The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्राहकांची लोकेशन चुकीच्या पद्धतीने ट्रॅक केल्यामुळे गुगलवर खटला भरलाय

by द पोस्टमन टीम
26 January 2022
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं गुगल अडचणीत आलं असून अमेरिकन टेक कंपनी गुगलवर अमेरिकेतच खटला दाखल करण्यात आला आहे. लवकरच गुगलला कडक कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची लक्षणं आहेत. असं नेमकं काय घडलं की गुगलला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत आहे? गुगलची लोकेशन ट्रॅकिंग सुविधा गुगलला अडचणीत आणू पहात आहे. वापरकर्त्यांच्या गोपनियतेचा भंग करत असल्याचा आरोप गुगलवर आहे. हा एक फ़ौजदारी खटला असून याअंतर्गत गुगल क्रोम आणि गुगलच्या इतर सुविधा वापरकर्त्यांच्या वतीने २०१८ साली गुगलच्या लोकेशन ट्रॅकिंवर आक्षेप घेत सॅन होजे येथे दावा दाखल करण्यात आला होता.

लोकेशन ट्रॅकिंग बंद केल्यानंतरही उपभोक्त्यांच्या मोबाईलवर हे ॲप पूर्णपणे बंद होत नाही आणि ग्राहकांची चक्क फ़सवणूक करत त्यांच्या या माहितीचा मार्केटिंगसाठी वापर करून घेतला जातो असा गुगलवर आरोप आहे.

या आरोपात असंही म्हटलं आहे की, गुगल अनॅलॅटिक्स, गूगल ॲड मॅनेजर आणि इतर ॲप्लिकेशन्स वेबसाईट आणि प्लग इन्सद्वारे वापरकर्त्यांना ट्रॅक करत असते. कंपनी या सेवांद्वारे वापरकर्त्यांचा संपूर्ण डेटा वाचत असते, त्यांचे वैयक्तिक संपर्क, आवडी, छंद, खान-पान या सगळ्याची माहिती जमा केली जाते. या सगळ्याची भरपाई म्हणून लाखो वापरकर्त्यांना पाच हजार डॉलर्स दिले जावेत असं या दाव्यात म्हटलं गेलं होतं.

या जुन्या दाव्यांसोबतच आता लोकेशन ट्रॅकिंगचा नवा दावा गुगलवर करण्यात आला आहे. २०१४ ते २०१९ गुगल वापरकर्त्यांची फ़सवणूक करत होतं. ज्यात लोकेशन हिस्टरी बंद ठेवल्यास वापरकर्त्यांच्या ठावठिकाणाबाबत गुगललाही काहीही माहिती असत नाही. मात्र प्रत्यक्षात हा संपूर्ण डेटा जमा केला जात असल्याचा गूगलवर आरोप आहे.

गूगल क्रोममधील इनकॉग्निटो मोडवर ब्राऊंजिंग केल्यास आपला काही ट्रेस उरत नाही असा क्रोम वापरणार्‍यात समज आहे, त्यामुळे खाजगी ब्राऊजिंग करताना याचा वापर केला जातो. मात्र वास्तवात तसे घडत नाही.



अमेरिकेतील कोलंबिया, टेक्सा, इंडियाना आणि वॉशिंग्टन डीसी येथे अशा प्रकारचे खटले दाखल करण्यात आले आहेत. असोसिएट प्रेसच्या दाखल्यानुसार मॅपवर एखादं लोकेशन सापडलं नाही किंवा लोकेशन हिस्टरी रिकामी केली तरिही मॅप तुमचा प्रवास नोंद करत रहातो. याचबरोबर तो इतर खाजगी गोष्टींच्या नोंदीही ठेवतो.

प्रिनस्टोन विद्यापीठाद्वारे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळलं की ॲण्ड्रॉईड आणि ॲपल वापरणार्‍या दोन बिलियन हॅण्डसेटवर याचा परिणाम झालेला आहे, प्रतिस्पर्ध्यांना रोखून आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी ऑनलाईन सर्च क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाचा गैरवापर करत असल्याचा गुगलवर आरोप आहे. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अल्फ़ाबेट इन्कॉर्पोरेशनची उपकंपनी असणारी गुगल आपल्या या क्षेत्रातील वर्चस्वाचा गैरवापर करत आहे असा अरोप गुगलवर गेली अनेक वर्षं होत आहे. या आरोपांची दखल घेत अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकी न्याय विभागाकडून गुगलवर विश्वासघाताचा खटला दाखल करण्यात आला होता. ट्रम्प प्रशासनाच्या कालावधीत गुगलवर ठोस कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले गेले होते.

गुगलचे प्रवक्ते जोसे कास्टानेडा यांनी गुगलची बाजू मांडताना सांगितलं की, त्यांच्या सेटिंग्जबद्दलचे एजीचे दावे चुकीचे आणि जुने आहेत. कंपनीने वापरकर्त्यांशी संवाद साधल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच अगदी जून २०२० मधील नवीन खाती डीफ़ॉल्ट बाय डिफ़ॉल्ट म्हणून सेट करण्यापूर्वी वापरकर्त्यांना जून २०१९ पासून लोकेशन डेटा आपोआप हटवून दिला.

जगभरातील ९० टक्के वेबसर्च आपल्या मुठीत ठेवणार्‍या गुगलला हा धक्का होता मात्र त्यांनीही आपली बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer: 5G तंत्रज्ञानाला जगभरातून विरोध का होतोय? ते खरंच धोकादायक आहे का?

Next Post

जगातली ती प्रयोगशाळा, जिथे अनेक मृतदेह पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने ठेवले जातात

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जगातली ती प्रयोगशाळा, जिथे अनेक मृतदेह पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने ठेवले जातात

सलग ८ वर्ष बरड माळावर राबून नंदनवन फुलवलं; पद्म पुरस्काराने गौरव झाला!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.