The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताने दिलेल्या गीर गाईंमुळे ब्राझिलची अर्थव्यवस्था उभी राहिली होती..!

by द पोस्टमन टीम
13 December 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातल्या गुजरात राज्यातल्या गीर जंगलातल्या गाई जगभरात प्रसिध्द आहेत. भरपूर आणि पौष्टीक दूध देणार्‍या गुजरातमधल्या गीर गाई ब्राझिलमध्येही विशेष लोकप्रिय आहेत.

तिथल्या धवल क्रांतीचं कारण असणार्‍या या गीर गाई मुळात ब्राझिलला पोहोचल्या कशा?

गुजरातमधल्या सौराष्ट्रातील गीर जंगलात आढळणार्‍या गायींना या जंगलावरूनच “गीर” हे संबोधन मिळालं आहे. भारतातल्या गीर गाई दिवसाकाठी दहा ते वीस लिटर दूध देतात तर ब्राझिल, अमेरिकेतल्या गीर गाईंची खासियत ही आहे की या दिवसाकाठी कमीत कमी पन्नास ते साठ लिटर दूध देतात. गीर गाईंचं दूध काढायचं तर एकट्यादुकट्या माणसाचं काम नाही. चार-चार जणांना दूध काढावं लागतं.

पशुपालनात गीर गाईंना जास्त महत्त्व असण्यामागचं कारण केवळ त्यांचं मुबलक दूध हे एकमेव नाही तर गीर गाईच्या दूधाचे, तुपाचे असलेले अनेक फ़ायदे आहेत.

गीर गाईंच्या दुधाची महती

संशोधनात असं आढळलं आहे की गीर गाईंच्या दुधात आठ प्रकारची प्रथिनं, सहा तर्‍हेची जीवनसत्वं, २१ प्रकारची अमिनो ॲसिड्स, ११ प्रकारची चरबीयुक्त ॲसिडस, २५ प्रकारची खनिजं, १६ प्रकारची नायट्रोजन यौगिक आणि दोन प्रकारच्या शर्करा असतात. याशिवाय सोनं, तांबं, लोह, कॅल्शियम, आयोडिन, फ़्लोरिन, सिलिकॉन हे देखील गीर गाईंच्या दुधात आढळतं. गीर गाईच्या दुधाच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. अनेक आजारात उपचार म्हणूनही गीर गाईच्या दुधापासून बनविलेल्या तुपाचा वापर करतात.



भारत हा सर्वांत जास्त दूध उत्पादन करणार्‍या देशांत गणला जातो. जगाच्या तुलनेत एकट्या भारतात वीस टक्के दूग्ध उत्पादन केलं जातं. यात गीर गाईंचा महत्त्वाचा वाटा आहे. ब्राझिलमध्ये झालेली धवल क्रांती ही गीर गाईंमुळे झाल्याचं मानलं जातं. ब्राझिलमध्ये पूर्वीपेक्षा सात टक्क्यांनी दूध उत्पादनात झालेली वाढ ही गीर गाईंमुळे झालेली आहे.

आजच्या घडीला ब्राझिलमधल्या ८० टक्के गाई या गीर जातीच्या आहेत. जगाच्या तुलनेत ब्राझिल दूग्ध उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. याचं संपूर्ण श्रेय भारताला जातं.

गीर गोवंशाच्या गाई थोराड, उंच आणि भक्कम बांध्याच्या असतात. या गोवंशातील बैलही गाईंप्रमाणेच धष्टपुष्ट असतात. अशा या उत्तम गोवंशावर ब्राझिल आणि अमेरिकेत संशोधन होऊन गीरलॅण्ड गोवंश विकसित करण्यात आला. ब्राझिलमध्ये असणार्‍या गीर गाई या भारतीय गोवंशाच्या कुळातील आहेत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ब्राझिलच्या पैराना फ़ार्मवर असणारी इल्हाबेला गाय ही ओरिजिनल गीर वंशाची शेवटची गाय मानली जाते. त्यामुळे तिची विशेष देखभाल केली जाते. या फ़ार्ममधील ही शेवटची गाय आहे. भावनगरच्या महाराजांनी ज्या सेल्सोला कृष्णा बछडा भेट दिला होता त्याचं हे फ़ार्म हाऊस असून त्याची थेट वंशज असणारी ही संपूर्ण भारतीय अशी शेवटची गाय आहे. आज सेल्सोचा नातू या फ़ार्मची जबाबदारी सांभाळतो.

आज इन-व्हिट्रो-फ़र्टिलायझेशनच्या मदतीनं गीर गाईंची पैदास केली जाते, ज्या प्रचंड प्रमाणात दूध देतात. आज या गाई जवळपास वीस वर्षांपर्यंत दूध देतात, त्यामुळे त्यांच्या किंमतीही प्रचंड आहेत. ब्राझिलच्या अर्थकारणात गीर गाईंचा मोलाचा सहभाग आहे म्हणूनच त्यांची ब्राझिलमध्येही पूजा होते.

ब्राझिलमधील सेल्सो गार्सिया या शेतकर्‍याची आणि भावनगरच्या कुष्णकुमारसिंह महाराजांची मैत्री होती. या महाराजांनी सेल्सोला मैत्रीपूर्ण भेट म्हणून गीर जातीचा एक धष्टपुष्ट बैल, कृष्णा दिला. आज ब्राझिलमधल्या सर्व गाई या कृष्णाच्या वंशज आहेत. उत्तम देखभाल करूनही कृष्णा १९६१ साली मरण पावला. मात्र तोवर त्यानं ब्राझिलचा गीर गोवंश फ़ोफ़ावायला मोलाचं योगदान दिलं होतं.

गीर आणि होलेस्टेनियन अशा मिश्र जातीचा हा गोवंश आहे. याला गिरोलॅण्डो म्हणून ओळखलं जातं.

१९८९ साली ब्राझिलच्या कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ब्राझिलमधल्या दूग्ध उत्पादनातला ऐंशी टक्के सहभाग या गीर गाईंचा आहे. ब्राझीलमध्ये लोकप्रिय झालेला गोवंश दक्षिण अमेरिकेतही झपाट्यानं लोकप्रिय झाला. याचं कारण म्हणजे गीर गाई कोणत्याही हवामानाशी जुळवून घेतात. ब्राझिलियन शेतकर्‍यांनी पशुपालनात गीर गाईंना प्राधान्य देण्यास सुरवात केली आणि त्यांच्या प्रचंड दुध उत्पादनानं ब्राझिलमध्ये धवल क्रांती घडवली. ब्राझिलचं अर्थकारणच या धवल क्रांतीमुळे बदलून गेलं.

कृष्णकुमारसिंहांप्रती कृतज्ञता म्हणून पार्लमेंट परिसरात त्यांचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे.

सुरुवातीला केवळ ब्राझिलमध्ये असणार्‍या गीर गाई कालांतरानं संपूर्ण उपखंडात पसरल्या आणि त्याच्या विविध हायब्रीड प्रजाती जन्मल्या. गीर गाईंसोबतच आंध्रप्रदेशातील काही गाईंचे वंशही ब्राझिलमध्ये आढळतात. यात झेबू, ओन्गोले, नेलोरे यांचा समावेश आहे.

भारत आणि ब्राझिलमध्ये दुग्ध उत्पादन क्षेत्रात सौहार्दाचे संबंध आहेत. २०१६ साली भारत आणि ब्राझिल यांच्यात MoU वर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. ब्राझिल सरकारनं इंडो ब्राझिल सेंटरला मान्यता दिलेली आहे. या सेंटरमध्ये गायींच्या दुध उत्पादन क्षमतेवर तसेच त्यांच्या जातींवर संशोधन करण्यात येणार आहे. गीर गोवंश वृध्दीसाठी या MoU चा फ़ायदा होणार आहे.

एकेकाळी भारतातून ब्राझिलमध्ये गेलेल्या गीर वंशाच्या बछड्यानं ब्राझिलचा आर्थिक चेहरा बदलून टाकला कारण त्यांनी त्यावर केलेलं संशोधन. आज त्याच संशोधनाची मदत भारत घेऊ पहात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इकडे लोक टीका करत राहिले आणि तिकडे गौतम अदानींनी हजारो करोडोंचं साम्राज्य उभारलं

Next Post

अमेरिकेतील या बिल्डिंगची सुरक्षा ‘व्हाईट हाऊस’पेक्षा तगडी आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

अमेरिकेतील या बिल्डिंगची सुरक्षा 'व्हाईट हाऊस'पेक्षा तगडी आहे..!

माणसाने आयुष्यात एकदा तरी ही अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहायलाच हवीत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.