The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्मतःच चार पाय असलेल्या या महिलेने शास्त्रज्ञांना हैराण करून टाकलं होतं

by Heramb
28 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी जीवन हे अनेक आश्चर्यांनी आणि चमत्कारांनी भरलं आहे. यामध्ये आपल्याला कित्येक विचित्र प्रकार पाहायला मिळतात. काही लोकांचे शरीर अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरीतीने तयार झालेले असते, पण त्यांच्यात काहीतरी विशेष आणि सामान्य माणसापेक्षा अधिक करण्याची शक्ती असते. उदाहरणार्थ काही अंध व्यक्तींची श्रवणशक्ती आणि स्मरणशक्ती सर्वोत्तम असते.

तसेच काही लोक जन्मजात दिव्यांग असतात. अनेकवेळा समाजातील काही लोक अशा दिव्यांगांना काही चुकीचं संबोधून हिणवत असतात, विशेषतः जुन्या काळामध्ये असं मोठ्या प्रमाणात होत असे. दुर्दैवाने समाजातील काही लोक आजही असं करतात, पण त्यामुळे संपूर्ण ‘समाजा’ची विकृती दिसून येते. अशांपैकीच एक, मर्टल कॉर्बिन यांना काही लोकांनी ‘राक्षस’ म्हणून सम्बोधले होते पण त्यांचे आयुष्य म्हणजे सर्वांप्रती स्नेहभावाची एक मोठी कथाच होती.

प्रकृतीच्या निर्मितीचे रहस्य समजणे आपल्यासाठी जवळ जवळ अशक्यच आहे. जन्माच्या वेळी एखाद्या शरीरात आपण रॅन्डमली फेकले जात असतो. एखादी व्यक्ती एका परिपूर्ण आनुवंशिक रचनांसह श्रीमंत कुटुंबात जन्माला येते आणि एखादी व्यक्ती गरीब कुटुंबात वंशपरंपरागत आजारांसह जन्माला येते असं कधीच होत नाही, हा भेदभाव माणूस करू शकतो, पण प्रकृतीला सगळे प्राणी सामानच आहेत. कोणाला कसे शरीर मिळेल हे आपल्याला आधीच सांगता येत नाही. किंबहुना ते जीवन आहे आणि त्याबद्दल काहीही करता येत नाही.

एका ग्रीक पुराणकथेनुसार, अशाच दिव्यांग असलेल्या हेफेस्टस हेराला मरण्यासाठी सोडून दिले गेले कारण तो शारीरिकदृष्ट्या अतिशय विकृत झाला होता आणि तो तत्कालीन “परफेक्ट फॅमिली”च्या प्रतिमेत बसत नव्हता. मर्टल कॉर्बिनची कथा याबाबतीत काही प्रमाणात हेफेस्टसच्या कथेप्रमाणे आहे.



जोसेफिन मर्टल कॉर्बिन यांचा जन्म १२ मे १८६८ रोजी अमेरिकेतील टेनेसी येथे झाला. जन्मापासूनच त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते. ती उलटी जन्माला आली होती. अशा प्रकारच्या जन्मामुळे बऱ्याचदा जन्मलेल्या बाळासाठी आणि आईसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पण, जोसेफिन आणि तिची आई दोघेही या संकटातून वाचले आणि एक अतिशय निरोगी बाळ जन्माला आले. पण या जन्मलेल्या बाळाबद्दल एक गोष्ट विचित्र होती; कमरेपासून खाली, त्या बाळाला दोन देह होते.

दोन देह म्हणजे तिला चार पाय होते आणि पायाच्या दोन्ही जोड्यांना वेगळे खाजगी भाग असून वरचा भाग एकच होता. वैद्यकीय संशोधकांनी तिची शारीरिक स्थिती समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि प्रत्येक संशोधकाने या प्रकाराला वेगळे आणि जटिल नाव दिले. काहींनी तिला “डिपिगस डिब्रॅचियस टेट्रापस” म्हटले, तर काहींनी तिच्या स्थितीला, “पोस्टियरियर डिकोटॉमी” म्हटले. एका डॉक्टरने तर “राक्षस” शब्दाचा वापर करून तिला “मोनोसेफॅलिक, इलॅडेल्फिक राक्षसांच्या फ्यूजनद्वारे संबंधित महिला” असेही म्हटले.

जोसेफिन फक्त १३ वर्षांची असताना साईड शो सर्किटमध्ये एक कलाकार बनली. तिला “चार पायांची महिला” असे नाव देण्यात आले, याच वेळी तिची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढली. इतर लोक त्यांच्या शोमध्ये चार पायांच्या महिलेचा तोतया उभे करू लागले, इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर ती पोहोचली. पण त्याच बरोबर एक सामान्य व्यक्ती करू शकणारी प्रत्येक गोष्ट करू शकत होती आणि तिच्या दोन अतिरिक्त पायांनी तिला कोणत्याही प्रकारे अकार्यक्षम केले नाही, हीच अनन्यसाधारण गोष्ट आहे.

तिचे अतिरिक्त पाय दोन नैसर्गिक पायांच्या मधोमध होते. हे अतिरिक्त दोन पाय आकाराने लहान होते आणि तिचे संपूर्ण वजन उचलण्यासाठी ते खूपच कमकुवत होते. किंबहुना ती तिच्या दोन नैसर्गिक पायांच्या मदतीने उत्तम प्रकारे चालू शकत होती. १९ वर्षांची असताना तिने जेम्स बिकनेलशी लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतर तिची गर्भधारणा झाल्याने ती खूप आजारी पडू लागली. तिला सतत ताप येत होता आणि उलट्या होणे थांबत नव्हते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

गर्भातील अर्भक चार महिन्यांचे असताना तिचा जीव धोक्यात असून तिने गर्भपात करावा असे डॉक्टरांनी सुचवले. गर्भ डाव्या बाजूच्या गर्भाशयात आहे असे काही चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांना समजले. गर्भपात यशस्वी झाला आणि बरी झाल्यानंतर कालांतराने जोसेफिन कोणत्याही समस्येशिवाय मुलांना जन्म देऊ शकली. 

जोसेफिनला चार पाय असणे ही एक अद्भुत वैद्यकीय घटना होती. अशी मानवी घटना जगाने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. जन्मतःच आलेले अपंगत्व असूनही, ती एक प्रेमळ पती आणि मुलांसह सामान्य जीवन जगली. अखेर वयाच्या साठाव्या वर्षी, ६ मे १९२८ रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या कुटुंबीयांनी चोर किंवा स्म*ग्लर्सपासून रक्षणार्थ तिचा मृतदेह ‘काँक्रीट बंद’ करून त्यावर अंत्यसंस्कार केले.

तिच्या कुटुंबाला तिच्या मृत-अवशेषांसाठी अनेक गोष्टी जमा करणाऱ्या लोकांनी (कलेक्टर्सनी) आणि शास्त्रज्ञांनी मोठी रक्कम देऊ केली होती. पण जोसेफिनला सामान्य माणसाप्रमाणे शांततेत चिर-विश्रांती द्यावी, असा कुटुंबीयांचा विश्वास असल्याने त्यांनी ही रक्कम नाकारली.

तिच्या शरीराच्या विचित्र रचनेमुळे अनेक लोक जोसेफिनकडे भेटण्यासाठी येत असत, परंतु तिच्या सौम्य आणि प्रेमळ स्वभावामुळे ते तिच्या संपर्कात राहत असत. जरी काही दीडशहाण्यांनी तिला वेडं किंवा राक्षस म्हणून संबोधलं असलं तरी आपल्या गोड स्वभावाबरोबरच ती एक सर्वोत्तम आयुष्य जगणारी बुद्धिमान स्त्री होती. एखाद्याचा जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन असेल तर तो कोणत्याही कमतरतेवर मात करू शकतो, हेच तिच्या जीवनाचे सार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कारखान्यातील साठवणुकीच्या टाक्या फुटल्या आणि रस्त्यावर विस्कीचा पूर आला

Next Post

सीरिअल कि*लरच्या कैदेत दोन महिने हालअपेष्टा सहन केल्यानंतर तिची सुटका झाली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सीरिअल कि*लरच्या कैदेत दोन महिने हालअपेष्टा सहन केल्यानंतर तिची सुटका झाली होती

डकवर्थ-लुईसपेक्षाही वाईट नियमाने १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमधून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.