The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेशवाईतही गणेशोत्सव साजरा व्हायचा का?

by द पोस्टमन टीम
27 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सण-उत्सव साजरा करण्याची भारतीयांची पद्धत काही वेगळीच असते. सणासमारंभांच्या वेळचे आल्हाददायक, प्रसन्न आणि उत्साही वातावरण काही औरच असते. भारताला भेट देणाऱ्या अनेक परदेशी पाहुण्यांना या सणासुदीचे विशेष आकर्षण आणि औत्सुक्य असते.

सण साजरे करण्याचा पद्धती आणि त्यामध्ये उत्साहाने सामील होणारा भला मोठा समुदाय, एकमेकांच्या सोबातीने साजरा केलेला आनंद, एकमेकांविषयी दाखवला जाणारा स्नेह आणि आदर. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच समाजातील सौहार्द आणि भावनिक ओलावा टिकून राहतो.

पेशव्यांच्या काळात भारतात आलेल्या अशाच एका विदेशी पाहुण्याला आपल्या खास मराठमोळ्या सणाचा सोहळा अचंबित करून गेला होता.

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भारतात इस्ट इंडिया कंपनीने नुकतेच आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीचा मॅलेट नावाचा एक अधिकारी पेशव्यांकडे राहत होता. मॅलेटने पेशव्यांचे चित्र रेखाटण्यासाठी जेम्स वेल्स या प्रसिद्ध स्कॉटिश चित्रकाराला बोलावून घेतले होते. मॅलेटने दिलेले निमंत्रण स्वीकारून जेम्स वेल्स पेशव्यांचे चित्र बनवण्यासाठी पुण्यात हजर झाला.



जेम्स पुण्यात आला तेव्हा सगळीकडे गणेश चतुर्थीची धामधूम सुरु होती. आता गणेशोत्सवाची धामधूम म्हणजे नेमका काय माहोल असेल हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.

महाराष्ट्रात या बुद्धीच्या देवतेला आजही अतीव श्रद्धेने पूजले जाते. तो काळ तर पेशवाईचा होता. विशेष म्हणजे, चौसष्ट कलांची आराध्य देवता असलेला श्री गणेश हा पेशव्यांचा आराध्य दैवत होता. पेशव्यांच्या आराध्य दैवताचा सण म्हणजे त्याची रौनक तर डोळे दिपवणारीच असणार ना!

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पेशव्यांच्या काळातही गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. नंतर ब्रिटिशांनी भारतीय एकत्र येऊन सण-समारंभ साजऱ्या करण्याच्या प्रथेवर बंदी घातली आणि हे सण फक्त वैयक्तिकरित्या साजरे केले जाऊ लागले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करेपर्यंत देशात गणेशोत्सव हा वैयक्तिक पातळीवरच साजरा होत असे.

स्वातंत्र्यसंग्रामात भारतीयांना एकत्र येऊन आपले देशकार्य तडीस नेता यावे या उद्देशांनी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे पुनरुज्जीवन केले. देशाबांधवांना त्यानिमित्ताने एकत्र येऊन काही क्रांतीकार्य करता येईल हाच टिळकांच्या उद्देश होता. नंतर टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव मात्र सगळ्या देशभर धुमधडाक्यात साजरा होऊ लागला.

पेशवेकाळातही गणेशोत्सव उत्साहाच्या, जल्लोषाच्या आणि भक्तीभावाच्या वातावरणात साजरा होत असे.

वेल्स हा एक चित्रकार होता. खुद्द पेशव्यांचे चित्र रेखाटून त्यांना खुश करण्याच्या हेतूनेच तो पुण्यात आला होता. जेणेकरून त्याच्या चित्रांना भारतात आणखीन मागणी वाढेल आणि भारतात त्याचे नावही होईल.

तर, जेम्स वेल्स जेव्हा पुण्यात आला, तेव्हा गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सवकालीन चैतन्यमय आणि लगबगीच्या वातावरणाने जेम्स वेल्स अक्षरश: दिपून गेला. संपूर्ण पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेली आरास, वाड्यातील दिव्यांची रोषणाई, मधुर संगीताचे सूर, सोबत विविध पक्वान्नांचा आणि मोदकांचा दरवळणारा घमघमाट अशा वातावरणाने जेम्सला मोहून टाकले.

वेगवेगळ्या रंगीबेरंगी पोशाखात सजलेले पुरुष आणि सोन्यामोत्यांच्या दागिन्यांनी नखशिखांत नटलेल्या मराठमोळ्या गृहिणी, गणपतीच्या आरतीसाठी जमलेला भला मोठा जमाव पाहिल्यानंतर जेम्स भारावून गेला. त्या दिवशीच्या सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे वर्णन त्याच्या डायरीत वाचायला मिळते. सध्या ही डायरी ब्रिटीश आर्ट म्युझियमच्या येल सेंटरच्या ताब्यात आहे.

परंतु त्या काळातील गणेशोत्सवाचे बारीकसारीक वर्णन या डायरीतून नोंदवले गेले आहे. सोबतच वेल्सने पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील गणेशोत्सवाचा अचूक वर्णन करणारी एक आकृती देखील रेखाटली आहे. या आकृतीत त्याने श्रीगणेशाची मूर्ती कुठे बसवली आहे, पेशवा कुठे बसले आहेत, ब्रिटीश मंत्री कुठे बसले आहेत, इत्यादी सगळ्या गोष्टींची नोंद केलेली आहे.

तो काळ पेशव्यांचा उत्कर्षाचा आणि मराठी साम्राज्याच्या उन्नतीचा काळ होता. अर्थातच पेशव्यांच्या वैभवाला आणि कीर्तीला शोभेल अशा थाटातच हा गणेशोत्सव साजरा होत असणार.

जेम्सने या डायरीत लिहिले आहे, “आज आम्हाला गणेशोत्सवानिमित्त दरबारात येण्याचे आमंत्रण दिले होते. आम्ही तिथे पोहोचल्यावर एका मोठ्या खोलीत आम्हाला घेऊन जाण्यात आले. त्या खोलीची एक बाजू एखाद्या देवळाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे सजवली होती. तिथे एक दारही होते आणि दारातून आम्हाला दिव्यांच्या जळणाऱ्या ज्योती आणि पूजा करणारे ब्राह्मण दिसत होते.”

आरतीसाठी जमलेले पुरुष देखील भरजरी आणि रंगीत पोशाखात सजूनधजून आल्याचे जेम्सने लिहिले आहे. विशेष म्हणजे पुरुषांनी परिधान केलेल्या पगड्या आणि शिरस्त्राणे वेगवेगळ्या पद्धतीची असल्याचे निरीक्षणही जेम्सने नोंदवले आहे.

जेम्सने आपल्या डायरीत गणेशोत्सवाचा एक आराखडा रेखाटला आहे. या आराखड्यात त्याने सोहळ्याचे चित्रमय वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. या आकृतीत त्याने ठिकठिकाणी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचा वापर करून त्याखाली कोणते अक्षर काय दर्शवते याचे स्पष्टीकरणही दिले आहे.

A- देवळाचा दरवाजा, B- लाल रेशमी वस्त्रे घेतलेले दोन सेवक, C-विविध फुलांचे गुच्छ, D-पूजेची निरांजने, E-श्री गणेशाची मूर्ती, F-आसनस्थ पेशवे, G- मंत्री (म्हणजे बहुतेक नाना फडणवीस), H- सर चार्ल्स मॅलेट, I-मिस्टर लॉकहार्ट, J- पानाच्या विड्यांचे तबक, K-वेल्स (स्वतः), L- डॉ. फिंडले (इंग्रज वकिलातीतील सर्जन), M-मिस्टर इमानुएल, N-कर्नल लेडी यांचा मोठा मुलगा, P- सेवक, Q- नृत्य करणाऱ्या स्त्रिया, S-पेशव्यांच्या शेजारी आणि समोर अनेक उच्च दर्जाचे सरदार बसले आहेत, R- नृत्य कलावंतांचा गट, असे वर्णन केले आहे.

आरतीसाठी हजर असलेले सरदार मनसबदार, इंग्रज अधिकारी यावरून शनिवारवाड्यातील गणपतीची आरती किती सन्मानाची समजली जायची याची प्रचीती येते.

पेशवेकालीन गणेशोत्सवाच्या नोंदी असलेली अस्सल कागदपत्रे आज उपलब्ध नाहीत. पण, जेम्स वेल्सच्या या डायरीतून तत्कालीन गणेशोत्सवाची एक झलक दिसून येते. त्याच्या या नोंदी आणि नकाशामुळे शनिवारवाड्यातील परंपरा आणि सोहळे यांची अधिक माहिती जाणून घेण्यास नक्कीच मदत होऊ शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दरोडेखोर जॉन डिलींजर इतकी लोकप्रियता हॉलीवूड अभिनेत्यालासुद्धा मिळाली नसेल

Next Post

भारताच्या संविधान निर्मितीत या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योगदान बहुमूल्य आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारताच्या संविधान निर्मितीत या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योगदान बहुमूल्य आहे

कसा आहे अनुराग कश्यपचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'चोक्ड' हा चित्रपट?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.