The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कितीही मोठ्या आणि अवघड साखळदंडात बांधा, हॅरी हुडिनी त्यातून सुटायचाच

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जादू म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवणे. जादूचे खेळ पाहण्यासाठी म्हणूनच आजही लोक उत्सुक असतात. कारण, या खेळात अशक्य गोष्टी शक्य होतात. जादू आणि जादुगार यांच्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. तसेच त्यांच्याबद्दल आकर्षणही आहे. जादू म्हटले की जगप्रसिद्ध जादुगार हॅरी हुडीनीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हुडीनीचा एस्केप आर्ट हा खेळ पाहणाऱ्याचे श्वास रोखले जात. पाहणाऱ्याला वाटे आता हुडीनी मरतो की काय पण प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढेपर्यंत हुडीनी पुन्हा पूर्ववत स्टेजवर उभा असे.

त्याच्या या खेळासाठी तर प्रेक्षक त्याच्या प्रयोगांना हमखास गर्दी करत. अशाच एका शो दरम्यान अचानक तो बेशुद्ध झाला. दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. स्टेजवर बेशुद्ध झालेला हुडीनी परत उठलाच नाही.

शो करता करताच हुडीनी पडतो काय आणि तो कायमचाच जातो काय, सगळेच अनाकलनीय. त्याच्या मृत्यूने आजही अनेकांना कोड्यात टाकले आहे.

तर झाले असे की, ११ ऑक्टोबर १९२६ रोजी तो असाच आपल्या प्रयोगात व्यस्त होता. एका ठिकाणानंतर दुसऱ्या ठिकाणी असे त्याचे शो सतत सुरू होते. लोकांना हुडीनीने वेड लावले होते. न्यूयॉर्कच्या अल्बेनी येथे हुडीनीचा शो होता. त्याच्या या प्रयोगासाठी लोकांनी अमाप गर्दी केली होती. लोकांना खास आकर्षण होते ते त्याच्या एस्केप आर्टचे.

हुडीनीला पाहताच लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. एकामागून एक आपले सगळे प्रयोग त्याने लोकांसमोर सादर केले. पण लोक उत्सुक होते त्याचा सर्वात खास प्रयोग पाहण्यासाठी अर्थातच चायनीज वॉटर टॉर्चर सेल. हा हुडीनीचा सर्वात खतरनाक आणि तितकाच प्रसिद्ध प्रयोग होता. त्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.



हा प्रयोग करताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. तरीही त्याने पुढचे सगळे प्रयोग दाखवलेच. कुणाच्या लक्षातही आले नाही की त्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचे सुचवले. हुडीनीने विश्रांती घेतली असती तर त्याला पुढचे कार्यक्रम रद्द करावे लागले असते. त्यामुळे त्याने डॉक्टरांचे काही ऐकलेच नाही.

एकामागून एक त्याचे कार्यक्रम सुरूच होते. त्याच्या शरीराला विश्रांतीची गरज होती मात्र हुडीनी काही केल्या कार्यक्रम थांबवत नव्हता. थकवा, घोट्याला झालेली दुखापत, सततची दगदग यामुळे त्याला ताप भरला. शरीराची अवस्था अत्यंत नाजूक झालेली असतानाही तो डेट्रॉइटला पोहोचलाच. दोन दिवस आधीच कार्यक्रम स्थळी पोहोचल्याने त्या दिवसात त्याने पूर्णतः विश्रांती घेण्याचे ठरवले. त्याला थकवा आला होता त्यामुळे त्या दोन दिवसात तो आपल्या खोलीतून बाहेरही आला नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हुडीनी आपल्या खोलीत आराम करत असताना कॉलेजचा विद्यार्थी त्याला भेटण्यासाठी आला. हुडीनीची तब्येत इतकी बिघडलेली असतानाही त्या विद्यार्थ्याने त्याला त्याच्या एका आव्हानाची आठवण करून दिली. हुडीनीचा असा दावा होता की, त्याने एकदा का आपले पोट आत ओढले की त्याला कुणीही कितीही मार दिला तरी त्याला त्रास होत नाही. हुडीनीचा हा दावा त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचा होता. हुडीनीची अवस्था डोळ्यासमोर दिसत असतानाही त्याने आपला हट्ट सोडला नाही.

हुडीनी आपल्या बेडवरून उठून उभा राहातच त्या मुलाने हुडीनीला मारायला सुरूवात केली. हुडीनीने अजून आपले शरीर हा मार सोसण्यासाठी तयारही केले नव्हते इतक्यात त्या मुलाने त्याच्या पोटात असे काही बुक्के घातले की, हुडीनीला उभंही राहवेना.

तो मुलगा हुडीनीची अवस्था पाहूनही थांबत नव्हता जणू काही तो हुडीनीला संपवूनच थांबणार होता. हुडीनीला यामुळे खूप त्रास होत होता. कार्यक्रम करण्याच्या अवस्थेत तर तो नव्हताच पण तरीही तो स्टेजवर गेलाच. आपली वेदना लपवून त्याने लोकांचे मनोरंजन केले.

नंतर तो डॉक्टरांकडे गेले तेव्हा समजले की त्याला अपेंडिक्स आहे. किमान आता तरी त्यांनी विश्रांती घ्यावी असे डॉक्टर कळवळून सांगत होते. मात्र हुडीनीवर जणू काही भूतच बसले होते. त्याने कुठलाच कार्यक्रम रद्द केला नाही. उलट एकावर एक एकावर एक असे कार्यक्रम करतच सुटला. हुडीनी असा स्वतःचाच शत्रू का झाला होता, याचे उत्तर तेव्हाही कोणाकडे नव्हते आणि आताही नाही. डॉक्टरांनी वारंवार मनाई करूनही त्याने कार्यक्रम थांबवले नाहीत की थोडीशी उसंत घेतली नाही.

स्टेजवर उभे राहिल्यानंतर त्याला त्याचे शरीर अजिबात साथ देत नसे तरीही हुडीनी एकामागून एक प्रयोग दाखवत राही. अशा अवस्थेत त्याने जीवावर बेतणारे स्टंटही त्याने सोडले नाहीत.

त्या दिवशी जेव्हा तो स्टेजवर गेला तेव्हा प्रेक्षकांनाही त्याच्यातील बदल जाणवत होता. त्याच्या प्रयोगातही पूर्वी इतका सफाईदारपणा राहिला नव्हता. हुडीनीचे नक्कीच काही तरी बिनसले आहे हे प्रेक्षकांनाही समजत होते. कारण त्याचे इतर प्रयोग आणि आजचे प्रयोग यात खूप मोठा फरक होता. कार्यक्रम अंतिम टप्प्यात आल्यावर हुडीनी शेवटचा तो खतरनाक स्टंट दाखवायचा होता. हुडीनीने मनाचा हिय्या करून या प्रयोगाला सुरूवात केली. कारण, त्यांच्या शरीरातील वेदनांनी आता सगळ्या सीमा पार केल्या होत्या. तशा वेदना घेऊनही ते हा प्रयोग करणारच होते.

उसने अवसान आणून त्यांनी प्रयोग सुरू केला मात्र मध्येच तो कोलमडला. संपूर्ण प्रेक्षागृहात भयाण शांतता पसरली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टरांनी तपासल्यावर कळाले की त्याचा अपेंडिक्स फुटला होता आणि त्यातील पस सगळ्या शरीरभर पसरला होता. डॉक्टरांनी तातडीने त्याचे ऑपरेशन केले. ऑपरेशन तर यशस्वी झाले पण हुडीनी काही अंथरुणातून उठला नाही.

ऑपरेशननंतर तब्बल एक आठवडा तो हॉस्पिटलमध्येच होता. त्याला शुद्धच आली नव्हती. डॉक्टरांनी त्याला शुद्धीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. एक आठवड्यानंतर हुडीनीने या जगातून कायमची एक्झिट घेतली.

शेवटच्या दिवासात हुडीनी असा स्वतःचाच शत्रू का झाला, त्या मुलाने त्याची शारीरिक अवस्थेचा जराही विचार न करता असे मुक्के का मारले, त्याच्या मारानेच हुडीनीला हा त्रास झाला का? असे कितीतरी प्रश्न नंतर उपस्थित झाले पण याची उत्तरे आजवर कोणालाच देता आलेली नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ही महिला प्लेन क्रॅश होऊन १०,००० फूट खाली पडून देखील सुखरूप होती

Next Post

अमेरिकेने जर्मनीला कोक सप्लाय करणं बंद केलं म्हणून जर्मनीने स्वतःचा फॅंटा बनवला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकेने जर्मनीला कोक सप्लाय करणं बंद केलं म्हणून जर्मनीने स्वतःचा फॅंटा बनवला

क्रिकेटमध्ये 'बॉलरची'सुद्धा द*हश*त असू शकते हे मुरलीधरनने दाखवून दिलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.