The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसा आहे नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित डार्क सिरीजचा तिसरा सिजन…?

by सोमेश सहाने
5 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


बॅरन बो ओदार यांनी नेटफ्लिक्स सोबत वेबसिरीजच्या दुनियेत पुढचं पाऊल टाकणारी आणि या फॉरमॅटला नव्या उंचीवर नेणारी “डार्क” ही सिरीज बनवली आहे. समीक्षकांकडून स्तुती कमावल्यानंतर एक मोठा फॅन बेस कमवायला डार्कला कोरोनाची वाट बघावी लागली. तिसऱ्या सिझनची तारीख जाहीर झाल्यापासून कोणी फक्त मिम्स बघून तर कोणी समाज माध्यमांच्या आभासी दबावाखाली सिरीज बघायला सुरू केली.

दुसऱ्या सिझनपर्यंतच्या आणि एकंदर या सिरीजमधल्या विश्वाबद्दल याआधी आपण एका लेखात चर्चा केली आहे. त्याची लिंक या लेखाच्या शेवटी जोडली आहे. आता तिसऱ्या सिजनबद्दल बोलूया. सिरीज बघण्याआधी काही संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे, त्या सांगताना काही छोटे स्पॉईलर्स येतील, पण त्याने फार फरक पडणार नाही. पण ज्यांनी दोन सिझन बघितले नाहीत, त्यांनी पुढे न वाचता खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जुना लेख आधी वाचावा.

माणसाला ‘फ्री विल’ नसते, या अर्थाच्या एका कोटसोबत तिसरा सिजन सुरू होतो. न्यूटनबाबा म्हणालेत तसं विश्वाच्या आणि वेळेच्या निर्मितीपासून एका सरळ रेषेत सगळं घडत जातंय.

म्हणजे नशिबात जे लिहिलंय ते बदलू शकत नाही. कोरोना येणारच आणि जीवितहानी होणारच, यावर आपलं नियंत्रण नाही, अशी काहीशी ही विचारपद्धती. या चक्रात एक अचानक बिघाड होतो (a glitch in the matrix) आणि यातून जोनस आणि मार्था हे आपल्या दोन स्वतंत्र विश्वात येणारा प्रलय रोखण्यासाठी धडपड करायला लागतात.

दुसरा सिझन संपतो, तोपर्यंत आपल्याला हे स्पष्ट झालेलं असतं की दोन वेगळ्या काळातील जोनस अचानक गायब होणाऱ्या मुलांचा शोध घेऊन हे सगळं थांबवायचा प्रयत्न करत असतात, त्यांना अणुविद्युत प्रकल्पाची प्रमुख क्लॉडीआ टायडमन मदत करत असते. या सगळ्याच्या मुळाशी स्वतः भविष्यातील जोनस आहे हे समजल्यापासून कोणत्या पात्रावर विश्वास ठेवावा, हे तरुण जोनसला आणि आपल्यालाही कळत नसतं.



त्यात दुसरा सिझन संपतो तेव्हा एका वेगळ्याच विश्वामधून मार्था येते आणि जोनसला घेऊन जाते. तिकडे सत्यस्थिती समजलेले काही लोक बंकरमध्ये असतात आणि पुढच्या काळातील जोनस हे थांबवायला अक्षम ठरल्याने तो टाईम मशीनच्या मदतीने आपल्या तीन मित्रांसह गायब होतो. ही झाली आतापर्यंतची घटनांची उजळणी.

वैज्ञानिक संकल्पनांपैकी आतापर्यंत आपल्याला डार्क मॅटर आणि टाईम ट्रॅव्हलबद्दल कळालंय. दुसरा सिझन संपताना अजून एक गोंधळ आपल्याला कळतो, तो म्हणजे शार्लेटची मुलगीच तिची आई असते. समजा अजून काही महिन्यांनी कोरोनाचा अँटीडोट सापडला आणि आपल्याकडे टाईम ट्रॅव्हल करण्याची सोय असली तर आपल्यापैकी एक जण ती लस घेऊन भूतकाळात जाईल आणि कोरोना येण्याआधीच सगळ्यांना लस देईल.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मग आता सांगा बर कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आपल्याला आधी सगळ्यांना कोरोना होऊ द्यावा लागेल ना? गोंधळलात ना? या गोंधळाला म्हणतात “बूटस्ट्रप पॅरॅडॉक्स“. डार्क सिरीजमध्ये या आणि अशा बऱ्याच थेरॉटीकल फिजिक्समधल्या संकल्पनांवर आधारित प्रसंग आहेत किंबहुना सगळा प्लॉटच त्यांच्याभोवती फिरतो.

ही सिरीज टिपिकल सायन्स फिक्शन म्हणून प्रसिद्ध झालेली नाहीये. त्याचा मूळ गाभा आतापर्यंत यातल्या थ्रिलमध्ये आणि जोनस-मार्थाच्या ड्रामामध्ये आपण शोधला. पण इथून पुढे ड्रामा मागे पडतो आणि झालेला गोंधळ निस्तरायला दाखवाव्या लागतील त्या तांत्रिक बाबी दाखवायला जास्त वेळ जातो. पण हे साहजिकच आहे, आपण जर दुसरा सिझन संपला आणि तेव्हा तिसरा सिझन लगेच बघायला सुरू केला असता तर हा फरक जाणवला नसता.

खुप कौशल्याने दोन सिझनमधून सगळी पात्रं आणि त्यांचं विश्व आपल्यासमोर उभारलं गेलं आहे. त्यांना आता जवळ जवळ 5 वेगवेगळ्या काळात आणि दोन वेगवेगळ्या जगात फिरताना बघणं म्हणजे निव्वळ पर्वणी.

आता या ओळखीच्या लोकांना आणि त्यांच्या जगाला या चक्रामध्ये अडकवणाऱ्या गोंधळाविषयी आपण अजून जास्त सविस्तर माहिती मिळवतो. ही माहिती फक्त तांत्रिक नसून याला मानवी स्वभाव आणि दंतकथेचीसुद्धा किनार आहे.

मानव जातीचा उगम ज्यांच्यापासून झाला ते ऍडम आणि इव्ह ज्ञानाचं फळ खातात आणि त्यातून त्यांना चांगल्या वाईट सवयी लागतात. या ख्रिस्ती दंतकथेला व्यावहारिक मानवी स्वभावाशी जोडून डार्कच्या या चक्राच्या मुळाशी जाण्याचा प्रवास अधिक अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणूनच शेवटच्या भागाचं नाव “पॅराडाईज” असं आहे.

एक आदर्श जग – जिथं लोभ, दुःख, सुख, इच्छा हे नाहीत, तिथं जाण्याचा प्रवास करणारी ही पात्रं जणू त्या दंतकथेलाच अस्तित्वात आणतायत असं काही काळ वाटतं. तर काही काळ असंही वाटून जातं की हा सगळा विज्ञानाचा किंवा स्वप्नाळू जगाचा भाग आहे.

अचानक जोनस स्वप्नातून उठेल. आपल्या वडिलांना गमावण्याच्या दुःखात, त्या दुर्दैवी घटनेला काहीतरी कारण देण्याच्या विचारात त्याला हे विचित्र स्वप्न पडलं होतं, असं आपल्याला कळेल. पण डार्क या पारंपरिक अपेक्षित चौकटीत अडकत नाही.

डार्कचा लोगो तीन लुप्सने बनला आहे, तीन या आकड्याशी संबंधित अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला या सिजनमध्ये समजतील.

या कथेतील दृष्टिकोन नाविन्यपूर्ण आहे. काही महत्वाच्या प्रसंगात म्युझिक किंवा गाण्यांच्या जोडीने प्लॉट समजून सांगताना दाखवलेली कलात्मकता या सिरीजला एक वेगळी उंची देते. ही मांडणी खूपच सिनेमॅटिक प्रकारची आहे, म्हणजे देजा वू, बिटविन द टाईम ही फक्त एपिसोड्सची नाव नसून त्यांची मांडणीही तशीच एक तासाच्या चित्रपटासारखी आहे. कोणाचाच अभिनय कमी प्रभावशाली वाटत नाही, किंबहुना कथेतच लक्ष एवढं अडकून जातं की एका पात्राला वेगळं काढून बघण्याची सवड इथे निर्मात्यांनी ठेवलीच नाही.

मध्यमवयीन जोनसची भूमिका साकारणारा अभिनेता तुलनेने तरुण जोनसच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्यापेक्षा उजवं काम करतोय हे मात्र नेहमी खटकत राहतं. त्या जोनसला जास्त वेळ स्क्रीनवर बघता यावं असं सतत वाटत राहतं. वेगवेगळा काळ दाखवताना त्यातलं विश्व खूप खरं ठेवलंय. वेशभूषा, कलादिग्दर्शन या विभागांच्या कामाचं महत्व इथे समजतं.

तांत्रिक बाबी जागतिक पातळीच्या असणं अपेक्षित आहेच, पण तेच करून वेळ न मारता बरेच धाडसी प्रयोगही केले आहेत. वाईड फ्रेम, जास्तीत जास्त गोष्टींना दाखविण्यासाठी लॉंग शॉट या गोष्टींतून निर्मितीची किंमतही वाढत असते. पण खूप विश्वासु लोकांच्या टीमसोबत काम करत असताना केलेलं हे असलं धाडस शेवटी चांगलंच फळ देतं.

खऱ्या जगात येणारं मानवनिर्मित संकट आणि चमत्कारिक गोष्टी दाखवायला वापरलेलं ऍनिमेशन कुठेच जास्त किंवा कमी झालंय असं वाटत नाही, ते मूळ सीन्सशी समरूप झालेलं दिसतं. “डार्क”मध्ये त्याच्या शिर्षाकाप्रमाणेच हे विश्व अंधारमय दाखवलं गेलंय. पांढरा रंग दिसणं खूपच दुर्मिळ.

शक्य असल्यास फक्त रात्रीच किंवा अंधारातच ही सिरीज बघावी. गोंधळात पाडतील असे ट्विस्ट आहेत म्हणून होईल तितका डिस्टर्बन्स टाळावा. तुम्ही म्हणाल खरंच एवढं गरजेचं आहे का? तर हो! मी पहिले दोन सिझन हॉस्टेलवर आणि तिसरा सिझन घरी बघितलाय त्या अनुभवावरून तरी माझं असं मत झालंय की या सिरीजला बघायला आवश्यक असणारी तयारी करणं योग्यच आहे.

मी याबद्दल एक मीमही बघितला होता, त्यात इतर सिरीज बघताना समोर पॉप कॉर्नचा फोटो होता आणि डार्क बघताना समोर बदामाचा. या मिममधला संदेश ही सिरीज पूर्णपणे सिद्ध करते. फक्त मिम्सच नाही तर अजून एक वेगळं आणि महत्वाचं निरीक्षणही आहे. सिरीज बघताना ज्या वैज्ञानिक बाबींबद्दल प्रश्न पडले, त्याबद्दल युट्युबवरचे व्हिडीओ बघत असताना त्यांच्या कमेंटमध्ये असं लिहिलेलं सापडलं की “who is here after watching dark?”.

याकाळात अस्तित्वात असणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पना त्या फक्त गणिताशी निगडित आहेत, म्हणून क्लिष्ट असतील असा समज करून टाळल्या जात होत्या. या सिरीजमुळे जर त्याबाबद्दलची उत्सुतकता वाढताना दिसत असेल तर निर्मात्यांनी “इंटरस्टेलार”, “ग्रॅव्हिटी” यांच्या तोडीस तोड काहीतरी बनवलंय हे सिद्ध होतं. म्हणून त्या एका अंगानेही ही सिरीज महत्वाची आहे.

फिजिक्समधल्या या रंजक संकल्पना आणि त्याचा या सिरीजमध्ये केलेला वापर, त्यातलं काय खरं आहे आणि काय कल्पनेतून आलेलं आहे हे उलगडून सांगणारा लेख तर वेगळाच लिहावा लागेल. तोपर्यंत तुम्ही तिसरा सिझन नक्की बघा. तुमच्याकडे असणारे डार्कबद्दलचे मिम्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा.


आधी हे वाचाच-

डार्क – नेटफ्लिक्सची प्रचंड गुंतागुंतीची आणि धरून ठेवणारी पाहायलाच हवी अशी सिरीज


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: darknetflix
ShareTweet
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मन की बात”मध्ये कौतुक केलेले कामेगौडा कोण आहेत..?

Next Post

बाबा दीपसिंह शीर धडावेगळं होऊनदेखील शत्रूसोबत लढले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

बाबा दीपसिंह शीर धडावेगळं होऊनदेखील शत्रूसोबत लढले होते

थ्री इडियट्सच्या खऱ्या हिरोने चीनविरुद्ध एक खास मोहीम उघडली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.