The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्वयंघोषित डॉक्टरने मायकल जॅक्सनचा पण इलाज केला होता

by द पोस्टमन टीम
10 November 2024
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आपण आजारी पडलो की, डॉक्टरकडे जातो. सर्वात जास्त चांगल्या डॉक्टरकडे जाण्याकडे आपला कल असतो. साधा सर्दी-खोकला असेल तर आपण जनरल फिजिशियनकडे जातो. मात्र, जास्त गंभीर त्रास होत असेल तर एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याला प्राधान्य दिलं जातं. कारण, सर्वोत्तम तज्ज्ञाकडून आपला उपचार व्हावा अशी आपली इच्छा असते. मात्र, तुम्हाला जर अचानक कोणी सांगितलं की तुम्ही ज्या डॉक्टरकडून उपचार घेतले त्याची डिग्री बनावट आहे तर? नक्कीच तुमची भीतीनं गाळण उडेल ना? ज्या व्यक्तीकडे वैद्यकीय शिक्षणच नसेल त्या व्यक्तीकडून उपचार करून घेणं किती धोकादायक आहे, याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकालाच असेल.

मात्र, पॉपस्टार मायकल जॅक्सनला कदाचित याची कल्पना नव्हती किंवा त्याला भीती वाटली नसावी. कारण, त्यानं एका स्वयंघोषित डॉक्टरकडून स्वत:चे उपचार करून घेतले होते! अनेकांना ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल मात्र, ही बाब एकदम खरी आहे. मायकलनं डॉ. सेबी नावाच्या एका व्यक्तीकडून उपचार करून घेतले होते. ही व्यक्ती नेमकी कोण होती आणि तो कशा पद्धतीनं उपचार करत होता, याबाबत हा विशेष लेख…

सेबी नावानं प्रसिद्ध असलेल्या या स्वयंघोषित डॉक्टरचं खरं नाव अल्फ्रेडो बोमन होतं. १९३३ साली मध्य अमेरिकेतील होंडुरास येथे त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा हैतीमधून होंडुरासमध्ये स्थलांतरित झाले होते. सेबीनं आपल्या आजीकडून हर्बल उपचार आणि उपचाराच्या पारंपारिक पद्धती शिकून घेतल्या होत्या. त्याला स्वत:ला दमा, मधुमेह, नपुंसकता आणि दृष्टीदोष यांसारख्या अनेक समस्या होत्या. त्यासाठी त्यानं पाश्चात्य वैद्यकीय पद्धतींचा वापर करून उपचार घेतले होते. मात्र, त्याला फरक पडला नाही. त्यामुळं सेबी निराश झाला.

त्यानंतर त्यानं मेक्सिकोमधील अल्फ्रेडो कॉर्टेझ नावाच्या हर्बलिस्ट (वनस्पतींचा वापर करून उपचार करणारी व्यक्ती) विक्रेत्याला भेट दिली. सेबीचा मृत्यू जवळ आल्याची पुष्टी कॉर्टेझनं केली. मात्र, सेबीला त्याच्यावर विश्वास बसला नाही. आपल्या आजीकडून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या आजारांवर आपणच उपचार शोधायचे या हेतूनं त्यानं काम सुरू केलं.

सेबीनं होंडुरासमध्ये स्वतःची उपचार पद्धती सुरू केली. त्यानं ‘आफ्रिकन बायो-इलेक्ट्रिक सेल फूड थेरपी’ नावाची एक उपचार पद्धती विकसित केली. आपल्या उपचार पद्धतीमुळं कॅन्सर, एड्स आणि विविध प्रकारचे जुनाट शारीरीक व मानसिक आजार बरे होऊ शकतात, असा त्यानं दावा केला. त्यासाठी त्यानं अनेक हर्बल उत्पादने देखील तयार केली.



सेबीनं १९८०च्या दशकात होंडुरासजवळ एक केंद्र स्थापन केलं आणि युनायटेड स्टेट्समध्ये त्याच्या हर्बल उत्पादनांची विक्री सुरू केली. त्यानं आपल्या केंद्राला यूएसएचए (USHA) संशोधन संस्था, असं नाव दिलं होतं. 

त्यानंतर परवान्याशिवाय औषधोपचार केल्याबद्दल त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. परंतु त्यानं वैद्यकीय निदान केल्याचं सिद्ध न झाल्यानं त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये ग्राहकांची फसवणुक केल्याच्या कारणानं त्याच्यावर यशस्वीरित्या खटला भरण्यात आला. या प्रकरणात त्याला ९०० डॉलर्स दंड भरावा लागला. नंतर त्याच्यावर होंडुरासमध्ये मनी लाँड्रिंगचे देखील आरोप ठेवण्यात आले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सेबीनं विकसित केलेली उपचार पद्धती निव्वळ एका समजूतीवर आधारित होती. आपल्या शरीरातील विविध ॲसिड नियंत्रित करण्यासाठी अल्कधर्मी पदार्थ आणि औषधी वनस्पती, ज्यांचा पीएच रेशो ७ पेक्षा जास्त आहे, अशा आवश्यक आहेत. शरीरातील ॲसिड आणि क्षार संतुलित ठेवल्यास विविध आजारांना कारणीभूत असलेला म्यूकस तयार होण्यास आळा बसतो, असा सेबीचा समज होता. मात्र, हा त्याचा समज वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं निव्वळ गैरसमज होता. खरे पाहता रक्तातील पीएचमध्ये लक्षणीय बदल करता येऊ शकत नाहीत. रक्तामध्ये कार्बोनिक असिड आणि सोडियम बायकार्बोनेटचे रेणू असतात ज्यांच्यामुळं रक्तातील पीएच 7.35 ते 7.45 दरम्यान राहते.

पीएचचं प्रमाण यापेक्षा जास्त झाले की आजारपण येतं किंवा व्यक्तीचा मृत्यू होतो. अगदी हायस्कूल पातळीवरील बायोलॉजीच्या अभ्यासक्रमात देखील ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळते. मात्र, सेबीच्या डोक्यात ही माहिती काही घुसली नाही. तो आपल्या समजुतीच्या आधारे विविध हर्बल अर्क तयार करत राहिला आणि त्यांची विक्री करत राहिला.

सेबीनं तयार केलेल्या हर्बल अर्कांबदद्ल सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, औषधी वनस्पती, शैवाल आणि समुद्री शैवालांचा समावेश असलेले द्रव आणि भूकटीच्या स्वरूपातील पदार्थ होते. त्यांना आफ्रिकन बायो मिनरल बॅलन्स कंपाउंड देखील म्हणतात. त्याच्या अनेक कंपाउंडमधील सर्व घटक बाटल्यांवरती दिले गेलेले नव्हते. उदाहणार्थ, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी सेबीनं एक हर्बल टी तयार केला होता. या टीमधील घटकांपैकी फक्त एक घटक उघड केलेला होता. ज्याला ‘फ्लोर डी मनिता’ किंवा चिरॅन्थोडेन्ड्रॉन असेही म्हणतात. ही एक प्रकारची वनस्पती असून त्याचा फूलझाडांमध्ये समावेश होतो. ग्वाटेमाला आणि दक्षिण मेक्सिकोमध्ये ती प्रामुख्यानं आढळते.

सेबीच्या मते प्राचीन काळापासून तिचा हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. म्हणून त्यानं तिचा वापर करून एक हर्बल टी तयार केला. मात्र, ही गोष्ट जर खरी असती तर आतापर्यंत जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे एखाद्या संशोधकानं तरी तिची परिणामकारकता तपासण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, त्याबाबत कुठलीही माहिती आढळलेली नाही.

सेबीची काही औषधं ‘डिटॉक्सिफिकेशन’ सोल्यूशन्स म्हणून विकली जातात. आपल्या शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडले की शरीर निरोगी राहते. हा शरीरशास्त्रातील साधा नियम आहे.

मात्र, आपले मूत्रपिंड आणि यकृत व्यवस्थित काम करत असेल तर शरीराला नियमित डिटॉक्सची आवश्यकता नाही, हे देखील तितकेच खरे आहे. ही गोष्ट सेबीला मान्य नव्हती म्हणून त्यानं विविध डिटॉक्सिफिकेशन सोल्यूशन्स तयार केली होती. 

सेबीच्या वैद्यकशास्त्राबाबत असलेल्या काही समजुती मूर्खपणाच्या पलीकडे आणि स्यूडोसायन्समध्ये गेल्या होत्या. २००२ मध्ये त्यानं युनायटेड स्टेट्समधील झिम्बाब्वेच्या राजदूताला लिहिलेल्या पत्रात, असा दावा केला होता की आफ्रिकन जनुकांमध्ये उच्च विद्युत अनुनाद (high electrical resonance) आहे. प्रत्यक्षात त्यानं केलेल्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नव्हते. आपल्या जनुकांमध्ये काही प्रमाणात दीर्घकालीन भौतिक परिस्थितीचा परिणाम दिसून येतो. सेबीनं सांगितल्याप्रमाणं उच्च विद्युत अनुनाद असलेला आफ्रिकन जनुकांचा कुठलाही प्रकार अस्तित्त्वात नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेबीकडं वैद्यशास्त्राची कुठलीही अधिकृत डिग्री नसून देखील तो प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. अगदी हॉलिवूड सेलिब्रेटी देखील त्याच्याकडून हर्बल औषधे घेऊन जात होते.

२००४ मध्ये, पॉपस्टार मायकल जॅक्सनवर बाल शोषणाचा खटला भरण्यापूर्वी सेबीनं त्याच्यावर उपचार केले होते. सेबीनं आफ्रिकन बायो-इलेक्ट्रिक सेल फूड थेरपीसह, मायकलला पेनकिलर डेमेरोल आणि मॉर्फिनच्या व्यसनावर मात करण्यास मदत केल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यानं जॅक्सनसोबत कोलोरॅडोतील ऍस्पनमध्ये सहा महिने काम केलं होतं. मात्र, जॅक्सनच्या पब्लिसिस्ट असलेल्या रेमन बेननं सेबीचा दावा फेटाळून लावला होता. यावरून सेबी आणि बेन दरम्यान काही कायदेशीर वाद देखील झाले होते.

६ जून २०१६ मध्ये सेबीला मनी लॉन्ड्रीगच्या प्रकरणात अटक झाली. तुरुंगात असताना त्याला न्युमोनियाची लागण झाली. त्यानंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. ६ ऑगस्ट रोजी त्याची अत्यावस्थ स्थितीमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानं रुग्णालयात जाण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला. सेबीच्या हर्बल औषधांबाबत अनेक वाद-विवाद आहेत. तरी देखील त्याला माननारा एक मोठा गट अमेरिकेमध्ये अस्तित्त्वात आहे, हे विशेष.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या कलियुगातल्या भीमाने व्हॉईसरॉयची फुल्ल स्पीडमधली गाडी साखळीने थांबवली होती

Next Post

आपलं जेवण गोड करणाऱ्या साखरेचा इतिहास माहिती करून घ्या..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आपलं जेवण गोड करणाऱ्या साखरेचा इतिहास माहिती करून घ्या..!

थॉमस एडिसनने त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एका हत्तीणीचा शॉक देऊन बळी घेतला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.