The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिडक्या आणि रडक्या ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅकग्रा कायमच वेगळा वाटायचा

by द पोस्टमन टीम
8 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा किती दबदबा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या देशात हा खेळ सुरु झाला त्या देशाला म्हणजे इंग्लंडलाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट खेळताना दडपण येते.

ऑस्ट्रेलियन संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ग्लेन मॅकग्राबद्दल तर तुम्ही खूप काही ऐकून असालच. हातातून गेली अशा वाटणाऱ्या सामन्याचा निकालही फिरवायची कसब असलेला खेळाडू.

२००२ साली दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जोहान्सबर्गच्या मैदानात झालेला सामना तुम्हाला आठवत असेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर होता, १ विकेट ८९ धावा. पण बघता बघता दक्षिण आफ्रिकेचे एकामागून एक खेळाडू तंबूत जाऊ लागले आणि फक्त १३३ धावांवरच दक्षिण आफ्रिकेला आपला खेळ गुंडाळावा लागला.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चांगली कामगिरी सुरू असताना अचानक त्यांचे पारडे फिरले. कारण, त्यांच्याविरोधात बॉलिंग करण्यासाठी उभा होता, ग्लेन मॅकग्रा.

ग्लेनने अनेकदा असे चमत्कार करून दाखवले आहेत. कसोटी असो की वन-डे, वर्ल्ड कप असो की लीग मॅच. ग्लेनने आपल्या संघाची मजबुती टिकवण्यावर नेहमीच भर दिला आहे.



ग्लेनचा क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास कसा झाला हे जाणून घेणे खूपच प्रेरणादायी ठरेल.

ग्लेन मॅकग्राचा जन्म ऑस्ट्रेलियातील डाबू येथे झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने न्यू साउथ वेल्स येथे स्थलांतर केले. लहानपणापासूनच ग्लेनला क्रिकेटची आवड होती. त्याला या खेळात विशेष गती होती हे पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॉग वॉल्टर्सने त्याच्यातील या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचे ठरवले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

वॉल्टर्सला ग्लेनची बॉलिंग आवडत असे. ग्लेनने सदरलँडच्या ग्रेड क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. सिडनी येथे भरलेल्या या मालिकेत ग्लेनने आठ सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात त्याने उत्तम खेळ केला. यानंतर त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली. इथूनच त्याच्या क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

१२ नोव्हेंबर १९९३ रोजी पर्थच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. ग्लेनचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात ग्लेनने ३ विकेट घेतल्या. पण त्यानंतर ग्लेनच्या कर्तृत्वाचा आलेख वाढताच राहिला आहे.

ग्लेन कसोटी क्रिकेट खेळू लागला. हळूहळू त्याच्या बॉलिंगला चांगलीच धार येऊ लागली. त्याच्या या कमालीच्या बॉलिंगने ऑस्ट्रेलियाला अनेकदा यश मिळवून दिले. विजयाचे पारडे फिरवणारा खेळाडू ही त्याची ओळख आजही कायम आहे.

९ डिसेंबर १९९३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याद्वारे ग्लेनने एकदिवसीय क्रिकेटची सुरूवात केली. त्याच्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ग्लेनला एकही विकेट मिळाली नव्हती. पण, त्याच्या बॉलिंगने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

त्याच्या नावावर बॉलिंगचे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. कसोटी, एकदिवसीय, किंवा टी-२० सगळ्याच प्रकारांत त्याने चांगली कामगिरी केली. १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण १२४ कसोटी सामने खेळले आणि ५६३ विकेट आपल्या नावावर कमावल्या. यातील २९ सामन्यांत तर त्याने सलग ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण टीमला तंबूत पाठवण्याचा विक्रमही त्याने केला आणि एकदा नव्हे तर त्याने हा विक्रम तब्बल तीनदा केलेला आहे.

ग्लेनला महान खेळाडू का म्हणतात हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.

एकदिवसीय सामान्यातही त्याने असेच विक्रम नोंदवले आहेत. त्याने संपूर्ण कारकिर्दीत एकूण २५० एकदिवसीय सामने खेळले. या सगळ्या सामन्यांत मिळून त्याने ३८१ विकेट मिळवल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांतील त्याची बॉलिंग तर भन्नाट अशीच म्हणावी लागेल. एकदिवसीय सामन्यांत त्याने तब्बल सात वेळा एकमागून एक अशा पाच खेळाडूंना तंबूत पाठवण्याची किमया साधलेली आहे. ग्लेनच्या बॉलिंगची जादू काय होती याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

२००७ च्या वर्ल्डकप मालिकेत त्याने एकूण २६ विकेट घेतल्या. या मालिकेत इतक्या विकेट घेण्याचा विक्रम यापूर्वी कोणीही केलेला नाही. आणि म्हणून त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधेही झाली आहे. ग्लेनने कसोटी सामन्यात तब्बल ३५ वेळा खेळाडूंना शून्यावरच आउट केले आहे. हाही एक विक्रम त्याच्याच नावावर आहे. यानंतर नंबर लागतो तो त्याच्याच संघातील खेळाडू शेन वॉर्नचा.

एवढेच नाही तर, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या शेवटच्या सामन्यातील शेवटच्या बॉलवरही याने विकेट घेतली आहे.

सामन्याची दिशा बदलण्याची त्याच्यात हिंमत होती. १९९७ साली इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या सामन्यात तर त्याने आठ खेळाडूंना तंबूत पाठवले होते. २० ओव्हरच्या बॉलिंगमध्ये त्याने ८ विकेट घेतल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला पण ग्लेनच्या बॉलिंगने सर्वांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवला होता.

गाबाच्या मैदानातील २००६ साली झालेली ॲशेसची मालिकाही अशीच अविस्मरणीय राहिली आहे. ग्लेनने खेळलेली ही पहिली ॲशेस होती. यातही त्याने ६ विकेट घेऊन सामन्याचा निकाल फिरवून टाकला. त्याच्या बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाने २७७ धावांनी हा सामना जिंकला होता.

२००३ चा वर्ल्डकपचा सामनाही ग्लेनच्या बॉलिंगमुळेच जिंकता आला होता. या सामन्यातही ग्लेनने ७ विकेट घेतल्या होत्या. तेही सलग. निबियाच्या खेळाडूंना त्याची बॉलिंगच समजली नाही आणि एकामागून एक सात खेळाडू आउट झाले.

ग्लेनने २००७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पण खेळाडू म्हणून तो निवृत्त झाला असला तरी त्याचे क्रिकेटप्रेम मात्र तितकेच उत्कट आहे. आज तो नव्या खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण देतो. यासाठी त्याने एका फाउंडेशनची देखील स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या वतीने महिलांमध्ये आरोग्य जागृती करण्याचेही काम केले जाते.

ग्लेनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच प्रामाणिक आणि दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न केला. एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून नेहमीच ग्लेन क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हरभजन सिंह – भारतीय संघाचा टर्बिनेटर

Next Post

मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या 'गाझी'चा भुगा केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.