुर्कीश तुलांबा हे दोन गोड पदार्थ देखील बहुतांश गुलाबजामशी साधर्म्य साधणारे आहेत. ते पदार्थ देखील मऊ असतात आणि त्यांना देखील साखरेच्या पाकाच्या माध्यमातून गोडवा प्रदान करण्यात येतो. फक्त गुलाब जाम हा थंड असेल तर वाढला जातो आणि ते गरमा गरम वाढले जातात, हाच काय तो मूळ फरक आहे. या परदेशी पदार्थांची प्रेरणा घेऊनच मुघल आचाऱ्यांनी गुलाब जामचा आविष्कार केला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

खाद्य संस्कृतीच्या इतिहासाचे आभ्यासक असलेल्या मायकल क्रॉंडी यांनी आपल्या पुस्तकात लिहले आहे की पर्शियन आक्र*मक भारतात गुलाबजाम घेऊन आले होते. गुलाबजाम हे नाव देखील पर्शियन लोकांनीच प्रदान केले असल्याचे ते नमूद करतात. इतकंच नाही ते पुढे लिहतात की भारतीय गुलाबजाम हे मध्य पुर्वेतील मिष्ठानांपासून वेगळे असून त्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर केला जातो. त्यांच्याप्रमाणे संपूर्ण गोळा तळून घेत नंतर आपण त्याचे तुकडे करत नाही.

एक असा मतप्रवाह देखील आहे की गुलाबजाम हा पदार्थ अरबस्तानातील ‘लुकमत अल काडी’ नावाच्या गोड पदार्थाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे, ज्याची निर्मिती देखील लहान गोलाकार गोळे मधात बुडवून त्यावर साखरेचा लेप लावून केली जाते.

लुकमत अल काडीचा अर्थ होतो असा पदार्थ जो एका कठोर न्यायाधीशाचे देखील मतपरिवर्तन घडवून आणू शकेल. यावरूनच हा पदार्थ किती किती लज्जतदार असेल याची कल्पना येते.

अरबस्तान आणि भारतीय भूमीतील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा परिणाम असा झाला की गुलाबजाम भारतात आला. भारतात गुलाबजाम देखील एकाच प्रकारचे नसून वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम भारतात उपलब्ध आहेत. यातून गुलाबजामच्या ऐतिहासिक वाटचालीची कल्पना देखील येते.

लेडीकिनी हा गुलाबजामचा प्रकार असून हे लांब सडक आणि तांबड्या राखाडी रंगाचे असतात. लेडीकिनी गुलाबजाम हे प्रामुख्याने कोलकाता शहरात मिळतात. या लेडीकिनी गुलाबजामची पण एक कथा आहे.

१८५० साली भीम चंद्र नाग या मिठाईवाल्याला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कॅनिंगच्या पत्नी लेडी कॅनिंगसाठी खास मिष्ठान्न तयार करण्याचे आदेश देण्यात आले. लेडी कॅनिंग यांच्यासाठी बनवलेलं खास मिष्ठान्न म्हणून त्या पदार्थाला लेडीकिनी हे नाव मिळाले. लेडी कॅनिंगला देखील हा गोड पदार्थ प्रचंड आवडला, तिने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात या पदार्थाचे वाटप केले. बंगालमध्ये या पदार्थाच्या प्रसाराला लेडी कॅनिंगने मोठा हातभार लावला होता.

बंगालमध्ये पांतूआ नावाचा अजून एक गुलाबजामचा प्रकार असून त्याला माव्याचे आवरण चढवलेले असते.

कुंभकोणम येथे गुलाबजामचा अजून एक प्रकार आढळून येतो. त्याला कुंभकोणमचा सुखा जामुन म्हणून ओळखले जाते. हा पदार्थ कुंभकोणमच्या मुरारी स्वीटवर मिळतो. एक परिवार अनेक वर्ष ह्या पदार्थाची विक्री कुंभकोणम शहरात करत आहे. हा सुखा जामुन तयार करण्याची पद्धत गुलाबजाम सारखीच असून फक्त या गुलाबजामला ७ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात येते, ज्यात तो गुलाबजाम पूर्णपणे पाक शोषून घेत कोरडा होतो. कुंभकोणमचा सुखा जामुन आकाराने लहान असतो. जर कधी तुम्ही तमिळनाडूच्या प्रसिद्ध कुंभकोणम तीर्थक्षेत्राला भेट दिली तर या सुखा जामुनचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

गुलाबजामच्याच परिवारात एक अजून प्रकार आहे, जो भारतातील बहुतांश लोकांचा लाडका आहे. तो म्हणजे काला जाम अथवा काला जामुन. काळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा गुलाबजाम नेहमीपेक्षा जास्त गोड असतो आणि अधिक तापमानावर तयार केला जातो. भारताच्या बहुतांश भागात हा काला जामुन सहज उपलब्ध होतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या तरुण मराठी सरपंचाने कोरोनालढ्याचं यशस्वी मॉडेल उभं केलंय

Next Post

ऑस्कर जिंकल्यामुळे चित्रपटाचा काय फायदा होतो..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ऑस्कर जिंकल्यामुळे चित्रपटाचा काय फायदा होतो..?

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी देशासाठी शहीद झालेले अमर क्रांतिकारक हेमू कलानी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.