The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या महिलेने आयएएस होऊनही रुग्णसेवेचा ध्यास सोडला नाही

by द पोस्टमन टीम
13 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्याकडे डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते. ‘व्हाईट एप्रन’ आणि गळ्यात स्टेथेस्कोप अडकवलेला व्यक्ती दिसला की अचानक मनात त्या व्यक्तीबद्दल आदरभाव निर्माण होतो.

मेडिकलचं क्षेत्र एक नोबेल प्रोफेशन आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतो, तेंव्हाच समाजात काम करण्यासाठी वचनबद्ध होतो.

आज भारताने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा भरपूर प्रगती केली आहे. अत्यंत किचकट शस्त्रक्रियेसाठी अनेक देशातून लोकं भारतात येतात. थोडक्यात भारतात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. पण येत्या काही काळात भ्रष्टाचाराचा या क्षेत्रात प्रवेश अत्यंत काळजीची बाब आहे.

अवयवांची तस्करी, गर्भाशय असताना लिंग चाचणी व इतर अनेक गैरव्यवहार देखील चालतात. यामुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चाललाय.

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवा सोडून व्यावसायिकतेकडे झुकत चाललंय असं लोकांना वाटु लागलंय. ही सर्व डॉक्टरांसाठी काळजीची व विचार करण्याची बाब आहे. अशातही आज अनेक डॉक्टर्स निस्वार्थपणे समाजात सेवा देताना दिसतात.



आमटे कुटुंबीय, कोल्हे कुटुंबीय, डॉ. अभय बंग व अशी असंख्य नावे वैद्यकीय क्षेत्राची गरीमा टिकून ठेवता आहेत. या यादीत आणखी एक नाव जोडावं लागेल, ‘डॉ. आकांक्षा भास्कर’ डॉ. आकांक्षा भास्कर ही एक आयएएस अधिकारी असून, आपल्या व्यस्त दिनचर्येतून जसा वेळ मिळेल रुग्णांची सेवा करते.

साधारणपणे डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात. आकांक्षासुद्धा डॉक्टरांच्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे तिचे पाउल सहाजिकपणे त्या दिशेने वळले. तिचे वडील डॉ. भानु शंकर पांडे वाराणसीतील एक प्रख्यात डॉक्टर आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आई विद्या सागर हॉस्पिटलमधे संचालक पदी आहेत. समाजसेवेचा वारसा व बाळकडू तिला तिच्या आई वडिलांकडूनच मिळाला. तिने तिचं वैद्यकीय शिक्षण कोलकता येथील आर. जी.कर. हॉस्पिटलमधून पूर्ण केलं.

एक डॉक्टर म्हणून काम करताना तळागाळात वैद्यकीय सेवेचा अभाव तिच्या नजरेस आला. ही परिस्थिती बदलण्याकरिता तिला आयएएस अधिकारी व्हावं लागेल, म्हणून तिने यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा दिल्या.

त्यात देखील तिने दैदिप्यमान यश संपादन केलं. २०१४ साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तिने भारतातून ७६वा क्रमांक पटकावला. पहिल्याच प्रयत्नात व वयाच्या २४व्या वर्षी तिची रघुनाथपूर्ण येथें उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली.

पुरुलीया जिल्ह्यातील संतूरी या गावांच्या दौऱ्यावर असताना तिने तिथल्या दवाखान्यांची पाहणी केली. त्यावेळी डॉक्टर अनुपस्थित असल्याने रुग्ण ताटकळत बसलेले तिने पाहिले व क्षणाचाही विलंब न करता त्यांची तपासणी सुरू केली.

जवळपास सहा महिन्यांनी ती रुग्ण तितक्याच आत्मविश्वासाने तपासत होती. आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा असा उपायोग होइल याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. वेळ मिळेल तसा रुग्णांची सेवा करायची प्रेरणा तिला याच प्रसंगातून मिळाली.

शिवाय लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत मैत्रिपुर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा उत्तम मार्ग तिला गवसला. त्या दिवशी तिने जवळपास ४० रुग्ण तपासले. तिला तिथल्या वैद्यकीय सेवा व इतर उपकरणांचा अभाव तिच्या लक्षात आला. तिने तातडीने त्या दिशेने पाउलं उचलायला सुरुवात केली .

तिने उपजिल्हाधिकारी या नात्याने पुरुलीयाच्या डोंगरी भागात अनेक शिबिर आयोजित केले. अत्यंत दुर्गम भागात काम करणं खरंतर खुप आव्हानात्मक होतं, पण तिने मोठ्या हिंमतीने या कामाला सुरुवात केली.

सगळ्यांत मोठा प्रश्न होता तो म्हणजे घरी होणारे बाळंतपण, यामुळे अनेक स्त्रियांचा तर कधी नवजात बाळांचा मृत्यू होत असे. कधी कधी आई व बाळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ नसायचे. या विषयावर तिने सगळ्यांत पहिले काम सुरू केलं.

गर्भाशय स्त्रिसाठी पोषण कसं असावं, कुठली काळजी घ्यावी यावर तिने नियमित शिबिर आयोजित केले. स्वतः अनेक स्त्रियांना भेटुन बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल ती मार्गदर्शन केले.

किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व त्यासंबंधी जरूरी असलेली काळजी यावर प्रशिक्षण दिलं. सॅनीटरी नॅपकिनचं महत्व पटवून सांगितलं, असे अनेक प्रकल्प व उपक्रम तिने राबवले.

समाजजीवन सुधार, सर्वांगिण विकास व रोगराई कमी होवून स्वस्थ जीवन मिळावं या उद्देशाने ती काम करु लागली. हे सगळं तिने आपलं काम सांभाळून रिकाम्या वेळेत किंवा कामाचा ताण कमी असताना केलं.

साधारण कुणीही अशा वेळेचा उपयोग आराम करण्यासाठी, किंवा कुठे फिरायसाठी करतो. पण तिने एक वेगळा मार्ग स्वीकारला व सर्व तरुणांसाठी एक उदाहरण घालून दिल.

आजकालच्या पबजी आणि मॅकडीच्या काळात सर्व तरुणांनी तिचा आदर्श घ्यावा. आयुष्य प्रत्येकाच काहीतरी अद्वितीय करण्याची एक संधि देतो. पण खुप लोकांना त्या संधीचा अर्थ उमगतो व आपलं संपूर्ण आयुष्य ते समाजासाठी अर्पण करतात.

तिच्या कार्यात तिला प्रचंड यश मिळो अशी प्रार्थना करु या…!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: DoctorIAS OfficerSocial SeventSocial Worker
ShareTweet
Previous Post

पॅसिफिक समुद्रात रंगांधळ्या लोकांचे बेट आहे

Next Post

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग ६: सिक्कीम भारतात विलीन झाले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post
sikkim india featured

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग ६: सिक्कीम भारतात विलीन झाले

पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारी महाराणी आबाक्का

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.