The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यातला तुमचा फेव्हरेट क्रिकेट अंपायर कुठला..?

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सध्या आयपीएलमुळे सगळीकडे क्रिकेटचीच चर्चा आहे. आपल्याला असे वाटत असते क्रिकेट म्हणजे फलंदाज, गोलंदाज. ते बरोबरही आहे. पण, क्रिकेटमधील एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होते किंवा म्हणावी तशी यांची दखल घेतली जात नाही. ते म्हणजे पंच! अम्पायर!

आपल्या अचूक आणि स्पष्ट निर्णय देण्याच्या क्षमतेमुळे अनेक पंचांनी क्रिकेट मैदानावर आपली छाप सोडली आहे. आज आपण अशाच काही पंचांविषयी माहिती घेणार आहोत. ज्यांनी मैदानातील आपल्या निर्णयाने रसिकांची माने जिंकली.

टोनी हिल

टोनी हिल यांच्याकडे शतकातील एक महान पंच म्हणून पाहिले जाते. टोनी हिल यांचे पूर्ण नाव आहे, अँथनी लॉयड हिल. टोनी हिल यांनी १९९८ पासून आपल्या पंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. न्युझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या सामन्यात त्यांनी पहिल्यांदा पंच म्हणून काम पहिले होते.

टोनी हिल यांना त्यांच्या अचूक निर्णयासाठी ओळखले जाते. गोलंदाजाने कितीही अपील केले तरी जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही तोपर्यंत ते निर्णय देत नाहीत. त्यांनी आजपर्यंत ९६ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून भूमिका निभावली आहे. शिवाय, १७ टी-२० आणि ४० कसोटी सामन्यांत देखील त्यांनी पंचगिरी केली आहे.



डेरल हेयर

ऑस्ट्रेलियाचे डेरल हेयर यांना ओळखले जाते ते त्यांच्या कठोर निर्णयासाठी. पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान २००६ साली ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ते पंच होते. या सामन्यात त्यांना अशी शंका आली की पाकिस्तानी संघाने चेंडूमध्ये काही तरी गडबड केली आहे.

त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना चेंडू बदलायला लावला आणि इंग्लंडच्या संघाला पाच रन जादा दिल्या. यावर पाकिस्तानी संघाने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.

त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यांचे गोलंदाजांच्या बॉलिंगकडेही फारच बारकाईने लक्ष असते. एकदा तर मुरलीधरनला त्यांनी सात वेळा ‘नो बॉल’ दिला होता. नो बॉल देण्याचे कारणही ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मुरलीधरन बॉलिंग करताना आपला पूर्ण हात न हलवता फक्त बॉल फेकतो.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

अशा अनेक कारणांसाठी पंच डेरल हेयर आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

बिली बोडेन

अचूक निर्णय आणि कठोर निर्णय हे तर अनेक पंचांची ओळख आहे. पण बिली बोडेन यांना या दोन्हीसोबत आणखी एका कारणासाठी ओळखले जाते. ते म्हणजे त्यांचा हसमुख चेहरा. त्याच्या हसमुख चेहऱ्यामुळे मैदानावर वातावरणात चैतन्य निर्माण होते. त्यांच्या उपस्थितीने खेळाडू देखील उत्साही असतात.

बिली बोडेन कधी काळी एक वेगवान गोलंदाज होते. मात्र नंतर त्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा आजार जडला. ज्यामुळे त्यांना हातपाय किंवा हाता पायांच्या बोटांची नीट हालचाल करता येत नाही. त्यामुळे निर्णय देताना ते आपली बोटे दुमडून निर्णय जाहीर करतात. त्यांची ही पद्धत एक स्टाईल बनली आहे.

त्यांच्या चाहत्यांना मात्र ही स्टाईल खूपच आवडते.

त्यांच्या नावावर १४२ प्रथम श्रेणी आणि २८४ ए श्रेणीतील सामन्यात पंच म्हणून काम करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

अलीम दार

पाकिस्तानचे पंच अलीम दार यांचे निर्णयही अचूक आणि कठोर असतात. त्यांचे पूर्ण नाव आहे अलीम सरवर दार. वयाच्या तिसाव्या वर्षापासून ते पंच म्हणून काम करत आले आहेत. आयसीसीसीच्या सर्वांत यशस्वी पंचांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

२०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे त्यांची बरीच चर्चा झाली. परंतु काही खेळाडूंना त्यांचे निर्णय पसंत नव्हते. यावरून बराच वाद विवाद झाला होता.

नाराज खेळाडूंनी डीआरएसचा आधार घेतला. मात्र डीआरएसचे निर्णय आणि दार यांचे निर्णय एकच होते.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच निर्णय देताना आपल्या डाव्या हाताचा वापर करत नाही. त्यांच्या मते नमाज पढण्याचे पवित्र काम ज्या हाताने करतो त्या हाताने कधीही चुकीचा निर्णय दिला जाऊ नये म्हणून मी डाव्या हाताचा वापर करत नाही.

२००९, २०१० आणि २०११ असा सलग तीन वर्षे त्यांना ‘अंपायर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यानच्या प्रसिद्ध ऍशेष सामन्यात त्यांनी पाच वेळा पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

स्टीव्ह बकनर

वेस्ट इंडीजच्या जमैका प्रांतातील स्टीव्ह बकनर यांनी पंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी ते शाळेमध्ये शिक्षक होते. शाळेत ते मुलांना खेळ शिकवत.

१०० पेक्षा जास्त सामन्यात त्यांनी पंच म्हणून योगदान दिले आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना गोल्डन बेल्ज पुरस्कार देखील मिळाला आहे. पंच म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

क्रिकेट सोबतचे फुटबॉल सामन्यांसाठी देखील रेफ्री म्हणून काम करतात. क्रिकेट आणि फुटबॉल अशा दोन्ही सामन्यांसाठी पंच म्हणून काम करणारे ते एकमेव आहेत. १९८८ साली नेदरलँड्स आणि सेल्वादोरमधे झालेल्या फुटबॉल सामन्यात त्यांनी रेफ्री म्हणून काम पहिले होते.

क्रिकेटमध्ये खेळाडूंना भलेही जास्त महत्व असेल, पण खेळाडू मैदानावर राहणार की तंबूत जाणार हे ठरवणारे पंच काही खेळाडूंपेक्षा कमी नसतात. बरोबर ना?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘ब्रूस ली’बद्दलच्या अफवा सगळ्यांना माहित आहेत, आता फॅक्टस् वाचा!

Next Post

प्रेमासाठी तुम्ही काय केलंय..? या राजाने ‘वाईन’चा तलाव केला होता..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

प्रेमासाठी तुम्ही काय केलंय..? या राजाने 'वाईन'चा तलाव केला होता..!

ज्या देशासाठी अंतराळात गेला, परत आला तेव्हा तो देशच अस्तित्वात नव्हता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.