The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाजसेवेचा बुरखा पांघरून ही महिला ५००० मुलांना विकून करोडपती झाली होती

by द पोस्टमन टीम
13 September 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मुलं चोरणारी टोळी सक्रीय, खंडणीसाठी मुलांचं अपहरण अशा आशयाच्या अनेक बातम्या तुम्ही आजवर वाचल्या असतील. मात्र, एका बालगृहाच्या संचालिकेनंच तब्बल ५ हजार मुलं चोरली, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार का? अनाकलनीय अशी ही घटना पूर्णत: खरी असून ती घडलीय महाशक्ती म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेत. जॉर्जिया टॅन असं या मुलं चोरून विकणाऱ्या तस्कराचं नाव.

अमेरिकेतील टेनिसी चिल्ड्रेन्स होम सोसायटीत वर्षानुवर्षे हा गोरखधंदा जॉर्जिया करत होती. जेव्हा या कृत्याचा भांडाफोड झाला, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. गरीब वस्त्यांमध्ये फेरफटका मारायचा, सुंदर मुलांना हेरायचं, त्यांना तिच्या लक्झरी काळ्या गाडीत फेरफटका मारायला न्यायचं ही तिची मुलं चोरण्याची पद्धत होती.

एकदा का ही मुलं या आमिषाला बळी पडली, की ती परत त्यांच्या आई-वडिलांना कधीच दिसायची नाही. तिच्या या क्रृरकर्मात तिला कायद्यातील तृटींचा बराच फायदा झाला. हे बालगृह बंद झाल्यानंतर जॉर्जियानं चोरलेल्या अनेक मुलांचा तिनं केलेल्या छळामुळे मृत्यू झाल्याचं एका अहवालात पुढे आलं. जी मुलं या छळछावणीतून वाचली, त्यांच्या जीवाचा आज एवढ्या वर्षांनंतरही त्या आठवणीनं थरकाप उडतो.

बेऊलाह जॉर्ज ऊर्फ जॉर्जिया टॅनचा जन्म अमेरिकेच्या मीसीसीपी प्रांतातील फिलाडेल्फिया शहरात १८९१ साली झाला. तिचे वडील शहरातील प्रसिद्ध न्यायाधीश होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वकील होण्याची जॉर्जियाची इच्छा होती. मात्र, याला तिच्या वडिलांचा विरोध होता. त्यानंतर तिनं स्वत:ला समाजसेवेत वाहून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, समाजसेवेच्या नावाखाली तिनं जे कारनामे केले, त्यामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली.

सुरवातीला जॉर्जियानं मीसीसीपीमधील एका संस्थेसाठी काम करायला सुरुवात केली. मात्र, गरिब मुलांना विनाकारण अयोग्यरित्या त्यांच्या घरातून जॉर्जिया बाहेर काढत असल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. मग, त्या संस्थेनं तिला घरचा रस्ता दाखवला.



त्यानंतर तिनं टेक्सासची वाट धरली. याठिकाणी १९२२ मध्ये जून नावाच्या एका मुलीला तिनं दत्तक घेतलं. या ठिकाणी काही काळ वास्तव्यानंतर ती मेम्फीसला स्थलांतरीत झाली. या शहरात असलेल्या ‘टेनिसी चिल्ड्रेन्स होम सोसायटी’च्या शाखेत तिला कार्यकारी सचिवाची नोकरी मिळाली. जॉर्जियाच्या वडिलांनी तिला ही नोकरी मिळावी यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर केला होता. या संस्थेची पुढे ती १९२९ साली कार्यकारी संचालक झाली आणि सुरु झाला लहान मुलांचं अपहरण करून विकण्याचा गोरखधंदा.

मोठी किंमत मिळावी म्हणून चोरलेली मुलं श्रीमंतांना विकण्याचा जॉर्जियाचा प्रयत्न असायचा. सेलिब्रेटी, उद्योजक, लेखक असे मोठे लोक तिच्या रडारवर असायचे. करिअरमध्ये व्यस्त यशस्वी स्त्रिया त्याकाळी नवजात बालकं दत्तक घेण्यास प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे जॉर्जियाच्या या धंद्याचं जाळं अल्पावधीतचं विस्तारलं गेलं. डिक पोवेल, जुन अलिसन, लाना टर्नर, पर्ल बक, स्माईली बरनेट यासारख्या मोठ्या आसामींनी जॉर्जियाच्या संस्थेतील मुलं दत्तक घेतली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

असं म्हणतात, की बाल तस्करीतून या बाईनं त्याकाळी १ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय मूल्यामध्ये ७१ करोड ८० लाखांवर कमाई केली. या बाल तस्करीत तिला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, वकील एवढंच काय, न्यायाधीशांनी देखील मदत केली. यातील काहींनी खेळांच्या मैदानांमधून, शाळांमधून, चर्चमधून मुलं पळवून नेली. गरिब कुटुंबांतील मुलांना ही मंडळी सर्वांत आधी लक्ष्य करायची. कारण पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यानं ही कुटुंबं त्यांच्या मुलांसाठी कायदेशीररित्या भांडण्याची शक्यता फार कमी होती.

रुग्णालयांमध्ये कमी दरांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या आमिषालाही अनेक कुटुंबं बळी पडली आणि त्यांनी त्यांची मुलं कायमची गमावली. मोबाईल फोन, इंटरनेट नसलेल्या त्या काळात हा धंदा नजरबाजांच्या टीपवर चालायचा. अमुकअमुक ठिकाणी बेसावध मुलं फिरत असल्याची टीप हे नजरबाज जॉर्जियाला द्यायचे. मग काय तिच्या पॉश काळ्या चारचाकीत फिरवण्याचं आमिष ती या मुलांना दाखवायची आणि पळवून न्यायची.

टेनिसी संस्थेच्या नियमानुसार त्या काळात ७ ते ७५ डॉलर्स एवढी फी मुलं दत्तक घेण्यासाठी आकारली जायची. मात्र, यासाठी हजारो डॉलर्स जॉर्जिया आकारत असल्याचं आणि यातून जमा झालेल्या तब्बल ९० टक्के रकमेचा अपहार झाल्याचं पुढे चौकशीत निष्पन्न झालं. मुलांनी शांत राहावं, यासाठी या संस्थेतील मुलांना ड्र*ग्ज दिलं गेल्याचंही अहवालात समोर आलं. ही मुलं दत्तक जाईपर्यंत त्यांच्यावर अतोनात अ*त्याचार केले जायचे. अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवणं, मार*हाण याशिवाय त्यांना अनेक दिवस उपाशी देखील ठेवलं जायचं. या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी नशेडी लोकांना ठेवलं जायचं.

चोरलेल्या मुलांची ओळख पटू नये, यासाठी कुणाला दत्तक देण्यापूर्वी त्या मुलांच्या वयात आणि नावात फेरफार केला जायचा. नवजात बालकांची मागणी जास्त असल्यानं कुमारी माता, धर्मार्थ दवाखाने, तुरुंगात जन्मलेले बाळ संबंधित यंत्रणेतील लोकांना लाच देऊन मिळवायची.

वर्षानुवर्ष सुरु असलेल्या या तस्करीचं रॅकेट १९५० साली उघडकीस आलं. या घटनेच्या ३ दिवसांनंतरच रॅकेटची मुख्य सुत्रधार जॉर्जिया टॅन तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. त्यानंतर लगेचच ‘टेनिसी चिल्ड्रेन्स होम सोसायटी’ला टाळं लागलं. मुलांच्या तस्करीचं हे प्रकरण त्याकाळी अमेरिकी माध्यमांनी उचलून धरलं.

या छळछावणीत मृत्यू पावलेल्या इवल्याश्या जिवांना जॉर्जियानं कुठे गाडलं, हे आजतागायत समजू शकलं नाही. मारहाणीतून जिवंत वाचलेल्या मुलांच्या शरिरावर उमटलेले व्रण त्यांच्या मनात कायमचं घर करुन गेले.

या रॅकेटच्या दृष्टकृत्यांमुळे ५ हजार मुलांचं आयुष्य नेहमीसाठी बदललं. अनेक मुलांची त्यांच्या खऱ्या आईबाबांपासून कायमची ताटातूट झाली. नवजात असताना दत्तक गेलेल्या मुलांची खरी ओळख हरवली, ती ही कायमचीच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कारकिर्दीच्या पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेऊनही वामन कुमारला संधी नाकारण्यात आली

Next Post

जगावेगळा ‘मसाई’ समाज: जनावरांचं पितात रक्त, तर थुंकुन दिला जातो नवजात बाळांना आशिर्वाद

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगावेगळा ‘मसाई’ समाज: जनावरांचं पितात रक्त, तर थुंकुन दिला जातो नवजात बाळांना आशिर्वाद

ऑपरेशन टायटॅनिक - ब्रिटनने बाहुल्यांना पॅराशूट्स लावून जर्मनीत उतरवून त्यांची झोप उडवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.