The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने फेसबुक, गुगलला खोटी बिलं पाठवून त्यांच्याकडून १२१ मिलियन डॉलर्स उकळले होते

by द पोस्टमन टीम
27 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


हिंदू धर्मात पुरुषार्थाला फार महत्त्व दिलं गेलं आहे. या पुरुषार्थाचे चार अंग आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चार शब्दांना जितके महत्त्व आहे तितकेच शब्दांच्या क्रमाला ही महत्त्व आहे. हा क्रम समाजाकडून व्यक्तीकडे जाणारा आहे. आज या ४ पुरुषार्थांपैकी आज आपला संबंध अर्थाशी आहे.

“पैसा” हा माणसाच्या भौतिक जगाचा पाया आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. पैसा हा ह्या भौतिक जगात अस्तित्वात असलेल्या वस्तू आणि सेवांचे मूल्य ठरवण्याचं एक साधन आहे. या पैशाचं वैशिष्ट्य म्हणजे माणसाला हा पैसा कितीही मिळाला तरी तो त्याला कमी वाटतो. आता पैसा हा विविध मार्गांनी मिळवता येतो, जे सज्जन असतात ते कायदेशीर मार्गाने मिळवतात तर ज्यांना कमी वेळात, कष्ट न करता लवकर व भरपुर पैसा हवा असतो असे लोक बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात.

अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, बिपाशा बसू यांच्यावर चित्रीत फिर हेरा फेरी हा विनोदी सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीत गाजला. याच सिनेमात अक्षय कुमार यांचा “२५ दिन में पैसा डबल” हा डायलॉग तर भरपूर गाजला. आता या पैशाची फसवणूक करणाऱ्या स्कीम किंवा योजना हा काही काल्पनिक भाग नाही. जर तुम्ही वृत्तपत्र नीट वाचत असाल तर सोलापूरचा विशाल फटे याने केलेली फसवणूक एकेकाळी चर्चेत होती. विशाल फटे याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इथल्या लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. अर्थात विशाल फटे हा काही पहिला इसम नाही की ज्याने लोकांची फसवणूक केली आहे. आता आपण एक अशीच एक फसवणुकीची गोष्ट जाणून घेणार आहोत.

युरोप हे नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे तिथलं नयनरम्य निसर्ग सौंदर्य. याच युरोपियन देशांत जगातील मोठ्या बँका व वित्तीय संघटनाही अस्तित्वात आहेत. लिथुएनिया हा एक छोटा देश. या देशाचे क्षेत्रफळ ६५,२०० sq.km म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही छोटा देश.



लिथुएनिया हा उत्तर युरोपमधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक देशांपैकी एक देश होता. हा देश २००४ साली युरोपियन युनियनमध्ये सदस्य म्हणून सामील झाला. ही आहे लिथुएनिया या देशाची ओळख.

आज जगातील जवळजवळ सर्व लोक फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांचा व गूगल या सर्च इंजिनचा वापर करतात. फार कमी लोकं असतील जी या समाजमाध्यमांचा व गूगलचा वापर करत नसतील. आपल्या दैनंदिन जीवनाचा गूगल व ही समाज माध्यमं अविभाज्य भाग बनली आहेत. ४ ऑक्टोबर २०२१ ही तारीख आठवते आहे का?

नाही ना, याच दिवशी फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम ही तिन्ही समाज माध्यमं तब्बल ६ तास बंद होती. त्या तीन कंपन्यांचं नुकसान किती झालं हा भाग सोडा पण फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम हे ६ तास बंद पडल्यामुळे आपण सर्व लोकं कमालीचे अस्वस्थ झालो होतो. या अस्वस्थेवरून या समाजमाध्यमांचे महत्त्व आपल्या आयुष्यात किती वाढले आहे हे समजता येईल.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तीन मोठ्या कंपन्यांकडे जगातल्या जवळपास सर्व लोकांचा डेटा आहे आणि तो सुरक्षित रहावा यासाठी तिन्ही कंपन्या दरवर्षी त्यांच्या कंपनीच्या सायबर सुरक्षाप्रणालीत सुधारणा करत असतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका सामान्य माणसाने फेसबुक आणि गूगल या दोन्ही कंपन्यांची आर्थिक फसवणूक केली आहे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. हो हे खरं आहे! पण ही फसवणूक कशी केली हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सायबर सुरक्षेतील काही तांत्रिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्हाला कधी असा इ-मेल आला आहे का ज्यात एक लिंक दिलेली आहे, आणि त्यावर क्लिक करायला सांगितलंय? आणि हा मेल तुमच्या परिचयातील कुणीही पाठवलेला नाही तर लक्षात घ्या की हा फिशिंग ह*ल्ला असू शकतो. फिशिंग म्हणजे मासेमारी पण सायबर विश्वात जेव्हा कुणी कोणत्याही प्रकारची गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात याला फिशिंग असं म्हणतात.

कधीकधी तर हे फिशिंग इ-मेल पेटीएम, जीपे (GPay), किंवा इतर बँकिंग वेबसाईटवरून येतात. फिशिंग सायबर गुन्हेगारांमध्ये लोकप्रिय आहे कारण एखाद्या इसमाच्या संगणकाची सुरक्षा किंवा अँटीवायरस ब्रेक करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एखाद्या माणसाला फिशिंग इ-मेलवर दुर्भावनायुक्त लिंकवर क्लिक करायला भाग पाडणे जास्त सोपे आहे. आता या फिशिंग इ-मेलमध्ये बरेचवेळा त्वरित प्रतिसादाची विनंती केली जाते.

चला तर आता फिशिंगचा वापर करून एका माणसाने फेसबुक आणि गूगलची कशी आर्थिक फसवणूक केली हे समजून घेऊ.

लिथुएनिया या देशाचा रहिवासी असलेला एव्हलडस रायमेसॉस्कस या धूर्त माणसाने गूगल आणि फेसबुकची आर्थिक फसवणूक केली आहे. आता हा माणूस काही मोठा हॅकर वगैरे नाही, त्याने गूगल आणि फेसबुक हॅक करून त्यांच्या खात्यातील पैसे चोरी वगैरे काही केले नाहीत. तर त्याने सरळ गूगल आणि फेसबुककडे पैसे मागितले आणि या दोन्ही कंपनींनी काही पुढचा मागचा विचार न करता ते पैसे याला दिले. आहे की नाही मजेशीर किस्सा?

पण आपल्याला हा प्रश्न पडतो की ह्या माणसाने हे केलं कसं? नेटफ्लिक्सवर मनी हाईस्ट नावाची वेबसिरीज खूप गाजली. त्यामध्ये ही बँकांमध्ये चोरी केली जाते. ही चोरी कशी करावी ह्याचा प्लॅन प्रोफेसर नावाचं पात्र तयार करतो. पण इथे एव्हलडस रायमेसॉस्कस याने कोणताही कसलाही प्लॅन केला नाही. त्याने २०१३ पासून २०१५ पर्यंत गूगल आणि फेसबुक या दोन्ही कंपन्यांना सामानाच्या पैशांविषयी विचारणा करत अनेक बिलं पाठवली. पण गंमत म्हणजे या दोन्ही कंपन्यांनी त्याच्याकडून कोणतेही सामान विकत घेतले नव्हते. तरीपण एव्हलडस रायमेसॉस्कसचा प्लॅन यशस्वी झाला कारण त्याने योजना आखून ठेवली होती.

त्याने ह्या दोन्ही कंपन्यांसोबत खरंच व्यवहार झाला हे दाखवण्यासाठी खोटे काँट्रॅक्ट तयार केलं आणि या दोन्ही कंपन्यांसोबत अधिकृतरित्या कॉर्पोरेट पातळीवर संपर्क साधल्याचं दाखवलं. अधिकृतरित्या कॉर्पोरेट पातळीवर संपर्क साधण्याकरता त्याने Quanta Computer Inc नावाची खोटी कॉम्प्युटर हार्डवेअर कंपनी असल्याचे दाखवले. अशा नावाची कंपनी खरंच अस्तित्वात आहे पण ती तैवान या देशात स्थित आहे. त्यांनी या कंपनीची कागदपत्रे खरी व अस्सल आहेत असं समजून ह्या कागदपत्रांवर विश्वास ठेवला आणि त्या कंपनीबद्दल जास्त चौकशी केली नाही.

एव्हलडस रायमेसॉस्कस याने जी बिलं पाठवली त्याची अजिबात तपासणी न करता या दोन्ही कंपन्यांनी सरळ पैसे त्याच्या बँक खात्यात जमा केले. हा माणूस एवढा धूर्त होता की त्याने आपला माग कुणी काढू नये म्हणून सायप्रस, हंगेरी, स्लोव्हाकिया, लाटव्हिया या देशातील विविध बँकांमध्ये आपली खाती उघडली.

त्याने जी खोटी बिलं पाठवली त्यावर गुगलने त्याच्या खात्यात २.३ करोड डॉलर, तर फेसबुकने ९.८ करोड डॉलर जमा केले. एव्हलडस रायमेसॉस्कसच्या या फसवणुकीचा गोरखधंदा २०१३ ते २०१५ पर्यंत एकदम छान चालू होता. पण शेवटी मार्च २०१७ मध्ये त्याला लिथुएनिया पोलिसांनी अटक केली. 

२०१७ च्या ऑगस्ट महिन्यात लिथुएनिया व अमेरिकेत प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला न्यूयॉर्क पोलीस खात्याकडे सोपवण्यात आले व न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयासमोर त्याची पेशी झाली.२०१९ साली आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी व सायबर सुरक्षा कायद्याअंतर्गत त्याला ३० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली व सध्या तो ही शिक्षा भोगत आहे.

सध्याचं  युग हे डिजिटल युग आहे. रोख व्यवहारांसोबत ऑनलाईन व्यवहार ही वाढत चालले आहेत. डिजिटल व्यवहार होत असताना त्या सोबत सायबर फ्रॉडच्या घटना ही वाढत आहेत. जरी आपली पोलीस यंत्रणा सुसज्ज असली तरीही एक जबाबदार नागरिक व माणूस म्हणून कोणताही डिजिटल व्यवहार करताना स्वतःचं अर्थिक नुकसान व फसवणूक होऊ न देण्यासाठी आपण कायम सावध असणे हे काळाची गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer – मेटाव्हर्स नेमकं काय आहे..? त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत..?

Next Post

भारतीय पेमेंट कंपनी ‘RuPay’मुळे अमेरिकन Visa आणि MastarCard ची चांगलीच तंतरलीये

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

भारतीय पेमेंट कंपनी 'RuPay'मुळे अमेरिकन Visa आणि MastarCard ची चांगलीच तंतरलीये

शत्रूला धडकी भरवणाऱ्या भारतीय बनावटीच्या ब्रह्मोसची आता निर्यात होणार आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.