The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाही कुटुंबात जन्मलेल्या या महिलेने ३०० मुलींचा अमानुष छळ करून ह*त्या केली होती

by Heramb
21 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ज्याप्रमाणे साहित्य नवरसांनी भरलेलं आहे त्याप्रमाणेच मानवी इतिहासालासुद्धा अनेक रंग आणि रस आहेत. त्यात पराक्रम, चपळाई, राज्यव्यवहार, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, यु*द्धशास्त्र असे अनेक रंग असतात. पण इतिहासात क्रूरतासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. भारतासह जगभरात विविध राज्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने आणि आपापल्या कारणांनी क्रू*रता दाखवली.

काहींनी धर्माच्या नावाखाली तर काहींनी अर्थाच्या नावाखाली. भारतामध्ये ‘गोवा इन्क्वीजीशन’ प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाने उत्तरेत स्थानिकांवर अनन्वित अत्या*चार केले, तसेच किंवा त्याहूनही भयानक अत्या*चार गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी सुमारे २ शतकभर केले. पोर्तुगीजांच्याच युरोपमध्ये असे अनेक विघ्नसंतोषी आणि रक्तपिपासू राजे लोक होते. त्यांपैकी सर्वांत क्रू*र नाव म्हणजे एलिझाबेथ बॅथोरी. ही बाई राज्यातील तरुण मुलींना कैद करून त्यांच्यावर असहनीय आणि अमानवी अत्या*चार करत असे. तिचं कुटुंब सत्तेत असल्याने तिच्या या क्रू*रकर्माकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत होतं. या एलिझाबेथ बद्दल जाणून घेण्यासाठीच आजचा हा विशेष लेख!

एलिझाबेथ बॅथोरीचा जन्म १५६० साली रॉयल हंगेरीच्या न्योरबॉटर येथील शाही कुटुंबात झाला आणि तिने आपले बालपण ‘एक्सेड कॅसल’ येथे घालवले. लहानपणी, बॅथोरीला अपस्मारामुळे बहुधा काहीशा मंदपणाचा सामना करावा लागला. अपस्माराचे निदान झाल्यानंतर तिच्यावर योग्य ते उपचार होणे आवश्यक होते. काही कारणांनी योग्य ते उपचार झाले नाहीत.

पण अनेक विचित्र उपचार तिच्यावर करण्यात आले. यामध्ये अपस्मार नसलेल्या व्यक्तीचे रक्त ओठांवर चोळणे किंवा अपस्मार नसलेल्या व्यक्तीच्या रक्तात कवटीचा तुकडा टाकून ते प्यायला देणे, असे उपचार घेतच तिचे बालपण सरले. या कारणांमुळे बॅथोरीने तिच्या नंतरच्या आयुष्यात केलेल्या ह*त्या हा तिच्या बालपणापासून तिच्यावर करण्यात आलेल्या उपचारांचा भाग असल्याचा अंदाज लावला गेला. पण हे कुठेही सिद्ध होत नाही.

काही लोक तिने केलेल्या क्रू*रतेचे कारण म्हणजे तिचे कुटुंब आहे असे सांगतात. तरुण बॅथोरीने तिच्या कुटुंबाच्या अधिकाऱ्यांना क्रू*र शिक्षांची अंमलबजावणी करताना अनेकदा पाहिले. पण या सगळ्याची एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे तिला भीती वाटत नसे. कुटुंबतील काही सदस्यांनी तिला सैतान पूजा आणि जादूटोणाशी संबंधित काही गोष्टी शिकवल्या असेही सांगितले जाते. पण हे दावे सिद्ध होतील असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तिने लॅटिन, जर्मन, हंगेरियन आणि ग्रीक या भाषांचे शिक्षण घेतले. खानदानी कुटुंबात जन्मलेल्या बॅथोरीला भरपूर संपत्ती, शिक्षण आणि एक प्रमुख सामाजिक पद मिळाले.



बॅथोरी अवघ्या दहा वर्षांची असताना तिचे लग्न नादास्डी कुटुंबातील सदस्य फेरेन्क नादास्डी याच्याशी निश्चित झालं. नादास्डी कुटुंब राजकीय वर्तुळात सक्रिय होतं. एलिझाबेथचा सामाजिक स्तर तिच्या पतीपेक्षा मोठा असल्याने तिने तिचे आडनाव बदलण्यास नकार दिला आणि त्याऐवजी नादास्डीने ‘बॅथोरी’ हे आडनाव धारण केले.

बॅथोरीच्या वयाच्या १५व्या वर्षी आणि फेरेन्कच्या १९व्या वर्षी, ८ मे १५७५ रोजी त्यांचा विवाह पार पडला. या विवाहसोहळ्याला सुमारे ४५०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. लग्नानंतर ते दोघेही ‘सेजेथ कॅसल’ येथे स्थायिक झाले. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून फेरेन्कने तिच्या सांगण्यानुसार सेजेथ कॅसल येथे  ‘अत्या*चार कक्ष’ बांधला. लग्नांनंतर बॅथोरीने अनेक मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्या*चार करण्यास सुरुवात केली. यामध्ये सुरुवातील १० ते १४ या वयोगटातील मुलींचा समावेश होता नंतर वयाचा हा आकडा वाढत गेला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नोकर मुलींच्या नखांखाली पिन्स आणि सुया घालणे, त्यांना बांधून त्यांच्या अंगाला मध फासणे जेणेकरून त्यांना मधमाशा आणि मुंग्यांच्या उपद्रव होईल असे क्रू*र अ*त्याचार ती करत असत. तिचा पती मात्र या अत्या*चारांपासून लांब असल्याचं दिसून येतं, तसेच त्याने तिच्या आवेगांना आवर घालण्याचाही प्रयत्न केला असावा. कारण इसवी सन १६०० च्या सुरुवातीला, फेरेन्कच्या मृत्यूनंतर ती खूपच वाईट झाली.

तिची सुरुवातीची नर्स, इलोना जू आणि स्थानिक जादूटोणा करणारी स्त्री, डोरोटा सेझेंटेस यांच्या मदतीने, बॅथोरीने शेतकऱ्यांच्या मुलींवर अ*त्याचार आणि ह*त्या करण्यासाठी अपहरण करण्यास सुरुवात केली. ती अनेकदा अशा पीडित मुलींच्या मांसाचे तुकडे गोळा करत असत आणि एका मुलीला तर स्वतःचे मांस शिजवून खाण्यास भाग पाडले गेले होते. मानवाच्या रक्ताने आपण कायम तरुण आणि निरोगी राहू असा तिचा समज होता.

तिचे कुटुंब स्थानिक सरकारचे प्रमुख असल्याने, १६१० पर्यंत बॅथोरीच्या गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केले गेले. पण १६१० साली, राजा मॅथियास २ ने थुर्झोला यासंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमले. तो हंगेरीचा पॅलाटिन होता. पॅलाटिन हे हंगेरी साम्राज्याचे सर्वोच्च दर्जाचे कार्यालय होते. मार्च १६१० मध्ये थुर्झोने आंद्रेस केरेसटोरी आणि मेझेस झिरॉकी यांना यासंदर्भात पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले. ऑक्टोबर १६१० पर्यंत त्यांनी ५२ साक्षीदारांचे निवेदन गोळा केले होते तर १६११ उजाडेपर्यंत, ही संख्या तब्बल ३०० वर गेली होती.

अखेरीस जानेवारी १६११ मध्ये, बॅथोरी आणि तिच्या सहकाऱ्यांवर ८० ह*त्येच्या गुन्ह्यांचा खटला चालवण्यात आला. सर्वांना दोषी ठरवण्यात आले, परंतु बॅथोरीला फाशीच्या शिक्षेतून सुट मिळाली. तिला एका वाड्याच्या खोलीत कैद करून ठेवण्यात आले, ज्यामध्ये फक्त अन्न आणि हवा मिळेल इतकीच सोय होती. ती तीन वर्षे जगली आणि अखेर ऑगस्ट १६१४ मध्ये ती मृतावस्थेत आढळली. तिच्या याच कारनाम्यांमुळे तिला ब्लड काऊंटेस अशी ओळख मिळाली..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतातली पहिली रेल्वे सुरु झाल्याच्या खुशीत राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती

Next Post

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियरचा प्रभाव आहे तसाच मायकेलेंजेलोचा कलेवर आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियरचा प्रभाव आहे तसाच मायकेलेंजेलोचा कलेवर आहे

'आंद्रे द जायंट'च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.