The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आंदोलकांना घाबरून लपून का बसलेत..?

by द पोस्टमन टीम
3 February 2022
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा पाया समजला जातो. आज एखाद्या देशात जर सरकारच्या धोरणाबद्दल लोकांमध्ये नाराजी असेल तर लोक त्या धोरणाचा विरोध किंवा निषेध करतात. हा विरोध दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. पण जुन्या काळापासून आत्तापर्यंत विरोध करण्यासाठी एक नीती वापरली जाते ती नीती म्हणजे आंदोलन करणे. आंदोलन हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर इतिहासातील आणि आत्ताची अशी बरीच आंदोलने आठवतील. नुकताच कॅनडामध्ये ट्रक ड्रायव्हर्सनी जस्टीन ट्रूडो सरकार विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. तर हे आंदोलन का करत आहेत? कशासाठी करत आहेत? हे आज आपण समजून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड.

कॅनडा उत्तर अमेरिका खंडातीला एक प्रगत देश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर रशियानंतर कॅनडाचा नंबर लागतो. कॅनडाला लोक “मिनी पंजाब” असंही गमतीने म्हणतात. याचं कारण म्हणजे 3 करोड लोकसंख्या असलेल्या देशात 6 लाख लोकं ही शीख समुदायाची आहेत.

कॅनडामधला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा प्रांत म्हणजे “ब्रिटिश कोलंबिया”. या ब्रिटिश कोलंबियाचं वैशिष्ट्य असं की सगळ्या कॅनडामध्ये सर्वांत जास्त शीख लोकसंख्या या प्रांतात आहे. ब्रिटिश कोलंबियाची व्याप्ती समजून घ्यायची असेल तर ब्रिटिश कोलंबियामध्ये भारतातल्या पंजाब राज्याच्या क्षेत्रफळाची 50 राज्य बसतील. ब्रिटिश कोलंबियानंतर शीख लोकसंख्या ही ऑंटेरियो आणि अल्बर्टा या प्रांतात आहे.

या शीख समुदायाचं कॅनडाच्या राजकारणात आणि अर्थकारणात फार मोठा वाटा आहे. आजच्या काळात जस्टीन ट्रूडो यांना होणारा विरोध जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जस्टीन ट्रूडो यांची राजकिय कारकीर्द समजून घ्यावी लागेल. हे समजून घेण्यासाठी चला आपण 2018 सालात जाऊ.



2018 साली कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो हे भारत दौऱ्यावर होते. पण जस्टीन ट्रूडो यांचा हा भारत दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. आता तुम्ही म्हणाल असं काय झालं की हा दौरा वादग्रस्त ठरला? तर जस्टीन ट्रूडो हे भारत दौऱ्यावर असताना कॅनडाच्या उच्चायुक्ताकडून जस्टीन ट्रूडो यांचासाठी असलेल्या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जसपाल अटवाल याला कॅनडाच्या उच्चायुक्ताकडून निमंत्रण गेले होते. आता हा जसपाल अटवाल नक्की आहे तरी कोण?

जसपाल अटवाल हा एक खलिस्तानी दहशतवादी आहे. तो “इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन” या प्रतिबंधित शीख संघटनेशी संबंधित आहे. 1980च्या दशकात कॅनडा सरकारने “इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन” या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. 1985 साली त्याला ऑटोमोबाईल फ्रॉड केसमध्येही शिक्षा झाली होती. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

1986 साली कॅनडाच्या वॅनकूवर शहरात पंजाब राज्याचे तत्कालीन मंत्री मलकीयत सिंग सिद्धू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात जसपाल अटवाल आणि त्याच्या साथीदारांना कॅनडाच्या कोर्टाने 20 वर्षांची शिक्षा दिली होती. भारताने “इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन” या संघटनेवर बंदी घातली. त्यामुळे भारतासाठी जसपाल अटवाल हा एक खलिस्तानी समर्थक व दहशतवादी आहे. जसपाल अटवाल याला निमंत्रण गेले या चुकीची कबुली खुद्द जस्टीन ट्रूडो यांनी त्यांचा भारत दौरा सुरू असतानाच दिली. पण यामुळे जस्टीन ट्रूडो व त्यांचे सरकार हे खलिस्तानी समर्थक आहे असा आरोप सुरू झाला.

पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खलिस्तानी म्हणजे नक्की कोण? 

भारत कॅनडा आणि खलिस्तान यांचा एकत्रितरित्या काय संबंध आहे? तर 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्याचवेळी देशाची फाळणीही झाली. पण हे फाळणीचं तत्व पंजाबमधील नागरिकांना पटलं नव्हतं, कारण फाळणीदरम्यान पंजाबमधील बराचसा भाग हा पाकिस्तानात गेला होता. शीख समुदायाला आपलं सर्वकाही सोडून भारतात यावं लागलं होतं. त्यामुळे शीख समुदायाच्या मनात असंतोष निर्माण झाला व त्यातून वेगळ्या राष्ट्राची म्हणजेच खलिस्तानची मागणी सुरू झाली.

1971 साली गजतीसिंग चौहान याने अमेरिकन वृत्तपत्रांत खलिस्तान राष्ट्राची जाहिरात दिली. 1978 साली याच गजतीसिंग चौहानने अकाली दलाशी हातमिळवणी करून स्वतंत्र खलिस्तान निर्मितीसाठी आनंदपूर साहिबच्या नावाने संकल्प पत्र जाहीर केलं. 1980 साली गजतीसिंग चौहानने खलिस्तान राष्ट्रीय परिषदेची स्थापना करून स्वतःला त्याचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं.

ज्यावेळी खलिस्तानच्या मागणीला जोर आला होता याच काळात जरनैल सिंग भिंद्रानवाले हा दमदमी टकसालमध्ये शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आला होता. अल्पकाळातच भिंद्रानवाले लोकप्रिय झाला. दमदमी टकसालच्या गुरूच्या मृत्यूनंतर वयाच्या 31व्या वर्षी शिखांच्या पाच अकाल तख्तांपैकी एक असलेल्या दमदमी टकसालचा तो प्रमुख बनला.

1980 ते 1984 या काळात पंजाबमध्ये दहशतवादी घटना वाढू लागल्या. भिंद्रानवाले खलिस्तानी चळवळीचा नेता बनला. अशांत पंजाबला शांत करण्यासाठी केंद्र सरकारने “ऑपरेशन ब्लु स्टार”च्या माध्यमातून लष्करी कारवाई केली. ज्यात सुवर्ण मंदिरात लपलेला भिंद्रानवाले मारला गेला. परंतु सरकारने शिखांची नाराजी ओढवून घेतली. त्यातून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची ऑक्टोबर 1984 मध्ये हत्या करण्यात आली.

आता 2017 साली जस्टीन ट्रूडो यांच्या सरकारने 1984 च्या शीख नरसंहाराच्या निषेधाचा ठराव कॅनडाच्या संसदेत मंजूर करून घेतला. 2018 साली कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी “2018 Public Report on Terrorist Threat to Canada” असा एक अहवाल कॅनडाच्या मंत्रिमंडळात सादर केला. ज्यात खलिस्तानी दशहतवाद कॅनडाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घातक असल्याचं सांगितलं होतं. कॅनडाच्या संसदेत खलिस्तान समर्थक खासदारांच्या गटाने जस्टीन ट्रूडो सरकारवर दबाव आणून 24 तासाच्या आत या अहवालाला केराची टोपली दाखवली. जस्टीन ट्रूडो यांच्या मंत्रीमंडळात रक्षा मंत्री असलेले हरजित सज्जन यांच्या खालसा दिवान सोसायटीच्या बैसाखीच्या उत्सवाला जस्टीन ट्रूडो यांनी हजेरी लावली. हरजित सज्जन हे कट्टर खलिस्तानी समर्थक आहेत. वरील घटना जर तुम्ही नीट समजून घेतल्या तर जस्टीन ट्रूडो यांचा खलिस्तानी चळवळीला कसा छुपा पाठिंबा होता हे दिसून येते.

आता येऊया 2019 या सालात. ऑक्टोबर 2019 मध्ये कॅनडाच्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये जस्टीन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीला 157 जागा मिळाल्या पण त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. बहुमत सिद्ध करण्यासाठी जस्टीन ट्रूडो यांच्या पार्टीला अजून 13 जागांची आवश्यकता होती. अशावेळी जस्टीन ट्रूडो यांनी न्यू डेमोक्रॅटिक पार्टीशी हातमिळवणी केली ज्यांना 24 जागा मिळाल्या होत्या.

पण खरी गंमत तर इथे आहे सरकार स्थापन झाल्यावर परत एकदा जस्टीन ट्रूडो यांच्यावर ते खलिस्तानचे समर्थन करतात असा आरोप झाला. हा आरोप का झाला तर याचं कारण म्हणजे या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये एक खासदार आहेत ज्यांचे नाव आहे जगमीत सिंग. जगमीत सिंग यांचे खलिस्तानी संघटनेशी संबंध आहेत म्हणून भारताने 2013 साली त्यांचा व्हिसा रद्द केला. आता कॅनडामध्ये सत्तेत आल्यावर जगमीत सिंग आणि त्यांच्या समर्थकांनी जस्टीन ट्रूडो यांचावर कॅनडामध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी दबाव टाकायला सुरुवात केली.

आता येऊया 2020 सालात. सप्टेंबर 2020 रोजी The MacDonald Laurier Institute ने एक शोधप्रबंध सादर केला. या शोधप्रबंधात पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ही कशी खलिस्तानी चळवळीला छुपा पाठिंबा देत आहे व यामुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या सुरक्षेला कसा धोका आहे याबद्दल या शोधप्रबंधात भाष्य केलं गेलं आहे.

डिसेंम्बर 2020 साली भारतातल्या शीख समुदायाची मने जिंकण्यासाठी जस्टीन ट्रूडो यांनी भारतात दिल्ली बॉर्डरवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते एकटेच असे नव्हते ज्यांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, रीहाना, ग्रेटा थनबर्ग यांनीही पाठिंबा दिला होता.

26 जानेवारी 2021ला शेतकरी आंदोलनालाच्या आडून खलिस्तानी लोकांनी जी ट्रॅक्टर रॅली काढली, लाल किल्ल्यावर चढून जो निशाण साहिब फडकवला, कायदा हातात घेऊन जी नासधूस केली याला जस्टीन ट्रूडो यांनी स्वतःच्या देशात शीख वोट बँक आपल्या बाजूने कायम राहावी म्हणून पाठिंबा दिला. आत्तापर्यंत जस्टीन ट्रूडो यांच्यावर ते खलिस्तानी समर्थक आहेत असा आरोप होत होता, पण वरती नमूद केलेल्या त्यांचा भूमिकेमुळे ते खरेच खलिस्तानी समर्थक आहेत हे सिद्ध झालं.

पण म्हणतातना कर्माची गती फार गहन असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जस्टीन ट्रूडो यांच्या सरकारने लसीकरण सक्तीचं केलं व बाहेर देशातून येणाऱ्या लोकांना 14 दिवस सक्तीचं विलगीकरण बंधनकारक केलं. सरकारचे हे धोरण न पटल्यामुळे ट्रक व्यवसाय करणाऱ्या असंख्य लोकांनी जस्टीन ट्रूडो सरकार विरोधात आंदोलन करायला सुरुवात केली.

हे आंदोलन इतकं तीव्र होत की जस्टीन ट्रूडो यांना त्यांचा कुटुंबासहित एका अज्ञात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागलं. या त्यांचा पळपुटेपणा वर सारवासारव करण्यासाठी 2 दिवसांनी जस्टीन ट्रूडो यांनी आपण पळपुटे नसून कोरोना संक्रमित झाल्यामुळे विलगीकरणात आहोत असं विधान पत्रकार परिषद घेऊन केलं.

आपली मागणी मान्य होत नाही हे लक्षात येताच आंदोलनकर्त्यांनी थेट जस्टीन ट्रूडो यांच्या निवासस्थानी ट्रक नेऊन वेढा घातला. सर्व कॅनडातुन ट्रक राजधानी ओटावा इथे येऊ लागले. ट्रकच्या लांबच्या लांब रांगा असल्याने या आंदोलनाला “फ्रीडम काँव्होय” अस नाव देण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळी आंदोलक इतके आक्रमक झाले होते की काही आंदोलक हे “टॉम्ब ऑफ द अननोन सोलजर” या स्मारकावर चढले.

काहींनी तर नाझीचं स्वस्तिक चिन्ह फडकावत जस्टीन ट्रूडो सरकारचा निषेध केला. जसा ऍमेझॉनचा मालक जेफ बेझोस याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला तसाच टेस्लाचा मालक एलोन मस्कने या फ्रीडम काँव्होयला पाठिंबा दिला. पण आता हे ट्रक ड्रायव्हर सक्तीच्या लसीकरणाला विरोध का करत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला उत्तर अमेरिकेत प्रसिध्द असलेला ट्रक व्यवसायाबद्दल जाणून घ्यायला हवं.

अमेरिकेतला ट्रक व्यवसाय म्हणजे तिथल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचा कणा. अमेरिका व कॅनडा हे देश अख्खा खंड व्यापून टाकतात. या दोन देशाच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचा व व्यापाराचा बराचसा भार या ट्रक व्यवसायावर असतो. ऑक्टोबर 2021 साली ब्रिटन आणि कॅनडामध्ये ट्रक ड्रायव्हरची कमतरता जाणवू लागली. त्यात कोरोनामुळे बरेंच उद्योग-धंदे बंद पडले.

या अशा काळात कोरोना निर्बंधामुळे आणि 14 दिवसाच्या सक्तीच्या विलगीकरणामुळे या दोन्ही देशाच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचा सगळा समतोल बिघडला. हा समतोल बिघडल्याने याचा विपरीत परिणाम वस्तू व सेवा देणाऱ्या वितरकांवरही झाला. ज्यामुळे या दोन्ही देशाच्या व्यापाराचे नुकसान झाले. जस्टीन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली पण आज जेव्हा तशीच परिस्थिती त्यांच्यावर आली तेव्हा जस्टीन ट्रूडो यांनी पळपुटेपणा केला. त्यामुळे म्हणतातना माणसाने एक वेळेस मृत्यूला घाबरू नये पण कर्माला घाबराव Because Karma is a Bitch.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ब्रिटनची सर्वात प्रसिद्ध ‘द ब्ल्यू बॉय’ पेंटिंग शंभर वर्षांनी अमेरिकेहून परत लंडनला येतेय

Next Post

Explainer – रशिया-युक्रेन-NATO वादात चीनने घेतलेल्या भूमिकेचा अर्थ काय..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

Explainer - रशिया-युक्रेन-NATO वादात चीनने घेतलेल्या भूमिकेचा अर्थ काय..?

Explainer: कर्नाटकात हिजाबवरून पेटलेला वाद नेमका काय आहे?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.