The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाखो लोकांना भिकेला लावणारा ‘डॉट कॉम बबल’ काय होता माहिती आहे का..?

by द पोस्टमन टीम
18 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गेल्या दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत, इंटरनेटनं आपल्या आयुष्यात अफाट बदल घडवून आणले आहेत. परस्पर संवाद, खरेदीपासून ते बातम्यांपर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी आपण इंटरनेटचा वापर करतो. इंटरनेटच्या मदतीनं अनेक प्रस्थापित व्यवसाय आणि स्टार्ट-अप्स मालकांनी लाखो-करोडो रुपये कमवले आहेत.

भविष्यात देखील अनेकांना अशाच पद्धतीनं पैसा मिळवण्याची आशा आहे. मात्र, इंटरनेटच्या मदतीनं पैसा मिळवण्याची अपेक्षा असलेल्यांनी १९९० च्या उत्तरार्धातील कुप्रसिद्ध ‘डॉट-कॉम बबल’बाबत (याला ‘इंटरनेट बबल’ म्हणूनही ओळखलं जातं) एकदा नक्की माहिती घेतली पाहिजे. सध्या होत असलेला इंटरनेटचा वापर पाहता, जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर आणखी एक बबल नक्कीच निर्माण होऊ शकतो. हे ‘इंटरनेट बबल’ नावाचं प्रकरणं नेमकं होतं तरी काय ?

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेटनं व्यवसायांप्रती एक ‘युफोरिक’ वृत्ती निर्माण केली. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांतून चांगले पैसे मिळतील अशी आशा अनेकांना वाटू लागली. याकाळात अनेकांनी इंटरनेट कंपन्या (डॉट-कॉम्स) सुरू केल्या. या कंपन्या भविष्यात कोट्यवधींची उलाढाल करतील, असा विचार करून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यातील बर्‍याच डॉट-कॉम्सना यश मिळालं नाही. परिणामी, या कंपन्या क्रॅश झाल्या आणि गुंतवणूकदारांचं लक्षणीय नुकसान झालं. अगदी मोजक्या कंपन्यांना यश मिळालं मात्र, ते देखील काही प्रमाणात जास्त ग्लोरिफाय केलेले होतं. त्यावेळी गुंतवणूकदारांना बसलेला फटका आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका होता.

कंपन्या क्रॅश झाल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ५ ट्रिलियन डॉलर्सचा तोटा झाला होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर द*हश*तवादी ह*ल्ल्यानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीपेक्षा देखील हा तोटा मोठा होता.

नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात, इंटरनेटबद्दल समाजाच्या अवास्तव अपेक्षा होत्या. अनेकजण इंटरनेट उद्योजक आणि डॉट-कॉम मिलिनियर होण्याची स्वप्नं पाहत होते. अशा स्वप्नाळू उद्योजकांना अ‍ॅमेझॉन, ईबे आणि कोझमो सारख्या कंपन्यांनी आणखी प्रेरित करण्याचं काम केलं. त्यामुळं जागतिक बाजारपेठेत हा इंटरनेट ‘बबल’ तयार झाला होता, असं तज्ज्ञाचं मत आहे. कुठलाही फुगा हा फुटण्यासाठीच तयार होत असतो, हा अलिखित नियम आहे. त्यामुळं बाजारपेठेत तयार झालेला हा बबल देखील फुटला आणि अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं.



डॉट कॉम्समध्ये आपला पैसा लावताना अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूकीच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केलं. पी/ई गुणोत्तरांचं विश्लेषण करणं, बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करणं आणि व्यवसाय योजनांचा आढावा घेणं यासारख्या बाबींकडं कानाडोळा करण्यात आला. त्याऐवजी, गुंतवणूकदार आणि उद्योजक नवीन कल्पना आणण्यात व्यस्त होते. विशेष म्हणजे या कल्पनांनी बाजारपेठेच्या पटलावर आपलं ठाम अस्तित्व त्यावेळी सिद्ध देखील केलं नव्हतं, तरी देखील गुंतवणूकदार याला बळी पडले. कहर म्हणजे हा बबल कधीतरी फुटेल याकडं देखील कुणी लक्ष दिलं नाही.

डॉट कॉम बबल फुटण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले होते. पैशाच्या प्रवाहाकडं दुर्लक्ष करणाऱ्या मेट्रिक्सचा वापर हे यामागील मुख्य प्राथमिक कारण होतं. बर्‍याच विश्लेषकांनी वैयक्तिक व्यवसायांवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यातून महसूल किंवा नफा कसा उत्पन्न होतो, याच्याशी त्यांच्या काहीही संबंध नव्हता. उदाहरणार्थ, ‘नेटवर्क थेअरी’मुळं इंटरनेट बबल फुटला, असं काहींनी कारण दिलं. या थेअरीनुसार कॉम्प्युटर होस्टिंग आणि नेटवर्क वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यानं बाजारात क्रश निर्माण झाला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

मात्र, या थेअरीमध्ये काही गोष्टींकडं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. जर एखाद्या गोष्टीचा वापर वाढला तर त्याचं मूल्य देखील वाढतं हा व्यवसातील साधा सरळ नियम आहे. या नियमानुसार जर कॉम्प्युटर होस्टिंग आणि नेटवर्क वापरकर्त्यांची संख्या वाढली होती तर त्यातून नुकसान होण्याऐवजी गुंतवणूकदारांना नफा होणं अपेक्षित आहे.

जगातील सर्वात मोठी बँक एचएसबीसी होल्डिंग्जनं, नवीन टेक-सेव्ही कंपन्यांच्या पी / ई गुणोत्तरांचा एक अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार या नवीन कंपन्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त ओव्हरव्हॅल्युड करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात, जर पाच वर्षांमध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये ८० टक्के वाढ झाली असती तरचं त्यांच्या स्टॉक्सचं योग्य मूल्य ठरवता आलं असतं. कोणतीही कंपनी ८० टक्क्यांपर्यंत जाणं केवळ अशक्य आहे. अगदी मायक्रोसॉफ्टसुद्धा हे करू शकत नाही.

सध्याची परिस्थिती पाहता असं दिसतं की, जगानं पहिल्या इंटरनेट बबलपासून काही धडा घेतलेला नाही. सोशल मीडियाच्या आगमनामुळं इंटरनेटचं वेड पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कदाचित याचं रुपांतर दुसऱ्या डॉट-कॉम संकटात होऊ शकतं.

फेसबुकचं वास्तविक मुल्य ८४ अब्ज डॉलर्स आहे मात्र, जेव्हा त्याचे स्टॉक सार्वजनिक होतात तेव्हा त्याचं मूल्य १०० अब्ज डॉलर्स होतं. गुंतवणुकदार याला बळी पडतात. ट्विटर ही आणखी एक सोशल नेटवर्किंग कंपनी आहे जी एक भक्कम स्थान मिळविण्यासाठी धडपडत आहे. मात्र, २०० दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते असूनही, ट्विटरला नफा मिळविण्यासाठी अर्थपूर्ण पद्धत सापडली नसल्याचं दिसतं. तरी देखील त्यात गुंतवणूकदार आपला पैसा अडकवत आहेत. आता इलॉन मस्कने त्यावर नियंत्रण मिळवले असल्याने कंपनी कशाप्रकारे काम करते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

भविष्यात जर आणखी एक बबल डॉट कॉम टाळायचा असेल तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एखादी कंपनी जितकी प्रसिद्ध आहे तितकी ती नफ्यात असेलच असं नाही. फेसबुक आणि ट्विटरसारख्या साइट्सकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की ते गुंतवणूक करण्यालायक आहेत.

कोणत्या कंपन्यांवर सर्वाधिक चर्चा होते यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, एखादी कंपनी ठोस व्यवसाय मूलभूत तत्त्वांचे पालन करते की नाही हे तपासणं कधीही चांगलं. हॉट इंटरनेट स्टॉक्स बर्‍याचदा अल्पावधीत चांगला पैसा मिळवून देतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ते नक्कीच विश्वासार्ह नाहीत. दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीसाठी मजबूत उत्पन्नाचा स्रोत असलेली कंपनी केव्हाही चांगली ठरते.

इंटरनेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात काहीच गैर नाही. परंतु, जर प्रसिद्धीऐवजी त्यांच्या बॅलन्स शीट आणि नफ्यावर तुम्ही लक्ष ठेवलं तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जस्ट डायलची ‘सक्सेस स्टोरी’ एखाद्या पिक्चरपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे..!

Next Post

जॉर्ज बुशला फेकून मारलेल्या बुटाचा इराकी लोकांनी भला मोठा पुतळा बसवला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

जॉर्ज बुशला फेकून मारलेल्या बुटाचा इराकी लोकांनी भला मोठा पुतळा बसवला होता

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.