The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रान्समध्ये झालेल्या एका कोर्ट मार्शलमुळे इज्राइलच्या निर्मितीची सुरुवात झाली होती..!

by द पोस्टमन टीम
30 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


फ्रांसमध्ये १८९०च्या मध्यात झालेल्या एका सैनिकी कोर्ट केसमुळे आत्ताच्या इस्त्राईल देशाच्या निर्मितीची सुरुवात झाली असं म्हटल्यावर डोकं चक्रावणार नाही तर काय..!

‘ड्रेफस अफेयर’ नावाने प्रसिध्द असणारी ही घटना पुढे जाऊन जगातील पहिल्या ज्यू देशाची स्थापना करण्यास महत्त्वपूर्ण होती. आज आपण याच घटनेचा आढावा घेणार आहोत.

या घटनेतले मुख्य पात्र होते अल्फ्रेड ड्रेफस. ड्रेफस हा फ्रेंच सैन्यात तोफखाना विभागात उच्च पदावर अधिकारी होता. १८९४ च्या सप्टेंंबर महिन्यात एक मोलकरीण जर्मन दुतावासाच्या बाहेरील कचराकुंडी तपासत होती. (ही मोलकरीण नसून फ्रेंच गुप्तचर होती.) या कचराकुंडीत तिला जर्मन सेनेच्या उच्चाधिकाऱ्यांना लिहिलेली काही पत्र सापडली. या पत्रांमध्ये फ्रेंच सैन्याच्या नवीन तोफखान्याची काही गुपिते लिहिलेली होती. ही पत्रे पुढे जाऊन ‘बोर्डरो’ म्हणून ओळखली गेली.

या पत्रांना फ्रेंचच्या युध्द मंत्र्याकडे पाठवले गेले. जास्त काही विचार न करता यामागे तोफखान्याच्या अधिकाऱ्यांचाच हात होता असा निर्णय त्या मंत्र्याने घेतला आणि लगेच त्यांची यादी मागितली. या यादीत असलेले एक नाव वेगळे होते.



बाकी सगळे अधिकारी फ्रेंच होते, अल्फ्रेड ड्रेफस सोडून. अल्फ्रेड ड्रेफस ज्यू होता. फक्त ज्यू असल्याने ड्रेफसला दोषी ठरवण्यात आले.

ही केस जेव्हा कोर्टात गेली तेव्हा पुरावे म्हणून त्या पत्रात लिहिले गेलेले हस्ताक्षर ड्रेफसच्या हस्ताक्षराशी जुळवून बघितले गेले. ड्रेफसचे हस्ताक्षर जुळत नव्हते तरीही त्याला दोषी ठरवण्यात आले. हे पटवून देण्यासाठी ड्रेफसने आपले हस्ताक्षर बदलून ही पत्रे लिहीली होती असा दावा करण्यात आला. म्हणजे, हस्ताक्षर जुळलं नाही म्हणून त्याला दोषी ठरवण्यात आलं. त्याचबरोबर अजून काही पत्रे तयार करुन ड्रेफसच्या विरोधात सादर करण्यात आली.

सगळ्या पुराव्यांनिशी त्याला दोषी घोषित करुन डेव्हिल्स बेटावर एकटेच राहण्यासाठी पाठवण्यात आले. या बेटावर जाण्यापुर्वी त्याची तलवार त्याच्यासमोर तोडण्यात आली. त्याच्या खांद्यावरील बिल्ले काढून जमिनीवर टाकून देण्यात आले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याचवेळी डॉ. थिओडोर हर्जेल नावाचा एक ज्यू लेखक या सगळ्या घटनांकडे बघत होता. एका ज्यू अधिकाऱ्यावर एवढा अन्याय होत असेल तर सामान्य जनतेची परीस्थिती काय असेल हा प्रश्न त्याला पडला. यातूनच त्याने ‘ज्यूडेनस्टाट’ नावाचे एक पुस्तक लिहीले. पुस्तकात त्याने ज्यूवर होणारे अत्याचार आणि त्यासाठी वेगळा देश निर्माण करण्याची संकल्पना मांडली, ही संकल्पना युरोपभर पसरली.

ज्यू लोकांना फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या हक्कांची जाणीव होण्यास सुरूवात झाली. यातूनच ड्रेफसचे प्रकरण पुन्हा एकदा तपासून बघण्याची मागणी जोर धरू लागली.

याच वेळी जुन्या फ्रेंच युध्दमंत्र्याऐवजी नवीन मंत्र्याची नेमणूक झाली. मार्च १८९६ मध्ये या नवीन मंत्र्याने ड्रेफसचे प्रकरण पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. त्याने पुन्हा सगळी कागदपत्रं तपासून घेतली. बनावट पत्रं बघितली. हे सगळं करत असताना फ्रेंच अधिकारी फर्डीनांड इस्टराझी आणि जर्मन दुतावास यांच्यातील टेलीग्रामकडे मात्र त्याचे लक्ष गेले नाही.

नवीन तज्ज्ञांनी इस्टराझी आणि जर्मन दूतावासाला लिहिली गेलेली पत्रं यांच्यातील हस्ताक्षर तपासून बघितले आणि त्याला ते जुळत असल्याचे सापडले. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. त्याला ती केस आधीच संपुष्टात आल्याचे सांगितले गेले. केस बंद केली गेली. पुरावे दाबून टाकण्यात आले आणि त्या अधिकाऱ्याची बदली ट्युनिशीयाला केली गेली.

पण ट्युनिशियामधून इस्टराझी खरा दोषी असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकायला लागल्या. त्याची आणि बोर्डीयरची जुळणारी हस्ताक्षरांची प्रत छापून आली. त्याच वेळी इस्टराझीच्या पूर्वीच्या पत्नीने इस्टराझीने तिला लिहिलेली पत्रे प्रकाशित केली. 

यात त्याने फ्रांसच्या प्रती त्याच्या मनात असलेला तिरस्कार व्यक्त केला होता. एवढे सगळे पुरावे असताना इस्टराझीला कोर्टात खेचण्याशिवाय फ्रेंच सेनेला पर्याय नव्हता.

इस्टराझीला कोर्टात आणले खरे, पण इथेही त्याला निर्दोष ठरवले गेले. याच वेळी एमिल झोला नावाच्या प्रसिध्द लेखकाने यावर एक लेख लिहिला. ‘आय अक्यूज’ असे नाव असलेला हा लेख जगभर पसरला. त्यात लिहिण्यात आलेल्या घटना आणि करण्यात आलेल्या टिकेने फ्रेंच सैन्याची जगभर नाचक्की झाली. वर्तमानपत्राची ताकद दर्शविणारा हा लेख पुढे जाऊन पत्रकारितेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार होता.

झोलाच्या या लेखाने फ्रांसमधले लोक, ड्रेफसला पाठिंबा देणारे आणि फ्रेंच सैन्याला पाठिंबा देणारे अशा दोन भागात विभागला गेला. ड्रेफसार्ड्स आणि अँटीड्रेफसार्ड्स. यातून दंगे सुरु झाले. रस्त्यावर दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली. इस्टराझी सुरक्षिततेसाठी इंग्लंडला पळून गेला. झोलाला देशाच्या शांततेचा भंग केला म्हणुन तुरुंगात टाकले गेले. पुढे तो सुध्दा इंग्लंडला पळाला.

सरकार आणि सैन्यात तणाव वाढत होता. याचा परिणाम म्हणून काही मंत्री पदाचा राजीनामा देऊन निघुन गेले. १८९९ मध्ये सरकार उलथण्याचा प्रयत्न देखील झाला. एवढे सगळे पुरावे असताना ड्रेफसला बेटावर एकटे ठेवणे आता योग्य नव्हते. म्हणून १८९९ मध्ये त्याला परत आणले गेले. आल्यावर त्याला कोर्टासमोर उभे केले तेव्हा त्याची अवस्था दयनीय झाली होती. त्याने आपले दात गमावले होते. ४ वर्ष कोणाशीही बोललेला नसल्याने त्याने आपली बोलण्याची क्षमता गमावली होती. त्याची ती अवस्था बघून त्याची बायको आणि भाऊ यांना धक्काच बसला.

कोर्टात पुन्हा केस उघडली गेली आणि धक्कादायक बाब अशी की त्याला पुन्हा दोषी ठरवले, मात्र यावेळी राष्ट्रपतीने त्याला शिक्षा न देता तसेच जाऊ दिले. ड्रेफसने हे मान्य केले. १९०६ मध्ये फ्रेंचच्या सुप्रीम कोर्टाने ड्रेफसला मुक्त केले आणि ही केस संपली.

ड्रेफसला पुन्हा सैन्यात घेतले गेले. त्याला तोफखान्यात अजून उच्च पदावर बढती दिली गेली. पहिल्या महायुद्धात त्याने लेफ्टनंट कर्नल म्हणून फ्रेंच सैन्याचे नेतृत्व केले. सगळं आयुष्य तो फ्रेंच सेनेशी प्रामाणिक राहिला. १९३५ साली त्याचा मृत्यू झाला.

हर्जेल हे सगळं बघण्यासाठी जिवंत नव्हता. पण त्याच्या पुस्तकाने सुरू झालेली नवीन ज्यू देशासाठीची चळवळ उभी करण्यात मदत मिळाली हे नक्की!

एक छोटीसी घटना इतिहासाच्या पुस्तकात किती महत्त्वाची ठरू शकते याचे हे ऊदाहरण. त्याच बरोबर सत्तेच्या ताकदीने एखाद्या विशिष्ट समाजाची किंवा व्यक्तींची अवहेलना होते तेव्हा परिस्थिती किती दाहक असते हे ही घटना जवळून दर्शवते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या सेनापतीने मौर्य साम्राज्य संपवून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं होतं..!

Next Post

ग्रीक दंतकथा – या बारा अशक्यप्राय कामांमुळे हर्क्युलस अजरामर झाला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ग्रीक दंतकथा - या बारा अशक्यप्राय कामांमुळे हर्क्युलस अजरामर झाला

डुप्लिकेट वस्तू बनवणाऱ्या चीनने तयार केलाय चक्क कृत्रिम सूर्य, पाहा खासियत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.