The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात डुप्लिकेट लाकडी रणगाड्यांनी हि*टल*रची झोप उडवली होती

by द पोस्टमन टीम
1 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


यु*ध्द म्हटलं की शस्त्रास्त्रं आलीच. शस्त्राविना यु*ध्द लढणंही कठीण आणि ते जिंकणंही. मात्र ऐतिहासिक अशा दुसर्‍या महायु*ध्दात मात्र जर्मन सैन्याला व्यूहात अडकविण्यासाठी विरोधी बाजूनं एक अनोखी शक्कल लढविली. त्यांनी चक्क नकली रणगाडे वापरुन व्युह रचला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना*झी या व्युहात फ़सलेही. याला घोस्ट आर्मी असं नाव दिलं गेलं.

दुसरं महायु*द्ध अशा अनेक गोष्टींसाठी इतिहासात नोंदवलं गेलं. अ*ण्वस्त्रांचा वापर आणि प्रथमच आकाशातून यु*ध्द करुन या यु*ध्दानं त्याचा आवाका आणखीनच मोठा करुन ठेवला होता. जर्मन ना*झी सैन्यानं जगभरात हाहाकार माजवला होता. मात्र या ना*झींना अमेरिकेच्या ट्रुपनं अक्षरश: उल्लू बनवत ही छोटी लढाई जिंकली होती.

घोस्ट आर्मी म्हणून जिचा दुसर्‍या महायु*ध्दाच्या इतिहातास उल्लेख केला जातो ती २३ हेडक्वार्टर स्पेशल ट्रुप कलाकार, ऑडिओ तज्ज्ञ आणि सैनिकी अधिकारी यांचा मिळून बनला होता. या तिघांच्या कल्पनेतून साकारली होती एक अनोखी कल्पना. जिनं ना*झींना यु*ध्दभूमीवर चांगलाच चकमा दिला होता.

कला आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ़ करत घोस्ट आर्मीनं १९४४ ते १९४५ या कालावधीत किमान दोन डझन मिशन्सची यशस्वी पूर्तता केली होती. युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा ठावठिकाणा ना*झींना कळू न देण्यासाठी, त्यांना चकवा देण्यासाठी म्हणून या घोस्ट आर्मीचा वापर करण्यात आला होता. या व्युहरचनेमुळे हजारो सैनिकांचे प्राण वाचवणं शक्य झालं. या घोस्ट आर्मीचं रहस्य इतकं सुरक्षित होतं की यु*ध्द संपल्यावरही चाळीस वर्षांनंतर जगासमोर ही गोष्ट आली. तोपर्यंत महायु*ध्दात असा काही प्रकार घडला होता हे कोणालाही माहित नव्हतं. १९९० च्या मध्यापर्यंत घोस्ट आर्मी हे जगासाठी गुपित होतं.

मार्च १९४५, दोस्त राष्ट्रांची जर्मन सैन्याबरोबरची महिनोन महिने चाललेली कडवी लढत आता अंतिम टप्प्यात आल्यात जमा होती. जर्मन सैन्याला र्‍हाईन नदीचं नैसर्गिक संरक्षण लाभलं होतं. मात्र याच नदीच्या पात्राजवळ दोस्ट राष्ट्रांच्या सैन्याची हालचाल जर्मन सैन्याला हवाई टेहळणीत दिसून आली आणि ना*झी सावध झाले. दोस्त राष्ट्रांना आपण खिळखिळं करून टाकलं असल्याचा विश्वास आलेला असतानाच ही हालचाल गंभीर इशारा देऊ पहात होती.



हवाई टेहळणीत हजारो अमेरिकन वाहनांची हालचाल दिसून आली. याची खातरजमा करून घेण्यासाठी म्हणून दोस्त राष्ट्रांच्या रेडिओ संदेशांना टॅप करण्यात आलं. या संदेशांवरून र्‍हाईन नदीपलीकडे खरोखरच सैन्याची हालचाल चालू झाल्याची ना*झींची पूर्ण खात्री पटली. या संदेशावरून दोन अमेरिकन तुकड्या हालचाल करताहेत असं जाणवलं. जर्मन टेहळणी पोस्टवरून समोरच्या हालचाली आणि संदेश बारकाईनं तपासण्यात येऊ लागले.

दोस्त राष्ट्रं ३० एक हजारांची कुमक घेऊन र्‍हाईन नदीकडे येऊ लागल्याची खात्री पटल्यावर हि*टल*रनं ही कुमक नदीतच बुडवून टाकण्याचे आदेश दिले. आपल्या हेरगिरीवर ना*झींना विश्वास काय, माज होता. दोस्त राष्ट्रांची मुंगीइतकी हालचालही आपण हेरू शकतो याचा अभिमान होता आणि म्हणूनच आताही दोस्तराष्ट्रांची ही हालचाल त्यांनी टिपल्यावर त्यांना गारद करण्यासाठीच्या व्युहरचनेला ना*झींनी सुरवात केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अनायसे इतकी मोठी कुमक गारद करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद झालेले ना*झी अत्यंत उत्साहानं दोस्तराष्ट्रांच्या रणगाड्यांची वाट बघत होते.

तिकडे ना*झी दबा धरू बसलेले असताना इकडे र्‍हाईनच्या पैलतीरावर एक वेगळंच नाट्य रंगलेलं होतं. रंगीत तालिम पूर्ण होऊन आता फ़ायनल स्टेज शो होणार होता. हो, स्टेज शो! ना*झींच्या नाकाखाली अमेरिकन ट्रुपनं बसवलेलं हे नाटक त्याच्या प्रिमियरकडे सरकलं होतं. ना*झी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची ताकद अजमावत असतानाच दोस्त राष्ट्र चक्क खास जर्मनीसाठी म्हणून एक नाटक बसवत होतं. या नाटकात मुख्य भूमिका होती रणगाड्यांची. हे लाकडी जर्मन सीमेकडे सरकत असताना ना*झींना कणभरही शंका आली नाही की ज्यांना उ*ध्वस्त करायला आपण एवढी मोठी सैन्य जुळवणी करतो आहोत प्रत्यक्षात ती दोस्त राष्ट्रांनी ना*झींना भेट दिलेली नकली खेळणी आहेत. ज्या रेडिओ संदेशांना पकडून दोस्तराष्ट्रांच्या हालचाली आपण मिळविल्या असं ना*झींना वाटत होतं, ते संदेशही प्रत्यक्षात नकली होते.

अतिशय काळजीपूर्वक आखलेलं हे एक नाट्य होतं, ज्याचा उद्देश जर्मन सैन्याचं लक्ष विचलीत करणं होतं, जो शंभर टक्के यशस्वी झाला होता.

लाकडी साच्यावर हेशन कापडानं अगदी हुबेहूब ब्रिटिश रणगाड्यांचा रंग चढविण्यात आला होता. हा रंग इतका खरा होता की ३० हजार सैन्य रणगाड्यांसहित चाल करून येत असल्याची ना*झींची खात्रीच पटली होती. प्रत्यक्षात दोस्तराष्ट्रांनी रचलेलं बेगडी नाट होतं जे यु*ध्दभूमीवर दाखवलं गेलं.

या घोस्ट आर्मीचं नेतृत्व होतं कर्नल हॅरी रेडर यांच्याकडे. या ट्रुपमध्ये १ हजार २३ जणांचा समावेश होता. ज्यात न्यूयॉर्कमधील प्रॅट इन्स्टिट्यूटमधील इंडस्ट्रीयल कॅमोफ़्लॉज प्रोग्रॅमचे विद्यार्थी, फ़ॅशन डिझायनर बिल ब्लास, छायाचित्रकार आर्ट केन आणि चित्रकार एल्सवर्थ केली यांचा समावेश होता. या सगळ्यांनी मिळून ना*झींना चकवा देण्याची रणनिती आखली होती.

फ़ॅण्टम आर्मी बटालियनला जिवंत करण्यासाठी त्यांनी चार भागात त्याची रचना केली. सर्वात पहिला भाग होता, कॅमफ़्लॉज इंजिनियर बटालियन-अग्निशामक वाहनं, फ़ुगणारे टॅन्क यावर काम करणारे तज्ज्ञ. असे टॅन्क जे अगदी दोन चार माणसंही सहजी एका जागेवरून दुसरीकडे नेऊ शकतील. मात्र त्यांच्या हालचालीत आणि दिसण्यात इतका जिवंतपणा असायला हवा की दूरवरून ते खरे रणगाडेच भासले पाहिजेत.

दुसरा भाग होता, सिग्नलचा. असे तज्ज्ञ, जे बनावट रेडिओ लहरी संदेशांची जबाबदारी सांभाळतील. हे रेडिओ ऑप्रेटर इतके कुशल होते की त्यांनी सैनिकी संदेश पाठविण्याची विशिष्ट शैली, मॉर्स कोडची नक्कल करुन हे संदेश पाठविले म्हणूनच ना*झींना रणगाड्यांच्या हालचालीची सत्यता पटली होती. तिसरा घटक होता, सोनिक साऊंड. अर्थात ध्वनी. सैन्याचं प्रशिक्षण आणि खंदक खोदतानाच्या हालचाली, आवाज यांना आधीच रेकॉर्ड करुन त्यांना यु*ध्दभुमीवर मोठ्या स्पिकरवर वाजवून सैनिकी हालचालीचं हुबेहूब वातावरण निर्माण करणे हे काम या गटाकडे होतं.

चौथा विभाग हा जर्मन हेरांना चकवा देण्यासाठी काम करणार होता. आजूबाजूच्या गावातून ठरवून संशयास्पद हालचाल करत ना*झी हेरांची दिशाभूल करण्याचं काम हा गट करणार होता.

अशा प्रकारे काम करत या पलटणीनं अनेक ठिकाणी जर्मनांना चकवलं होतं. या नकली पलटणीला खरी समजून जर्मन चाल करून येत असतानाच दोस्तराष्ट्रांची खरी कुमक दुसरीकडेच धुमाकूळ घालत असे. हीच चाल र्‍हाईनच्या पात्राजवळ चालली गेली ज्यात जर्मन सैन्य पुरतं अडकलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या बौद्ध भिक्खूने म्यामनमारमध्ये मुस्लिमांचं जगणं मुश्किल करून टाकलंय

Next Post

सर रतन टाटांमुळे पाटलीपुत्रचा वैभवशाली इतिहास जगासमोर येऊ शकला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

सर रतन टाटांमुळे पाटलीपुत्रचा वैभवशाली इतिहास जगासमोर येऊ शकला

सौदीच्या वाळवंटातला हा दगड एलिअन्सनी मधोमध 'लेझरकट' केल्याच्या अफवा आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.