The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रेडिट कार्ड, युपीआयच्या जमान्यातसुद्धा बँक नोट्सचा इतिहास तेवढाच महत्वाचा आहे..!

by Heramb
19 December 2024
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


माणूस जंगलांतून बाहेर पडून समाज व्यवस्थेमध्ये राहू लागला तेव्हापासूनच देवाणघेवाण सुरु झाली. आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्याला त्याने काही वस्तू देण्यास सुरुवात केली आणि जन्म झाला व्यापाराचा. हळूहळू या बुद्धिमान प्राण्याने मोजमाप शोधून काढले, मग सुरु झाली चलनाची व्यवस्था. ताम्रयुग सुरु झाल्यानंतर नाणी पाडण्याची पद्धत सुरु झाली.

व्यवहारामध्ये नाणी आल्यानंतर मानवाचे जीवन पूर्णतः बदलले. काही हजारो वर्षे पृथ्वीवर चलन म्हणून नाणी वापरण्याची पद्धत सुरु झाली आणि आजही आपण दैनंदिन जीवनात नाणी वापरतो. भारतामध्ये सुमारे अठराव्या शतकात चलनी नोटांचा वापर सुरु झाला. हा वापर सुरु केला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. त्यानंतर पोर्तुगीजांनी देखील भारतामध्ये नोटांचा वापर सुरु केला.

दैनंदिन जीवनात आजही आपण नोटांचा मोठ्या वापर प्रमाणात करीत आहोत. क्रेडिट-डेबिट कार्ड्स आणि युपीआय सारखे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पर्याय असले तरीही नोटांची किंमत आजही तितकीच आहे. या नोटांचा शोध अन्य महत्वाच्या शोधांप्रमाणे कोणत्याही पाश्चिमात्य देशाने लावला नसून चीनच्या काही व्यापाऱ्यांनी मिळून लावला होता.

‘गरज ही शोधाची जननी असते’ या वाक्यानुसार, नोटांची गरज काही चिनी व्यापाऱ्यांना भासली. म्हणून त्यांनी नोटांचा शोध लावला. तत्कालीन चिनी व्यापारी नोटांचा वापर आजच्या ‘चेक’ प्रमाणे करीत असत. नेमकं काय होतं त्यांच्या व्यापाराचं तंत्र जाणून घेऊया या लेखातून..

  • चीन:

मानवाच्या ज्ञात इतिहासात कागदी चलनाची सुरुवात ‘तांग’ राजसत्तेच्या काळात झाली असे म्हणता येईल. तांग राजसत्तेचे इसवी सन ६१८ ते ९०७ पर्यंत आधुनिक चीनच्या बहुतेक भूभागावर वर्चस्व होते. या राज्यामध्ये लोकांमधील आपापसांतील आर्थिक व्यवहार कागदी नोटांच्या सहाय्याने होत असत. व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे ट्रस्टीजकडून मिळतील याची खात्री कागदी नोटांद्वारे होत असे. या पद्धतीचा अकराव्या शतकात सॉन्ग राजसत्तेत मोठ्या प्रमाणावर वापर झाला.



या राजसत्तांच्या काळामध्ये चिनी नाणी खूप जड होती. अशी शेकडो जड नाणी वाहून नेणे म्हणजे व्यापाऱ्यांसाठी एक मोठी समस्या होती. हीच समस्या सोडवून त्यांनी जगाला ‘नोटेचा’ पर्याय दिला. तसं पाहायला गेलं तर त्याकाळामध्ये कायदेशीर किंवा सरकारमान्य चलन म्हणून बँकनोट्स वापरल्या जात नव्हत्या. 

जड नाण्यांच्या समस्येवर उपाय म्हणजे, व्यापारी आपले पैसे एका ट्रस्टीकडे ठेवत असे. तो ट्रस्टी व्यापाराला एक चिठ्ठी लिहून देत असे. या चिठ्ठीत व्यापाऱ्याचे किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती होती. यामुळे व्यापाऱ्याला स्वतःबरोबर नाण्यांची स्ट्रिंग घेऊन जाण्याची गरज नव्हती. नाण्यांची स्ट्रिंग म्हणजे दोरीच्या सहाय्याने अनेक नाणी गुंफून तयार केलेली माळ.

ट्रस्टीने दिलेली ‘नोट’ व्यापारी किंवा सामान्य माणूस कोणत्याही वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या व्यापाऱ्याला देत असे. तो दुकानदार किंवा सामान्य व्यक्ती जेव्हा हवे असेल तेव्हा ट्रस्टीकडून पैसे घेत असत.

‘सॉन्ग’ राजसत्तेने नोटांच्या या व्यवस्थेची होत असलेली प्रगती पहिली आणि याच व्यवस्थेला कायदेशीर मान्यता दिली. नाण्यांपेक्षा कागदी नोटा व्यापारासाठी अधिक कार्यक्षम असल्याचे लक्षात आल्याने सॉन्ग राजवंशाने ११२०च्या दशकात नोटांना चलन म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. परिणामी, बाराव्या शतकामध्ये, एका वर्षात इश्यू केलेल्या नोटांची संख्या सुमारे २६ दशलक्ष नाण्यांच्या स्ट्रिंगइतकी होती.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

  • युरोप आणि उर्वरित जग: 

याच काळात युरोपमध्ये, चलनासारख्याच देवाणघेवाणीच्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ ‘टेम्परल’चे योद्ध्ये आपल्याबरोबर यात्रेकरूंचे मौल्यवान धन नेत असत. या यो*द्ध्यांबरोबर असलेल्या धनाची पावती ते यात्रेकरूंना देत असत. जेणेकरून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर यात्रेकरूंना ही पावती दाखवून आपले धन पुन्हा मिळवता येईल. नोटांच्या व्यवहाराची खरी माहिती युरोपीय लोकांना तेराव्या शतकात मिळाली.

तेराव्या शतकात ‘मार्को पोलो’ नावाच्या संशोधकाने चीनच्या बलाढ्य ‘युआन राजवटी’ला भेट दिली होती, त्याचवेळी त्याने आपल्या संशोधनाचे निष्कर्ष युरोपमध्ये सांगितले. मार्को पोलोच्या संशोधनानुसार, “हे सर्व कागदाचे तुकडे, शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे असल्यासारखेच वागवले जातात आणि शुद्ध त्यांना सोन्यासारखीच कायदेशीर मान्यता आहे. या कागदाच्या तुकड्यांच्या साहाय्याने सम्राट कुबलाई खान सगळे पैसे फेडू शकतो. त्याने या नोटा आपल्या सर्व राज्यांमध्ये आणि आपल्या प्रभावक्षेत्रात मान्य केल्या आहेत. प्रत्येकजण हा व्यवहार अतिशय सहजतेने करू शकतो. ग्रेट खानच्या संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला हे कागदाचे तुकडे मिळू शकतात. त्याच्या राज्यात कोणीही या कागदी नोटांद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकतो. अगदी सोन्याच्या नाण्यांप्रमाणे!”

युरोपमधील नोटांची संकल्पना इटलीमध्ये सुरु झाली ‘प्रॉमिसरी’ प्रकारच्या नोटांच्या वापराने. याच प्रकारच्या संकल्पनेतून आधुनिक नोटांची व्यवस्था उभी राहिली आहे. पैशांची देवाणघेवाण सुरक्षितरित्या व्हावी यासाठी प्रॉमिसरी नोटांची व्यवस्था सुरु करण्यात आली. कारण देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाण्यांच्या रूपात पैसे नेणे हे त्याकाळी अतिशय धोकादायक होते. ‘बॅंकनोट्स’ हे नावच चौदाव्या शतकातील इटालियन शब्द, “नोटा डी बॅंको”वरून आले आहे. या शब्दाचा अर्थच ‘बॅंकनोट्स’ असा होतो.

सतराव्या शतकाच्या आसपास ‘प्राईझ रिव्होल्युशन’दरम्यान कागदी नोटांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. स्पॅनिश ट्रेझर फ्लीटमधून सोन्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे युरोपमध्ये महागाई प्रचंड वाढली होती. स्पॅनिश लोकांनी त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील वसाहतींमधून प्रचंड प्रमाणात सोने आणले होते. परिणामी, वार्षिक चलनवाढीचा दर एक ते दीड टक्क्याने वाढला. हा दर त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात होता. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा नोटांचा वापर केला तो गोल्डस्मिथ बँकर्सने.

नऊ वर्षांच्या यु*द्धासाठी निधी उभारणीच्या दृष्टीने ‘बँक ऑफ इंग्लंड’ने युरोपातील पहिल्या कायदेशीर मान्यता असलेल्या नोटा जाहीर केल्या. इसवी सन १७४५ पर्यंत, २० ते १००० युरोजपर्यंतच्या मुद्रित नोटा बँक ऑफ इंग्लंडने छापायला सुरुवात केली. अशा प्रकारे बँक ऑफ इंग्लंडने युरोपमधील सामान्य आर्थिक व्यवहारांसाठी कागदी चलनाचा वापर सुरू केला. पुढे वसाहतवादामुळे या नोटा संबंध जगामध्ये पोहोचल्या.

अकराव्या शतकातील चिनी व्यापाऱ्यांना/सामान्यांना व्यापारासाठी नवीन माध्यमाची गरजच भासली नसती किंवा त्यांना कॉइन-स्ट्रिंगचे ओझे वाटलेच नसते तर कदाचित आपल्याला सर्व खरेदी नोटा किंवा क्रेडिट कार्ड्सऐवजी सोन्याच्या नाण्यांद्वारे करावी लागली असती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकदा चिकनच्या तुटवड्यामुळे KFC च्या ८० शाखांना टाळं लागला होतं..!

Next Post

आणि तेव्हा अमेरिकन लोकांवर स्वतःच्या पोटच्या मुलांना विकण्याची वेळ आली होती..!

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

आणि तेव्हा अमेरिकन लोकांवर स्वतःच्या पोटच्या मुलांना विकण्याची वेळ आली होती..!

ॲपल, मायक्रोसॉफ्ट नाही तर ही आहे जगातली पहिली ट्रिलियन डॉलर्समध्ये नफा कमावणारी कंपनी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.