The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त ३५ डॉलर्सच्या मोबदल्यात बनलाय नायकीचा जगप्रसिद्ध लोगो

by द पोस्टमन टीम
24 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘लोगो’ हा ब्रॅंडचा चेहरा असतो, लोगोमुळे ब्रॅंडला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. प्रत्येक ब्रॅंडच्या लोगोमागे त्याच्या निर्मितीची एक रंजक कथा असते. नाईकी या प्रसिद्ध स्पोर्ट्स शूज आणि कपड्यांच्या ब्रँडच्या लोगोमागे देखील अशीच एक रंजक कथा आहे.

१९७१ साली केरोलिना डेव्हिडसन नावाच्या ग्राफिक डिझायनरने नाईकीचा लोगो तयार केला होता, यासाठी तिला फक्त ३५ डॉलर्स मिळाले होते.

कॅरोलिना डेव्हिडसन ‘पोर्टलॅंड युनिव्हर्सिटी ऑफ ग्राफिक डिझायनिंग’ची विद्यार्थिनी होती. ऑइल पेंटिंगसचा कोर्स करण्यासाठी पैशाची चणचण भासत असल्यामुळे ती कामाच्या शोधात होती. याच काळात फील नाईट नावाच्या प्रोफेसरने तिला काही प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी बोलावले. याठिकाणी काम करण्याचा तिला ताशी दोन डॉलर पगार मिळायचा. प्रोफेसर फील नाईट त्यावेळी ब्लु रिबन स्पोर्ट्स नावाचा एक बिझनेस देखील चालवत होते. यातून ते जपानच्या ओनीत्सुका या कंपनीच्या शूज व इतर प्रॉडक्टसचे वितरण करत होते.

एकदा प्रोफेसर फील नाईट यांनी कॅरोलिनासोबत आपला स्वतःचा स्पोर्ट्स शूज ब्रँड उघडण्याची कल्पना बोलून दाखवली आणि त्यासाठी एक उत्तम लोगो तयार करायला सांगितला. कॉरोलिनाने ब्लु रिबन्स स्पोर्ट्ससाठी फ्रिलांस काम करायला सुरुवात केली. तिने एका चेक मार्कच्या स्वरूपातील नाईकीचा लोगो तयार केला. हा लोगो वेग आणि परिवर्तनाचे प्रतीक होता. प्रोफेसर फिलने याला नाईकी असे नाव दिले.



नाईकी हे ग्रीसमधील एका देवीचे नाव आहे. कॅरोलिनाला हे डिझाईन करण्यासाठी प्रोफेसर नाईटने ३५ डॉलर दिले होते. तिने एका शूजवर हा लोगो चितारला होता. नाईकीला त्याच चिन्हासोबत लाँच करण्यात आले.

आज हा जगातील काही प्रमुख ब्रँड्सपैकी एक आहे.

नाईकी लोगोचे डिझाईन केल्यानंतर ही कॅरोलिनाने १९७५ पर्यंत नाईकीसाठी काम केले होते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तब्बल ३० वर्षं फ्रीलांसर म्हणून देखील तिने काम केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एका मुलाखतीत ती सांगते की नाईकीचा लोगो डिझाईन करण्यासाठी तिला बराच वेळ दिला होता, पण तिला फक्त १७.५ तासाच्या कामाचेच पैसे मिळाले. केवळ ३५ डॉलर्स इतकाच रोजगार तिला त्यावेळी देण्यात आला होता! इतकेच नाही तर, कॅरोलिनाला नफाही लवकर मिळाला नव्हता. पण तिच्या लोगोने जगभरात या ब्रॅंडला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.

१९८३ साली कॅरोलिना डेव्हिडसनला ‘नाईकी’ने या लोगोसाठी सन्मानित केले. तिला नाईकीचे चिन्ह असलेली सोन्याची अंगठी देण्यात आली, याच अंगठीमध्ये एक हिरा देखील बसवण्यात आला होता. कॅरोलिनाला त्यावेळी नाईकीचे ५०० शेयर्स देखील देण्यात आले, आज त्यांची संख्या ८ हजार इतकी आहे.

१९६२ मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या फील नाईट यांना छोटे बिझनेस आणि मार्केटिंग प्लॅनची असाईनमेंट मिळाली. स्पोर्ट्समध्ये रस असलेल्या फील यांनी त्यावेळी स्पोर्ट्स शूजवर असाईनमेंट तयार केली. त्याच वेळी त्यांच्या मनात चांगले, मजबूत, टिकाऊ शूज तयार करण्याची कल्पना आली. त्यासाठी त्यांनी ‘ब्लु रिबन स्पोर्ट्स’ नावाच्या कंपनीची स्थापना केली. पुढे त्यांनी जपानच्या ओनीत्सुका या ब्रॅंडचे टायगर शूज अमेरिकेत विक्री करण्याची डीलरशिप मिळवली. याच काळात बिल बोरमन नावाचा स्पोर्ट्स कोचशी गाठ पडली. नाईट यांनी बोरमन यांना आपली शूजनिर्मितीची कल्पना सांगितली. बोरमन यांच्या ती पसंतीस उतरली.

नाईट आणि बोरमन यांनी एकत्रितपणे ‘ब्लु रिबन स्पोर्टस’ या फुटवेअर कंपनीला आकार दिला.

एकेकाळी जपानी टायगर शूज गाडीच्या डिक्कीत ठेवून विकणाऱ्या नाईट यांनी काही कालावधीतच नाईकीचा स्वतःचा ब्रँड विकसित केला. १९७१ साली ओनीत्सुका आणि ब्लु रिबनचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर नाईकीने काही काळातच मार्केटवर ताबा मिळवला. ३० मे १९७१ रोजी नाईकी या अधिकृत नावाचा स्वीकार केला.

आज नाईकी जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स ब्रँडपैकी एक आहे आणि अनेक देशात त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तीन देशांचं राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे एकमेव व्यक्ती आहेत

Next Post

संतांचे आखाडे काय असतात, त्यांचा उद्देश काय..? जाणून घ्या कुंभमेळ्याबद्दलच्या गोष्टी

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

संतांचे आखाडे काय असतात, त्यांचा उद्देश काय..? जाणून घ्या कुंभमेळ्याबद्दलच्या गोष्टी

या लोकांमुळे रेल्वेतल्या टॉयलेटमधला मग साखळीने बांधून ठेवलेला असतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.