The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरमधील १४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा लष्कराने जीर्णोद्धार करून सर्वांसाठी खुलं केलं आहे

by द पोस्टमन टीम
20 August 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या उत्तरेला स्थित असणाऱ्या जम्मू काश्मीर राज्याला जमिनीवरील स्वर्ग समजले जाते. या राज्यातील निसर्गसौंदर्य दरवेळी पर्यटकांचे मन आकर्षून घेते. सोबतच राज्यात भेट द्यायला आलेल्या पाहुण्यांचे केले जाणारे आदरातिथ्य आणि देवी देवतांबद्दल जपल्या जाणाऱ्या आस्थेमुळे पर्यटक जम्मू काश्मीरकडे आकर्षित होतात. पण कोरोनामुळे जवळपास दीड वर्षांपासून पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता.

देशभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटन पूर्णपणे थांबवण्यात आले होते. पर्यटन व्यवसाय थांबल्यामुळे राज्याचे अर्थकारणही ढासळले होते. पण आता कोरोना साथ आटोक्यात येत असल्यामुळे पर्यटकांची रीघ काश्मीरकडे लागली आहे.

उत्तर काश्मीर या भागातील गुलमर्ग थंड हवेच्या ठिकाणाला दरवर्षी पर्यटक भेट देत असतात. गुलमर्ग या ठिकाणी पर्यटकांसाठी लष्कराने १४० वर्ष जुने भगवान महादेवाचे मंदिर खुले केले आहे.

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग शहरात हे शिव मंदिर आहे. चारही बाजूने बर्फाने वेढलेले डोंगर आणि देवदारच्या जंगलात एका उंच डोंगरावर शिव मंदिर वसलेले आहे. येथील स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या मनात या मंदिराबद्दल आस्था आणि श्रद्धा असल्याचे आहे. या मंदिराला मोहिनीश्वर शिवालय किंवा राणीमंदिर असेही म्हटले जाते.



भारतीय लष्कराने या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे रूपच पालटून टाकले आहे. या मंदिराची खासियत म्हणजे काश्मीरमधील हे मंदिर डोग्रा वंशाचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराचा असा इतिहास सांगितला जातो की, महाराजा हरी सिंह यांच्या पत्नी महाराणी मोहनीबाई सिसोदिया यांची महादेवावर असीम भक्ती होती. त्यांनी सन १९१५ साली या मंदिराची स्थापना केली होती. त्या या मंदिरात दररोज पूजा करायला येत असत. त्यांनी या मंदिराची देखभाल पण त्या काळात केली.

त्यानंतर जेव्हा ९० चे दशक आले तेव्हा हिंदू धर्मियांना काश्मीर सोडून जावं लागलं होतं. तेव्हा मंदिराची देखभाल कोणी करायची हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला. त्यावेळी एका मुस्लिम व्यक्तीने मंदिराची देखभाल केली. सोबतच तो मंदिराची आरती करून आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवत असे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जम्मू काश्मीर राज्यातील गुलमर्ग या ठिकाणी जेव्हा पर्यटक भेट देत असत तेव्हा त्यांनी या शिव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. पर्यटकांची मागणी आणि स्थानिकांच्या आग्रहामुळे लष्कराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.

लष्कराने स्थानिक लोक आणि राज्य सरकारच्या मदतीने पाहतापाहता या मंदिराचे रूप बदलून टाकले. श्रद्धाळू भाविकांसाठी हे मंदिर १ जून २०२१ रोजी उघडण्यात आले. जेव्हा मंदिर उघडण्यात आले तेव्हा जमिया मस्जिदचे पुजारी, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू धर्माचे पुजारी पण उपस्थित होते. या मंदिराच्या जवळपास मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा असल्यामुळे सर्वधर्मीय लोकांनी यावेळी हजेरी लावली होती. या मंदिराच्या उदघाटनात जम्मू काश्मीरमधील पर्यटन विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे.

यावेळी बोलताना शिव मंदिराचे कार्यवाहक गुलाम महम्मद शेख यांनी म्हटले आहे की, “गुलमर्ग शहरात वसलेले हे शिवमंदिर कश्मीरच्या संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाची ओळख आहे. त्यांनी गुलमर्ग शहरातील भाविकांना मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता मंदिराची देखभाल करण्याचे आवाहन केले.

शिव मंदिराची पूजा करणाऱ्या एका भाविकाने यावेळी म्हटले की, ते या शिव मंदिरातील मूर्तीची जवळपास ३५ वर्षांपासून पूजा करत आहेत. या ठिकाणी मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळ आहेत. प्रत्येक माणसाने भाईचारा ठेवायला हवा. हिंदू मुस्लिम समाजाने पण एकमेकांच्या प्रार्थनास्थळांची पूजा करायला हवी.

गुलमर्ग शहरातील या शिव मंदिराच्या परिसरात अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंग झालेल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित ‘आप की कसम’ या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग याच परिसरात झाले आहे. या चित्रपटातील जय जय शिवशंकर, काटा लगे ना कंकड गाण्याचे शूटिंगही येथेच झाले होते. भगवान महादेवावर चित्रित केलेले हे गाणे योगायोगाने याच मंदिराच्या परिसरात चित्रित केले गेले आहे.

यावेळी लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नागरिकांचे आभार मानताना राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याचा यावेळी आवर्जून उल्लेख केला. ब्रिगेडिअर बी एस फोगट यांनी यावेळी म्हटले आहे की, “आम्हाला गुलमर्गमधील शिव मंदिराचा लष्करातर्फे जीर्णोद्धार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी लष्करातील आम्ही सर्वानी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न चालू केले. आमच्या प्रयत्नाला स्थानिक लोकांनीही साथ दिली.

आम्हाला या कार्यात सर्वात जास्त मदत जनतेकडून झाली. जनतेने मंदिराच्या कार्यात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हे सगळे काम जनतेने केले आहे. आम्ही यात फक्त जनतेला मदत करण्याचे कार्य लष्करातर्फे केले. राज्य सरकार, जम्मू काश्मीर पोलीस, जल विभाग, पर्यटन विभाग या सर्वानी या कार्यात आमची मदत केली आहे.” या सर्वांच्या मदतीमुळे शिव मंदिराला पूर्वीचे रूप प्राप्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. लष्कराने मंदिराचे जीर्णोद्धार करताना आजूबाजूचा परिसर पण सुशोभित केला आहे. त्यांनी मंदिराकडे येणारे रस्ते मजबूत केले आहेत.

जम्मू काश्मीर राज्यात उघडण्यात आलेल्या शिव मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला सर्वधर्मीय भाविकांनी हजेरी लावली. भारतीय लष्कर भाविकांच्या मनातील श्रद्धा आणि पर्यटकांमध्ये असलेल्या देशप्रेमाच्या भावनेमधील पूल बनल्याचे दिसून आले आहे. भारतीय लष्कर संकटासोबतच चांगल्या कार्यात पण धावून जात असल्याचे यावेळी दिसून आले आहे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी आपल्या लोकांनी ही खास नोट बनवली होती..!

Next Post

जपानी लोकांना सगळ्यात जास्त भीती असते ती ‘योत्सुया कैदान’ची..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जपानी लोकांना सगळ्यात जास्त भीती असते ती 'योत्सुया कैदान'ची..!

हे आहेत शिखांचे पाच पवित्र तख्त, यातील एक महाराष्ट्रातही आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.