The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द*हश*तवादी संघटनांचं उत्पन्नाचं साधन काय असतं..? त्यांनी महागडी शस्त्रास्त्रं कशी परवडतात..?

by द पोस्टमन टीम
3 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


द*हश*तवाद हा मोठा विलक्षण शब्द. म्हणजे त्यात वाद आहे, पण खऱ्या अर्थाने तत्त्वप्रणाली नाही. त्यापेक्षा एखाद्या विशिष्ट पंथाने अनुसरलेली ही एक आचारप्रणाली आहे. याचे पुरस्कर्ते कोणत्याही प्रकारचा कायदा आणि शासन यांना न जुमानणारी समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवतात.

द*हश*तवादाची व्याख्या करणे कठीण आहे. ही बरीच गुंतागुंतीची संज्ञा आहे. याचे कारण एका देशासाठी द*हश*तवादी असलेला मनुष्य दुसऱ्या देशासाठी स्वातंत्र्यसैनिक असतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन द*हश*तवादाची सर्वसामान्य व्याख्या पुढील प्रमाणे करता येते-

“द*हश*तवाद म्हणजे राजकीय, धार्मिक, किंवा तात्त्विक हेतूने प्रेरित होऊन एखाद्या देशातील नागरिक किंवा नि:शस्त्र लोक यांच्या विरोधात केलेली हिं*सक कृती किंवा अशी कृती करण्याची धमकी.”

ही सर्वसामान्य व्याख्या असली, तरी सामान्यतः लोकांना द*हश*तवादी कृत्यांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा कुठून मिळते हे मात्र कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही.

द*हश*तवादाला धर्म नसतो असे म्हटले जाते. मात्र द*हश*तवादाचा पैसा आणि सत्ता यांच्याशी जवळचा संबंध आहे. द*हश*तवाद हा आता धंदा झाला आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हांट या संस्थेचे उदाहरण घ्या. आता ही संघटना जवळजवळ संपलीय, पण त्याची शैली आपल्याला समजून घेता येईल. आपल्याला ही संस्था आयसिस या नावाने परिचित आहे. या संस्थेचा कारभार एखाद्या औद्योगिक साम्राज्याप्रमाणे चालत होता. या संस्थेत पदांची उतरंड होती, वेगवेगळी कामे करणारे विविध विभाग होते. सर्वकाही एखाद्या कॉर्पोरेट बिझनेसप्रमाणे. यातील बरेच नेते सद्दामच्या सैन्यात अधिकारी होते.



आता या कारभाराची आर्थिक बाजू पाहू. या लोकांना पैसे मिळत कुठून होते? त्याचे उत्तर आहे सीरियामधील तेल विहिरींच्या कारभारातून. २०१४ मध्ये या तेलाच्या व्यापारातून त्यांची रोजची कमाई १२ लाख डॉलर्स एवढी होती. यातूनच आयसिस ही अत्यंत श्रीमंत दह*शत*वादी संघटना बनली. हा पैसा आयसिसने आपली संघटना वाढवण्यासाठी, कडव्या तरुणांची भरती करण्यासाठी वापरला. यात विशेष गोष्ट ही, की यातील बहुतांश तरुण आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या, संपन्न अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमधून आलेले होते. हे तरुण मुख्यतः पैशासाठीच येत होते.

एका अहवालानुसार २०१५ मध्ये आयसिस या लोकांना दरमहा ५०० ते १२०० डॉलर्स देत होती. याव्यतिरिक्त त्यांच्या बायकांना स्टायपेंड म्हणून पन्नास डॉलर्स आणि मुलांना स्टायपेंड म्हणून प्रत्येकी पंचवीस डॉलर्स दिले जात होते. शिवाय खंडण्या, ड्र*ग्सचा व्यापार आणि इतर गुन्हेगारी मार्गांनी देखील त्यांना बराच पैसा मिळत होता.

सुदैवाने हे चित्र आता बदलले आहे. आयसिसचा करिष्मा बराच कमी झाला आहे. पण एकंदर संपूर्ण जगाचा विचार करता द*हश*तवादाचा धंदा आजही तेजीत आहे. तुर्कस्तान, नायजेरिया, कॅमेरून, सोमालिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणी द*हश*तवाद मोठ्या प्रमाणावर ठाण मांडून आहे. पाकिस्तान हे तर या द*हश*तवादी संघटनांचे माहेरघरच आहे. तिथे ३५ पेक्षा जास्त लहान-मोठ्या द*हश*तवादी संघटना कार्यरत आहेत. त्यांची नावे वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आजवर जगाने अनेकदा पाकिस्तानला द*हश*तवादाला पाठिंबा न देण्याविषयी इशारे दिले आहेत पण पाकिस्तान त्याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करत आहे. पाकिस्तानने या संघटनांना एवढा उदार आश्रय देण्याची कारणे काय आहेत? परत तेच… पैसा. कसे ते पाहू.

या द*हश*तवादी संघटनांपैकी अनेकांनी आपला चेहरामोहरा बदलला आहे. या संघटना आता धर्मादाय संस्था म्हणून काम करतात, निदान तसे भासवतात. या संघटना अन्नदान करतात, दवाखाने चालवतात, इस्पितळे, ॲम्ब्युलन्स, ब्लड डोनेशन कॅम्प हेही चालवतात. ही कामे करत असताना हे लोक एकीकडे विद्वेषाचे वातावरण पसरवतात. यातल्या काही संघटना आपल्या कामाचा प्रचार करतात आणि लोकांना आपल्याबरोबर भरती व्हायलाही सांगतात.

शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या संस्था निधी गोळा करतात. यांचे जाळे पाकिस्तानच्या बाहेरही पसरलेले आहे. २०१७ मध्ये भारताच्या एनआयएने यांचे एक फंडिंग रॅकेट उ*द्ध्वस्त केले. यावेळी त्यांना काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दीड करोड रुपयांची रोकड आढळून आली. याव्यतिरिक्त या संघटना राजकीय पक्षही चालवतात. त्या माध्यमातूनही त्यांना भरपूर निधी मिळतो.

जैश-ए-मोहम्मद या संघटनेचेच उदाहरण घ्या. ही संघटना मसूद अझहर या मौलानाची आहे. पुलवामा येथे झालेला द*हश*तवादी ह*ल्ला, तसेच २००१ साली लष्कर-ए-तैयबा या संघटनेसोबत मिळून संसद भावनावर केलेला ह*ल्ला यासारखे अनेक द*हश*तवादी ह*ल्ले ही या माणसाची पापे; आणि तिकडे पाकिस्तानमध्ये हीच संघटना धर्मादाय कामे करते. म्हणजे निदान कागदोपत्री तसा दिखावा तरी करते. प्रत्यक्षात या संघटनेचे नेते खुल्लमखुल्ला भडकाऊ भाषणे करून लोकांना जिहादमध्ये सामील होण्याचे आवाहन करतात.

एवढे सगळे राजरोसपणे चालूनही याबाबतीत कोणते उपाय हाती घेतले जातात? तर फारसे नाही. दुर्दैवाने जगातील बलाढ्य देशही यासाठी फारसे काहीही करत नाहीयेत. पाकिस्तानला अधून मधून एखादी हलकीशी चापट दिली जाते. तो देशही ते फार मनावर घेत नाही. ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असे एकंदरीत चालले आहे.

पाकिस्तान वरवर मलमपट्टी केल्यासारखे या संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा करते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. द*हश*तवाद पाकिस्तानच्या मातीत खोलवर रुजलेला आहे. त्याला आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर खतपाणी घालत आहे.

यावर उपाय एकच. या बिझनेसला अर्थपुरवठा करणारे सर्व मार्ग बंद करणे. फक्त पैशाअभावीच द*हश*तवादाचे कंबरडे मोडू शकते. हे अजून केले जात नाही हीच खरी चिंतेची बाब आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एक ज्यू कलाकार ना*झी जर्मनीसाठी आर्यन आयडॉल बनला होता..!

Next Post

चीनने प्रकाशित केलेली नवीन दिनदर्शिका वादात का सापडलीय..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चीनने प्रकाशित केलेली नवीन दिनदर्शिका वादात का सापडलीय..?

आजही कित्येक देशांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ब्रिटिश म्युझियममध्ये कैद आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.