The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जिलेट’ने भारतीय बाजारपेठेत हातपाय पसरवण्यासाठी एक से एक शक्कल लढवल्या होत्या

by द पोस्टमन टीम
31 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“दम हथियार में नहीं, चलाने वाले में होता है” अशी एक हिंदी म्हण आहे. काहीशे वर्षांपूर्वी ही म्हण खरीही होती. विशेषतः जेव्हा दाढी करण्याची वेळ येत. दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे – ज्यामध्ये प्रामुख्याने वस्तऱ्याचा समावेश होत – ही केवळ कुशल व्यक्तींनाच हाताळता येत होती. त्यामुळं मग जर कोणाला दाढी करुन घ्यायची असेल, तर नाभिकाकडे जाऊन आपला गळा त्या हातात धारदार ब्लेड असणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात द्यावा लागत होता. यामुळं दाढी करण्यासारखं छोटंस कामही बरंच वेळखाऊ व्हायचं.

शिवाय, त्याकाळी आजच्या प्रमाणे वाढलेले केस किंवा दाढी यांची फॅशन नव्हती. त्यामुळं क्लीनशेव्ह करणं हे ‘जंटलमन्स’साठी अनिवार्य होतं. त्यामुळं दर दोन-तीन दिवसांनी नाभिकाकडे चक्कर मारावीच लागत. घरीच शेव्ह करण्याचा पर्याय तेव्हा तितकासा सुरक्षित नव्हता. त्यामुळं पैशांचा आणि वेळेचा होणारा हा खर्च टाळणं जवळपास अशक्य होतं.

१९०१ साली मात्र हे चित्रं बदललं. किंग सी. जिलेट नावाच्या एका व्यक्तीने ‘जिलेट’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट होतं, नाभिकाच्या दुकानात असलेली खुर्ची सामान्य व्यक्तीच्या बाथरुममध्ये नेणं! म्हणजेच, बाहेर सलूनमध्ये होते तशाच दर्जाची, आणि तेवढीच सुरक्षित शेव्हिंग लोकांना घरबसल्या स्वतःच करता यावी. यासाठी त्यांनी पहिलं प्रोटोटाईप अवजार १९०० मध्येच तयार केलं होतं. यामध्ये एक डिस्पोजेबल (एकदा वापरुन फेकून देता येण्यासारखं) ब्लेड आणि ते पकडण्यासाठीच्या एका अवजाराचा समावेश होता.

या ‘सेफ्टी रेझर’साठी एवढं पातळ आणि मजबूत ‘ब्लेड’ लागणार होतं, की ते तयार करणं अशक्य असल्याचं मत एमआयटीच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. मात्र, किंग जिलेटने तसे ब्लेड तयार करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.



जिलेटचं हे यंत्र/अवजार इंग्रजी वर्णमालेच्या टी (T) अक्षराप्रमाणे होतं. ज्यामध्ये वरच्या आडव्या पट्टीमध्ये ब्लेड अडकवण्याची सुविधा होती. तर खालची उभी दांडी म्हणजे ते पकडण्यासाठीची ग्रिप होती. यामुळे ब्लेड एकाच ठिकाणी घट्ट अडकून राहणार होतं, तसेच वापरणाऱ्याला आपल्या एकाच हाताने हे अवजार वापरणं शक्य होणार होतं.

यापूर्वी जेव्हा नाभिक दाढी करायचा, तेव्हा त्याच्या एका हातात ब्लेड होतं, आणि दुसऱ्या हाताने तो चेहऱ्यावरची स्किन ताणून धरायचा, जेणेकरुन ग्राहकाला कापलं जाणार नाही. मात्र, जिलेटचं रेझर वापरताना अशा प्रकारे स्किन ताणायची गरजच नव्हती.

किंग जिलेट हे केवळ एक रेझर लॉंच करुन थांबले नाहीत, तर याच मॉडेलमध्ये ते पुढे बरेच इन्व्हेंशन करत राहिले. पहिल्या प्रोटोटाईपला मिळालेल्या प्रतिसादामधून शिकत त्यांनी १९२० साली या सेफ्टी रेझरचं दुसरं मॉडेल लॉंच केलं. यामध्ये ब्लेड अडकवण्याची पट्टी एका विशिष्ट कोनामध्ये होती, तसेच त्याचं उघड-झाक करण्याचं मेकॅनिजमही बदलण्यात आलं होतं. आपल्या चेहऱ्यावर ते अधिक सहज आणि सुरक्षितपणे काम करावं, यासाठी हा बदल करण्यात आला होता. याच मॉडेलमध्ये ग्रिपही थोडीफार बदलली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

त्यानंतर मग कित्येक वर्षं जिलेट एकटंच शेव्हिंग प्रॉडक्ट्सच्या मार्केटमध्ये होतं. त्यानंतर १९२६ मध्ये ‘शिक रेझर्स’ म्हणून एक कंपनी आली. याची मालकी २००३ पर्यंत फायझरकडे होती. मात्र, या कंपनीच्या येण्याने जिलेटला फारसा फरक नाही पडला. पहिल्या महायु*द्धाच्या काळात तर अमेरिकी सरकारने केलेल्या करारानुसार ३५ लाख रेझर्स अमेरिकी सैनिकांना देण्यात आले. त्यामुळे या रेझरला ‘अमेरिकेचं रेझर’ अशी ओळख मिळाली.

तसंच, दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात अमेरिकी सैन्याने १ करोड २५ लाख रेझर्स आणि १५ लाख ब्लेड्स विकत घेतले. यासोबतच जिलेटने जर्मन रेझर्सची कॉपी करुन तीदेखील अमेरिकी गुप्तहेरांना पुरवली. जेणेकरुन जर्मनीमध्ये हेरगिरी करण्यासाठी गेलेल्यांवर अमेरिकी रेझर सापडून त्यांच्यावर कोणाला संशय येऊ नये.

यासोबतच, या काळात सैनिकांसाठी पैसे, नकाशा ठेवता येणारे किंवा मग दिशादर्शकाप्रमाणे वापरता येणारे असे विशेष रेझर्सही जिलेटने बनवले होते.

जिलेटला केवळ एकाच गोष्टीची चिंता होती, ती म्हणजे त्यांच्या डिझाईनचं पेटंट संपण्याची. त्यामुळं ते वारंवार आपल्या रेझरचं डिझाईन अजून मॉडिफाय करत होते. १९५७ साली जिलेटनं ॲडजस्टेबल सेफ्टी रेझर लॉंच केलं. यामध्ये लाईट, मीडियम आणि हेवी अशा तीन सेटिंग्स होत्या. यात मग पुढे आणखी बदल करत एकूण नऊ सेटिंग्स बसवण्यात आल्या. पुढे १९६५ साली आलेल्या ‘टेकमॅटिक’मध्ये आणखी मोठे बदल करण्यात आले. यामध्ये दोन वेगवेगळे भाग नव्हते, तर ब्लेड बसवण्याचा भाग आणि ग्रिप हे एकत्रच होते. हे रेझर रिट्रॅक्टेबल असल्यामुळे यात ब्लेड घालण्यासाठी ब्लेडला हात लावण्याचीही गरज पडत नव्हती.

आतापर्यंतच्या सर्व रेझर्सना केवळ एकच ब्लेड होतं. मात्र, १९७१ साली आलेल्या ट्रॅक-२ या मॉडेलमध्ये जिलेटने पहिल्यांदाच एका खाली एक असे दोन ब्लेड बसवले होते. अधिक सफाईदारपणे आणि अधिक चांगली शेव्हिंग करता यावी यासाठी ही दोन ब्लेडची सिस्टिम तयार करण्यात आली होती. पुढे १९७७ मध्ये आलेल्या ‘ॲट्रा’ मॉडेलमध्ये ट्विन ब्लेड्ससोबतच मोठा बदल करण्यात आला. याची ब्लेड बसवण्याची जागा (म्हणजे एकूण ब्लेडच) ही टिल्ट होत होती. यामुळे चेहऱ्यावरील चढ-उतारांसोबतच हे ब्लेडही ऍडजस्ट होत होतं. यामुळं शेव्ह करणं आणखी सुरक्षित झालं होतं.

पुढे १९८५ साली याच ॲट्रामध्ये ल्युब्रिकेटिंग स्ट्रिप जोडून ‘ॲट्रा प्लस’ हे मॉडेल लॉंच करण्यात आलं. त्यानंतर ९०मध्ये आलेल्या ‘सेन्सर’ या मॉडेलमध्ये दोन्ही ब्लेड्स स्वतंत्रपणे हलू शकतील अशी व्यवस्था होती. १९९३मध्ये आलेलं ‘माक्-३’ हे जिलेटचं आतापर्यंतच सर्वात जास्त चाललेलं मॉडेल. अजूनही याची लोकप्रियता कमी झाली नाही हे विशेष.

या रेझरमध्ये पहिल्यांदाच तीन ब्लेड वापरण्यात आले होते. यानंतरही जिलेटने ५ ब्लेड्स, दोन्ही बाजूंनी ल्युब्रिकेटिंग स्ट्रिप अशा गोष्टी असलेली आणखी मॉडेल्स लॉंच केली. मात्र, माक्-३ हे सर्वात लोकप्रिय राहिलं.

जिलेटच्या लोकप्रियतेमागे केवळ त्यांचं डिझाईन हीच बाब नव्हती. त्यांची किंमत हादेखील मोठा मुद्दा होता. जिलेटने आपली प्रायझिंग स्ट्रॅटर्जी अशा प्रकारे ठेवली होती, की सामान्यातील सामान्यालाही ते घ्यायला परवडेल. प्रत्येक वेळी नवीन मॉडेल लॉंच केलं, की त्यापूर्वीच्या मॉडेलची किंमत कमी केली जात होती. ज्यामुळं एखाद्या व्यक्तीला नवं मॉडेल परवडत नसलं, तरी तुलनेने स्वस्त झालेलं जुनं मॉडेल तो घ्यायचाच. जसंजसं मार्केटमध्ये स्पर्धा वाढू लागली, जिलेटनं जाहिराती वगैरे इतर गोष्टींवरही लक्ष देण्यास सुरुवात केली. माक्-३ साठी जिलेटनं तब्बल ५ वर्षं रिसर्च केला होता. तसंच, याच्या जाहिरातींवर तब्बल ३०० मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आला होता.

भारतामध्ये तर जिलेटला अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. माक्-३ भारतात २००४ साली लॉंच झाला. तेव्हा भारतातील लोकसंख्या वाढतच होती. भारत हा जिलेटसाठी मोठं मार्केट ठरणार होता. मात्र, एक अडचण होती. ती म्हणजे, अमेरिका किंवा इंग्लंडसारख्या देशांप्रमाणे भारतात क्लीन शेव्ह असण्याला तेवढं महत्त्व नव्हतं. त्यामुळे रेझर खपवायचेत, तर देशातील नागरिकांना आधी शेव्हिंगची सवय लावणं गरजेचं होतं. यासाठी जिलेटने शेव्ह इंडिया मूव्हमेंट, वुमेन अगेन्स्ट लेझी स्टबल अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या. तसेच, विविध टीव्ही शो, न्यूज चॅनल यांच्यावर शेव्हिंगबाबत चर्चा घडवून आणल्या.

यात तीन प्रश्न प्रामुख्याने विचारले गेले – एक म्हणजे क्लीन शेव्ह केलेले पुरुष अधिक यशस्वी असतात का? दुसरा म्हणजे, लोकांना क्लीन शेव्ह केलेले सेलिब्रिटी जास्त आवडतात का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता – बायकांना क्लीन शेव्ह केलेले पुरुष आवडतात का?

२००९ च्या आसपास हे सगळं करण्यासोबतच जिलेटने नव्या रुपात माक्-३ भारतात लॉंच केलं होतं. वापरण्यास सोपं, परवडणारं, चांगल्या दर्जाची आणि सुरक्षित शेव्ह देणारं, कमी पाणी लागणारं अशा प्रकारच्या यूएसपींचा वापर करुन जिलेट भारतीय बाजारपेठेत आणलं – आणि चाललंही!

मोठमोठ्या स्पर्धांना स्पॉन्सर करणं, फुटबॉल स्टार्स, सेलिब्रिटी यांना जाहिरातीमध्ये घेणं अशा गोष्टी करत राहिल्यामुळे जिलेट आजही एक मोठा ब्रँड आहे. विशेष म्हणजे, आजकाल लोक क्लीन-शेव्ह करण्याकडे तेवढं गांभीर्याने पाहत नाहीत. इलेक्ट्रिक रेझर्स आल्यामुळे झटपट दाढी ट्रिम करण्याकडे लोकांचा कल असतानाही जिलेटचा खप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जगातील एकूण रेझर्सच्या मार्केटचा ५३ टक्के भाग जिलेटकडे आहे. बाकी टक्केवारीमध्ये मग इतर कंपन्यांचा समावेश आहे. एका अर्थाने अजूनही जिलेट या मार्केटमध्ये डॉमिनंट आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या आजीने ६५व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली आणि ५० पेक्षा अधिक मेडल्स जिंकली

Next Post

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गाडगीळ समिती काय सांगते, जाणून घ्या!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गाडगीळ समिती काय सांगते, जाणून घ्या!

एका बॉक्समध्ये ७२ तास विषारी सापांसोबत राहून या पुणेकराने गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.