The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अलेक्झांड्रियाच्या जगप्रसिद्ध लायब्ररीमध्ये लागलेल्या आगीनं प्राचीन साहित्याचा संपूर्ण संग्रह नष्ट झाला

by द पोस्टमन टीम
19 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘The library is inhabited by spirits that come out of the pages at night,’ चीलीतील प्रसिद्ध लेखिका इसाबेल अलेंडे यांचं हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे. खरंच ग्रंथालय हे असं ठिकाण आहे, ज्याठिकाणी असलेली पुस्तकं आपल्याशी संवाद साधू शकतात. अर्थात त्यासाठी आपण तितकी काळजीपूर्वक ती वाचली पाहिजेत. ग्रंथालयांतील कमालीचं शांत वातावरण कुठल्याही व्यक्तीला भारावून टाकण्यास पुरेसं असतं.

प्राचीन काळातील काही राजे-महाराजे देखील या पुस्तकांचे आणि ग्रंथालयांचे चाहते होते. असं म्हटलं जातं प्राचीन काळात उत्तर इजिप्तमधील अलेक्झांड्रियामध्ये जगातील सर्वात मोठं ग्रंथालय होतं. होमर, प्लेटो, सॉक्रेटीस यांच्यासह पुरातन काळातील अनेक महान विचारवंतांचं आणि लेखकांचं साहित्य त्याठिकाणी ठेवलेलं होतं. आपल्याकडील नालंदा विश्वविद्यालय हे अतिशय प्राचीन आणि वैभवशाली ज्ञान भांडार होतं, त्यालाही बख्तियार खिलजीने आगीत नष्ट करून टाकलं.

अलेक्झांड्रियामधील या ग्रंथालयाला दोन हजार वर्षांपूर्वी प्रचंड मोठी आग लागली अन् त्या आगीत हे ग्रंथालय नष्ट झालं. हे प्राचीन ग्रंथालय खरोखर अस्तित्त्वात होतं हे निश्चितपणे सिद्ध करू शकणारे कोणतेही वास्तुशिल्पीय अवशेष किंवा पुरातत्त्वीय घटक अद्याप सापडलेले नाहीत. मात्र, अनेक कवी, इतिहासकार, प्रवासी आणि विद्वानांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून या ग्रंथालयाच्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केलेला दिसतो. चला तर मग, या कथित जगप्रसिद्ध प्राचीन ग्रंथालयाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? हे आपण पडताळून पाहू.

प्राचीन जगतातील सात आश्चर्यांपैकी एक ‘फारोस लाईटहाऊस’ ज्या ठिकाणी अस्तित्वात होतं, त्या अलेक्झांड्रियाची स्थापना इसवी सन पूर्व ३३०च्या सुमारास ‘अलेक्झांडर द ग्रेट’नं केली. त्यामुळं या शहराला ‘अलेक्झांड्रिया’ नाव पडलं. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचं साम्राज्य त्याच्या सेनापतींच्या हातात राहिलं. सेनापती टॉलेमी I सोटरनं इजिप्तचा ताबा घेतला आणि अलेक्झांड्रियाला त्याची राजधानी बनवलं.

पूर्वी नाईलच्या त्रिभूज परिसरातील एक लहान मासेमारी करणारं अलेक्झांड्रिया शहर इजिप्तच्या टॉलेमिक शासकांच्या कारभाराचं स्थान बनलं. काळासोबत बौद्धिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील त्याचा विकास झाला. कदाचित अलेक्झांड्रिया हे प्राचीन जगातील सर्वात मोठं शहर असावं. याच ठिकाणी त्याकाळचं सर्वात मोठं ग्रंथालय अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं.



असं मानलं जातं की, इसवी सन पूर्व २९५च्या सुमारास, अथेन्सचे निर्वासित गव्हर्नर, विद्वान आणि वक्ते डेमेट्रियस यांनी ‘टॉलेमी I सोटर’ला एका ग्रंथालयाची स्थापना करण्यास तयार केलं. डेमेट्रियसनं आपल्या कल्पनेतील ग्रंथालयाचं वर्णन देखील टॉलेमीला ऐकवलं होतं. या ग्रंथालयात जगातील प्रत्येक पुस्तकाची एक प्रत असणार होती.

टॉलेमी I च्या राजाश्रयाखाली डेमेट्रियसने ‘द मुझिओ’चं (the mouseion) बांधकाम केलं. तिथूनचं ‘museum’ हा शब्द प्रसिद्ध झाला. अलेक्झांड्रियातील हे संग्रहालय अथेन्समधील ‘लिसियम ऑफ ॲरिस्टॉटल’ या रचनेवर आधारित होतं. लिसियम ऑफ ॲरिस्टॉटल हे बौद्धिक आणि तत्त्वज्ञानविषयक व्याख्यानं आणि चर्चां सत्रांचं केंद्र होते. डेमेट्रियसच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं ‘द म्युझियम’ म्हणजेचं अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाचा पहिला भाग होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

म्युझियममध्ये विद्येची ग्रीक देवता ‘म्यूस’चं मंदिर होत. ब्रुचियन किंवा पॅलेस क्वार्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉयल पॅलेसच्या मैदानात हे म्युझियम होतं. याठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेगेवेगळ्या विभागात ठेवलेली हस्तलिखिते, व्याख्यान केंद्र, प्रयोगशाळा, वेधशाळा, वनस्पती उद्यान, प्राणीसंग्रहालय, लिव्हिंग क्वार्टर आणि जेवणाचे हॉल तसेच ग्रंथालय आणि अभ्यासाचं केंद्र होतं. टॉलेमी I नं निवडलेला एक पुजारी या संग्रहालयाचा प्रशासक होता.

ग्रंथालयातील हस्तलिखितांची काळजी घेण्यासाठी एका स्वतंत्र ग्रंथपालाची नेमणूक करण्यात आली होती. नंतर, टॉलेमी I चा मुलगा टॉलेमी II फिलाडेल्फस यानं त्याच्या वडिलांनी उभारलेल्या म्युस मंदिराला पूरक म्हणून एका ‘रॉयल ​​लायब्ररी’ची स्थापना केली. रॉयल लायब्ररी जुन्या हस्तलिखित ग्रंथालयाच्या शेजारी असलेली एक स्वतंत्र इमारत होती की जुन्याला जोडूनच तिचा विस्तार करण्यात आला होता याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र, रॉयल लायब्ररी म्युस मंदिराचाच एक भाग होती, याबाबत अनेकांचं एकमत आहे.

टॉलेमी II च्या कारकिर्दीत ‘युनिव्हर्सल लायब्ररी’ची कल्पना प्रत्यक्षात आल्याचे आढळून येते. संग्रहालयात १०० हून अधिक विद्वान ठेवण्यात आले होते. वैज्ञानिक संशोधन करणे, व्याख्यानं देणे, साहित्य प्रकाशित करणे, भाषांतर करणे, कॉपी करणे आणि केवळ ग्रीक लेखकांच्या मूळ हस्तलिखितांचे संकलन करणे अशी कामं त्यांना देण्यात आलेली होती. असं म्हटलं जातं याठिकाणी ५ लाख दस्तऐवज होते. याशिवाय पपायरस स्क्रोलची संख्या तर अस्पष्टचं आहे.

मात्र, पुढे एक घटना अशी घडली की, भरभराटीस आलेली ही ‘युनिव्हर्सल लायब्ररी’ काही क्षणांत नष्ट झाली! अलेक्झांड्रियाच्या या जगप्रसिद्ध लायब्ररीमध्ये लागलेल्या आगीनं प्राचीन साहित्याचा संपूर्ण संग्रह नष्ट झाला. ही घटना शतकानुशतके इतिहासकारांच्या चर्चेचा मुद्दा बनली आहे. प्राचीन ज्ञानाच्या या भांडाराता नक्की काय झाल होतं आणि ते जळण्यास कोण जबाबदार होते? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.

अलेक्झांड्रिया ग्रंथालयाच्या नाशासाठी ज्युलियस सीझरला मुख्य संशयित मानलं जातं. सीझरने इसवी सन पूर्व ४८ साली अलेक्झांड्रिया शहरावर वर्चस्व मिळवले. तो स्वतः रॉयल पॅलेसमध्ये राहू लागला. स्वसंरक्षणासाठी त्यानं त्याच्या माणसांना बंदरात असलेल्या इजिप्शियन जहाजांना आग लावण्याचे आदेश दिले. पण आग नियंत्रणाबाहेर गेली आणि किनाऱ्याजवळील शहराच्या काही भागात पसरली. त्याच आगीच्या भक्ष्यस्थानी ‘युनिव्हर्सल लायब्ररी’ पडली, असा आरोप केला जातो.

रोमन तत्त्वज्ञ आणि नाटककार सेनेकानं लिव्हिजच्या ‘हिस्ट्री ऑफ रोम’चा संदर्भ घेऊन लिहिलं आहे, सीझरनं लावलेल्या आगीत ४० हजार (हस्तलखिताच्या) स्क्रोल्स नष्ट झाल्या. लुशियानो कॅन्फोरा यांनी त्यांच्या ‘द व्हॅनिश्ड लायब्ररी’ या पुस्तकात प्राचीन लेखकांच्या पुराव्यांचा अर्थ लावला आहे. त्याच्या मते, सीझरच्या आक्र*मणाच्या वेळी हे साहित्य किनाऱ्याजवळील गोदामांमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, लावलेल्या आगीतच त्यांचा नाश झाला.

तर काही इतिहासकारांच्या मते, या घटनेसाठी खलीफा ओमर जबाबदार होता. इसवी सन ६४० साली जनरल आमरो इब्न अल-अस याच्या नेतृत्वाखाली अरबांनी दीर्घ वेढा घालून अलेक्झांड्रिया ताब्यात घेतला. या कथेनुसार विजयी अरबांनी अलेक्झांड्रियातील भव्य ग्रंथालयाबद्दल ऐकलं होतं आणि ते पाहण्यासाठी उत्सुक होते. खलिफा या अफाट ज्ञानाच्या संग्रहामुळे अस्वस्थ होता. त्यानं ही सर्व ग्रंथ संपदा नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही सर्व हस्तलिखिते एकत्र केली गेली आणि शहरातील ४ हजार स्नानगृहांसाठी इंधन म्हणून वापरली गेली.असं म्हटलं जातं की, जवळपास ६ महिने त्यांचा इंधन म्हणून वापर केला गेला.

अलेक्झांड्रियातील या ग्रंथालयाबाबत साहित्यामध्ये पुरावे आढळलेले असूनही अभ्यासकांचा एक गट असा आहे की, ज्यांचा ग्रंथालयाच्या अस्तित्त्वावरही विश्वास नाही. मात्र, काही पुरातत्वशास्त्रज्ञांना विश्वास आहे. कदाचित एक दिवस, इजिप्तच्या वाळवंटात, एकेकाळच्या भव्य ग्रंथालयाचा भाग नक्की सापडेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतातली पहिली रेल्वे लाईन मुंबई ते ठाणे नव्हे तर ‘रेड हिल रेल्वे’ आहे

Next Post

इंटरनेट बॉस असूनही गुगल कंपनी जाहिरातीवर करोडो रुपये खर्च का करतेय..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

इंटरनेट बॉस असूनही गुगल कंपनी जाहिरातीवर करोडो रुपये खर्च का करतेय..?

राणी अमिनाच्या शौर्याच्या कथा आफ्रिकेच्या घराघरात आजही सांगितल्या जातात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.