The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळ्यांना फुकट आहे, जाहिराती पण दाखवत नाही तर मग व्हॉट्सॲप पैसे कसं कमावतं?

by द पोस्टमन टीम
25 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 3 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज जगभरातील कोट्यवधी लोक व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोक तासन्तास एकमेकांशी चॅटिंग करतात, असंख्य गोष्टींची देवाणघेवाण करतात. यासाठी व्हॉट्सॲप कुठलाही चार्ज लावत नाही. आता तर व्हॉट्सॲपने मोफत कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढ्या साऱ्या सुविधा देणारं व्हॉट्सॲप एक रुपयाही चार्ज का करत नाही?? सगळं मोफत कसं काय देतो? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर चला आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ

२००९ मध्ये ब्रायन एक्टन आणि जॉन कॉम या दोन मित्रांनी व्हॉट्सॲप सुरू केले. महागड्या मेसेजिंगशी स्पर्धा करण्यासाठी व्हॉट्सॲप विकसित करण्यात आले होते.

व्हॉट्सॲपवर टेक्स्ट मेसेजसोबत फोटो, व्हिडिओ व इमोजी पाठवण्याची देखील सुविधा विकसित करण्यात आली होती. काही काळाने व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली.

व्हॉट्सॲपमुळे आपले सर्वांचेच आयुष्य सोपे व गतिमान झाले आहे. सुरुवातीला फक्त अँड्रॉईडसाठी मर्यादित असलेले व्हॉट्सॲप आता डेस्कटॉप विंडोज, आय ओ एससारख्या असंख्य ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येते.

फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांना व्हॉट्सऍपची ताकद लक्षात आल्यामुळे त्यांनी २०१४ साली १९ अब्ज डॉलर्समध्ये व्हॉट्सॲप खरेदी केले होते. फेसबुकच्या ‘फॉर्म १० क्यु’नुसार, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत व्हॉट्सऍपने १२ लाख ८९ हजार डॉलर्सची घसघशीत कमाई केली. जेव्हा झुकरबर्गने व्हॉट्सऍप विकत घेतले त्यावेळी त्याने आधीचाच स्टाफ ठेवला होता, भविष्यात त्याने रणनीतीमध्ये बदल केला व कंपनीच्या अनेक मोठ्या पदांवरील लोकांची हकालपट्टी करून नवीन लोकांना स्थान दिले.



चार वर्षांनी ३० एप्रिल २०१८ ला व्हॉट्सॲपचे सहसंस्थापक व फेसबुक इंकचे सदस्य जेन कॉम यांनी आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देऊन फेसबुक सोडले. फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून युझर्सचा पर्सनल डेटा लिक करत असल्याचा संशय आल्याने जेन कॉम असंतुष्ट होते. व्हॉट्सॲपचा डेटा लिकिंग बिझनेससाठी होणारा वापर त्यांच्या तत्वात बसला नाही आणि त्यांनी व्हॉट्सऍपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. कॉम यांना व्हॉट्सॲपवर कुठलीही जाहीरातबाजी नको होती. कॉम आणि ब्रायन एक्टन हे गेल्या कित्येक दिवसांपासून व्हॉट्सॲपच्या डेटा प्रायव्हीसीसाठी संघर्ष करत होते.

२०१८ मध्ये व्हॉट्सॲपचे १.५ बिलियन वापरकर्ते होते. ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामपेक्षा मोठी कंपनी बनली होती.

व्हॉट्सॲप सुरुवातीला पैसे कमवण्यासाठी प्रति डाउनलोड एक डॉलर घ्यायचा तसेच प्रतिवर्षं एक डॉलर घेऊन आपली सेवा प्रदान करायचा. त्याकाळी व्हॉट्सॲप हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करायचे, जेवढे अधिक सबस्क्रिप्शन तेवढे अधिक पैसे असा सरळ हिशोब होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

प्रत्येकी ७०० मिलियन युझर्स असलेला व्हॉट्सॲप त्यावेळी या माध्यमातून ७०० मिलियन डॉलर्सची कमाई करत होता. जानेवारी २०१६ मध्ये फेसबुकने ही सबस्क्रिप्शन पॉलिसी बंद केली आणि त्याऐवजी व्हॉट्सॲप मोफत वापरायला दिले.

व्हॉट्सॲपमध्ये कुठलीही जाहिरात न देता फेसबुक त्याला विमान सेवा व बँक सिस्टमशी जोडू पाहत आहे. भारतात यूपीआय सेवा उपलब्ध करून देत त्यांनी या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सध्या जरी फेसबुकने व्हॉट्सॲप ऍड फ्री ठेवले असले तरी भविष्यात जर त्याने ऍड लावल्या तर त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा फेसबुकला कमवता येणार आहे. फेसबुकने २०२० पर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अब्जावधी रुपये कमावले असून फेसबुक व इन्स्टाग्रामचे काही फीचर्स लिंक करून व्हॉट्सऍपचा डेटा फेसबुक व इतर प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध करून दिला आहे.

सध्या जगभरातील २अब्जांपेक्षा जास्त लोक व्हॉट्सॲपचे सक्रिय वापरकर्ते आहेत. दिवसेंदिवस व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची संख्या वाढतच चालली आहे. आता काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीत होणाऱ्या बदलांबद्दल माहिती पुरवली आहे. व्हॉट्सॲप आता फेसबुकसोबत आपला डेटा शेयर करणार असून यामुळे आपल्या प्रायव्हसीला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. अनेक लोकांनी व्हॉट्सॲपला सोड चिट्ठी देण्याचा निर्णय घेतला असून दुसऱ्या अधिक सुरक्षित प्लॅटफॉर्मकडे वळायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपच्या पॉलिसीमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांचा अनेक तज्ञांनी देखील निषेध केला आहे.

एलोन मस्क, जॅक डॉरसी या उद्योगपतींनी देखील आता ‘सिग्नल’ या नवीन मेसेंजरचा प्रचार केला असून त्यांनी देखील व्हॉट्सॲपच्या नवीन पॉलीसीचा निषेध नोंदवला आहे. व्हॉट्सॲपच्या विरोधात आता सर्वत्र एक बंडाळी उभी राहिली असून सिग्नल व टेलिग्राम सारख्या अत्यंत एनक्रिपटेड प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका कवीने तयार केली होती जगातील सर्वात धोकादायक अेके-४७ बंदूक !

Next Post

चार्ल्स शोभराज तिहार जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चार्ल्स शोभराज तिहार जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता

गांधी ह*त्येनंतर जिन्नांची प्रतिक्रिया काय होती ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.