The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एअर क्वालिटी इंडेक्स – जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये तीन भारतातील आहेत

by ऋजुता कावडकर
18 November 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


संपूर्ण जगाला गेल्या काही वर्षांपासून एक समस्या त्रास देतेय. ही समस्या म्हणजे सतत वाढत जाणारं प्रदूषण. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचे, प्रदूषणाचे परिणाम लोकांच्या रोजच्या आयुष्यावर होतायत. यातही भारताचा नंबर फार वरती लागतो.

भारताच्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची वाढती पातळी धोक्याची घंटा बनली आहे. दिल्लीत तर दर थोड्या महिन्यांनी प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचे दुष्परिणाम बघायला मिळतात.

दिल्लीतील वायू प्रदूषणाची वाढती पातळी, जवळच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून धुराच्या घातक मिश्रणामुळे आणि वाहनातील विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील एक संस्था, IQAirकडून, हवेची गुणवत्ता आणि शहरातील प्रदूषण यांचा अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले आहे की खराब हवेच्या दहा शहरांच्या यादीत भारतातील तब्बल तीन शहरांचा समावेश होतो.

IQAirने सूचीबद्ध केलेल्या या यादीत दिल्लीचा AQI 556, नंबर सगळ्यात पहिला लागतो. तर कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या नंबरवर येतं. सर्वात वाईट AQI निर्देशांक असलेल्या शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर आणि चीनमधील चेंगडू यांचाही समावेश आहे.



IQAir नुसार, सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशक आणि प्रदूषण रँकिंग असलेली दहा शहरे हे आहेत-

1. दिल्ली, भारत (AQI: 556)

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

2. लाहोर, पाकिस्तान (AQI: 354)

3. सोफिया, बल्गेरिया (AQI: 178)

4. कोलकाता, भारत (AQI: 177)

5. झाग्रेब, क्रोएशिया (AQI: 173)

6. मुंबई, भारत (AQI: 169)

7. बेलग्रेड, सर्बिया (AQI: 165)

8. चेंगडू, चीन (AQI: 165)

9. स्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया (AQI: 164)

10. क्राको, पोलंड (AQI: 160)

दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा अंदाज देणारी आणि प्रदूषणाचे घटक ओळखणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या (IITM) निर्णय समर्थन प्रणाली(DSS)च्या अंदाजानुसार शुक्रवारी  दिल्लीत झज्जर, गुरुग्राम, बागपत, गाझियाबाद आणि सोनीपत अशा शहरांतूनही प्रदूषक आले आणि प्रदूषणाची पातळी वाढली.

DSS विश्लेषणात असे दिसून आले की शुक्रवारी, भातशेतीच्या आगीमुळे दिल्लीच्या प्रदूषणात 15 टक्के वाटा होता, स्थानिक वाहनांच्या उत्सर्जनाचा वाटा 25 टक्के होता, घरांमधून उत्सर्जनाचा वाटा 7 टक्के होता.

SAFAR, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्राने सांगितले की, शुक्रवारी हवेतील किमान 35 टक्के प्रदूषक भुसभुशीत आगीमुळे होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लिथुआनियातील जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं आणि तिथूनच सोव्हिएतची दुर्दशा सुरु झाली

Next Post

पारंपरिक चिनी औषधांमुळे आफ्रिकेतील वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पारंपरिक चिनी औषधांमुळे आफ्रिकेतील वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय..!

एक्सप्लेनेर : भारत-पाकिस्तान दरम्यानचा कर्तारपूर कॉरिडॉर शिखांसाठी इतका महत्वाचा का आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.