The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि आपल्याला तीन मोस्ट वॉंटेड आतं*कवा*द्यांना सोडून द्यावे लागले

by ऋजुता कावडकर
23 December 2025
in विश्लेषण, इतिहास, राजकीय, संपादकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“नमस्कार! इंडिअन एअरलाईन्स के आईसी-814 इस फ्लाईट में आपका स्वागत है. हम अब उडान भरने के लिये तैयार है. काठमांडू से दिल्ली तक की दुरी हम १ घंटे और २० मिनिट में तय करेंगे.”

सूचना ऐकल्यासारखी वाटते ना? ही सूचना होती २४ डिसेंबर १९९९च्या साधारण दुपारी ४ वाजताच्या काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाची. ख्रिसमसच्या आधीची संध्याकाळ होती. नेपाळहून नवीन वर्षाचीच नाही तर नव्या सहस्रकाची आनंदी सुरुवात करण्यासाठी सगळे आपापल्या घरी परतत होते.

विमानातील ११ कर्मचारी आणि १७८ प्रवासी, ज्यामध्ये २४ विदेशी नागरिकसुद्धा होते, असे एकूण १८९ लोकं त्या विमानाने भारतात येत होते. या प्रवाशांना कल्पनासुद्धा नव्हती की त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले हे विमान संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी भारताच्या हवाई क्षेत्रात शिरले. पण विमान दिल्लीला उतरणार, एवढ्यात…

विमानात असलेल्या ५ द*हश*तवाद्यांनी विमान बळकावले.



त्या ५ जणांपैकी सगळ्यात आधी एक द*हश*तवादी उठला आणि त्याने विमान उडवून टाकण्याची धमकी देत कॉकपिटमध्ये प्रवेश केला. पायलटला धमकावत त्याने विमान पश्चिमी दिशेला घ्यायला सांगितले. तोपर्यंत इकडे उरलेल्या द*हश*तवाद्यांनी लहान मुलांना आणि मोठ्यांना वेगळं केलं. ग्रेनेड, पिस्तुल, चाकू असतील ती ह*त्यारं घेऊन उरलेले चौघे विमानात चारही बाजूंना पसरले.

thepostman

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

कॉकपिटमधील द*हश*तवाद्याने पायलटला विमान पाकिस्तानच्या दिशेने घ्यायला सांगितले. कॅप्टन देविशरण यांनी भारताबाहेर विमान जाऊ न देण्याचा प्रयत्न म्हणून फार फार तर मुंबई किंवा अहमदाबादपर्यंत जाऊ शकेल एवढेच इंधन विमानात असल्याचे सांगितले. आतं*कवा*द्याला हा डाव लक्षात आल्याने त्याने विमान लाहोरला घ्यायला सांगितले. हे सगळे घडेपर्यंत भारत सरकारला याचा काहीच आगापिछा नव्हता.

देविशरण यांनी मोठ्या चतुराईने आतं*कवा*द्याचं लक्ष नसताना इमर्जन्सी बटण दाबलं. लगेच भारताच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला निरोप मिळाला की आईसी-814 या विमानाचे अपहरण करण्यात आले आहे.

इकडे कॅप्टन विमान पाकिस्तानला घेऊन जाऊ नये यासाठी द*हश*तवाद्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर न्यायचे नव्हते. त्याचवेळी तिकडे पाकिस्तानातसुध्दा या अपहरणामुळे खळबळ उडाली होती. त्यांना भीती होती की हे विमान आपल्या हद्दीत उतरू नये. यासाठीच लाहोर एटीसीने (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमानाला लाहोरमध्ये उतरू देण्याची परवानगी नाकारली. त्यांनी आपल्या हवाई सीमा सील केल्या.

कॅप्टननी याच गोष्टीचा फायदा उचलला. देविशरणने विमानाची गती पार ४०% पर्यंत कमी केली होती. त्यांचा अंदाज होता की विमान दिल्ली नाही तर अमृतसरला उतरेल. तोपर्यंत विमानातील इंधन देखील संपत आले होते. आता विमान जर कुठे उतरवले नाही तर ते crash होण्याची शक्यता होती. त्यांनी आतं*कवा*द्यांकडून विमान उतरवण्याची परवानगी मिळवली आणि अमृतसरला विमान उतरवण्यात आले.

हे विमान उतरलं तर खरं पण तिथे काहीही कारवाई करण्याची परवानगी तत्कालीन पंतप्रधानांनी स्थानिक पोलिसांना दिली नाही. दिल्लीवरून नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स या स्पेशल फोर्सचे जवान तिथे येईपर्यंत त्यांना वेट अँड वाॅचचे आदेश होते.

इकडे विमानात इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ बघून आ*तंक*वादी बेचैन होत होते. त्यांनी तसेच विमान उडवायला सांगितले. पण अर्थातच आपल्या कॅप्टननी त्याला स्पष्ट नकार दिला. विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांनी प्रवाशांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातच रुपन कात्याल या तरुणाला सुरा भोसकून जीवे मारण्यात आले.

रूपनचे अवघ्या २० दिवसांपूर्वी लग्न झाले होते . तो आणि त्याची पत्नी फिरायला म्हणून नेपाळला गेले होते. आनंदाने नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचे स्वप्न बघणाऱ्या त्यांना असं काही अघटित घडेल याची कल्पना देखील नव्हती.

हा सगळा प्रकार बघून प्रवासी प्रचंड घाबरले. कारण आ*तंक*वाद्यांनी धमकी दिली की आता विमान इथून निघाले नाही तर ते एक एक करुन सगळ्या प्रवाशांना जीवे मारतील.

इकडे कॅप्टनला बाहेर काय चालू आहे हे कळायला मार्ग नव्हता. तसं बघायला गेलं आत्तापर्यंत मदत यायला हवी होती. अमृतसरला विमान उतरवलं तर सरकारला या लोकांशी काही बोलाचाली करुन प्रवाशांना आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांना वाचवता येईल असा त्यांचा अंदाज होता. पण सरकार काही कार्यवाही करेल याआधीच अवघ्या तासाभरात विमानाने पुन्हा एकदा लाहोरच्या दिशेने झेप घेतली.

हरकत-उल-मुजाहिद्दीन या द*हश*तवादी संघटनेशी संलग्नित असणारे इब्राहीम अतहर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काजी, मिस्त्री जहूर इब्राहीम आणि शाकिर हे पाचही आ*तंक*वादी पाकिस्तानी होते. त्यामुळे लाहोरला विमान उतरवू याबद्दल निश्चिंत होते.

रात्र होता होता विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरले. अजूनही पाकिस्तानी सरकार त्यांना लाहोरला उतरवू देण्यास तयार नव्हती. त्यांनी विमान उडवून टाकण्याची धमकी देऊनही आ*तंक*वादी नरमले नाही. शेवटचा उपाय म्हणून लाहोर एटीसीने विमान उतरतं त्या रनवे वरील लाईट बंद केले, जेणेकरून विमान उतरवणे शक्य होणार नाही.

याबद्दल माहिती नसल्याने कॅप्टनने लाईट दिसेल त्या ठिकाणी विमान उतरवण्यास सुरुवात केली. पण तो इतर वाहतुकीचा रस्ता होता. शहरात अपघात होऊ नये यासाठी एटीसीने रनवेवरील लाईट्स चालू केल्या. परंतु ते फार काळ विमानाला लाहोरमध्ये ठेवण्याच्या पक्षात नव्हते. एवढंच काय तर किमान वृद्ध आणि लहान मुलांना तरी इथे उतरू द्या अशी कॅप्टनची विनंती त्यांनी भीतीपोटी धुडकावून लावली होती.

आणि पुन्हा एकदा इंधन भरून झाल्यावर हे विमान उडाले खरे, पण उतरणार कुठे याची अर्थातच काहीच माहिती नव्हती.
आ*तंक*वाद्यांची इच्छा होती की विमान काबुलला उतरवावे. पण एवढ्या रात्री तिथे विमान उतरवण्याची सोय नसल्या कारणाने विमानाला दुबईच्या दिशेने वळवण्यात आले. याच संधीचं सोनं करुन घ्यायचं भारत सरकारने ठरवलं. यासाठी त्यांनी दुबईच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सगळी परिस्थिती कथन केली आणि मदत मागितली. इथे कमांड ऑपेरेशन करुन आपल्या नागरिकांची सुटका करण्याचा सरकारचा विचार होता.

दुबईला पुन्हा एकदा इंधन भरणे आवश्यक होते, त्याबरोबरच खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा करावी लागणार होती. याचा फायदा तिथल्या अधिकाऱ्यांनी घेतला. इंधन आणि भोजन व्यवस्थेच्या बदल्यात त्यांनी त्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडून देण्यास सांगितले. हो नाही करता करता ते २४ लोकांना सोडायला तयार झाले. १८९ पैकी फक्त २४. त्यात जखमी लोकं, महिला आणि लहान मुलं होती. या सगळ्यांमध्ये त्यांनी रूपनचे पार्थिवसुद्धा दुबईच्या त्या अधिकाऱ्यांच्या हवाली केले. हो! दुबईला पोहोचण्याच्या थोडाच वेळ आधी रूपननी आपली जगण्याची धडपड संपवली होती.

हे सगळं आटोपून विमान सरतेशेवटी अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या कंदाहारला उतरवण्यात आले. उतरल्या उतरल्या या विमानाला भारतीय सुरक्षा दलापासून लांब ठेवण्यासाठी तालिबानच्या लोकांनी चारही बाजूंनी विमानाला घेरले.

सगळीकडे स्वतःच्या नावाची द*हश*त वाढवण्याची नामी संधी तालिबान्यांच्या दारात आता चालून आली होती. भारताला तालिबानची ही हुकुमत मान्य नव्हती. पण त्यांना कुठलेही ऑपरेशन कंदाहारमध्ये करायचे असेल तर तालिबानची परवानगी घेणं गरजेचं होतं.

thepostman

याच अनुषंगाने २७ डिसेंबरला अपहरणकर्त्यांसोबत वाटाघाटी करण्यासाठी भारताने काही लोकांची नियुक्ती केली यामध्ये काही कमांडोचा पण सामावेश होता. विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल हे त्या टीमचे प्रमुख होते. भारताला कंदाहारमध्ये एक कमांडो ऑपरेशन करायचे होते पण हे तालिबान्यांना आपल्या बाजूने वळवल्याशिवाय शक्य नव्हते.

डोवाल आणि इतर साथीदारांनी तालिबानला मदतीसाठी विचारले. तालिबान अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी करायला तयार झाला. पण, “आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहायला नको” चोराच्या उलट्या बोंबा मारत त्यांनी भारताला कमांडो ऑपरेशन करू देण्यास नकार दिला. 

आत्ता अपहरण करण्याचे खरे कारण पुढे आले. अपहरणकर्त्यांनी आपला म्होरक्या मौलाना मसूद अजहरच्या सुटकेच्या बदल्यात सगळ्या प्रवाशांना आणि विमान कर्मचाऱ्यांना सोडू असा प्रस्ताव मांडला. मसूद हरकत-उल-मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रमुख होता. याला १९९४ साली पकडल्यानंतर जम्मू येथील कोट भालवाल जेलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. विमानाचे अपहरण करण्याऱ्या आ*तंक*वाद्यांमध्ये मुख्य मसूदचा लहान भाऊच होता.

पण ते एवढी एकच मागणी करुन थांबले नाही. ३० तास चाललेल्या चर्चेनंतर त्यांच्या सगळ्या मागण्या समोर आल्या.

१. मौलाना मसूद अजहरची सुटका.

२. आतं*कवा*दी सज्जाद अफगाणीची शवपेटी.

३. अजहरसोबत पकडल्या गेलेल्या 35 आ*तंक*वाद्यांची सुटका.

४. आणि २० करोड डॉलर एवढी खंडणी.

तत्कालीन पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी आ*तंक*वादी संघटनांसमोर झुकायला कदापि तयार नव्हते. तालिबान भारत सरकार आणि अपहरणकर्ते यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. पण दोघंही आपल्या म्हणण्यावर ठाम होते. शेवटी अपहरणकर्त्यांनी शव आणि खंडणीची रक्कम या दोन मागण्या सोडून दिल्या.

पण अजहर आणि इतर साथीदारांच्या सुटकेबाबत मात्र ते माघार घ्यायला तयार नव्हते. बऱ्याच वेळ अशाप्रकारे चर्चा झाल्यानंतर सगळ्या ओलीस ठेवलेल्या लोकांच्या बदल्यात ३ आ*तंक*वादी सोडून देण्यास भारत सरकार तयार झाले.

या तीन आतंकवाद्यांमध्ये एक तर होता मौलाना मसूद अजहर. दुसरा होता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उत्तीर्ण झालेला ब्रिटीश नागरिक, अजहरचा खास चेला उमर शेख उर्फ अहमद उमर सईद शेख. याला कश्मिरमध्ये विदेशी नागरिकांचे अपहरण करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती आणि तिसरा होता मुश्ताक अहमद झरगर. अल-उमर मुजाहिद्दीन या आ*तंक*वादी संघटनेचा मुख्य कमांडर.

सरतेशेवटी भारत सरकारला यांना सोडावेच लागले. अपहरण झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर १९९९ रोजी जम्मूहून एका खास विमानाने यांना आधी दिल्लीला आणले गेले मग तिथून कंदाहारला नेण्यात आले. त्यांना तिथे अपहरणकर्त्यांच्या हवाली सोपवून आपल्या नागरिकांना सुखरूप घेऊन भारताची टीम दिल्लीला यायला निघाली.

या पाच द*हश*तवाद्यांपैकी सर्वांत क्रू*र द*हश*तवादी मिस्त्री जहूर इब्राहीम २०२२ च्या मार्चमध्ये पाकिस्तानात मारला गेला.

या तीन “मोस्ट वॉंटेड” आतंकवाद्यांना सोडवण्यासाठी १८९ निर्दोष नागरिकांच्या डोक्यावर तब्बल १७३ तास मृत्यूची टांगती तलवार होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: kandahar hijack
ShareTweet
Previous Post

या सनकी राजाने स्वतःच्या घोड्याला मंत्री केलं होतं

Next Post

लढून रद्द करायला लावलेली बंगालची फाळणी इंग्रजांनी परत आपल्या माथी मारलीच

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लढून रद्द करायला लावलेली बंगालची फाळणी इंग्रजांनी परत आपल्या माथी मारलीच

गंडभेरुंड - किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर कोरलेला एक गूढ पौराणिक पक्षी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.