The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

by द पोस्टमन टीम
29 July 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लहानपणापासून अनेक क्षेत्रात पाऊल टाकणारी पहिली महिला म्हणून डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ओळखल्या जातात. त्यांनी भारतातील पारंपरिक सामाजिक प्रथांचा बिमोड करत लैंगिक समानतेसाठी सदैव प्रयत्न केले. त्यांनी मेडिकल, शिक्षा आणि कायद्याच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले. फार कमी लोकांना माहिती आहे की भारतातील महिलांची स्थिती सुधारण्यात या महिलेचा मोठा वाटा आहे.

मुथुलक्ष्मी १९ व्या शतकातील एका बुरसटलेल्या समाजात जन्मला, ज्यात स्त्री फक्त लग्न करून नवऱ्याची सेवा करण्यापर्यंत मर्यादित होती.अशा समाजात जन्म घेऊन देखील त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी सदैव महिलांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष केला. मुथुलक्ष्मी ह्या एक कडव्या स्त्रीवादी होत्या. कदाचित भारतातील पहिल्या स्त्रीवादी होत्या.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मुथुलक्ष्मी यांनी समाजसुधारक म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. बाल विवाह, देवदासी, वैश्यालय, लहान मुलं आणि महिलांच्या तस्करीविरोधात कडक कायदे करवून घेतले. त्यावेळच्या प्रस्थापित कर्मठ समाजव्यवस्थेला त्यांनी खुले आव्हान दिले होते.

लहानपणापासूनच मुथुलक्ष्मी यांना शिक्षणाची गोडी होती, पण त्या तामिळनाडूच्या पुडुकोट्टई नावाच्या एका छोट्या गावात जन्माला आल्या. या भागातील बहुतांश लोकांची मानसिकता पितृसत्ताकच होती. येथे फक्त पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता. त्यांचे वडील नारायण स्वामी अय्यर हे महाराजा कॉलेजचे प्राध्यापक होते, त्यांनी घरीच मुथुलक्ष्मी यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिलं.

मॅट्रिकच्या परीक्षेत मुथुलक्ष्मी यांनी टॉप केलं. त्यांच्या या यशाने जिल्ह्याभरात खळबळ माजली. ज्यावेळी महाराजा कॉलेजमध्ये त्यांच्या ॲडमिशनसाठी अर्ज करण्यात आला, त्यावेळी कॉलेजचे प्राध्यापक आणि इतर पदाधिकारी पेचात पडले कारण मुथुलक्ष्मी यांच्या अगोदर या कॉलेजात कुठल्याच मुलीने शिक्षण घेतले नव्हते. एकीकडे ही परिस्थिती असताना अर्थातच काही सनातनी मंडळींनी मुथुलक्ष्मी यांच्या शिक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.



पुड्डूकोटईचे राजे मार्तंड भैरव थोंडमन मुथुलक्ष्मी यांची कामगिरी बघून प्रचंड प्रभावित झाले त्यांनी समाजातील विरोधाला झुगारून लावत मुथुलक्ष्मी यांना कॉलेजात शिक्षण घेण्याचे आदेश दिले. त्यांना फक्त कॉलेजात ॲडमिशनच मिळवून देण्यात आली नाहीतर त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.

१९१२ साली मुथुलक्ष्मी यांनी अजून एक यश मिळवले, त्या मद्रास विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला ग्रॅज्युएट बनल्या.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, मुथुलक्ष्मी यांनी सर्जरीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. याच कॉलेज जीवनात त्यांचा सरोजिनी नायडूंशी संपर्क आला. त्यांच्या प्रभावात येऊन मुथुलक्ष्मी महिलांसाठीच्या बैठकांना उपस्थित राहू लागल्या. ॲनि बेझंट आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारायला सुरुवात केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एकीकडे सार्वजनिक आयुष्यात येत होती, तशी अनेक वादळे मुथुलक्ष्मी यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील येत होती. चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह निश्चित कऱण्यात आला होता, पण मुथुलक्ष्मी यांनी नकार दिला. १९१४ साली त्यांच्या करियरमध्ये आणि सामाजिक कामात ढवळाढवळ करणार नाही, हे वचन घेऊन त्यांनी डॉ. टी सुंदर रेड्डी यांच्याशी वयाच्या २८ व्या वर्षी लग्न केले.

एकदा मुथुलक्ष्मी यांना इंग्लंडमध्ये महिला आणि बालकांच्या स्वास्थ्य प्रशिक्षण वर्गासाठी जायचे होते, पण घरच्यांनी कुठलीच आर्थिक  मदत करण्यास नकार दिला. मुथुलक्ष्मी यांना त्यावेळी पनागल राजा यांनी अर्थसहाय्य केले होते, ज्याच्या बळावर त्या प्रशिक्षण वर्गाला जाऊ शकल्या होत्या.

ॲनि बेझंट यांच्या महिला कल्याण आंदोलनात मुथुलक्ष्मी सहभागी झाल्या. पुढे १९२६ साली महिला भारतीय संघाने नेमणूक केल्यावर त्यांनी १९३० साली विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. महिलांमध्ये फक्त घर सांभाळण्याची नाहीतर राष्ट्रनिर्माणाची देखील शक्ती आहे, असे मुथुलक्ष्मी यांनी दाखवून दिले.

मुथुलक्ष्मी यांनी बालविवाह, देवदासी, वैश्या आणि महिला व लहान मुला-मुलींची तस्करी यांविरोधात आवाज उठवला, त्यासंबंधी कायदे बनवून घेतले. तत्कालीन कर्मठ लोकांच्या प्रचंड विरोधाचा सामना मुथुलक्ष्मींना करावा लागला, पण त्या देखील खमक्या होत्या. त्यांनी कोणाच्याही विरोधाला न जुमानता, महिला व बाल कल्याणाचे काम सुरु ठेवले.

मुलींच्या लग्नाचे वय १६ आणि मुलांचे २१ करावे, ही मागणी घेऊन त्यांनी मोठे आंदोलन केले. त्या म्हणायच्या की सती प्रथेमुळे जर एका महिलेचे आयुष्य बरबाद व्हायचे तर बाल-विवाहामुळे अनेक स्त्रियांचे आयुष्य बरबाद होते.

इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की जर मुथुलक्ष्मी नसत्या तर आज महिलांची जी स्थिती आहे, त्याहीपेक्षा वाईट स्थिती राहिली असती.

१९४७ साली लाल किल्ल्यावर ज्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला, त्यांच्यापैकी मुथुलक्ष्मी एक होत्या. भारतात मतदान, शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा विरोधात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता.

लहान मुलांसाठी बालगृह आणि कॅन्सरग्रस्तांसाठी इन्स्टिट्यूट उभारल्यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा आहे. दलित आणि मुस्लिम महिलांच्या स्वास्थ्य विषयक प्रश्नांना देखील मुथुलक्ष्मी यांनी वाचा फोडली होती. त्या लेखिका आणि संपादिका देखील होत्या. कॅन्सर क्षेत्रातील योगदानासाठी मुथुलक्ष्मी यांच्या नावाने एक पुरस्कार देखील दिला जातो. तामिळनाडू आणि दक्षिण भारतात डॉ. मुथुलक्ष्मी यांचे नाव मोठे आदराने घेतले जाते. २०१९ साली गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

त्यांनी केलेला कार्याला सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्रभु श्रीरामाचे वंशज म्हणवून घेणाऱ्या थायलंडच्या राजाने वसवली आहे थाई ‘अयोध्या’ नगरी

Next Post

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.