आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दुसरे महायु*द्ध संपून जवळपास पाऊणशे वर्षे होत आली तरी, हे यु*द्ध, यु*द्धाचे परिणाम, यु*द्धाची कारणे आणि त्यातही हि*टल*र, स्टालिनसारख्या हुकुमशहांची भूमिका आजही चर्चेत असतात. हि*टल*रचा मृत्यू तर ३० एप्रिल १९४५ रोजी झाला. त्याच्या मृत्युनंतर दुसऱ्या महायु*द्धाचा भडका हळूहळू शांत होऊ लागला.
परंतु या हुकुमशहाशी संबंधित कथा मात्र आजही संपण्याचे नाव घेत नाहीत. हि*टल*रसारख्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची आजही अनेकांना उत्सुकता असते. हि*टल*रच्या गोष्टी म्हटले की त्यात क्रौर्य अपरिहार्यपणे असतेच. परंतु हि*टल*रच्या नावावर एका लबाड ढोंगी माणसाने इतका मोठा घोटाळा करून ठेवला की ८० च्या दशकात संपूर्ण जर्मनी हादरून गेली होती.
मुळातच हि*टल*र हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल जागे होते. हि*टल*रच्या क्रू*रतेचे, त्याच्या सैन्याकरवी त्याने घडवलेल्या ह*त्यांचे, त्याने उभारलेल्या छळछावण्यांचे किस्से नुसते ऐकले तरी अंगावर काटा येतो. इतकी क्रू*रता भरलेला हा माणूस नेमका होता तरी कसा, याबद्दल उत्सुकता लागून राहते. हि*टल*र म्हणजे जणू एक क्रौर्याची दंतकथा.
त्याच्या मृत्युनंतर त्याच्याच नावाने केलेली एक फसवणूक उघड झाली आणि जर्मनीसह संपूर्ण जगाचे लक्ष या घोटाळ्याकडे लागून राहिले.
जर्मनीची एक प्रसिद्ध मासिक आहे. स्टर्न नावाचे. आजही हे मासिक नियमित प्रकाशित होते. १९८० च्या दशकात या मासिकाने हि*टल*रची रोजनिशी हाती लागल्याचा दावा केला होता.
या रोजनिशीत लिहिल्यानुसार हि*टल*र खूपच भावूक आणि संवेदनशील होता. त्याच्या नावावर ना*झी सैन्याने जी काही राक्षसी कृत्ये केली त्याची त्याला जराही माहिती नव्हती. जणू, हि*टल*रच्या नावावरील सगळी पापकर्मे या रोजनिशीच्या माधमातून पुसण्याचाच घाट घालण्यात होता.
स्टर्न मासिकाकडे एक पत्रकार होते, ज्यांचे नाव होते गर्ड हाइडमेन. हाइडमेन हि*टल*रचे खूप मोठे समर्थक होते. त्यांनी स्वतः हि*टल*रवर बरेच संशोधन केले. हि*टल*र या व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांना खूपच उत्सुकता आणि आकर्षण होते. याच उत्सुकतेने त्यांना विनाशाच्या खाईत लोटले.
गर्ड हाइडमेन यांचे एक जवळचे मित्र होते, फिट्ज स्टीफल. हे फिट्ज स्टीफल देखील हि*टल*रचे स्तुतीपाठकच. त्यांना तर हि*टल*रमध्ये एवढी रुची होती की त्याच्या घरी एक छोटेसे म्युझियमच होते, ज्यात हि*टल*रशी संबधित वस्तू त्यांनी संग्रहित करून ठेवल्या होत्या. हाइडमेनना देखील फिट्जच्या या छंदाची माहिती होतीच.
हाईडमेनने या संग्रहावरून नजर फिरवली तेव्हा त्याला त्या संग्रहात एक कळकटलेली डायरी दिसली. या डायरीचे कव्हर संपूर्ण काळे होते. त्याच्यावर लिहिले होते हि*टल*र डायरीज्.
हे पाहताच हाईडमेनला त्या डायरीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि त्याने फिट्जला त्या डायरीबद्दल विचारले. यावर फिट्जने उत्तर दिले की ही डायरी खुद्द हि*टल*रने लिहिलेली आहे. ती डायरी फक्त त्याच्या जवळच होती.
हे ऐकताच हाईडमेनला ती डायरी आपल्या ताब्यात आली तर आपण याला प्रसिद्ध करू शकू, हि*टल*रबाबतचे सत्य जगासमोर आणल्याने आपले नाव होईल अशा नानाविध कल्पनांनी त्याला वेधून टाकले. परंतु ती डायरी विकत घेणे त्याच्या आवाक्यातील गोष्ट अजिबात नव्हती. शिवाय, ही डायरी खरंच हि*टल*रची आहे, याचीही पक्की खात्री नव्हती.
पण, हाईडमेनच्या डोक्यातून त्या डायरीचे विचार जात नव्हते. त्याने या डायरीबद्दल आपल्या कंपनीशी चर्चा केली. कंपनीलाही हेच वाटले की जर ही डायरी त्यांच्या मासिकात छापून आली तर जगभर खळबळ माजेल आणि पर्यायाने कंपनीची प्रसिद्धी वाढेल.
कंपनीने आपल्या सूत्रांच्या माध्यमातून या डायरीविषयी चौकशी सुरु केली. काही लोकांनी सांगितले की, हो हि*टल*र अशी डायरी लिहित होता आणि कदाचित ही डायरी त्याचीच असण्याची शक्यता आहे. काहींनी ही डायरी त्याचीच असल्याची पुष्टी केली.
मग, कंपनीने ही डायरी प्रकाशित करण्याचे पक्के केले. या सगळ्या प्रक्रियेत एक-दोन वर्षे तरी उलटली होती. फिट्जने त्या डायरीच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली.
स्टर्न कंपनीने फिट्जची ही मागणी मान्य केली. तब्बल ३७ लाख डॉलर (म्हणजे तेव्हाचे ४ कोटी रुपये) किंमत देऊन कंपनीने ही डायरी विकत घेतली.
स्टर्न मासिकाने ती डायरी छापण्याचा निर्णय घेतला आणि २५ एप्रिल १९८३ रोजी मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर जेव्हा या डायरीचे चित्र छापले तेव्हा जर्मनीच काय जगभर स्टर्न मासिकाची चर्चा सुरु झाली.
संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांनी ही बातमी तत्काळ आपापल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. संपूर्ण जगात स्टर्नची चर्चा सुरु झाली.
परंतु, त्या डायरीत लिहिलेली माहिती पाहून इतिहास अभ्यासकांना धक्काच बसला. जर्मनीच्या इतिहास अकादमीने पत्रकार परिषद घेऊन या डायरीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच ही डायरी खोटी असल्याचाही दावा केला. हि*टल*रने अशी कुठलीच डायरी लिहिली नसल्याचेही म्हंटले गेले.
संपूर्ण जर्मनीतून यावर वादविवाद सुरु झाले. जर्मन सरकारने या डायरीच्या चौकशीचे आदेश दिले. परंतु, जेव्हा या डायरीची सरकारी चौकशी झाली तेंव्हा हे सिद्ध झाले की ही डायरी हि*टल*रची नव्हतीच. डायरी पाहून ती खूप जुनी असेल असे वाटावे असेच रूप तिला देण्यात आले होते.
ही डायरी कोनराड कजाऊ नावाच्या एका भामट्याने माणसाने लिहिली होती. त्याने हि*टल*रच्या हस्ताक्षराची हुबेहूब नक्कल केली होती. हुबेहूब हि*टल*रसारखेच हस्ताक्षर असल्याने त्यावर फारसे कोणाला संशय आला नाही. त्यानेच ती डायरी स्वत:हून फिट्ज स्टीफलला विकली होती. हीच डायरी नंतर स्टर्न कंपनीने विकत घेतली.
पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. जिथे कोनराडची फसवणूक उघड झाली. त्याच्यासह हाईडमेनला देखील ४२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. फक्त प्रसिद्धीच्या हव्यासाने हाईडमेवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








