The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

by द पोस्टमन टीम
9 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लहान असताना एक प्रश्न मला कायम पडायचा, पैसे येतात कुठून? माझ्या बालसुलभ मनाला शांत करण्यासाठी घरातल्या मंडळींनी अनेक गमतीदार उत्तरं मला दिली होती. आई म्हटली बाबाच्या पॉकेटमधून पैसे येतात तर बाबा म्हटले बँकेतून येतात. जेव्हा पैशाचे व्यवहार समजण्याइतकी मोठी झाले तेव्हा मात्र, या प्रश्नाचं खरं उत्तर शोधण्यासाठी मी धडपड सुरू केली.

चौथीत असताना मला माझं उत्तर मिळालं. पैसे छापखान्यात तयार होतात! जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट मी ऐकली तेव्हा खूप हसले होते. पैसे छापखान्यात तयार होतात, हे मान्य करायला मन तयारच होत नव्हतं. मग, शेजारी राहणाऱ्या आणि बँकेत काम करणाऱ्या दादानं मला पैसे कसे तयार होतात, याची साग्रसंगीत माहिती दिली.

तेव्हा पहिल्यांदा ‘डी ला रू’ हे नाव कानी पडलं होतं. पुढे २०१० साली पुन्हा भारतीय माध्यमांमध्ये ‘डी ला रू’ हे नाव वारंवार आलं. यावेळी मात्र, मी सरळ गुगल बाबाची मदत घेतली आणि डे ला रू नेमकं आहे तरी काय? याचा शोध घेतला. एका वाक्यात डी ला रूची ओळख सांगायची झाल्यास, आपल्या खिशात जे पैसे आहेत त्याचा कागद तयार करण्याचं काम ही कंपनी करते. मात्र, फक्त या कंपनीचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि प्रवास एका ओळीत सामावण्याजोगा नक्कीच नाही. चला करूया ‘डी ला रू’ कंपनीची सफर..

‘डी ला रु’ ही बेसिंगस्टोक येथे मुख्यालय असलेली एक ब्रिटीश कंपनी आहे. ही कंपनी बँक नोट्स आणि टॅक्स स्टॅम्पसह पॉलिमर आणि सिक्युरिटी प्रिंटेड उत्पादनं तयार करते. गेट्सहेडमधील टीम व्हॅली ट्रेडिंग इस्टेटवर कंपनीचा कारखाना, एसेक्समधील डेबडेन आणि बोल्टनमधील वेसथॉटन येथे इतर मालमत्ता आहे.



थॉमस डी ला रु यांनी यांनी या कंपनीची स्थापना केली. १८२१ साली थॉमस ग्वेर्नसीहून लंडनला गेले आणि त्यांनी स्टेशनर आणि प्रिंटर म्हणून व्यवसाय सुरू केला. १८३१ साली त्यांनी खेळण्यातील पत्ते तयार करण्यासाठी ‘रॉयल वॉरंट’ मिळवलं. काही वर्षं त्यांनी पत्ते छापण्याचा व्यवसाय केला. आपल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी कंपनीनं १८५५ साली टपाल तिकिटांची आणि १८६० साली नोटांची छपाई सुरू केली. कंपनीला पहिलं कंत्राट मॉरिशससाठी नोटा छापण्याचं मिळालं होतं.

१९४७ साली कंपनीला प्रथमच लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आलं. नंतर ‘थॉमस डी ला रु अँड कंपनी लिमिटेड’ असं नाव देण्यात आलं. मात्र, १९५८ साली पुन्हा नाव बदलून ‘डी ला रु कंपनी लिमिटेड’ करण्यात आलं. १९६८ साली रँक ऑर्गनायझेशननं कंपनीच्या अधिग्रहणासाठी बोली लावली होती. परंतु, मोनोपॉलीज कमिशननं ही बोली नाकारली.

स्थापनेपासून कंपनीनं विविध उत्पादने तयार केलेली आहेत. यामध्ये खेळण्याचे पत्ते, बँक चेक, टॅक्स स्टॅम्प, ड्रायव्हिंग लायसन्स, फूड  व्हाऊचर्स यांची छपाई करण्याची कामं ‘डी ला रू’ कंपनीनं केली आहेत. कंपनीचे संस्थापक थॉमस डी ला रू यांचा भाऊ रशियाची सफर करून आला होता. त्यानं थॉमसला खेळण्याचे पत्ते छापण्याचा सल्ला दिला. कारण पत्त्यांचा खेळ जगभरात प्रसिद्ध झाला होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

थॉमस यांनी आधुनिक डिझाईनच्या पत्त्यांची निर्मिती करून त्यांची छपाई केली. त्यांचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. पुढे, १९६९ साली कंपनीनं पत्त्यांच्या छपाईचा व्यवसाय जॉन वेडिंग्टन यांना विकला. कंपनीनं युनायटेड किंगडम, त्याच्या काही वसाहती, इटली आणि कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकासाठी टपाल तिकिटे देखील छापलेली आहेत. डी ला रुनं स्टेशनरीचा देखील व्यवसाय केला आहे.

१८८१ साली कंपनीनं प्रथम फाऊंटन पेन विकसित केल्याचा दावा केला होता. ‘ओनोटो’ या ब्रँड अंतर्गत पेनची विक्री केली गेली. ही कंपनी ब्रिटनमधील फाऊंटन पेनची अग्रगण्य निर्माती होती. १९५८ साली ब्रिटनमधील पेनची निर्मिती कंपनीनं बंद केली परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये काही वर्षे या पेनचा वापर सुरू राहिला.

१९६५ साली डी ला रु कंपनीनं इटालियन प्रिंटर आणि संशोधक गुआल्टिरो जियोरीसह ‘डी ला रु जियोरी’ नावाचा एक संयुक्त उपक्रम सुरू केला. यासाठी स्वित्झर्लंडमध्ये कार्यालय तयार करण्यात आलं. याकाळात कंपनीनं नोटा छपाईसाठी लागणारी उपकरणे तयार करण्यात प्रभुत्त्व मिळवलं. ६०च्या दशकात त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इराणसाठी नोटा छापल्या.

सध्या जगातील सर्वात मोठी व्यावसायिक नोट प्रिंटर आणि पासपोर्ट निर्माती कंपनी असलेल्या डी ला रू कंपनीचे आणि भारताचे जुने संबंध आहेत. जगभरातील सरकारे, केंद्रीय बँका आणि व्यावसायिक संघटनांचा विश्वासू भागीदार असलेल्या कंपनीनं १८७६ पासून भारतासाठी काम केलं. भारत ब्रिटिशांची वसताहत होती. त्यामुळे कंपनीतील पोस्ट स्टॅम्प भारतात विकले जातं.

कंपनीनं नोट निर्मितीच्या व्यवसायामध्ये पाऊल टाकल्यानंतर देखील भारतासोबत त्यांचे व्यावसायिक संबंध कायम राहिले. १९६२ साली मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे भारताच्या नोट पेपर मिलच्या निर्मितीमध्ये डी ला रूनं मोठी मदत केली होती. भारतात नोटा छपाईसाठी वापरला जाणारा विशिष्ट कागद पुरवण्याचं काम ही कंपनी करत होती.

२०१० साली कंपनीतील एका अधिकाऱ्यानं एक धक्कादायक खुलासा केला होता. डी ला रू कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या मानकांचं उल्लंघन करून भारताची काउंटर फिट करन्सी प्रिंट केल्याचा आरोप या अधिकाऱ्यानं केला होता. असं करून कंपनीनं भारत सरकारची फसवणूक केली असल्याचं देखील त्यानं म्हटलं होतं. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती.

त्यावेळी सत्तेत असलेल्या युपीए सरकारनं कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा ही कंपनी भारतात चर्चेत आली. कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये असून देखील आताच्या सरकारनं, नोटांसाठी सुरक्षा सुविधा पुरवण्याचा करार कंपनीसोबत केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, वित्त मंत्रालयानं याचं खंडन केलं होतं. याबाबत एक प्रसिद्धी पत्रक देखील मंत्रालयानं काढलं होतं.

मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले की, डी ला रू कंपनी २०१० पर्यंत बँक नोटांच्या छपाईसाठी कागद पुरवत होती. नंतर मात्र, या कंपनीसोबत सरकारकडून कोणताही नवीन करार झालेला नाही. २०१० पासून वित्त मंत्रालयानं या फर्मसाठीचे सिक्युरिटी क्लिअरन्स रोखलेले आहेत. म्हणून भारत सरकारने तेव्हापासून या कंपनीला नवीन ऑर्डर दिलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डी ला रु कंपनी आणि भारताचे संबंध वादाच्या भोवऱ्यात आहेत. मात्र, जगाचा विचार करता ही कंपनी अग्रगण्य व्यावसायिक नोट प्रिंटरपैकी एक आहे. जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांची करन्सी छापण्याचं काम या कंपनीकडे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

Next Post

जगातला सर्वात मोठा तोतया, ज्याने नौदलात सर्जन म्हणून काम केलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

जगातला सर्वात मोठा तोतया, ज्याने नौदलात सर्जन म्हणून काम केलं होतं..!

मंगोल राजकुमारी 'खुटुलुन' त्याकाळातली सर्वात शक्तिशाली महिला होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.