The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाने हजारो नवजात बालकांचा बळी घेतला होता..!

by Heramb
22 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


या माणसाने एक पुस्तक लिहून हजारभर बालमृत्यू घडवून आणले होते. ही एम.डी. असलेल्या डॉ. बेंजामिन स्पॉकची सत्यकथा आहे. १९४६ साली, बालरोगतज्ञ डॉ. बेंजामिन मॅकक्लेन स्पॉकने ‘रॅडिकल’ पालकत्वाचा सल्ला देणारे पुस्तक प्रकाशित केले आणि “बालमृत्यूची” महामारी सबंध अमेरिकेत पसरवली. ऐकताना कितीही विचित्र वाटत असले तरीही ही सत्यपरिस्थिती आहे.

प्रत्येक संकटामागे काही ना काही कथा असते आणि प्रत्येक कथा तुम्हां-आम्हाला काही न काही शिकवून जाते. हजारभर बाळांचा जीव घेणाऱ्या पुस्तकाची कथा अनोखी आहे. कथा एका अलौकिक बुद्धिमत्तेच्या माणसापासून सुरू होते. पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी लेखक माहित असायला हवा.

डॉ. स्पॉकचा जन्म १९०३ साली ‘कनेक्टिकट’ मधील ‘न्यू हेवन’ येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्याने आपले शिक्षण येल विद्यापीठातून पूर्ण केले. पॅरिसमधील १९२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी विद्यापीठाच्या ‘रोइंग’ अर्थात नौकायनाच्या संघाला त्याने मदत केली. येल विद्यापीठात असताना तो विशेष ‘झेटा सी’ बंधुत्वातही सामील झाला. नंतर, त्याने ‘स्क्रोल’ आणि ‘की’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीमंत विद्वानांच्या कुप्रसिद्ध गुप्त समाजात आमंत्रण स्वीकारले. त्याचे जीवन सामान्य नव्हते.

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स’मध्ये त्याने वर्गात प्रथम येत शिक्षण पूर्ण केले. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याने ‘कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज’मध्ये बालरोगशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. शिकवत असतानाच तो डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही करत असे. १९४६ साली त्याने एक बेस्टसेलर पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळेच हजारो नवजात मुलांचा अनावधानाने मृत्यू झाला. “बेबी अँड चाइल्ड केअर” हे पुस्तक बेस्टसेलर होते आणि आजही याच्या सुधारित आवृत्ती उपलब्ध आहे.



स्पॉकच्या पुस्तकाने अनेक दशकांच्या पालकांचे आपल्या मुलांसोबतचे वागणे कसे चुकीचे आहे हे दाखवून दिले. त्याने कठोर वेळापत्रक आणि कमी ममतेला आपल्या पुस्तकातून प्रोत्साहन दिले. त्याच्या मते ममता आणि अनिश्चित वेळापत्रकामुळे मुलं कमजोर होतात. याउलट, स्पॉकने लहान मुलांना समजून घेणे, सहानुभूती दाखवणे आणि त्यांना चांगली वागणूक देण्याचेसुद्धा समर्थन केले होते.

या पुस्तकाच्या ४२ वेगवेगळ्या भाषांमध्ये ५ करोड प्रती विकल्या गेल्या. या विचित्र संकटादरम्यान जन्मलेल्या ७२ दशलक्ष बाळांच्या पालकांनी डॉ. स्पॉकच्या सल्ल्याचे पालन केले. त्याच्या प्रभावामुळे काही लहान मुलांचे जीवन सुधारलेही. पण दुर्दैवाने, त्याच्या सल्ल्यामध्ये एक प्राणघातक चॅप्टर होता, काही इतिहासकार हजारो निष्पाप बाळांच्या मृत्यूला हाच चॅप्टर कारणीभूत असल्याचे सांगतात.

डॉ. स्पॉकचे पहिलेच असे पुस्तक होते ज्यामध्ये बाळांना त्यांच्या पाठीऐवजी त्यांच्या पोटावर झोपू द्यावे असे सांगितले गेले. यालाच ‘प्रोन स्लीपिंग’ असेही म्हणतात. त्याच्या अनुभवाच्या आणि निरीक्षणाच्या आधारे त्याने ही शिफारस केली होती, पण याला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नव्हता. प्रोन स्लीपिंगमुळे निर्माण होणाऱ्या मृत्यूला एसआयडीएस (सडन इन्फंट डेथ सिंड्रोम) म्हणतात.

अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका लेखात नमूद केले आहे: “प्रोन स्लीपिंगमुळे बाळाचा अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढतो. डॉ. स्पॉकचे पुस्तक त्यावेळेस प्रोन स्लीपिंगची वकिली करणारे हे एकमेव लोकप्रिय पुस्तक नव्हते, या पुस्तकाच्या अनेक पुनरावृत्तींनी किंवा अशाच प्रकारच्या पुस्तकांनी एसआयडीएसच्या वाढत्या केसेसमध्ये भर घातली. पण त्या पुस्तकांविरोधात ठोस पुरावे जमा झाले होते. असे असले तरी नऊ वर्षांनी अशाच प्रकारची शिफारस करणे सुरूच होते.”

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

डॉ. स्पॉकचे पुस्तक प्रोन स्लिपिंगला प्रोत्साहन देणारे पहिले आणि सर्वात लोकप्रिय पुस्तक होते. पुस्तक मार्केटिंगमध्ये लोकप्रियता ही सहसा चांगली गोष्ट असते. पण जर त्या पुस्तकामुळे १०० हून अधिक बालमृत्यू झाले असतील तर मात्र ते पुस्तक बाजारात राहायलाच नाही पाहिजे, तरीही अनेक दिवस हे पुस्तक बाजारात होतं आणि विकलही जात होतं.

प्रोन स्लिपिंगच्या सल्ल्याने जगभरात साठ हजारांपेक्षा जास्त बाळांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एसआयडीएस हे अजूनही एक महिना ते एक वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे, असा अहवाल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिला आहे.

तुमच्या लक्षात आले असेल, मी लेखात वारंवार ‘हजारो’ अर्भकांच्या मृत्यूचा उल्लेख करत असलो तरी ही सोयीसाठी वापरलेली मृत्यूची संख्या खूप कमी आहे. बालमृत्यूंचा आकडा प्रत्यक्षात कितीतरी जास्त आहे. प्रोन स्लिपिंगविरोधात एवढे पुरावे सापडले असूनही डॉ. स्पॉकच्या पालकत्वाच्या पुस्तकामुळे त्याच प्राणघातक सल्ल्याचा प्रचार होत राहिला.

अर्भकांच्या शवविच्छेदनामुळे प्रोन स्लीपिंगमुळे अर्भकाचा मृत्यू होत आहे हे सर्वप्रथम निदर्शनास आले. १९७० साली युनायटेड सरकारने एसआयडीएसला “कोणतीही उकल न सापडलेल्या बालपणातील आजारांपैकी एक” घोषित केले. असंख्य शोकग्रस्त पालकांनी ‘फाउंडेशन फॉर द स्टडी ऑफ इन्फंट डेथ’ची स्थापना करण्यासाठी आंदोलने केली, याच फाउंडेशनचे पुढे आंतरराष्ट्रीय फेडरेशनमध्ये रूपांतर झाले.

बालमृत्यूच्या या घटनांचे पुनरावलोकन केलेल्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांच्या मालिकेने “बॅक टू स्लीप” नावाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. यानंतर मात्र राष्ट्रीय आक्रोश शिगेला पोहोचला. याच मोहिमेला नंतर “सेफ टू स्लीप” या नावाने ओळख प्राप्त झाली. स्पॉकच्या पुस्तकामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची जबाबदारी या मोहिमेवर आहे. ‘सेफ टू स्लीप’ने लहान बाळांना पाठीवरच झोपवावे असा सल्ला देऊन स्पॉकच्या धोकादायक सल्ल्यामध्ये सुधारणा केली.

या मोहिमेच्या अंमलबजावणीनंतर काहीच काळाने एसआयडीएसची प्रकरणे कमी झाली. १९९३ साली वार्षिक बालमृत्यू दर ४७०० वरून २०१८ साली १३०० पर्यंत कमी झाला. पण, डॉ. स्पॉकचे पुस्तक अजूनही दहाव्या आवृत्तीत उपलब्ध आहे. १९५५ साली सुरुवातीच्या प्रकाशनानंतर जवळजवळ दहा वर्षांनी, पालकांना त्यांच्या बाळांना त्यांच्या पाठीवर झोपवण्याचा सल्ला देण्यासाठी नवीन आवृत्ती अपडेट केली गेली. डॉ. स्पॉकचे १९९८ साली निधन झाले. त्याच्या पुस्तकाचा इतिहास, पालकत्वावर त्याचा नकळत विषारी प्रभाव, आणि त्याने दिलेला सल्ला हे व्हायरल झालेल्या खोट्या बातम्यांइतकेच जीवघेणे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भटकंती – महड येथील श्री वरदविनायक मंदिर

Next Post

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.