The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑनलाईन ‘मनी ॲप’मधून कधीच कर्ज काढू नका, आयुष्यभर पश्चात्ताप होईल

by द पोस्टमन टीम
16 October 2024
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


असं म्हणतात की, कुठलंही नाटक करता येतं. पण, पैशाचं नाटक करता येत नाही. पण, पैशासाठी मात्र माणूस वाटेल ती नाटकं करण्यास तयार होतो. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार बंद होते. त्यामुळे पैशाची आवक मंदावली होती. तर, काही लोकांचे आर्थिक स्त्रोत पूर्णच बंद पडले.. पण, संसाराचा गाडा हाकायचा तर, पैशाशिवाय पानही हलत नाही. त्यातच याकाळात डिजिटल लोन देणाऱ्या कंपन्यांचे भरमसाठ पेव फुटलेले दिसले.

अनेकांनी सोयीचे आणि विना कटकट लोन मिळते म्हणून या डिजिटल लोन देणाऱ्या प्लॅटफॉर्मवरून कर्ज उचलले. सुरुवातीला तरी विना कटकट वाटणाऱ्या नंतर मात्र या कंपन्या इतकी मोठी डोकेदुखी ठरल्या की, अनेकांना जीव नकोसा झाला. या कर्जाच्या खाईत अडकल्याने काही जणांनी आत्मह*त्येचा प्रयत्नही केला.

डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून कर्ज घेऊन पस्तावलेली अनेक माणसे आजूबाजूला दिसतात. डिजिटल लोनची प्रक्रिया साधीसोपी सरळ वाटत असली तरी, या कंपन्यांचा व्यवहार कसा चालतो? या कंपन्या कुणामार्फत हे कर्ज देतात? यांच्याकडून फसवणूक झाल्यास आपण कुठे तक्रार करू शकतो का? या सगळ्याची माहिती घेऊन मगच व्यवहार करणे शहाणपणाचे ठरेल. नाही तर आहेच मग, बुडत्याचा पाय खोलात!

डिजिटल लोनच्या या जाळ्यात अनेक व्यक्ती आणि काही छोट्या कंपन्या देखील अगदी गळ्यापर्यंत रुतल्या आहेत. अशा फसलेल्या लोकांची आणि फसवणुकीसाठी जन्मलेल्या डिजिटल फ्लॅटफॉर्मची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने सावधानतेच्या अनेक सूचना जारी केल्या आहेत.



तेलंगाणामध्ये एका व्यक्तीने अशा डिजिटल लोन देणाऱ्या कंपनीचा त्रास असह्य झाल्याने आत्मह*त्या केल्याची घटना उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकने अशा कंपन्यांकडून कर्ज घेताना कोणती काळजी किंवा खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल काही सूचना जाहीर केल्या आहेत. 

आत्मह*त्येच्या या घटनेनंतर पोलिसांनी देखील अशा ॲपचे कार्यालय आणि कॉल सेंटर्सविरोधात काही कडक कारवाई सुरु केली आहे.

डिजिटल लोन म्हणजे काय? 

तर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोबाईल ॲप्लिकेशन्सवरून कर्जाऊ रक्कम स्वीकारणे. कर्ज मिळण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष कर्जाची रक्कम मिळेपर्यंतचा सगळा व्यवहार हा डिजिटलीच होतो. कर्जाची रक्कम ही डिजिटल फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच बँकेत जमा केली जाते. या सगळ्या व्यवहारासाठी फक्त एक अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट पुरेसे आहे.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

खरे तर बँकेकडून प्रत्यक्ष कर्ज मिळवायचे झाल्यास सतरा वेळा बँकेला चकरा माराव्या लागतात. त्यासाठी शंभर कागदपत्रे गोळा करावी लागतात. बँकेच्या कर्जास पात्र असल्याचे सिद्ध करावे लागते. कर्ज फेडण्यासाठी काही आर्थिक स्त्रोत आहे का याची सगळी खातरजमा केल्याशिवाय बँक तुम्हाला एका रुपयाचेही कर्ज देत नाही. मात्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अवघ्या काही सेकंदात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होते.

काहीसे विना कटकट आणि विनासायास मिळणारे हे लोन ग्राहकांनाही सुखाचे वाटते. मात्र हे सुख फार काळ टिकत नाही.

कारण, अशा प्रकारे ग्राहकांना ऑनलाईन कर्ज देणारी ॲप्लिकेशन्स नंतर ग्राहकांचे शोषण करू शकतात. नव्हे करतातच. एक तर अशा प्रकारचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना त्यांना पर्सनल डाटा ॲक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागते. यामध्ये ग्राहकाच्या व्यक्तिगत डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचे पेवच फुटले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढली आहे. तेलंगणामधील प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांना असे आढळले की या कंपन्या ग्राहकांचे शोषण तर करतातच वरून त्यांना जाचही करतात.

बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्याही अशा प्रकारे डिजिटली कर्ज देतात. काही एनबीएफसीज् आरबीआयसोबत रजिस्टर्ड असतात.

अशा प्लॅटफॉर्मसाठी आरबीआयने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. बँक आणि एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज) यांनी अशा प्रकारे डिजिटल कर्ज देताना काही नियम पाळणे बंधनकारक असल्याचे अरबीआयने घोषित केले आहे.

बँक आणि एनबीएफसीनी ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून कर्ज देणार आहेत. त्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव यांच्या वेबसाईटवर नोंदवणे आवश्यक आहे. अशा डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी आपण कोणत्या बँकेच्या अथवा एनबीएफसीच्या वतीने कर्ज देऊ करतोय त्याची माहिती उघड करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना त्यांनी ही माहिती आवर्जून दिली पाहिजे.

हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स ज्या बँक किंवा एनबीएफसीद्वारे कर्ज देत आहेत, त्या बँकेच्या किंवा एनबीएफसीच्या लेटरहेडवर कर्ज मंजूर केल्याचे पत्र ग्राहकाला देणे अनिवार्य आहे.

संबंधित बँक आणि एनबीएफसी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या व्यवहारावर देखरेख ठेवली पाहिजे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेतला पाहिजे. डिसेंबर २०२० मध्ये आरबीआयने जाहीर केलेल्या सुचनेनुसार सेन्ट्रल बँकेशी सलग्न असणाऱ्या बँका आणि एनबीएफसी, तसेच राज्य सरकारद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या आणि राज्य सरकारच्या कायद्यात बसणाऱ्या जसे की कर्ज देय कायद्यात बसणाऱ्या संस्थाच अशा प्रकारे ऑनलाईन कर्ज देऊ शकतील असे म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक नियमनात न बसणाऱ्या अशा फसव्या ॲपवरून कर्ज न घेणेच शहाणपणाचे ठरेल.

आरबीआयच्या वेबसाईटवर आरबीआयसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या शेड्युल्ड कमर्शिअल बँक्स आणि एनबीएफसीज यांची लिस्ट पाहून त्यांच्याशीच ग्राहकांनी व्यवहार करावा अशी सूचना आरबीआयने दिली आहे. आरबीआयद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या अशा आर्थिक संस्थांकडून जर काही फसवणूक झालीच तर आरबीआयच्या कम्प्लेंट मॅनेजमेन्ट सिस्टीमकडे तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता.

परंतु आरबीआयशी संलग्न नसणाऱ्या कोणत्याही डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करू नये अशी सूचना आरबीआयने जाहीर केली आहे. अशा ॲपवर ग्राहकांनी आपली केवायसी कागदपत्रे देऊ नयेत असेही आरबीआयने सांगितले आहे. शिवाय, अशा फसव्या ॲपविरोधात तक्रार करायची असल्यास ग्राहकांनी सचेत पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही आरबीआयने म्हटले आहे.

शिवाय, कर्जाचा कालवधी कमी असेल, कर्ज संमत करण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे देण्याची सोय असेल, आरबीआयसोबत रजिस्टर असलेल्या संस्था प्रमुखांची सही कर्जाच्या करारावर दिलेली नसेल, कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आगाऊ रक्कमेची मागणी केली जात असेल, छुपे दर आकारले जात असतील तर अशा ॲपपासून ग्राहकांनी सावध राहावे असा इशारा डिजिटल लेंडर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देखील दिला आहे.

म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेताना संबधित कंपनी आरबीआय सोबत रजिस्टर्ड आहे का? ती कुठल्या बँकेच्या वतीने किंवा एनबीएफसीच्या वतीने काम करते का? कर्जाच्या करार पत्रावर अधिकृत व्यक्तीची सही शिक्का आहे का? याची खातरजमा करा. एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मबाबत तुम्हाला शंका वाटत असल्यास आरबीआयच्या सचेत पोर्टलवर त्यासंबधी तक्रार नोंदवा.

म्हणून झटपट लोनच्या नादी न लागता सावधगिरी बाळगा आणि योग्य ती खातरजमा करून मगच व्यवहार करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या कारणामुळे खजुराहोच्या मंदिरावर ‘तशी’ शिल्पे कोरली आहेत

Next Post

१९७३ साली उत्तरप्रदेशात पोलिसांनीच सरकार विरोधात बंड केलं होतं

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

१९७३ साली उत्तरप्रदेशात पोलिसांनीच सरकार विरोधात बंड केलं होतं

रशियाने त्यांच्या हद्दीत घुसलेलं अमेरिकन विमान पाडलं म्हणून आपल्याला GPS वापरायला मिळतंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.