The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्राझीलमधील या तुरुंगात सुरक्षाधिकारी म्हणून बदकांना नियुक्त केलं आहे!

by द पोस्टमन टीम
12 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘तुरुंग’ हा शब्द उच्चारला की, आपल्यासमोर एकदम कडक सुरक्षा व्यवस्था आणि भयाण शांतता असलेल्या दगडी इमारती येतात. साधारण सर्वच चित्रपटांमधून तुरुंगाचं असंच चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं. काही अंशी ही गोष्ट खरीदेखील आहे. तुरुंगाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला एकदम कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असते. जेणेकरून आतील कैदी पळून जाणार नाहीत किंवा आपापसात वाद घालणार नाहीत. तुरुंगांच्या सुरक्षेसाठी आता सुरक्षा रक्षकांसोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो.

युनायटेड स्टेट्स अर्थात अमेरिकेतील तुरुंगं सर्वात जास्त ‘हायली सिक्युअर्ड प्रिझन्स’ मानली जातात. याठिकाणावरून पळून जाणं केवळ अशक्य आहे. तेथील तुरुंगाच्या सिक्युरिटीमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. 

मात्र, सध्या जगात असा एक देश अस्तित्त्वात आहे, जो आपल्या तुरुंगाच्या सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वापर करतो! तुम्हाला कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र, ही गोष्ट अगदी १०१ टक्के खरी आहे. ब्राझीलमध्ये काही तुरुंग प्रशासनांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यात ‘गार्ड गुज’ या बदकांच्या प्रजातीचा समावेश केला आहे. यामागे काय कारण आणि काय लॉजिक आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

सध्याच्या हायटेक जमान्यामध्ये लेटेस्ट सिक्युरिटी टेक्नॉलॉजी उपलब्ध असतानाही ब्राझीलनं तुरुंगांच्या सुरक्षेसाठी बदकांचा वापर का केला आहे? हे जाणून घेण्यापूर्वी आपण तेथील तुरुंगव्यवस्थेचा एक आढावा घेऊ.



२०१९ मधील आकडेवारीनुसार, ब्राझीलमधील सुमारे ५१२ तुरुंगांमध्ये साधारण १ लाख ७० हजार कैदी आहेत. हजारो पोलीस लॉकअप आणि इतर अनेक सुविधांसह ब्राझील जगातील सर्वात मोठ्या १० पिनल सिस्टिम्सपैकी एक आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सर्व्हेंतील आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त आहे. परिणामी कैद्यांची संख्यादेखील जास्त आहे.

ब्राझीलमधील तुरुंगांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळं कैद्यांना अनेकदा लॉकअपमध्ये भयानक दैनंदिन जीवनमान सहन करावं लागतं. जास्त गर्दीमुळं बरेचशे कैदी जमिनीवरच झोपतात. त्यांना स्वत:च्या गाद्या, अंथरूण, कपडे आणि प्रसाधनसामग्री आणण्यास भाग पाडलं जातं. जागेसाठीचा संघर्ष आणि अनेक मुलभूत सुविधा पुरवण्यात अधिकाऱ्यांना आलेलं अपयश यांमुळं तुरुंगांमध्ये अस्थिरता असते. 

अनेक सराईत कैद्यांकडून इतर कैद्यांचं शोषण होतं. या सर्व कारणांमुळं गेल्या अनेक दशकांपासून ब्राझीलमध्ये तुरुंगातील हिंसाचाराच्या घटना सातत्यानं घडत आहेत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२९ जुलै २०१९ रोजी पारा राज्यातील अल्तामिरा तुरुंगात झालेल्या दंगलीत किमान ६२ कैद्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. हाय सिक्युरिटी असूनही शेकडो कैदी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतात. या घटना रोखण्यासाठी तेथील कायदा व सुवस्था विभागाला संघर्ष करावा लागत आहे.

तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक संवेदनशील करण्यासाठी ब्राझीलमधील तुरुंगांत बदकांचा वापर केला जात आहे. साओ पाउलो येथील सोब्राल तुरुंगात सर्वात पहिल्यांदा (२०११) बदकांचा वापर केला गेला. बदकांमध्ये विचित्र हालचाली टिपण्याची प्रचंड क्षमता असते. त्याच्या आसपास होणारी हलकीशी हालचालदेखील त्यांना अलर्ट मोडवर घेऊन जाते आणि ते मोठ्या प्रमाणात आवाज करण्यास सुरुवात करतात. बदकांतील या गुणामुळं ते आदर्श सुरक्षा कर्मचारी बनू शकतात, असा दावा तेथील वॉर्डन वेलिंग्टन पिकान्को यांनी केला होता. 

गर्दीने भरलेल्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांना रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनानं दोन बदक आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. सोब्राल तुरुंगाची क्षमता फक्त १५३ कैदी सामावून घेण्याची आहे. मात्र, २०११ मध्ये त्याठिकाणी २५५ गुन्हेगार राहत होते. सोब्रालमध्ये केलेला बदकांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर अनेक तुरुंगांमध्ये बदकांचा वापर सुरू करण्यात आला. काही वर्षांपूर्वी ब्राझीलमधील लुईस गोन्झागा रेबेलो प्रादेशिक तुरुंगात तुरुंग रक्षक म्हणून बदकांचा वापर होत असल्याच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरला झाला होता.

सुरक्षेसाठी बदकांचा वापर ही काही एकदम नवीन संकल्पना नाही. पूर्वीच्या काळी ‘गार्ड गुज’ या बदकांच्या प्रजातीचा वापर फार्मच्या संरक्षणासाठी केला जात असे. बदकांकडं उत्कृष्ट दृष्टी आणि मजबूत प्रादेशिक अंतःप्रेरणा असते. शिवाय त्यांच्याकडे मानवावर हल्ला करण्याची क्षमतादेखील असते. प्रत्यक्षात अशा घटनाही घडलेल्या आहेत.

स्वत:च्या गोस्लिंगचं रक्षण करताना अनेक बदकांनी एका ब्रिटिश व्यक्तीला त्याच्या सायकलवरून खाली पाडून त्याच्यावर हल्ला केला होता. ती व्यक्ती इतकी गंभीर जखमी झाली होती की, तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. ही घटना २००१मध्ये घडली होती. 

बदकांचा हाच आक्रमकपणा प्रादेशिक वर्तनाचा गुण त्यांचा गार्ड म्हणून वापर करण्यात करण्यास फायद्याचा ठरतो. गार्ड गुसचा वापर इतिहासात आणि आधुनिक काळात केला गेला आहे. इतिहासकार लिव्ही यांनी दिलेल्या संदर्भानुसार, प्राचीन रोममध्ये गॉल्सनं आक्रमण केले तेव्हा याच बदकांनी अलार्मची भूमिका निभावली होती.

आधुनिक काळात मोठ्य मोठ्या फार्मवरील इतर पाळीव पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि सापांचा प्रतिकार करण्यासाठी बदकांचा वापर केला गेला. आफ्रिकन बदक, रोमन बदक (टफ्टेड रोमन), पोमेरेनियन बदक (सॅडलबॅक पोमेरेनियन) आणि चायनीज बदक हे गार्ड ड्युटीसाठी सक्षण असलेल्या बदकांच्या सर्वोत्तम जाती आहेत.

चीनी बदक प्रचंड मोठ्या आवाजाचे असतात तर आफ्रिकन बदकांचा आवाज आणि आकार दोन्ही जास्त असतं. औद्योगिक सुरक्षेवरील हँडबुकमधील माहितीनुसार, गोदामं आणि इतर वेगळ्या भौतिक मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी बदत सक्षम असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे.

जर्मनीतील युनायटेड स्टेट्स एअर डिफेन्स कमांड इंस्टॉलेशन्सचं रक्षण करण्यासाठीही बदकांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे. स्कॉटलंडमधील डम्बर्टन येथील बॅलेंटाईन डिस्टिलरी येथे स्कॉच वॉच म्हणून आणि चीनच्या शिनजियांगमधील एका पोलीस स्टेशनचं संरक्षण करण्यासाठीही बदकांचा वापर होत असल्याची नोंद आहे.

या सर्व गोष्टींची दखल घेत ब्राझीलमधील तुरुंग प्रशासनांनी तुरुंगाच्या संरक्षणासाठी बदकांचा वापर सुरू केला. मात्र, ही गोष्ट या पक्ष्यांच्या जीवासाठी घातक आहे. कारण, काही दिवसांपूर्वी एका तुरुंगाभोवती पहारा देताना दोन बदकांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचीदेखील एक घटना घडलेली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

किंग जॉन खरोखरच इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात वाईट सम्राट होता का?

Next Post

त्या दोन वर्षात भारतीयांनी सगळ्यात जास्त काय खाल्लं असेल तर ती म्हणजे डोलो गोळी!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

त्या दोन वर्षात भारतीयांनी सगळ्यात जास्त काय खाल्लं असेल तर ती म्हणजे डोलो गोळी!

"टु मिनिट" मॅगीच्या ३० वर्षांच्या प्रवासाची कहाणी...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.