The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

by Heramb
22 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या चक्रव्यूहात सापडून वेगळ्या झालेल्या कोरियाला अनेक वाईट दिवस पाहावे लागले. कोरियाची फाळणी झाली ती दोन राजकीय विचारसरणींच्या आधारावर. अमेरिका आणि युएसएसआर यांच्या वैचारिक वादाचा जगावर कसा परिणाम झाला याचे प्रत्यक्ष आणि उघड उदाहरण म्हणजे कोरियन इतिहास. आज नॉर्थ कोरियाची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही.

साऊथ कोरियासुद्धा सुमारे चार दशकांपूर्वी नॉर्थ कोरियासारखाच देश बनला असता. चाळीस वर्षांपूर्वी साऊथ कोरियामध्ये लष्करी राजवट लागू झाली होती आणि ती राजवट लागू करणारा लष्करी हुकूमशहा होता चुन-डू हॉन. त्याने १९८० च्या दशकातील बहुतांश काळ साऊथ कोरियावर सत्ता केली होती.

१९७९ सालच्या लष्करी बंडानंतर चुन डू हॉनच्या हातातील लष्करी, हुकूमशाही राजवटीमुळे साऊथ कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात लोकशाही-समर्थनार्थ मोर्चे निघाले. २३ नोव्हेम्बर २०२१ रोजी, दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे चुन डू हॉनचा वयाच्या नव्वदाव्या वर्षी मृत्यू झाला..

पार्श्वभूमी:

माजी कमांडर चुन-डू हॉनने १९८० साली ग्वांगजू शहरात लोकशाही समर्थक निदर्शकांच्या ह*त्याकांडाचे नेतृत्व केले. शेकडो लोकशाही समर्थक आंदोलकांना कायमचं शांत करण्यासाठी त्याने पॅराट्रूपर्स आणि आर्मर्ड वेहिकल्स पाठवली. शासकपद सोडल्यानंतर आठ वर्षांनी, १९९६ साली चुन-डू हॉनला १९७९ च्या राजद्रोह आणि लष्करी विद्रोह तसेच १९८० च्या ग्वांगजू शहरात निदर्शकांच्या ह*त्याकांडासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण १९९७ साली त्याची फाशीची शिक्षा माफ करण्यात आली आणि त्याच्यावर मोठा आर्थिक दंड लादण्यात आला.



१९७९ पासून १९८८ च्या सुरुवातीपर्यंत साऊथ कोरियावर जुलमी राज्य करणाऱ्या चुन-डू हॉनला श्रीमंत आणि राजकारणी कुटुंबांकडून लाखो डॉलर्स लाच घेतल्याबद्दलही दोषी ठरविण्यात आले. कर कपात आणि इतर सरकारी मदतींमुळे त्या कुटुंबांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले.

कुप म्हणजेच लष्करी सामर्थ्याच्या बळावर सत्ता हस्तगत करणे. कुप करण्याचा चुन-डू हॉनचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता.  लष्कराचा कॅप्टन म्हणून, चुन-डू हॉनने १९६१ साली मेजर जनरल पार्क चुंग-हीच्या कुपमध्ये भाग घेतला होता. यामुळेच उच्चभ्रू लष्करी अधिकाऱ्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आस्थेचा आणि विश्वासाचा भाव निर्माण झाला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लष्करी हुकूमशाचा थोडक्यात जीवनक्रम:

चुन-डू हॉनचा जन्म १८ जानेवारी १९३१ रोजी कोरियाच्या हॅपचॉनमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यावेळी कोरिया ही जपानची वसाहत होती. त्याचे वडील, चुन सांग-वू, कर्ज-वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून आणि जपानी पोलिस अधिकाऱ्यांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. चुन-डू हॉनच्या आईला आपल्या चार मुलांपैकी एक असलेल्या चुन-डू हॉनडून खूप अपेक्षा होत्या.

व्होकेशनल हायस्कूल पूर्ण केल्यानंतर, चुन-डू हॉनने कॉलेज सोडून दिले, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला कॉलेजची फी परवडत नसे. मग तो ‘कोरिया मिलिटरी अकादमी’मध्ये भरती झाला. तिथे त्याने बॉक्सिंगचा सराव केला आणि त्याच्या फुटबॉल संघामध्ये गोलकिपर म्हणून संघाचे नेतृत्व केले.

चुन-डू हॉन १९७९ च्या उत्तरार्धात लष्कराच्या इंटेलिजन्स कमांडचा प्रमुख म्हणून काम करत होता. यावेळीच केसीआयए या साऊथ कोरियाच्या गुप्तहेर संस्थेच्या संचालकाने एके दिवशी तत्कालीन लष्करी हुकूमशहा मेजर जनरल पार्कची ह*त्या केली.

चुन-डू हॉनच्या हुकूमशाहीची सुरुवात आणि ग्वांगजू ह*त्याकांड:

१९७९ साली मेजर जनरल पार्कची ह*त्या झाली आणि त्याची अठरा वर्षांची लष्करी हुकूमशाही संपुष्टात आली. त्यावेळी मेजर जनरल पार्कची जागा कॅप्टन चुन-डू हॉनने घेतली आणि त्याची बढती ‘मेजर जनरल’ पदावर झाली. त्याने पुन्हा साऊथ कोरियामध्ये लष्करी राजवटीची स्थापना केली. यामध्ये दोन प्रमुख विरोधी नेते, किम यंग-सॅम आणि किम डे-जंग यांचा समावेश होता.

मे १९८० मध्ये, ग्वांगजू शहरात किम डे-जंगच्या राजकीय घरासमोर अनेक लोक, “डाउन विथ चुन-डू हॉन!” अशा घोषणा देत त्याच्या  निषेधार्थ निदर्शने करीत होते. पोलीस आणि सैनिकांचा समावेश असलेले एक मोठे सैन्य या निदर्शकांसमोर आले आणि गोळीबार सुरू केला. पण काही आंदोलकांनी पोलिस ठाण्यांमधून चोरलेली शस्त्रे घेऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

अधिकृत गणनेनुसार या हिं*साचारामध्ये २६ पोलीस आणि सैन्याधिकाऱ्यांसह १९१ लोकांचा मृत्यू झाला. पण मृतांची संख्या यापेक्षा मोठी असल्याचे अनेक लोकांनी सांगितले. विशेष म्हणजे उत्तर कोरियाच्या इशाऱ्यावर ग्वांगजू शहरात आंदोलन भडकावल्याच्या खोट्या आरोपावरून चुन-डू हॉनच्या लष्करी सरकारने किम डे-जंगला फाशीची शिक्षा सुनावली.

ग्वांगजू ह*त्याकांड आणि अमेरिकन कार्यालयांवरील पडसाद:

नंतरच्या दशकात दक्षिण कोरियातील तरुणांमध्ये अमेरिकेविरोधी भावना उफाळून आली. विद्यार्थी कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या डिप्लोमॅटीक इमारतींवर अनेक हिं*सक मोर्चे काढले आणि एका डिप्लोमॅटिक बिल्डिंगला आग लावली. अमेरिकन लष्करी तळांवर निदर्शक “यांकी, गो होम!” अशा घोषणा देत होते.

वॉशिंग्टनमधील प्रशासनाने ग्वांगजू ह*त्याकांडाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना चुन-डू हॉनच्या कुपवर आरोप केले आणि ग्वांगजू शहरात तैनात केलेल्या सैनिकांपैकी कोणीही सैनिक अमेरिकन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नव्हता हे स्पष्ट केले. चुनच्या मार्शल लॉवर टीका करण्यात आली आणि ग्वांगजूमध्ये संयम ठेवण्याचे आवाहन केले गेले.

पण सरकार-नियंत्रित दक्षिण कोरियाच्या वृत्त माध्यमांनी ‘युनायटेड स्टेट्सने चुन-डू हॉन सैन्य पाठवण्याच्या मागणीस मान्यता दिली आहे’ अशा बातम्या छापून आणल्या आणि यामुळे दक्षिण कोरियातील तरुणांमध्ये अमेरिकाविरोधी भावना उफाळून आली. २०१६ साली दक्षिण कोरियाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका दुर्मिळ मुलाखतीत, चुनने ग्वांगजूमध्ये गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचा आरोप नाकारला. यावेळी त्याने स्वतःला राजकीय ‘सूडा’चा बळी असे संबोधले. 

ग्वांगजू ह*त्याकांडाचा मुद्दा बराच गाजला आणि त्यामुळे चुन-डू हॉनने काही डावपेच खेळून पुन्हा स्वतःची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करवून घेतली होती. त्याने देशातील वर्तमानपत्रे आणि टीव्ही स्टेशन्स बंद करण्यास किंवा एका सरकारी टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रात विलीन करण्यास भाग पाडले. या माध्यमांवर सरकारने जारी केलेल्या ‘प्रेस मार्गदर्शक तत्वां’द्वारे नियंत्रण होत असे.

प्राइम-टाइम टीव्ही बातम्या नेहमीच चुन-डू हॉनच्या दिनचर्येच्या अहवालाने सुरु होत असत. या चॅनेलवर एक कॉमेडियन येत असे, जेव्हा लोक त्याची तुलना चुनशी करू लागले तेव्हा कॉमेडियनला टीव्हीवरून हद्दपार करण्यात आले.

ह*त्येचा प्रयत्न आणि चुन-डू हॉन पदावरून पायउतार:

१९८३ साली चुन-डू हॉन तत्कालीन बर्माच्या अर्थात म्यानमारच्या दौऱ्यावर होता. तेव्हा उत्तर कोरियाने त्याची ह*त्या करण्याचा प्रयत्न केला. उत्तर कोरियाच्या गुप्तहेरांनी चुन-डू हॉनला मारण्यासाठी प्लांट केलेल्या बॉ*म्बमुळे रंगून येथील शहीदांचे स्मारक उ*ध्वस्त झाले, यामध्ये दक्षिण कोरियाच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह २१ लोक ठार झाले. तेथे येण्यास उशीर झाल्याने चुन-डू हॉन या ह*ल्ल्यातून वाचला.

आपल्याला धोका आहे हे लक्षात घेऊन चुन-डू हॉनने आपला मित्र माजी जनरल रोह ताए-वूला उत्तराधिकारी म्हणून निवडले. रोहने १९८८ ते १९९३ पर्यंत साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले. किम यंग-सॅम आणि किम डे-जंग या दोन विरोधी उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन झाल्यामुळे रोह १६ वर्षांत देशातील पहिले खऱ्या अर्थाने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

पण या हुकूमशाहीच्या काळात अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या. एकूण तीन जनरल्सच्या ३२ वर्षांच्या हुकूमशाही शासनकाळात, दक्षिण कोरिया १९५० ते १९५३ दरम्यानच्या कोरियन यु*द्धाच्या प्रचंड नुकसानीतून बाहेर येत आशियातील आघाडीची अर्थव्यवस्था बनला आणि औद्योगिक उत्पादन तसेच राष्ट्रीय उत्पन्नात आपला प्रतिस्पर्धी उत्तर कोरियाला मागे टाकले.

चुन-डू हॉनच्या सरकारने १९८८ सालच्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा अधिकार जिंकण्यासाठी कोरियाचा ऐतिहासिक शत्रू जपान विरुद्धच्या अनेक अडचणींवर मात केली. साऊथ कोरियासाठी इतकी चांगली कामे केलेली असूनही चुन-डू हॉनला एक ‘हुकूमशहा’ म्हणूनच ओळख प्राप्त झाली आहे, तर काही साऊथ कोरियन्सच्या मते त्याच्या सकारात्मक कामगिरी त्याच्या नकारात्मक गोष्टींपेक्षा जास्त आहेत.

कोरियाच्या शेवटच्या हुकूमशहाची शिक्षा:

१९९७ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात, चुन-डू हॉनला लाचखोरीद्वारे बेकायदेशीरपणे जमा केलेले १९ करोड डॉलर्स राज्यास परत करण्याचा आदेश देण्यात आला. चुन-डू हॉनकडे दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या मदतीने त्याने मालमत्ता लपविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. दंडाची ही रक्कम गोळा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी छापे टाकून दोन कुत्रे आणि एका रेफ्रिजरेटरसह सर्व काही जप्त केले तरी दंडाच्या केवळ अर्धी रक्कम गोळा झाली होती.

२०१३ साली, चुन-डू हॉनच्या मुलांनी सरकारला वडिलांवरील दंड म्हणून १५ कोटी ४ लाख डॉलर्स देतील असे जाहीर केले होते. चुन-डू हॉननंतर दक्षिण कोरियामध्ये राजकीय स्थितीमध्ये सुधारणा होत गेली आणि सध्या दक्षिण कोरिया एक सशक्त राष्ट्र म्हणून जगासमोर आला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

Next Post

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेअब्रू करणारा ‘टीम पेन’ काही पहिलाच खेळाडू नाही, ही घ्या पूर्ण यादी..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेअब्रू करणारा 'टीम पेन' काही पहिलाच खेळाडू नाही, ही घ्या पूर्ण यादी..!

'गंगनम स्टाईल' एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.