The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन गुप्तहेरांच्या चलाख ‘गनिमी काव्याने’ ब्रिटीशांचा पराभव केला होता

by द पोस्टमन टीम
10 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अमेरिकन राज्यक्रांती ही जगाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. ब्रिटिशांच्या अंमलाखालून उत्तर अमेरिकेतल्या १३ वसाहतींच्या मुक्ततेसाठी मोठा संघर्ष उभा राहिला होता, ज्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलं होतं. यात त्यांना थॉमस जेफरसन, बेंजामिन फ्रॅंकलिन इत्यादी नेत्यांचे सहकार्य लाभले होते.

जॉर्ज वॉशिंग्टन हे आधी ब्रिटिश लष्करी सेवेत एक मोठे अधिकारी होते. त्यांच्याकडे यु*द्धाचा मोठा अनुभव होता. ते जेव्हा अमेरिकन वसाहतींच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढल्या जाणाऱ्या यु*द्धासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांच्याकडे ब्रिटिशांसारखी सैन्य शक्ती नव्हती.

पण वॉशिंग्टन यांच्याकडे प्रशिक्षित पण अज्ञात अशा असंख्य गुप्तहेरांची मोठी सेना होती, जी कधी जगासमोर आली नसली तरी त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे.

असं म्हणतात की जॉर्ज वॉशिंग्टन यांचा प्रत्यक्ष यु*द्धापेक्षा चलाखीने यु*द्ध करण्यावर मोठा भर होता, याला आपल्याकडे गनिमी कावा म्हणतात. अर्थातच कुठल्याही प्रकारची चलाखी करण्याआधी शत्रूबद्दल संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. यासाठीच जॉर्ज वॉशिंग्टन यांनी गुप्तहेरांच्या जाळ्याची निर्मिती केली होती. संपूर्ण यु*द्धात ह्या वॉशिंग्टनच्या गुप्तहेरांनी आपल्या चलाखीने आणि जीवावर उदार होऊन गुप्त माहिती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापर्यंत पोहचवण्यास सुरुवात केली होती.

त्यावेळी अमेरिकन वसाहती बलाढ्य ब्रिटिश अधिसत्तेला नमवू शकल्या त्याला हे गुप्तहेर मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.



सीआयए या अमेरिकन गुप्तचर संस्थेने केलेल्या दाव्यात त्यांनी म्हटलं आहे, दुसऱ्या महायु*द्धावेळी आणि शीतयु*द्धावेळी जितका गुप्तचरांच्या वापर जनरल आयसेनहॉवर यांनी केला नाही, त्यापेक्षा अधिक वापर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या सैन्यात केला होता.

सुरुवातीपासूनच जॉर्ज वॉशिंग्टन यांचा स्वातंत्र्यलढ्यातील उदय आणि गुप्त माहिती संकलनाची पद्धत यांमुळे तो अमेरिकेच्या स्वातंत्र्ययु*द्धात शीर्षस्थानापर्यंत जाऊन पोहचला होता.

त्याने आधी झालेल्या फ्रेंच यु*द्धात अमेरिकेतील मूलनिवासी रेड इंडियन आणि फ़्रेंच सोल्जर यांचा वापर गुप्तहेर म्हणून करण्यास सुरवात केली होती. त्याला तेव्हा गुप्तहेर यंत्रणेचं महत्व कळालं होतं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१७७५ साली वॉशिंग्टनला कॉन्टिनेन्टल सैन्याचा प्रमुख बनवण्यात आले. त्याने तिथे थॉमस नॉल्टन यांच्या नेतृत्वाखाली गुप्तहेर खात्याचे गठन केले.

१७७६ च्या हार्लेम हाईट्सच्या यु*द्धात नॉल्टनच्या रेंजर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्तचरांनी मोठी भूमिका बजावली होती. हा १३० जणांचा गट होता. ब्रिटिशांना या यु*द्धात माघार घ्यावी लागली होती. पण पुढे एका अपघातात नॉल्टनचा अंत झाला.

आज त्याच्या पहिल्या युनिटच्या स्मरणार्थ अमेरिकन सैन्याचे गुप्तहेर खाते ‘१७७६’ ही संख्या लिहलेला स्टॅम्प वापरत आहे.

नोव्हेंबर १७७८ साली वॉशिंग्टनने जनरल बेंजामिन टाल्माज याची गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी निवड केली. त्याला न्यूयॉर्क शहरात गुप्तहेरांचे जाळे निर्माण करण्याची सूचना करण्यात आली. त्याने सूचनेनुसार एक कल्पर रिंग नावाची एक मोठी गुप्तहेर यंत्रणा न्यूयॉर्क शहरात उभी केली.

कल्पर हे अमेरिकेतील व्हर्जिनिया या राज्यातील एक खेडेगाव होते आणि सर्व गुप्तहेर त्या भागातील होते.

ह्या गुप्तहेरांनी वेगवेगळ्या वेशभूषेत न्यूयॉर्कच्या प्रत्येक रस्त्यावर वावरण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्क हे ब्रिटिशांचे त्या काळचे प्रमुख केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणाहून माहिती मिळवणे सोपे जात होते.

अब्राहम वूडहॉल नामक टाल्माजच्या एका मित्रावर न्यूयॉर्कच्या संपूर्ण गुप्तहेर यंत्रणेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. वूडहॉल शहरात भूमिगत पद्धतीने काम करत होता. रॉबर्ट टॉवसेंड नामक एक गुप्तचर स्तंभलेखक, पत्रकार म्हणून न्यूयॉर्कमध्ये वावरू लागला.

अनेक ब्रिटिशांशी त्याचे चांगले संबंध होते. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून त्याला अनेक गुप्त बातम्या समजत असत, जो त्या वॉशिंग्टन पर्यंत पोहचवण्याचे काम करत असे.

ॲना स्ट्रॉंग नावाची महिला गुप्तचर देखील एक कुरियर व्यवसाय न्यूयॉर्कमध्ये चालवत होती.

जेव्हा ती काळ्या रंगाचा टॉप आणि पेटीकोट धारण करायची त्यावेळी तिच्याकडे काहीतरी गुप्त माहिती असल्याचे दुसऱ्या गुप्तहेराच्या लक्षात यायचे आणि पुढे तो ते गुप्त माहितीचे पार्सल तिच्याकडून शिताफीने घेऊन ते वॉशिंग्टन पर्यंत पोहचवण्यासाठी कल्पर रिंगचा वापर करायचा. कॅलेब ब्रेस्टर नावाचा अजून एक गुप्तहेर न्यूयॉर्कच्या लाँग आयलंड परिसरात मासेमारी करण्याचं ढोंग करायचा, त्याठिकाणी तो खऱ्या अर्थाने ब्रिटिश नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम करत होता.

या कल्पर रिंगने संपूर्ण युद्धकाळात जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पर्यंत गुप्त संदेश पोहचवण्याचे काम केले होते. त्यांनी ब्रिटिशांची कॉन्टिनेन्टल सैन्याच्या अर्थव्यव्यस्थेला खिंडार पाडण्याची योजना जगासमोर आणली होती. ऱ्होड आयलंडमध्ये अमेरिकेला मदत करणाऱ्या फ्रेंच लोकांना घेराव घालण्याचा ब्रिटिशांचा कट त्यांनी उघडकीस आणला होता.

बेनेडिक्ट अरनॉल्ड नावाच्या एका मोठ्या धोकेबाजाची माहिती देखील त्यांनी उघडकीस आणली होती, जो ब्रिटिशांशी व्यवहार करत होता.

पुढे हा देशभक्त अरनॉल्ड देश सोडून पळाला होता. याची माहिती बाहेर काढणाऱ्या जॉन आंद्रे नावाच्या अमेरिकन गुप्तहेराने ही माहिती अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमावले होते.

कल्पर रिंगच्या यशामागे ते वापरायचे त्या संकेतांचे आणि संबोधनांचे खूप महत्त्व होते. ते स्वतःची ओळख सांख्यिकी नंबरच्या माध्यमातून करून देत असत.

त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांना देखील एजेंट १११ हे सांकेतिक नाव दिलं होतं.

टाल्माज यांच्याकडे या सर्व सांकेतिक नावांची एक नोंद वही होती, ज्यात त्यांनी तब्बल ७७५ गुप्तचरांच्या नावाचा आणि सांकेतिक खुणांचा रेकॉर्ड ठेवला होता. त्यांनी शहर, वस्ती आणि जागांचा देखील सांकेतिक भाषेत उल्लेख करायला सुरुवात केली होती. चुकून कुठला गुप्तसंदेश कोणा ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हाती लागला तरी तो त्याला बापजन्मात समजणार नाही, अशी व्यवस्था त्यांनी केली होती.

कल्पर रिंग अस्तित्वात येण्या अगोदर फ्रान्सिस मुलिगन नावाच्या गुप्तचराने न्यूयॉर्क शहरात आपल्या गुप्तचर कार्याला सुरुवात केली होती.

कॅटो नावाच्या गुलामाच्या सोबतीने त्याने या कार्याला सुरुवात केली होती. सर्वांत मजेदार गोष्ट म्हणजे तो एक ब्रिटिश सैन्याधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होता आणि त्याने चक्क त्याच्या सिनियर ब्रिटिश अधिकऱ्याच्या मुलीशी लग्न देखील केले होते. आल्फ्रेड हॅमिल्टन नावाच्या एका गुप्तहेराने त्याला ब्रिटिश सैन्यातून अमेरिकन क्रांतिकारी लोकांच्या ताफ्यात सहभागी करून घेतले होते.

 

culper ring spy the postman

 

मुलिगनने २ वेळा जॉर्ज वॉशिंग्टन यांचे ब्रिटिश ह*ल्ल्यापासून संरक्षण केले होते. एकदा तर ते ब्रिटिशांच्या वॉशिग्टन यांच्या ह*त्येसाठी नेमल्या गेलेल्या सैन्य दलात होता.

त्याने वॉशिंग्टन यांना पळून जाण्यास मदत केली होती, तर दुसऱ्या वेळी त्याने वॉशिंग्टन यांना ह*ल्ल्याची सूचना देण्यासाठी आपला गुलाम जातो केटो याला वॉशिंग्टनकडे संदेश घेऊन पाठवले होते.

दोन्ही वेळा त्यांच्याकडे असलेल्या गुप्त माहितीचा आधार त्यांनी घेतला होता.

अजून एक अमेरिकन गुप्तहेर होता जेम्स आर्म्सस्टेड नावाचा, हा खरंतर कृष्णवर्णीय गुलाम होता. त्याच्यावर लाखो बंधनं होती. पण त्याने शेवटपर्यंत अमेरिकन सैंन्याशी आपली वफादारी कायम ठेवली होती. ब्रिटिशांकडे गुलामगिरी करत असताना त्याने अनेक गुप्त माहितीची देवाणघेवाण अमेरिकन सैन्यासोबत केली होती.

ब्रिटिश सैन्य यॉर्क टाऊन भागात मोठ्या प्रमाणात सैन्य घेऊन येत आहे, ही गुप्त माहिती त्याने फ्रेंच अधिकऱ्यांपर्यंत पोहचवली होती.

ज्यांनी ती पुढे वॉशिंग्टन पर्यंत पोहचवली. पुढे त्या माहितीच्या आधारावर ब्रिटिशांना अमेरिकन सैन्याने यॉर्क टाऊनला कोंडीत पकडले होते, ज्याठिकाणी एक मोठी लढाई झाली होती त्या लढाईत ब्रिटिशांचा पराभव झाला होता.

ही लढाई जिंकून अमेरिकेने आपल्या स्वातंत्र्यावर मोहर उमटवली होती. पुढे आर्मस्टेडची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात आली.

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर उभारलेल्या गुप्तहेरांच्या जाळ्याने अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते, अनेकांनी यासाठी आपले प्राण देखील अर्पण केले होते. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला होता. स्वतंत्रतेचं मोल या गोष्टीतून लक्षात येण्यासारखं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: American RevolutionBritish ColonyCupler Spy Ring
ShareTweet
Previous Post

क्रांतीपर्वात इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिल्या होत्या या दोन महिला क्रांतिकारक

Next Post

हा तस्कर स्वतःच्या देशापेक्षा चार पट श्रीमंत होता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

हा तस्कर स्वतःच्या देशापेक्षा चार पट श्रीमंत होता..!

स्त्रिया जेव्हा घराबाहेरही पडत नव्हत्या तेव्हा तिने विमान उडवण्याची स्पर्धा गाजवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.