The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक तरंगते वेश्यालय : सर्वाधिक कलंकित समुद्रप्रवासाची गोष्ट

by द पोस्टमन टीम
29 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इंग्रजांचा संपूर्ण जगभरात वेगाने साम्राज्यविस्तार सुरु होता, म्हणजे साधारण १७९०, त्यावेळची ही गोष्ट. निर्जन बेटावर नवशिक्या शेतकऱ्यांना पाठवले जाई व त्यानंतर गरज पडल्यास त्या बेटावर वसाहतीसाठी जीवनावश्यक वस्तूंची इंग्लंडवरून पाठवणी होत असे. जलपर्यटनच्या इतिहासातील अतिशय लज्जास्पद ठरलेला हा अश्लील समुद्री प्रवास.

लेडी जुलियन नामक स्त्रीचे इंग्लंडहून निघालेले जहाज १७९० सालच्या हिवाळ्यात सिडनीच्या किनारी येऊन पोहोचले. ज्या किनारी गेल्या जवळपास ११ महिन्यात इंग्लंडहून एकही जहाज आलेले नव्हते. सिडनीच्या किनारी भागात शेकडो नागरिकांनी इंग्लंडहून येऊन आपल्या वसाहती थाटल्या होत्या. सुरुवातीला गेलेले हे लोक शेतकरी होते. त्यांना तेथील अन्नधान्याची गरज भागविण्याइतके धान्य देखील पिकविता आले नव्हते. शिवाय गेल्या वर्षभरात मायदेशाहून अन्नधान्याची थोडी देखील कुमक न आल्यामुळे त्यांची उपासमार होत होती आणि त्याच आशेने ते समुद्राकडे डोळे लावून बसले होते.

लेडी जुलियनचे जहाज दिसताच वसाहतवाल्यांनी बोटी काढून समुद्राकडे धाव घेतली, मोठ्या जोमात वल्ह्यांनी पाणी मागे सारून बोटी जहाजाजवळ नेल्या. पण बघतात तर काय! लेडी जुलियनने तिच्या जहाजात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणलाच नव्हता. त्यात ती तब्बल दोनशेहून अधिक स्रिया घेऊन आली होती. आधीच तोळामासा स्थिती असणाऱ्या वसाहतवाल्यांवर आता एवढ्या स्रियांच्या पालनपोषणाचा फुकटचा भार पडला होता. वसाहतवाल्यांची प्रचंड निराशा झाली.

किनाऱ्यावरती आधीच उपासमार होत असताना तिथे आणखी जहाजभर स्रियांचा बोजा कसा सहन केला जाणार होता. तेथील परिस्थिती एवढी भयानक होती की नुकतेच १० खलाशांना धान्य चोरीच्या आरोपामुळे फासावर लटकावं लागलं होतं.

जहाज किनारी पोचल्यानंतर लेडी जुलियनने इंग्लंडून तिच्यासोबत आणलेल्या आप्त स्वकीयांच्या ख्याली खुशालीचे पत्र व निरोप हा एवढाच काय तो खुराक त्या जहाजातून त्या भुकेल्या वसाहतवाल्यांना मिळाला. त्या पत्रांच्या पुरचुंडीतच फ्रेंच राज्यक्रांतीची वार्ता देखील होती!

इंग्लंडहून निघालेले हे जहाज सिडनीच्या किनारी लागेपर्यंत जहाजावर कैदेत असणाऱ्या दोषी स्त्रियांचा वस्तूसारखा वापर करून लेडी जुलियनने जहाजावरील प्रत्येक पुरुषाची कामेच्छा पूर्ण केली होती. लेडी जुलियन तिच्या या अश्लील व्यवसायासाठी मुद्दाम प्रवास लांबवत असे. ती जहाजातील स्त्रियांना पुरुषांची शारीरिक वासना पुरविण्यासाठी त्यांच्या हवाली करीत असे. जहाजातून उतरलेल्या स्त्रियांपैकी बऱ्याच स्त्रिया गरोदर होत्या, काही स्रियांनी तर समुद्रप्रवासातच बाळांना जन्म दिला होता.

लेडी जुलियनने आणलेल्या या स्त्रिया इंग्लंडमधल्या कैदी होत्या. पण तिथे मिळणाऱ्या नरकयातनांपुढे लेडी जुलियनचा हा घाणेरडा समुद्रप्रवास त्यांना बरा वाटेल एवढे हाल इंग्लंडमध्ये व्हायचे.

या इंग्लंडहून आणलेल्या चाळीस टक्के स्रिया आपल्या प्राणास मुकला होत्या. जो इंग्लंड ते सिडनीच्या प्रवास नेपच्युनने अवघ्या १५८ दिवसात उरकला होता त्या प्रवासाला लेडी जुलियानाने एक वर्षभरापर्यंत ताणले होते.

पहिल्या जहाजातून येऊन सिडनीच्या किनारी स्थाईक झालेल्या पुरुषांची संख्या या स्त्रियांपेक्षा जास्त होती. किनारी लागल्या असल्या तरी या कोवळ्या वयातील मुलींच्या नरकयातना वाढतच होत्या कारण वसाहतवाल्यांसाठी या स्त्रिया म्हणजे केवळ प्रजननक्षम माद्याचा होत्या. किनारी उतरल्यानंतर देखील तेथील पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या स्त्रियांवर भयंकर अ*त्याचार आणि बलात्कार राजरोसपणे केले. 

‘चार्ल्स बोस्टन’ नामक समुद्री इतिहासकाराने त्या जहाजाचे ‘फ्लोटिंग ब्रॉथेल’ म्हणजेच ‘तरंगते वेश्यालय’ असेच नामकरण केले.

इंग्लंडच्या जहाजातून उतरलेल्या या स्त्रिया कोण होत्या आणि त्या एवढ्या भयानक प्रवासासाठी का तयार झाल्या? इंग्लंडमध्ये चोरी, शारीरिक व्यापार, दरोडा इत्यादी आरोपांखाली कैदेत असणाऱ्या या स्त्रिया होत्या. तिथल्या कारागृहातील गलिच्छ वस्ती, उपासमार, रोगराई या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या लेडी जुलियनच्या जहाजात उस्फुर्तपणे चढल्या. इतिहास तर असेही सांगतो की ऑस्ट्रेलियासारख्या निर्जन बेटांवर मनुष्य वस्ती वाढविणे आणि मनुष्यवस्ती विकसित करणे यासाठी म्हणूनच या प्रजननक्षम कैदी स्त्रियांचे जहाज भरून पाठविले गेले.

जरी आज लेडी जुलियनच्या या तरंगत्या वेश्यालयातून जन्माला आलेल्या बाळांपैकी बरेच प्रगत ऑस्ट्रेलियाचे सन्मानीय नागरिक आहेत, पण त्यावेळी या स्त्रियांचे जे हाल झाले असतील त्याच्या कल्पनेने अंगावर काटा उभा राहतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved


ShareTweet
Previous Post

तीन दिवस, अकरा कॉम्पिटिशन्स आणि पाच गोल्ड, पी.टी. उषांनी इंडोनेशियात डंका पिटला होता

Next Post

या माणसाच्या पँटला काटेरी लांडगा चिकटला आणि ‘वेलक्रो टेप’चा शोध लागला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या माणसाच्या पँटला काटेरी लांडगा चिकटला आणि 'वेलक्रो टेप'चा शोध लागला

टाटा नॅनोच्या आधी फोर्डने मध्यमवर्गाला परवडणारी पीपल्स कार बाजारात आणली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.