The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या पोराने केलेले फ्रॉड्स वाचले तर आपले नेतेसुद्धा याच्यापुढे कच्चे वाटतील

by द पोस्टमन टीम
23 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही ‘कॅच मी इफ यू कॅन’ हा चित्रपट पाहिलाय? इंडियाना जोन्स, ज्युरासिक पार्क किंवा सेव्हिंग प्रायव्हेट रायन इतका प्रसिद्ध नसला तरी ‘कॅच मी इफ यू कॅन’ हा चित्रपट देखील स्टीव्हन स्पीलबर्गच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. एक रिअल लाइफ कॉन मॅन आणि अमेरिकन लेखकाच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. लिओनार्डो डिकॅप्रियोनं यात मुख्य भूमिका साकारली आहे.

या माणसानं १९६० आणि ७०च्या दशकात २ लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे बनावट चेक जमा करून पैसे गोळा केले होते! बनावट डॉक्टर, वकील, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि पॅन अमेरिकन एअरलाइन्सचा पायलट बनून त्यानं अनेकांची फसवणूक केली होती.

एफबीआयसारख्या तपास संस्थेला देखील दोनदा गुंगारा देणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे ‘फ्रँक ॲबेगनाल ज्युनियर’. त्यानं आपल्या आयुष्यात आणखी काय काय करामती केल्या होत्या हे जाणून घेणं नक्कीच रंजक आहे.

अमेरिकन जनता त्याला एक अपराधी लेखक म्हणून ओळखते. एका आत्मचरित्राशिवाय त्यानं आणखी चार पुस्तकांचं लेखन केलं. ॲबेगनालच्या आत्मचरित्रानुसार त्यानं वयाच्या १५ व्या वर्षापासून लोकांना फसवण्यास सुरुवात केली होती. किशोरवयात आणि तरुणपणात त्याला अनेकदा अटक झाली आणि अमेरिका व युरोपात त्यानं तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे.

२७ एप्रिल १९४८ रोजी न्यूयॉर्कमध्ये फ्रँक ॲबेगनालचा जन्म झाला होता. त्याची आई अल्जेरियन होती तर वडील इटालियन-अमेरिकन वंशाचे होते. फ्रँकचं बालपण न्यूयॉर्कमध्येच गेलं. तो १५ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला.



त्यानंतर फ्रँक आपले वडील आणि सावत्र आईसोबत राहू लागला. तेव्हापासूनच त्यानं लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. आपल्याकडे असं म्हटलं जात चांगल्या कामाची सुरुवात घरापासून करावी. फ्रँकनं मात्र, एकदम याच्या विरुद्ध केलं. कारण त्याच्या करामतींमध्ये त्याचे वडिलंच त्याचं पहिले सावज ठरले! त्यानं आपल्या वडिलांना तब्बल ३ हजार ४०० डॉलर्सचा चुना लावला.

यानंतर त्यानं चेकच्या माध्यमातून बँकांना फसवण्याच्या निरनिराळ्या युक्त्या शोधून काढल्या. डिसेंबर १९६४ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी तो युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये भरती झाला. मात्र, तिथे तो तीन महिने देखील टिकला नाही. त्यानं काम सोडून दिलं. नेव्हीतून बाहेर पडल्यानंतर लगेचंच त्याला एका बनावट चेकच्या प्रकरणात अटक करण्यात झाली. मात्र, तो त्यातून सहीसलामत बाहेर आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१९६५ साली तो फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) रडारवर आला. त्याच्या वडिलांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीची फोर्ड मस्टँग गाडी चोरल्याप्रकरणी त्याला कॅलिफोर्नियाच्या युरेका येथून अटक झाली. एफबीआयचा एजंट रिचर्ड मिलरनं त्याची चौकशी केली होती. नंतर हा कार चोरीचा खटला न्यूयॉर्कला हस्तांतरीत केला गेला होता.

कार चोरीच्या प्रकरणाला तोंड दिल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र, सुधारेल तो फ्रँक कसला!? या १७ वर्षांच्या पोरानं बनावट पायलट होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं मॅनहॅटन युनिफॉर्म कंपनीमधून एक युनिफॉर्म मिळवला. त्यानं पायलट असल्याचं भासवून पुन्हा अनेकांची फसवणूक केली. परंतु काही दिवसांनंतर त्याला न्यूयॉर्कच्या टकाहोमध्ये अटक झाली. त्याची न्यूयॉर्कमधील कॉमस्टॉक येथील ग्रेट मेडो जेलमध्ये तीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी रवानगी करण्यात आली.

दोन वर्षं शिक्षा भोगल्यानंतर त्याला त्याच्या आईनं जामीन मिळवून दिला. त्याला सशर्त जामीन मिळाला. मात्र, या विचित्र पोरानं जामीनावर असताना देखील एक कार चोरली. परिणामी त्याची रवानगी पुन्ही ग्रेट मेडोमध्ये करण्यात आली.

२४ डिसेंबर १९६८ रोजी त्याच्या शिक्षा पूर्ण झाल्यानं तो तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर तो TWA पायलट म्हणून रुजू झाला. जिथे त्यानं न्यूयॉर्कमध्ये भेटलेल्या एका डेल्टा एअर लाइन्स कर्मचाऱ्याच्या वडिलांच्या घरी आश्रय मिळवला. त्यानं तिथे बँक चेकची चोरी केली आणि विविध हॉटेल्समध्ये तो पैसा वापरला.

त्याची ही अफरातफर देखील काही दिवसांनी उघड झाली आणि १४ फेब्रुवारी १९६९ रोजी त्याला अटक झाली. त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तो लुईझियानामधून युरोपला पळून गेला. त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याला फ्रान्समधून अटक करण्यात आली. या पठ्ठ्यानं तिथे देखील एक कार चोरली होती आणि दोन स्थानिक कुटुंबांची फसवणूक केली होती. त्याला फ्रान्समध्ये चोरीसाठी चार महिन्यांची शिक्षा झाली. जून १९७० मध्ये तो युनायटेड स्टेट्सला परत आला.

युनायटेड स्टेट्समध्ये परतल्यानंतर फ्रँकनं पुन्हा पायलटचा गणवेश परिधान केला आणि तिथे तो कॉलेज कॅम्पसमध्ये फिरत असे. पॅन अमेरिकन एअरलाइन्ससाठी भरती करण्यासाठी आपण आलो असल्याचं सांगून त्यानं ॲरिझोना विद्यापीठात प्रवेश केला. ज्या मुलींना फ्लाइट क्रूचा भाग होण्याची इच्छा होती अशा कितीतरी मुलींची शारीरिक तपासणी करण्याचं धाडसं देखील या महाशयांनी केलं होतं.

नोव्हेंबर १९७० मध्ये जॉर्जियाच्या कॉब काउंटीमध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये पॅन अमेरिकन एअरलाइन्सचे १० बनावट पेरोल चेक कॅश केले होते. या प्रकरणानंतर त्याला कितीतरी वेळा अटक झाली, शिक्षा झाली आणि तो तुरुंगातून सुटला देखील. ही सर्व माहिती त्यानं आपल्या पुस्तकात लिहिलेली आहे. स्पीलबर्गनं त्यावर चित्रपट देखील तयार केला आणि तो प्रचंड गाजला देखील.

२०२० मध्ये, पत्रकार ॲलन सी. लोगाननं फ्रँकच्या जीवनावर एक पुस्तक प्रकाशित करण्याच्या हेतूनं अनेक गोष्टींचा सखोल तपास केला. त्यानं अनेक वृत्तपत्रीय लेख आणि प्रशासकीय दस्तऐवज शोधले. त्यातून फ्रँकनं पुस्तकात केलेले दावे आणि सत्य परिस्थिती यात तफावत असल्याचं समोर आलं.

फेडरल कोर्टाच्या नोंदींनुसार फ्रँकला पाच राज्यांमध्ये (टेक्सास, ॲरिझोना, उटाह, कॅलिफोर्निया आणि नॉर्थ कॅरोलिना) १० पॅन अमेरिकन एअरलाइन्स चेकच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र, पॅरोलनंतर तो स्वत: एफबीआयसाठी काम करू लागला हा त्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं. फ्रँक ॲबेगनालनं पुस्तकात केलेले दावे कितपत खरे आहेत हे त्यालाच माहित. मात्र, त्यानं आयुष्यात कितीतरी तुफानी गोष्टी केल्या होत्या हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या शास्त्रज्ञाच्या उलट्या बुद्धीमुळे सोविएत रशिया कित्येक दशकं मागे गेला..!

Next Post

ऑलिम्पिकमध्ये २८ पदकं जिंकूनही मायकल फेल्प्सला आत्म*हत्या करायची होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ऑलिम्पिकमध्ये २८ पदकं जिंकूनही मायकल फेल्प्सला आत्म*हत्या करायची होती

अमेरिकेतलं प्रसिद्ध 'येल विद्यापीठ' भारतीय गुलामांच्या व्यापारावर उभं राहिलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.