The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या फ्रेंच सरदाराने एकहाती २०० सैनिकांना धूळ चारली होती..!

by Heramb
26 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी इतिहासात अनेक पराक्रमी यो*द्ध्यांची नोंद आहे. यांपैकी अनेक नावे तर आपल्याला माहीतही नसतात. युरोप, अरबस्तान आणि चीनच्या भागांत असे अनेक पराक्रमी यो*द्धे होऊन गेले. आपण अनेक शूर सरदारांच्या कथा ऐकतो, पण सर्वच सरदार जितके शूर होते तितके चांगले नव्हते. त्यापैकी काही क्रू*र होते. पण धैर्य आणि शौर्याचे एकाच वेळी दर्शन घडवणाऱ्या अशाच एका यो*द्ध्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

१४७६ च्या आसपास जन्मलेला पियरे टेरेल बेयर्ड हा एका शाही कुटुंबाचा वंशज होता. तो नेहमीच लढाईत व्यस्त असे.  त्याने त्याच्या काळातील इतर सरदारांच्या तुलनेत अतुलनीय शौर्य दाखवले होते. एका लढाई दरम्यान संपूर्ण पुलाचा आणि फ्रेंच सैन्याचा एकट्याने बचाव केल्यामुळे त्याला मोठी ख्याती मिळाली.

एक असामान्य यो*द्धा

सामान्य जीवनशैली असली तरी सर्वच जण त्याचा आदर करीत असत. त्याच्या पराक्रमामुळे त्याला दिल्या गेलेल्या अनेक टोपणनावांपैकी ‘ले बॉन कॅव्हेलियर’ (सर्वोत्तम सरदार) हे टोपणनाव प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्याला ‘ले कॅव्हेलियर सॅन्स प्युर एट सॅन्स रिप्रोच’ (कधीही निंदा न केलेला आणि कशाचेही भय नसलेला सरदार) या नावानेही ओळखले जाते.

त्याच्या कारकिर्दीत त्याने फ्रान्सच्या सलग तीन राजांची चाकरी केली. राजा आणि इतर सरदारांसह दरबारातील सर्वच जणांच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर होता. एकूण आयुष्यापैकी सर्वांत जास्त वेळ त्याने इटलीमध्येच काढला. बेयर्डला ऐषारामात राहणे आजिबात आवडत नसे. एवढी श्रीमंती असूनही तो जमिनीवरच झोपायचा. 



बेयर्डला मुख्यत्वे अवघड मोहिमांचे नेतृत्व दिले जात असे. शत्रूंच्या घोडदळाला पराभूत करण्याचे काम बेयर्ड लीलया करीत असे. एखाद्या शत्रूने घोडदळासह आक्र*मण केल्यास यु*द्धाची संपूर्ण जबाबदारी बेयर्डवर टाकली जात असे. इसवी सन १५०८ साली त्याने राजा लुईस सेव्हन्थसाठी जेनॉईस बंडखोरांविरुद्ध अशी घोडदळाची लढाई मारली होती.

गॅरीग्लिआनोची लढाई

डिसेंबर १५०३ मध्ये, स्पेन आणि फ्रान्सचे सैन्य गॅरीग्लिआनो नदीच्या पाणथळ प्रदेशात तळ ठोकून बसले होते. या दोन महाकाय सैन्यांमध्ये फक्त गॅरीग्लिआनो नदीचा प्रवाह होता. पण यावेळी नेहमीप्रमाणे बेयर्डकडे फ्रेंच सैन्याचे नेतृत्व नव्हते. न्यू इयरच्या पूर्वसंध्येलाच स्पॅनिश लोकांनी नदीवर पूल बांधायला सुरुवात केली. त्यावेळी प्रत्येक राज्यात, संस्कृतीच्या वैविध्यामुळे वेगवेगळ्या दिवशी ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ होत असे. परंतु अशा अवघड परिस्थितीत फ्रेंच सैन्याला आपल्या सहयोगी सैन्याच्या छावणीत रोगराई पसरल्याने अधिक कुमक मिळणं अशक्य होतं.

यामुळे फ्रेंचांची बाजू दुबळी पडली आणि सैन्याच्या वरिष्ठांनी माघार घेण्याचे आदेश दिले. स्पॅनिश सेनापतीला मात्र पळून जाणाऱ्या फ्रेंच सैन्यावरही आक्र*मण करायचे होते. पण फ्रेंच सैन्याच्या शेवटच्या तुकडीचा सामना करताना त्याचा हा निश्चय निरर्थक ठरला. बेयर्डने स्पॅनिश सैन्याने बांधलेल्या पुलावर पवित्रा घेतला आणि बाकीच्या फ्रेंच सैन्याला माघार घेण्याच्या सूचना दिल्या. असं म्हणतात दोनशे सैनिकांविरुद्ध तो एकटाच लढायला उभा ठाकला होता. अतुलनीय शौर्य दाखवत त्याने या प्रचंड सैन्याकडून झालेल्या आक्र*मणाला तोंड दिले आणि कसाबसा तो यातून वाचला.

दोन्ही सैन्यांमध्ये लहान-मोठ्या चकमकी झाल्या असल्या तरी उरल्या सुरल्या फ्रेंच सैन्याने जवळच्याच दुसऱ्या पुलाजवळ पोजिशन घेतली, जेणेकरून त्यांना वेढा घालू पाहणाऱ्या स्पॅनिश सैन्याचा ते समर्थपणे प्रतिकार करू शकतील. बेयर्डने अडवून धरलेल्या स्पॅनिश सैन्यातील काहींना फ्रेंचांची ही योजना समजली आणि त्यांनी फ्रेंच ज्या पुलाजवळ पोजिशन घेणार होते त्याठिकाणी ह*ल्ला केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

यावेळी फ्रेंचांना पुन्हा माघार घ्यावी लागली, आणि स्पॅनिश सैन्याचा विजय जवळ जवळ निश्चित झाला. पण बेयर्डची ख्याती याच लढाईपासून वाढू लागली. फ्रेंच सैन्याच्या अंतिम अयशस्वी ह*ल्ल्यानंतर मात्र स्पॅनिशांनी नॅपल्सवर वर्चस्व मिळवले. स्पॅनिश सैन्याचा विजय झाला असला तरी बेयर्डने शेकडो फ्रेंच सैनिकांचे प्राण वाचवले होते.

अ वॉ*र एक्सपर्ट

पंधराव्या आणि सोळाव्या शतकात सतत ‘इटालियन यु*द्धं’ होत असत. इटालियन यु*द्धं म्हणजे स्पेन आणि फ्रान्समध्ये वारंवार पडलेल्या यु*द्धाच्या ठिणग्या. या प्रचंड अनुभवामुळे बेयर्डला स्पॅनिश सैन्याविरोधात कशी आघाडी उघडायची आणि कसे ह*ल्ले करायचे हे कोणत्याही अन्य सरदारांपेक्षा जास्त माहिती होते. फ्रेंच यु*द्धतंत्र सर्वोत्तम आणि ‘विजयी यु*द्धतंत्र’ बनवण्याचे श्रेय बेयर्डलाच जाते यात काही आश्चर्य नाही. 

१५०९ साली ‘किंग लुईस सेव्हन्थ’ने बेयर्डला पायदळ आणि घोडदळाची स्थापना करण्याचे आदेश दिले. या पायदळाने आणि घोडदळाने ‘ले बॉन कॅव्हेलियर’च्या नेतृत्वाखाली प्रचंड शिस्त, धैर्य आणि कार्यक्षमता यांचे आदर्श उदाहरण घालून दिले. ‘ले बॉन कॅव्हेलियर’ने ‘ॲग्नॅडेलो’च्या यु*द्धात फ्रेंच मोहिमेचे नेतृत्व केले तेव्हा हे स्पष्टपणे दिसून आले. युरोपियन इतिहासाच्या ज्या कालखंडाला ‘इटालियन युद्धे’ म्हणतात, त्यामधील ‘ॲग्नॅडेलो’ची लढाई सर्वांत प्रमुख मानली जाते.

बेयर्ड, बिहाइंड द बॅटलफिल्ड:

बेयर्डच्या नेतृत्वाची शैली थंड डोक्याची होती. त्याने अनेक सैनिकांना देशासाठी सर्वस्व अर्पण करायला प्रेरित केले. बेयर्ड स्वतःसुद्धा याचे मूर्तिमंत उदाहरण होता. बेयर्डने कधीही लग्न केले नाही. तो एकदा दिवंगत पोप अलेक्झांडर सिक्सथची मुलगी आणि सेझर बोर्जियाची बहीण ‘लुक्रेझिया बोर्जिया’ला भेटला होता. तिला ‘स्त्रियांमधील मोती’ असे संबोधले जात असत. तिच्या मृत्यूनंतर तो अनेकदा तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जात असत.

पियरे टेरेल बेयर्ड अत्यंत निष्ठावान आणि प्रेमळ माणूस होता. तो त्याचा मित्र, गॅस्टन-डी-फॉईक्सशी अत्यंत घनिष्ट संबंध ठेवत असे. त्यांची मैत्री ही यु*द्धभूमीपेक्षा यु*द्धभूमीबाहेर जास्त बहरली. त्यांची मैत्री रक्ताच्या नात्याच्याही पलीकडची होती. गॅस्टन-डी-फॉईक्स हा एक सरदार तर होताच पण ‘नेमोर्स’चा ड्यूक सुद्धा होता.

१५१२ साली झालेल्या रावेन्नाच्या लढाईत फ्रेंचांचा विजय या जोडीने खेचून आणला खरा, पण गॅस्टन-डी-फॉईक्सच्या मृत्यूने पियरे टेरेलला मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं. शिवाय फ्रान्ससाठीसुद्धा हे मोठे धोरणात्मक आणि सामरिक नुकसान होते. गॅस्टन-डी-फॉईक्सचे टोपणनाव ‘थंडरबोल्ट ऑफ इटली’ होते आणि त्याने त्याच्या या उपाधीला साजेल असेच काम आयुष्यभर केले. शोकांतिका म्हणजे गॅस्टन-डी-फॉईक्सचा मृत्यू यु*द्धाच्या अगदी अंतिम टप्प्यात झाला होता.

१५१५ च्या जानेवारीच्या सुरुवातीला राजा लुई ट्वेल्थच्या मृत्यूनंतर, त्याचा उत्तराधिकारी ‘किंग फ्रान्सिस फर्स्ट’ने पुन्हा एकदा बेयर्डला इटलीमधील मोहिमांत सामील होण्याचे आवाहन केले. त्याच्या आधीच्या फ्रेंच राजांप्रमाणेच, फ्रान्सिस फर्स्टलासुद्धा एक सक्षम लष्करी सम्राट म्हणून नाव कमावण्यात स्वारस्य होते. तो स्वतः एक सरदार असल्यामुळे फ्रान्सच्या सिंहासनावर आल्याबरोबर त्याने मिलानच्या ‘डची’साठी संघर्ष सुरु ठेवला. डची म्हणजे एखाद्या ड्यूक किंवा डचेसचा भूभाग.

१५१५ साली, राजा फ्रान्सिस फर्स्टचा मॅरिग्नानोच्या लढाईत सर्वात मोठा विजय झाल्यानंतर, विरोधी सैन्यातील राजाने ‘ले बोन कॅव्हेलियर’समोर गुडघे टेकले आणि त्याला सरदारपद बहाल करण्याची विनंती केली. नेहमीप्रमाणे बेयर्ड नम्रपणे म्हणाला, त्याला  सरदारपद हे राजानेच बहाल केले पाहिजे आणि इतर कोणीही ते करू नये. यावेळी बेयर्ड जवळजवळ चाळीशीत होता तर फ्रान्सिस फर्स्ट अवघ्या विशीत. फ्रान्सिसने मात्र आग्रह धरला आणि त्यामुळे बेयर्डनेच त्याला सन्मान दिला. यामुळे फ्रेंच राजाला तात्पुरते टोपणनाव दिले गेले, ‘ले रोई कॅव्हेलियर’, किंवा ‘किंग-नाइट’.

तो ज्वालामुखी अखेर शांत झाला..!

पाव्हियाच्या लढाईत स्पॅनिश ‘अर्केब्स’मधून बेयर्डला गोळी लागली . या यु*द्धात स्पॅनिश अर्केब्सच्या विरोधात कोणत्याही संरक्षणाचा विचार केला गेला नव्हता. बेयर्डचा मूळ कमांडर जखमी झाल्यानंतर त्याने लष्कराची कमान स्वीकारली होती. मूळ कमांडरला वाचवताना बेयर्डला आपले प्राण गमवावे लागले.

ड्यूक ऑफ बोर्बन, चार्ल्सने काही वैयक्तिक, क्षुल्लक गोष्टींनंतर फ्रान्सच्या राजाविरुद्ध भूमिका घेतली होती. त्याने आपल्या जुन्या साथीदाराची ही हालत झालेली पहिली आणि तो बेयर्डला म्हणाला, ‘बेयर्ड… तुम्हाला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले; तुम्ही गुणी शूरवीर होता! ’

बेयर्ड त्याच्या जुन्या साथीदाराला पाहून थोडा हलला, म्हणाला: “सर, माझ्यावर दया करण्याची गरज नाही. मी माझे कर्तव्य करत असताना एक मानी माणूस म्हणून मरतोय; पण मला तुझी दया येते, कारण तू तुझ्या राजाविरुद्ध, देशाविरुद्ध आणि शपथेविरुद्ध लढत आहेस. ” हे त्या वीराचे शेवटचे शब्द होते.. ही गोष्ट आहे १५२४ सालची.  

बोर्बॉनचा ड्यूक नंतर १५२७ साली ठार झाला. काही कारणास्तव त्याला त्याच्याच सैन्याने ठार केले. बेयर्डचे संपूर्ण युरोपमध्ये डझनभर पुतळे आहेत, आजही लोक त्याचा सन्मान करतात.. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दाऊद इब्राहिममुळे भारताने ‘शारजाह’मध्ये क्रिकेट खेळणं बंद केलं

Next Post

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं...!

ऑपरेशन मिन्समीट - जेव्हा ब्रिटनने एका मृत*देहाचा वापर करून हिट*लरला मात दिली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.