The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिलोटीनचं नाव ऐकून माणूस शिक्षा देण्यापूर्वीच जीव सोडून द्यायचा

by द पोस्टमन टीम
24 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पश्चिमी देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा अनेक पद्धती होत्या, काही तर इतक्या क्रू*र होत्या इतकी वाचूनही अंगावर काटा येतो. गिलोटिन या यंत्राखाली देण्यात येणारी शिक्षा देखील अशा प्रकारची होती. खरंतर या यंत्राचा आविष्कार मरणाऱ्याला कमी त्रास होईल असा मृत्यू देण्याच्या अनुषंगाने करण्यात आला होता. पण हे यंत्र सर्वात जास्त क्रू*र व त्रासदायक मृत्यू देणारं यंत्र ठरलं होतं. यंत्र इतके भयानक होते की नुसते याकडे बघितले तरी अंगावर काटा येत होता.

इतिहासात अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यात फार क्रू*र पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती.

राणी मेरी आणि रॉबर्ट डेवरेक्स या दोघांना त्यांच्या चुकीसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, एका जल्लादाच्या हातून त्यांचे शीर कलम करायचे आदेश देण्यात आले होते. असं म्हणतात जल्लादाने अनेकवेळा वार केल्यानंतर त्यांचे मुंडके वेगळे झाते.

सॅल्सबरी काउंटीमध्ये मार्गारेट पोल नावाच्या इसमाच्या मुंडक्यावर दहा वेळा धारदार शस्त्राने वार करून त्याला मृत्यदंड देण्यात आला होता. मानवी क्रूरतेचे प्रतीक असलेल्या या अमानुष मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे फ्रेंच लोकांनी सहज पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा देता यावी यावर विचार करायला सुरुवात केली.

फ्रान्सिस गिलोटिन नावाच्या माणसाने मृत्यदंड देण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी फ्रेंच असेम्ब्लीसमोर केली, गिलोटिन यांचा प्रस्ताव अस्वीकार करण्यात आला. पण गिलोटिन यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. एकीकडे फ्रेंच नागरिक देखील मृत्युदंडाच्या शिक्षेची तीव्रता कमी करण्याची मागणी करत होते. अमानवीय पद्धतीचा वापर करुन मृत्युदंड देणे बंद करण्यात यावे अशी मागणी फ्रेंच नागरिकांची होती.



१७९१ मध्ये अखेरीस फ्रेंच असेम्ब्लीने गिलोटिनने प्रस्तुत केलेल्या प्रस्तावापैकी एकावर शिक्कामोर्तब केला व त्याला त्या मशीनची निर्मिती करायला सांगितली. फ्रान्सच्या राजाचा डॉक्टर अँथोनी लुईस याची मदत घेऊन त्याने एका यंत्राची निर्मिती केली, जे क्षणार्धात शीर धडापासून वेगळं करेल.

ही मशीन इंग्लंडमध्ये वापरण्यात येणाऱ्या हॅलिफॅक्स डिबेट आणि स्कॉटिश मेडेनपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली होती. गिलोटिन मशीनमध्ये कुऱ्हाडीचा पुढील भागाचा वापर करण्यात आला होता.

ही मशीन कुऱ्हाडीप्रमाणे एका घावात मुंडकं शरीरापासून वेगळं करायची. बऱ्याचदा या मशीनचा दोनदा उपयोग केला जायचा ज्यामुळे सामान्य माणसाची धाकधूक वाढायची. गिलेटीन आणण्यात आली त्यावेळी तिला एक क्रांतिकारक मशीन मानले गेले होते. पण तिच्या वापराला बघून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली, त्यामुळे त्यांनी गिलोटिनच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

गिलोटिनचे आधीचे मॉडेल यशस्वी झाले नाही. पण, यामुळे याचा वापर बंद करण्यात आला नाही, उलट या गिलोटिन यंत्राला अजून विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. अनेक महिन्यांनी जर्मनीच्या स्टार्सबर्ग येथील न्यायालयाने गिलोटिनच्या मूळ रूपात बदल करण्याचे आदेश दिले.

टोबीस स्किमिद नावाच्या जर्मन इंजिनिअरला याचे प्रोटोटाइप बनवण्याचे आदेश देण्यात आले. त्याने या यंत्रातील कुऱ्हाड काढून टाकत त्याच्या जागी ४५ अंशाचे तिरपे ब्लेड लावले. या ब्लेडमुळे मुंडकं छाटणे सोपे झाले होते. गिलोटिनचे हे नवीन रूप अनेकांच्या पसंतीस उतरले. या गिलोटीनला प्लेस ऑफ द ग्रेव्ह या ठिकाणी उभारण्यात आले. इथेच या गिलोटिनच्या मदतीने २५ एप्रिल १९७२ साली काही दरोडेखोरांचा शिर*च्छेद करण्यात आला.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात गिलोटिनचा वापर करण्यात आला. गिलोटिनने मृत्युदंड देण्याचे काम सोपे केले होते, त्यामुळे एकएक करत अनेक लोकांचा शिर*च्छेद हे यंत्र वापरून करण्यात आला. कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, गिलोटिनच्या मदतीने शिक्षा करण्यात येत होती. गिलोटिनवर कितीतरी हजार लोकांचा शिर*च्छेद करण्यात येत होता.

पॅरिस शहराच्या चौकात शिर*च्छेद करण्यात येत होता. गिलोटिनचा वापर विसाव्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये करण्यात येत होते. आता मात्र हे यंत्र फक्त संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

आजही तुम्ही फ्रान्स अथवा कुठल्याही युरोपियन वास्तू संग्रहालयात गिलेटीन बघता त्यावेळी अंगाचा थरकाप उडतो, इतक्या लोकांच्या किंकाळ्या व रक्ताचा इतिहास त्या यंत्राशी जोडला गेलेला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ओयोच्या २१ वर्षीय मालकावर एकदा व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढावली होती

Next Post

प्रभु श्रीरामाचे वंशज म्हणवून घेणाऱ्या थायलंडच्या राजाने वसवली आहे थाई ‘अयोध्या’ नगरी

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

प्रभु श्रीरामाचे वंशज म्हणवून घेणाऱ्या थायलंडच्या राजाने वसवली आहे थाई 'अयोध्या' नगरी

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.