The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याबद्दल या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

by द पोस्टमन टीम
14 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“सीमेवरती जवान खडा पहारा देतात म्हणून तर संपूर्ण देश निश्चिंतपणे झोप घेऊ शकतो.”

या एका वाक्यात लष्कराची जबाबदारी आणि त्यावरील विश्वास दोन्ही अतिशय सार्थपणे व्यक्त होतो. भारतीय लष्कराबद्दल भारतीय नागरिकांमध्ये पराकोटीचा आदर आहे. अतिथंड प्रदेशापासून ते अतिउष्ण प्रदेशापर्यंत सर्व प्रकारच्या परिस्थितीशी दोन हात करून ३० जवान आपले कर्तव्य बजावत असतात.

पण आपल्या लष्कराबाबतच्या या काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

लष्कराचा कमांडर आणि सर्वोच्च कमांडर

भारतीय लष्कराचे प्रमुख (COAS) हे लष्कराचे कमांडर असतात तर देशाचे राष्ट्रपती हे लष्कराचे सर्वोच्च कमांडर (Supreme Commander) असतात.



आरक्षण आणि शोषण नाही

भारतीय लष्करात भरती होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची तरतूद नाही. तसेच लष्करामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव देखील केला जात नाही. भारतीय लष्करात समता आणि एकता नांदावी म्हणून हा नियम लागू करण्यात आला आहे.

लष्करातील सर्वात मोठे दल – भूदल

भूदलात अंदाजे १४,५५,००० सैनिक आहेत. यामुळे भारतीय सैन्यदल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्यदल ठरले आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

घोडदळ

भारतीय लष्करात घोडदळही समाविष्ट आहे, ६१वे घोडदळ रेजिमेंट (61st Cavalry) म्हणून ओळखले जाते. हे जगातील एकमेव, शेवटचे आणि सर्वात मोठे घोडदळ आहे. भारतीय लष्करातील हे घोडदळ आजही सक्रीय आहे.

६१ व्या घोडदळाची स्थापना भारतातील संस्थानांमधील अनेक घोडदळ तुकड्यांचे एकत्रीकरण करून करण्यात आली, यांच्यामध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, कच्छवा हॉर्स, म्हैसूर लान्सर्स आणि बी स्क्वॉड्रन, दुसरे पटियाला लान्सर्स यांचा समावेश होता.

६१ व्या घोडदळाचा इतिहास समृद्ध आहे, १९१८ साली हैफाच्या लढाईत त्यांचा समावेश होता, यात भारतीय घोडदळाने अक्ष सैन्याचा पराभव केला होता.

सर्वांत उंच ठिकाणी तैनात सैन्यदल

सियाचीनसारख्या समुद्रसपाटीपासून ५४०० मीटर उंच असणाऱ्या बर्फाच्छादित ठिकाणीही भारतीय सैन्यदल तैनात आहे. सियाचीनवरील हवेत साधारण फक्त १०% ऑक्सिजन असतो. उणे ६० अंश तापमानात याठिकाणी आपले सैनिक कडा पहारा देत असतात. याठिकाणी होणारी मोठी बर्फवृष्टी आणि बर्फाची वादळे सैनिकांच्या संकटात आणखी भर टाकत असतात.

बेली पुलाची उभारणी

हिमालयाच्या पर्वतरंगांतील लडाखच्या दरीत द्रास नदीपासून सुरु नदीपर्यंत बेली पूल बांधण्यात आला आहे. इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला हा पूल भारतीय सैन्यदलाने उभारला आहे, हे फारच थोड्या लोकांना माहित आहे. बेली पूल हा जगातील सर्वात जास्त उंचीवर असणारा पूल आहे.

लोंगेवाला यु*द्ध

१९७१ साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान लोंगेवाला याठिकाणी मोठी लढाई झाली होती. १९७१च्या यु*द्धातील हा एक खूप महत्वाचा भाग होता. जिथे १२० सैनिकाच्या भारतीय तुकडीने पाकिस्तानच्या २००० सैनिकांचा पराभव केला होता. पाकिस्तानच्या सैन्य दलात २ पायदळी ब्रिगेड्स आणि तो शसस्त्र ब्रिगेड्स होत्या.

सर्वोच्च उंचीवरील सैनिकी शाळा

सियाचीन सारख्या उंच ठिकाणी असणाऱ्या बर्फाच्छादित प्रदेशाचे रक्षण कसे करावे आणि या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी लागते. याचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्यादलाने हाय अल्टीट्युड वॉरफेअर स्कूलची स्थापना केली. याठिकाणी सैनिकांना हिवाळी मैदानी खेळांचे देखील प्रशिक्षण दिले जाते.

सारागढीचे यु*द्ध

सप्टेंबर १८९७ मध्ये झालेल्या या यु*द्धाबद्दल ऐकल्यानंतर आपले डोळे विस्फारल्या शिवाय राहणार नाहीत. भारतीय सैनिकांनी या यु*द्धात अतुलनीय कामगिरी केली. या यु*द्धात फक्त २१ शीख सैनिकांनी अफगाणिस्तानच्या १०,००० अफगाणी सैनिकांना दीर्घकाळ प्रतिकार केला होता. आजवरच्या इतिहासातील एक अगदी अनोखे आणि शौर्याने भरलेले यु*द्ध म्हणून इतिहासात याची नोंद आढळते.

जंगल यु*द्धात वाकबगार

भारतीय सैन्यदलातील सैनिक हे जंगलात यु*द्ध खेळण्यात एकदम तरबेज असल्याचे म्हटले जाते. जंगलातील लढाई लढण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्यदल जंगल वॉर्फेअर स्कूल सुरु करण्यात आले आहे.

अग्नी-५

अग्नी-५ हे भारताचे स्वतंत्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सक्षम अ*णुबॉ*म्ब वाहक आहे. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे भारताचे नाव अमेरिका, चीन, फ्रांस आणि रशिया सारख्या बलाढ्य देशांच्या यादीत समाविष्ट झाले.

ऑपरेशन राहत

२०१३ साली उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने सगळीकडे हाहाकार मजला होता. ठिकठिकाणी लोक अडकून पडले होते. अशा ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना सोडवून सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यासाठी ऑपरेशन राहत राबवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मदत पोहोचवणारे आणि हे ऑपरेशन मोठ्या प्रमाणावर यशस्वीकरून दाखवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या लष्कराला जाते.

कधीही दुसऱ्या देशावर किंवा प्रदेशावर स्वतःहून पहिल्यांदा ह*ल्ला केलेला नाही

भारताचे लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे लष्कर असले तरी, भारताने स्वतःहून कधी कुठल्या देशावर ह*ल्ला केलेला नाही. इतर देशांवर ह*ल्ला न करणारे असे खूप कमी देश आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे.

१९७१ चा सर्वांत मोठा विजय 

भारत आणि पाकिस्तानात चार यु*द्धे झाली. १९४७-४८ चे यु*द्ध, या यु*द्धात भारताने युनायटेड नेशन्स गाठले, त्यामुळे दोन्ही देशांना यु*द्धविराम घोषित करावा लागला. यु*ध्दविरामाचा आदेश येईपर्यंत ज्या सेना ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी यु*द्ध थांबवण्याचे आदेश देण्यात आले. ज्या रेषेवर हे यु*द्ध थांबले ती यु*द्धविराम रेषा (सिजफायर लाईन). यामुळे आज जगात जो पाकव्याप्त काश्मीर दाखवला जातो, म्हणजे काश्मीरचा वायव्येकडील भाग तो अधिकृत पाकव्याप्त काश्मीर नसून फक्त पश्चिमेकडील भाग हा पाकव्याप्त काश्मीर आहे. कारण पाकिस्तानी सैन्य तेवढाच भाग बळकावण्यात यशस्वी ठरलं होतं. पाकिस्तान या भागाला आझाद कश्मीर म्हणतं.

सिजफायर झाल्यामुळे भारतीय सैन्याला उत्तरेकडे जाता आले नाही, म्हणून गिलगिट, बाल्टिस्तान, काराकोरम असे भाग पाकिस्तानच्या घशात गेले. परिणामी या यु*द्धाचा “अधिकृत निकाल” भारताचा विजय किंवा पराजय असा लागला नाही.

१९६५ च्या यु*द्धात देखील हीच स्थिती. त्यावेळी भारतीय सैन्याने आपल्या शौर्यच्या जोरावर पार लाहोरपर्यंत धडक मारली आणि लाहोरवर तिरंगा फडकवला होता. इतकंच नाही तर काश्मीरच्या पीर पंजाल पर्वत रांगेमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण – हाजी पीर देखील सैन्याने जिंकून घेतली होती. पण ताशकंद करारामुळे इथूनही आपल्याला सैन्य मागे घ्यावं लागलं.

पण १९७१ साली देशाचं राजकीय नेतृत्व आयर्न लेडी म्हणवल्या जाणाऱ्या इंदिराजींकडे होतं, तर लष्कराचं नेतृत्व होतं फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्याकडे. वेस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तानवर (सध्याच्या बांग्लादेशवर) उर्दूची सक्ती करत होतं, ती झुगारून तेथील स्थानिक जनतेला मात्र बांगला भाषेचा अभिमान होता. याच मुद्द्यावरून वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाया करण्याचे, तेथील पुरुषांची क*त्तल आणि महिलांवर बला*त्कार करण्याचे लिखित आदेश दिले होते.

यामध्ये उडी घेत भारताने बांग्लादेशच्या मुक्तीबाहिनीला मदत केली, आणि भारतीय सैन्याने अवघा बांगलादेश फक्त १४ दिवसांत स्वतंत्र केलाच, शिवाय ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. हा भारताचा अधिकृत विजय होता. दुसऱ्या महायु*द्धानंतर जगात आत्मसमर्पण करणारं सैन्य म्हणून पाकिस्तानची महती आजही आहे!

लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा (भारतीय पूर्व कमांडचे जीओसी-इन-सी) यांच्या उपस्थितीत ढाक्यामध्ये पाकिस्तान ईस्टर्न कमांडचा कमांडर लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी आत्मसमर्पण पत्रावर स्वाक्षरी करताना.

खरंतर यावेळीच काश्मीरचा प्रश्न देखील सोडवता आला असता, पण नियतीला ते मान्य नव्हतं.

आ*ण्विक अस्त्रांची चाचणी

१९७० आणि ९० साली भारताने दोनदा आ*ण्विक अस्त्रांची चाचणी केली. पण, दोन्ही वेळेस अण्व*स्त्राची चाचणी करताना खूप मोठी काळजी घेतली. भारताच्या या अण्व*स्त्र चाचणीमुळे कुठलेच नुकसान झाले नाही. भारताची ही आ*ण्विक चाचणी इतक्या गुप्तपणे राबवण्यात आली की सीआयएला देखील त्याची खबर लागली नाही.

संयुक्त राष्ट्र संघाच्या पीस किपींग फोर्सचा मोठा भागीदार

संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना जगात शांतात प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने झाली. संयुक्त राष्ट्राने अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी शांतता मोहीम राबवलेली आहे. यातील तब्बल ४३ शांतता मोहिमेत भारतीय लष्कराने देखील आपले योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे जे १० शांतता कार्यक्रम आहेत त्यात भारतीय लष्करातील सुमारे ५ हजारांहून अधिक सैनिक सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेतील भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा भागीदार आहे.

भारतीय लष्कराची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी प्रतिमा आहे. भारतीय लष्कराची ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्या लष्कराबद्दलचा अभिमान आणखी दुणावतो यात वाद नाही.

लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ, फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ दरवर्षी १५ जानेवारी रोजी लष्कर दिन साजरा केला जातो. फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांची १५ जानेवारी १९४९ रोजी लष्कराचे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

इसवी सन १८९५ साली, १ एप्रिल रोजी भारतीय सैन्य दलाची स्थापना झाली. तेव्हापासूनच हे सैन्य फक्त देशातच नाही तर विदेशांत देखील आपल्या बोधवाक्याची – Service Before Self ची जाणीव ठेऊन अविरत कार्य करत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

Next Post

ही आहे मानवी इतिहासातील सर्वात जुन्या खेळांची यादी..! यातला तुम्हाला आवडलेला खेळ कुठला..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ही आहे मानवी इतिहासातील सर्वात जुन्या खेळांची यादी..! यातला तुम्हाला आवडलेला खेळ कुठला..?

शून्य फक्त गणितातच नाही तर भारतीय संस्कृतीतसुद्धा महत्त्वाचा आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.