The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगप्रसिद्ध बीटल्स कलकत्त्यातील या छोट्याशा दुकानातून सितार खरेदी करत

by द पोस्टमन टीम
8 February 2024
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


कलकत्त्याच्या गजबजलेल्या रास बिहारी रस्त्यावर हिमेन आणि कंपनी नावाचे भारतीय वाद्यांचे एक छोटेखानी दुकान आहे, जे प्रथम दर्शनी लक्षातसुद्धा येत नाही. परंतु, या दुकानाला ७ दशकांची एक समृद्ध ऐतिहासिक परंपरा आहे. वृद्धत्वाकडे झुकत चाललेली व्यक्ती जशी वरून थकलेली दिसते पण आतून समृद्ध असते तसेच काहीसे या दुकानाचे आहे.

दुकानाच्या दर्शनी बाजूची पडझड झाली असली तरी दुकानाच्या आत शिरताच तुम्हाला एका समृद्ध वारस्याचा आणि खजिन्याचा शोध लागतो. या दुकानात सितार, गिटार, हार्मोनियम, व्हायोलिन अशी अनेक वाद्ये पाहायला मिळतील. कधीकाळी संगीतातील दिग्गज व्यक्तींनी या दुकानातूनच त्यांना हव्या असलेल्या वाद्यांची खरेदी केलेली आहे.

दुकानाच्या मागच्या भिंतींवर लावलेल्या फोटोंवरून दुकानाची एकेकाळीची समृद्धी आणि संगीत वाद्यांचा खजिना चटकन लक्षात येतो. जॉर्ज हॅरीसन, यहुदी मनुहिन आणि आयन अँडरसनसारख्या विदेशी संगीत कलाकारांनी देखील कधीकाळी येथूनच त्यांना हवी असणारी वाद्ये बनवून घेतली होती.

पंडित रवी शंकर आणि अनुष्का शंकरसारखे दिग्गज कलाकार नेहमीचे इथले ग्राहक होते.



छताला लटकवलेले सितार आणि व्हायोलीन, हार्मोनियम असे वाद्यांनी गजबजलेले कपाट, शेजारच्या भिंतीवर सजवलेले गिटार, सरोद आणि त्याच रेषेत अगदी शेवटी हातात एखादी सुंदर सितार घेऊन त्यावर काम करणारे रतन कुमार सेन.

हे दृश्य तुम्हाला संमोहित करते.

भीमसेन जोशी, नुसरत फतेह आली खान, संध्या मुखोपाध्याय, परवीन सुलताना यासारखे दिग्गज कलाकार कधीकाळी या दुकानाला वारंवार भेट देत. इथल्या दुकानात तयार झालेल्या वाद्यांची कसून तपासणी करूनच त्यांची खरेदी करत. हिमेनची ख्याती फक्त भारतापुरतीच मर्यादित नव्हती तर सातासमुद्रापार पोहोचली होती. म्हणूनच बीटल्स ग्रुपचे जानेमाने संगीत कलाकार देखील या दुकानातूनच त्यांना लागणाऱ्या संगीत साहित्याची खरेदी करत असत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कलकत्त्यातील सेन कुटुंबाची दुसरी पिढी या व्यवसायात आहे. संगीताचे आणि त्यांच्या दुकानाचेही गतकालीन वैभव लयास गेले असले तरी हे कुटुंब फक्त उदरनिर्वाह म्हणून किंवा व्यवसाय म्हणून नव्हे तर आपली आवड आणि छंद म्हणून अजूनही वाद्यनिर्मितीचा हा वारसा जपत आहेत. इथून पुढेही हा वारसा जपण्याचा त्यांचा निर्धार आहे.

इथे मिळणारे प्रत्येक वाद्य हे हाताने बनवलेले असते. इथल्या वाद्यांना एक वर्षाची गॅरंटी दिली जात असली तरी ही वाद्ये वर्षानुवर्षे टिकतात.

इथे सितार बनवण्यासाठी लागणारे लाकूड हे खास आसाममधून मागवण्यात येते तर, सरोद बनवण्यासाठी लागणारे कोकराचे कातडे कालीमातेच्या मंदिरातून मागवले जाते. सध्या अनेक ठिकाणी कोकरांचा बळी देण्याची प्रथा बंद केल्याने कोकराच्या कातड्यासाठी अव्वाच्यासव्वा किंमत मोजावी लागते. एक सरोद किंवा हार्मोनियम बनवण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.

“याकडे आम्ही एक व्यवसाय म्हणून पाहत नाही तर आमच्यातील कलेचा अविष्कार म्हणून पाहतो,” असे रतन म्हणतात. “पैसा तर महत्वाचा आहेच पण, वाद्यांचा दर्जा राखणे त्याहून जास्त महत्वाचे आहे. आमचे वडील हिमेन चंद्र सेन नेहमी म्हणायचे की, कोणतेही वाद्य सहजरीत्या कसे हाताळावे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते वाद्य निगुतीने बनवण्याची कला आत्मसात करू शकणार नाही.”

संगीत आणि संगीतकार हे दोन घटक तंतोतंत जुळल्याशिवाय संगीत पूर्ण होत नाही, असेही ते म्हणत. वाद्याशिवाय संगीतकार आणि संगीतकाराशिवाय वाद्य दोन्हीही अपूर्णच आहेत. म्हणूनच चांगला संगीतकार आणि चांगले वाद्य यांची जोडी जमली पाहिजे.

“आमच्याकडील सर्व वाद्ये हातांनीच बनवली जातात त्यामुळे ती वर्षानुवर्षे टिकतात. आमच्यासाठी हा व्यवसाय नाही तर वारसा हक्काने मिळालेली एक कला आहे आणि ही कला आम्ही पुढच्या पिढीकडेही हस्तांतरित करू. याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे.”

हिमेन सेन यांच्या हाताखालीच रतन आणि तपन यांनी ही कला आत्मसात केली. त्यांच्या मृत्यूपश्चात आज दोघेही भाऊ वडिलांचा हा व्यवसाय सांभाळत आहेत. हिमेन वयाच्या दहाव्या वर्षापासून सितार वाजवत होते. वयाच्या १७व्या वर्षी ते कोमिला (सध्या बांगलादेश) येथून कलकत्त्यात सितार शिकण्यासाठी आले. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे त्यांनी सितारची तालीम घेतली.

एकदा सितार वाजवता वाजवता हिमेन यांचे सितारची तार तुटली. अलाउद्दीन खान यांनी त्यांना स्वतःची सितार दुरुस्त करायला लावली. सितार दुरुस्त करण्यातील त्यांचे कसब पाहून खान साहेबांनी स्वतःकडील सगळ्या वाद्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी हिमेन यांच्यावरच सोपवली. फक्त खान साहेबच नाही तर त्याच्या मैहर बँडमधील सगळ्याच वादकांची वाद्ये दुरुस्त करण्याची जबाबदारीही हिमेन यांनाच देण्यात आली.

नंतर १९४७मध्ये भारताला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा हिमेन यांनी कलकत्ता येथे वाद्य दुरुस्तीचे हे छोटेसे दुकान उभारले. भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपली वाद्ये इथून बनवून नेली आहेत. वाद्यांच्या दुरुस्तीचे कामसुद्धा ते हिमेनकडूनच करवून घेत असत.

या व्यवसायामुळे अनेक कलाकारांशी हिमेनची मैत्री झाली. पंडित रवी शंकर यांपैकीच एक. पंडितजी आपली वाद्ये नेहमी हिमेन यांच्याकडूनच बनवून नेत पण, याबदल्यात हिमेनजी कधीही त्यांच्याकडून मोबदला घेत नसत. त्यांचा कलेची आणि कष्टाची दाद म्हणून पंडित रविजी आपल्या गाण्यांच्या रेकॉर्डींग्ज पाठवत असत. त्यांच्यातील हे सख्य कायम टिकून राहिले.

बीटल्स ग्रुपचे चारही वादक हिमेनजींकडूनच वाद्ये बनवून घेत. जॉर्ज हॅरीसन हे पंडित रविजींकडे भारतात संगीत शिकायला येत. त्यांनी रतनजींकडून सितार नेले होते. रतनजींनी देखील हॅरीसन यांच्याकडून सितारचे पैसे घेतले नाहीत. हॅरीसन यांनी त्याची जाणीव ठेवत त्यांच्यासाठी जर्मनहून एक मोठा लाकडी टेपरेकॉर्डर पाठवला होता.

कित्येक कलाकारांनी त्यांच्याशी आजही असाच सौहार्द जपला आहे. आज वडील जिवंत असते तर त्यांना या सौहार्दाच्या कथा अभिमानाने सांगता आल्या असत्या. पण, आज हे सगळे वैभव आणि त्यांचा वारसा त्यांच्याप्रमाणेच पुढे सांभाळला जातोय हे पाहायला ते हयात नाहीत याचीच खंत रतनजींना नेहमी सलत असते.

हा वसा आणि वारसा पुढच्या पिढ्यांनीही असाच जपावा इतकीच त्यांची इच्छा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना ‘धर्म’ दिला

Next Post

आपल्याला माहितही नसलेल्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव नासाने चंद्रावरील क्रेटरला दिलंय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आपल्याला माहितही नसलेल्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव नासाने चंद्रावरील क्रेटरला दिलंय

त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचं साहस आपण कधीच विसरू शकणार नाहीत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.