The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दाऊद इब्राहीम नाही तर हा आहे भारताचा मोस्ट वाॅन्टेड..!

by द पोस्टमन टीम
3 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नक्षलवाद ही भारतासमोरील एक फार मोठी गंभीर समस्या आहे. नक्षलवादाविरोधातील लढाईत भारताचे अनेक सुपुत्र आजवर शहीद झाले आहे.

देशातील या सर्वांत कुख्यात माओवादी नेत्याच्या मृत्यूचा याआधी अनेक वेळा बातम्या आल्या होत्या, पण त्या खोट्या ठरल्या होत्या, आता तो लवकरच पोलिसांना शरण जाणार असल्याची बातमी आली आहे. गणपती हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी किती मोठा धोका आहे याचा अंदाज त्याच्या डोक्यावर कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमपेक्षा जास्त रकमेचा इनाम आहे, यावरून येतो. गणपती हा अनेक राज्यात मोस्ट वॉन्टेड अपराधी आहे.

गणपतीचे खरे नाव मुप्पला लक्ष्मणराव असे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, बिहार व छत्तीसगडचे पोलीस दल त्याच्या शोधात आहे. नॅशनल इन्व्हेस्टिंगेशन एजन्सी (NIA) देखील याच्या शोधात आहे.

अनेक राज्यांनी या कुख्यात माओवादी नेत्यावर किती तरी कोटींचे इनाम ठेवले आहे. अनेकांनी हा आकडा २.५ कोटी असल्याचे म्हटले आहे. हा इनाम दाऊद इब्राहिमच्या दुप्पट आहे.

गणपती हा फार महत्त्वाचा नक्षल कमांडर असून त्याच्या भोवताली जंगलात राहून यु*द्ध करण्याचे सामर्थ्य असलेल्या नक्षली गोरिला गार्ड्सचा संरक्षण कडा आहे. ही सुरक्षा भारतातील अनेक राजकारण्यांना मिळणाऱ्या सुरक्षेच्या तोडीची आहे. या सुरक्षा कड्याला भेदून त्याच्यापर्यंत पोहचणे अवघड आहे.



इतकंच नाही तर गणपतीकडे गुप्तचरांची मोठी फौज आहे, जे त्याला पोलिसांच्या प्रत्येक गतीविधींच्या सूचना देत राहतात, यामुळेच त्याच्यापर्यंत पोहचण्याचा कुठलाच प्रयत्न यशस्वी होत नव्हता.

आज पोलिसांकडे गणपतीचा जो फोटो आणि चित्र आहे ते अनेक वर्षांपूर्वीचे आहे. आज हा ७४ वर्षांचा गणपती कसा दिसतो याचा पोलिसांना अंदाज नाही आहे. त्याच्या आधीच्या फोटोनुसार तो सडपातळ आणि काहीशा भुरकट केसांचा आहे, पण अनेकांच्या मते गणपती हा सदैव आपल्या डोक्याला डाय लावून केसांचा रंग बदलत असतो, जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गणपती सर्वप्रथम चर्चेत आला १९९५ साली, त्याने त्यावेळी पोलिसांच्या गाडीला बॉ*म्बने उडवले होते. ज्यात २५ लोक आपल्या प्राणास मुकले होते.

२००६ साली गणपतीने सलवा जुडूम अभियानाचा सामना करण्यासाठी आपल्या साथीदारांच्या मदतीने ३५ आदिवासींची बस्तरच्या एरॅबोरमध्ये निर्घृण हत्या केली होती.

२००६ साली त्याने उपलेटा कॅम्प मधील २२ पोलीस अधिकाऱ्यांची ह*त्या केली होती आणि १४ नागा सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला त्याने उडवले होते. २००८ मध्ये त्याने सीआयएसएफच्या हिरोली माईन्स कॅम्पवर हल्ला करत ८ जवानांना मारले होते.

तेलंगणाच्या करीमनगरमध्ये जन्मलेला गणपती पेशाने शिक्षक होता. परंतु आधीपासूनच त्याला लोकांना एकत्र करून व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता. याच विचाराला घेऊन त्याने माओवादी आंदोलनात उडी घेतली आणि काही काळातच तो नक्षलवादी कमांडर बनला.

गणपतीचे नेटवर्क देश-विदेशात पसरले होते. याचाच वापर तो नक्षली चळवळीसाठी रसद आणि हत्यार मागवत होता. त्याचा श्रीलंका आणि इतर देशातील राष्ट्र विरोधी शक्तींशी लागेबंध होता.

गेल्या काही वर्षांपासून तो आजारी असल्याने त्याने पार्टीच्या कामकाजातून स्वतःला मुक्त केले होते. त्याची तब्येत ठीक नसल्याने तो शरणागती पत्करायच्या विचारात आहे. तो शरणागती पत्करणार ही बातमी मीडियात पसरल्याने त्याचे इतर नक्षलवादी साथीदार चांगलेच बिथरले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून त्याने नक्षलवादी चळवळीला सोडले असल्याचा बातमीला दुजोरा दिला आहे.

पण त्यांनी तो शरणागती पत्करेल हा नक्षलवादी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

गणपती हा खूप मोठा नक्षल कमांडर असल्यामुळे त्याचा शरणागतीच्या बाबतीत पोलीस साशंक आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गणपती हा इतका मोठा लीडर आहे की तो स्वतःसाठी सहजपणे आरोग्ययंत्रणा उभारू शकतो, तो इतर माओवादी नेत्यांप्रमाणे स्वतःसाठी सहज ‘ICU’ रूम व डॉक्टरची व्यवस्था करू शकतो. वैद्यकीय कारणासाठी तो शरण येईल हे अजिबात विश्वासार्ह नाही.

परंतु एकीकडे पोलीस अधिकारी तो शरण येणार असल्याचे समाधान देखील व्यक्त करत आहेत. बस्तरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की जर तो शरण आला तर नक्षलवादी चळवळीला खिंडार पडेल आणि पोलिसांना त्यांचा नायनाट करण्यात मोठी मदत होईल.

आता हा गणपती शरण येतो की नाही आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात या भारताला लागलेल्या नक्षली किडीचा नाश करता येतो की नाही, याचे उत्तर भविष्यातच मिळेल. पण भारताला या रक्तरंजित चळवळीचा बिमोड करता आला पाहिजे, अशी आशा करूया..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या नवाबाच्या कुत्रीच्या लग्नाचा सोहळा तीन दिवस चालला होता

Next Post

पाश्चात्त्यांवर गांधीजींच्या विचारांइतकाच प्रभाव त्यांच्या चष्म्यानेही पाडला आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पाश्चात्त्यांवर गांधीजींच्या विचारांइतकाच प्रभाव त्यांच्या चष्म्यानेही पाडला आहे

कॉंग्रेसच्या रॅलीला जागा दिली नाही म्हणून या कलाकाराला रस्त्यावरच मारून टाकण्यात आलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.