The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विमानतळाची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून विमान हायजॅक करणारा हा पठ्ठ्या अजूनही फरार आहे !

by द पोस्टमन टीम
24 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही कधी नोटीस केलंय का? आपण ट्रेनने जातो, बसने प्रवास करतो तेव्हा फार काहीच तपासणी केली जात नाही. पण, तेच विमानाने प्रवास करायचा म्हटलं तर तासभर त्यांचं “सिक्युरिटी चेकिंग” सुरु असतं. जगात सगळ्याच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा खूप सजग आणि सावध आहेत. अगदी प्रवास करणारा व्यक्ती एखादा सेलिब्रिटी जरी असेल तरी त्याची अगदी कसून चौकशी केली जाते.

असे असूनही अनेकदा विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. १९७१ सालच्या एका घटनेने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले. एवढी कडक सुरक्षा असतानाही विमान हायजॅक करण्यात आले.

त्या प्रसिद्ध हायजॅकरचे नाव होते डी.बी. कुपर!

१९७१ साली ज्या दिवशी ही घटना झाली. याच्या दुसर्‍या दिवशी अमेरिकेत ‘थँक्स गिव्हिंग डे’ साजरा करण्याची तयारी सुरू होती. सगळेजण उत्सुक होते. त्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या कुपरच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं. अमेरिकेला थँक्स गिव्हिंगचं काय गिफ्ट द्यायचं हे त्याने आधीच ठरवलेलं होतं.

आपल्या योजनेनुसार डी. बी. विमानतळावर पोहोचला. तिथे रोजच्याप्रमाणे व्यवहार सुरू होते. आज येथे काय होणार आहे याची कोणालाही खबर नव्हती. सर्वजण आपल्या नेहमीच्याच गडबडीत होते. कुपरने सूट व टाय आणि त्यावर रेनकोट घातलेला होता, हातात एक काळया रंगाची बॅग होती. उंचीने सहा फूट असणारा कूपर इतर अमेरिकन नागरिकांप्रमाणेच दिसत होता. त्याने सगळा अंदाज घेत तिकीट काउंटरकडे आपला मोर्चा वळवला.



काउंटरवर जाऊन त्याने तिथे स्वतःचे नाव डेन कूपर असे सांगितले. कुपर हे त्याचे खरे नाव होते की नाही याबद्दल कुणालाही माहीत नाही. पण त्या घटनेनंतर त्याला सगळे कुपर या नावानेच ओळखतात. त्याने काउंटरवर सियाटलचे तिकीट खरेदी केले व इतर प्रवाशांसोबत फ्लाईटमध्ये बसला.

कुपारचे विमान होते बोईंग 727. विमानात चढल्यानंतर त्याने एअर होस्टेसकडे आपल्या सीटची चौकशी केली. कुपरला सर्वांत शेवटची सीट मिळाली होती. त्याचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी तीच उत्कृष्ट जागा होती.

इतर प्रवाशांप्रमाणे कुपरने आपले सामान त्याच्या जागी ठेवले नाही. त्याने ते स्वतः जवळच ठेवले. त्याचे प्रत्येक पाऊल नियोजित होते. त्याप्रमाणेच तो वागत होता. त्याने प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने हाताळली होती. आणि यामुळेच तो कुणाच्या ही नजरेत आला नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

विमानाने झेप घेतली. कुपर आपल्या पुढच्या कामासाठी सज्ज झाला. दुसऱ्या दिवशी थँक्स गिव्हिंग डेची सुट्टी असल्यामुळे विमानात कमी प्रवासी होते. कुपर जिथे बसला होता तिथेच फ्लाईट अटेंडंटची जागा होती. अटेंडंट तिथे येऊन बसली, कुपर आपल्या जागेवरून उठला व त्याने तिच्या हातात एक कागद दिला. अटेंडला वाटलं की, सुपर एखादा व्यवसायिक आहे म्हणून तो तिला फोन नंबर देत असावा. अटेंडंटने तो कागद न बघताच आपल्या पर्समध्ये टाकला.

थोड्या वेळाने कुपर आला व पुन्हा त्यांच्या शेजारी येऊन बसला. तिच्याजवळ जात कानात म्हणाला की, “मॅडम तुम्ही कागद वाचला नसेल, माझ्याकडे बॉ*म्ब आहे” हे ऐकल्यावर अटेंडंट सुन्नच झाली.

काही बोलण्याच्या आत कूपरने आपल्या बॅगेतून आणखी एक कागद काढला आणि तिला वाचण्यास सांगितले. या कागदाच्या तुकड्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की,

“माझ्याकडे बॉ*म्ब आहे आणि गरज पडल्यास मी त्याचा वापर देखील करेल. तुम्ही हायजॅक झाले आहात!”

अटेंडंटला आणखी घाबरवण्यासाठी कुपरने आपली बॅग उघडली आणि तिला बॉ*म्ब दाखवला.

धाक दाखवून कूपरने आपल्या सगळ्या अटी तिला सांगितल्या. त्याने सांगितलं की जवळच्या विमानतळावर विमान उतरवा व त्यात पुन्हा इंधन भरा. त्यासोबत त्याने दोन लाख डॉलर व चार पॅराशुटची देखील मागणी केली. अटेंडंट त्वरित पायलटकडे गेली व घडलेला प्रकार सांगितला. पायलट आपल्या केबिनमधून बाहेर आला. समोर कुपर काळा चष्मा लावून आरामात बसला होता. त्यावरून पायलटला कळून चुकले की, कुपरची संपूर्ण तयारी झालेली आहे.

पायलटने लगेचच सिएटलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिटला फोन लावला आणि सगळा प्रकार सांगितला. सगळ्यांचे धाबे दणाणले, ही गोष्ट एफबीआयपर्यंत जाऊन पोहोचली. सगळ्यांना प्रश्न पडला की असे कसे होऊ शकते? कुणालाच काही सुचत नव्हते. शेवटी अमेरिकन सरकारला कुपरच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

एफबीआयला सगळ्या नोटांचे नंबर माहिती होते. सगळे प्रवासी सुखरूप बाहेर पडावेत एवढाच त्यांचा प्रयत्न होता. कुपरला तर नंतरही पकडता येणार होते. कुपरने मागितलेल्या रकमेची जमवाजमव सुरू झाली. त्याने विमान उतरण्यास सांगितले. विमान उतरताच एक माणूस रोकड व पॅराशुट घेऊन समोर आला. अटेंडंटवर बंदूक धरून कुपरने सगळे पैसे ताब्यात घेतले.

कुपरला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या हाती आल्या होत्या. आता त्याला तेथून पळ काढायचा होता. त्याने पायलटला धाक दाखवून विमान मेक्सिकोला घेण्यास सांगितले. रात्रीच्या अंधारात कुपर विमानाच्या मदतीने लुप्त झाला.

FBI आणि अमेरिकन एअरफोर्स हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले संधी साधून कूपरने विमानातून उडी मारली.

विमान विमानतळावर पोहोचले. पोलिसांनी विमानाला घेरले होते. सगळ्यांना वाटले की कूपर पकडला गेला. पण तो तर हातावर तुरी देऊन फरार झाला होता. असे झालेच कसे याच संभ्रमात सगळे जण होते.

त्यानंतर अमेरिकन सरकारने कुपरला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. एवढ्या मोठ्या देशाच्या यंत्रणेला थँक्स गिव्हिंगचं गिफ्ट देऊन फरार झालेला कूपर शेवटपर्यंत हाती लागलाच नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या शीख सरदारांनी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवत बादशाहची सत्ता उखडून टाकली होती

Next Post

फ्रांसला जायला परवडत नसेल तर पुद्दुचेरीला जाऊन या

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

फ्रांसला जायला परवडत नसेल तर पुद्दुचेरीला जाऊन या

त्या दिवशी हि*टल*रच्या हवाई दलाने ब्रिटनच्या आकाशात अक्षरशः तांडव केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.