The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरच्या खोऱ्यातून देशाला मिळाली आहे पहिली मुस्लिम पायलट

by द पोस्टमन टीम
23 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“जिद्द असल्यास माणूस आयुष्यात अशक्य देखील शक्य करून दाखवू शकतो.”

हेच वाक्य काश्मीरच्या इरम हबीबने सत्यात उतरवलं आहे. काश्मीरसारख्या भागात इरम हबीब यांनी पायलट होण्याचे स्वप्न पाहिले होते. पितृसत्ताक मानसिकतेने ग्रासलेल्या या भागात एखादी मुलगी ज्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही,अशा भागातल्या इरम यांनी आपल्या जिद्दीचा बळावर हे यश मिळवले आहे.

इरम यांचा जन्म काश्मीरच्या श्रीनगरमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. आपल्या आईवडिलांनी दिलेल्या शिकवणुकीनुसारच त्या कायम वागत आल्या. त्यांचा परिवार कर्मठ असल्यामुळे इरम यांना घालून दिलेल्या बंधनांचे  त्यांना सक्तीने पालन करावे लागत होते. इरमचे पिता सर्जिकल सामानाचे सप्लायर होते. त्यांची इच्छा होती की इरमने आपले शिक्षण पूर्ण करून सरकारी सेवेत रुजू व्हावे. त्यांनी तिला वन विज्ञान शिकण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी सुरुवातीला इरम यांनी होकार देखील भरला. पण १२वीत त्यांच्या मनात पायलट बनून अवकाशाला गवसणी घालण्याचा विचार आला.

पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या परिवारात सगळे नाराज झाले. काश्मिरी मुलगी कधीच पायलट बनू शकत नाही, असं स्पष्ट शब्दात घरच्यांनी इरम यांना सांगितले आणि इरम यांना शांतपणे इतर कुठल्या मार्गाचा विचार करण्यास सांगितले.

इरम यांनी अखेरीस पालकांच्या हट्टाला मान देऊन वनविज्ञान शिकायला सुरुवात केली. पण त्यांच्यातील पायलट होण्याचे स्वप्न मात्र त्यांना शांत बसू देत नव्हते.



आपल्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन इरम देहरादूनच्या कॉलेजला वनविज्ञान शिकण्यासाठी गेल्या. त्यांनी तिथे शिक्षण केले पण त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यांच्या मनात पायलट बनण्याची इच्छा होती. पण परिवाराची समजूत काढणे फार अवघड होते. इरम यांनी अत्यंत चांगल्या गुणांनी आपले वन विज्ञानातील शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी पुढे लगेचच काश्मीरला परतून तेथील शेर ए काश्मीर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. याठिकाणी शिक्षण घेत असताना देखील पायलट होण्याची सुप्त इच्छा त्यांच्या मनात होतीच. त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इतकेच नाही वनविज्ञान क्षेत्रात पीएचडीसाठीसुद्धा प्रवेश घेतला. दीड वर्ष पीएचडीची तयारी केल्यानंतर देखील त्यांच्या मनात पायलट होण्याची इच्छा होती. मग त्यांनी आपल्या परिवाराची समजूत काढण्यास सुरुवात केली. परिवाराने आधीसारखेच याला केराची टोपली दाखवली. पण इरम मागे हटल्या नाहीत त्यांनी वेळोवेळी आपल्या परिवाराला विनंती केली.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

अखेरीस अनेक विनवण्या केल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांच्या पायलट होण्याच्या स्वप्नाला हिरवा कंदील दिला. 

तब्बल ६ वर्ष वाट पाहिल्यावर इरमना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या अमेरिकेला रवाना झाल्या.

२०१६ मध्ये अमेरिकेत मायामी फ्लाईंग स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इरम आता आपले स्वप्न पूर्ण करण्याचा अगदी जवळ येऊन पोहचल्या होत्या. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. लेखी अभ्यास आणि पायलट ट्रेनिंग दोन्हीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी एका टेस्टच्या दरम्यान अमेरिका आणि कॅनडाच्या दरम्यान २६० तासाचा विमान प्रवास पूर्ण केला होता. ही टेस्ट पास केल्यावर त्यांना अमेरिकेत पायलटचे लायसन्स मिळाले.

त्यांना अमेरिकेत कोट्यावधी कमावता आले असते पण त्यांनी भारतात परतून त्यांच्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या मुलींना प्रेरणा द्यायचे ठरवले. इरम भारतात परतल्यावर त्यांनी येथे नोकरीसाठी अर्ज केल्यावर सर्वांना इरम काश्मिरी मुस्लिम असल्याची गोष्ट जगासमोर आली. मग लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. पहिली काश्मिरी मुस्लीम महिला पायलट म्हणून त्यांनी प्रसिद्धी कमावली तरीदेखील त्यांच्या अनेक नातेवाईक मंडळीला त्यांचा हा निर्णय पटला नाही. पण आता इरम त्याचा फरक पडत नाही. त्या सध्या उच्चस्तरीय विमान वाहतुकीचे प्रशिक्षण घेत आहेत. लवकरच हा कोर्स पूर्ण करून त्या या क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठणार आहे.

इरम आज त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकल्या कारण त्यांचा त्यांच्या स्वप्नावर विश्वास होता. स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यावर कुठलीही व्यक्ती असाध्य गोष्ट साध्य करू शकते हे इरमने दाखवून दिले आहे. फक्त मनामध्ये आत्मविश्वास असायला हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कोण आहेत बर्फाळ प्रदेशात राहणारे एस्किमो ?

Next Post

साधे सिनेमागृह नसलेल्या भूतानमधील लोक जगात सर्वात आनंदी का आहेत ?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

साधे सिनेमागृह नसलेल्या भूतानमधील लोक जगात सर्वात आनंदी का आहेत ?

एकेकाळी द*हश*तवाद्यांचा गड असलेला पुलवामा जिल्हा बनतोय इंडस्ट्रियल हब !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.