The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेअब्रू करणारा ‘टीम पेन’ काही पहिलाच खेळाडू नाही, ही घ्या पूर्ण यादी..!

by द पोस्टमन टीम
22 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘शहाण्यानं बाई आणि बाटलीच्या नादी लागू नये’ हा वाक्प्रचार तुमच्यापैकी अनेकांनी अनेकदा ऐकला असेल. साधारण आपल्या आसपास असणारी वडिलधारी माणसं आपल्याला असा सल्ला देतात. असा समज आहे की, दारू आणि पर-स्त्री या दोन गोष्टी एखाद्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.

ऑस्ट्रेलियन टेस्ट क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेनला नुकतीच याची प्रचिती आली आहे. चार वर्षांपूर्वी आपल्या एका महिला सहकाऱ्याशी सेक्सटिंग केल्याची मोठी किंमत टीम पेनला मोजावी लागली आहे. या सेक्सटिंग प्रकरणामुळं निर्माण झालेल्या वादामुळं त्याला कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियानं टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकून आपल्यातील जादू अद्याप ओसरली नसल्याचं सिद्ध केलं होतं.

मात्र, त्यापाठोपाठ सेक्सटिंग प्रकरण समोर आल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली अन् ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ पुन्हा बदनाम झाली. पहायला गेलं तर क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ असं म्हणतात. मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनं हा समज खोटं ठरवण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. त्यांचा खेळ कितीही उच्च दर्जाचा असला तरी त्यांच्या ‘बॅड बॉइज’ इमेजमुळं वेळोवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटची गोची झालेली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं बदनामीचे किती डाग लावून घेतलेले आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा..

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या ‘बॅड बॉइज’ इमेजची परंपरा १९८१ मध्ये घडलेल्या ‘अंडरआर्म बॉलिंग’पासून सुरू झाली. जर तुम्ही क्रिकेटचे डाय हार्ड फॅन असाल तर तुम्ही या कुप्रसिद्ध घटनेच्या क्लिप पाहिल्या असतील किंवा निदान त्याबद्दल ऐकलं तरी असेल. १९८१ मध्ये तत्कालीन ऑस्ट्रेलियन कॅप्टन ग्रेग चॅपलनं, आपला धाकटा भाऊ ट्रेव्हर चॅपेलला न्यूझीलंडचा बॅटर ब्रायन मॅककेनीला अंडरआर्म बॉलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या.



मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेला एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी चॅपेलनं असं केलं होतं. मात्र, नंतर या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चॅपेल बंधूंनी क्रीडा-भावनेचा अनादर केल्याची टीका क्रिकेट चाहत्यांनी केली होती. त्यानंतर कित्येक वेळा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेर कांड करून क्रिकेटला बदनाम केलेलं आहे.

१९९५ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट बॉलर ‘स्टीव्ह वॉ’ आणि वेस्ट इंडिजच्या ‘कर्टली ॲम्ब्रोस’ यांच्यात ‘पोर्ट ऑफ स्पेन’ येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान झालेला संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे. दोन्ही खेळाडूंनी अतिशय शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेतला होता. कर्टली ॲम्ब्रोसनं तर आपल्या आत्मचरित्रामध्ये देखील या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

स्पिन बॉलर शेन वॉर्ननं आपल्या शानदार कारकिर्दीत निःसंशयपणे एक असा वारसा तयार केलेला, ज्याची इतर कोणत्याही बॉलरला सहजासहजी बरोबरी करता येणार नाही. मैदानावर जादूगार असलेला वॉर्न मैदानाबाहेर तितकाच खोडकर आणि उद्धट होता.

आपल्या अतरंगी जीवनशैलीसाठी आणि मद्यपानाच्या सवयींसाठी प्रसिद्ध असलेला वॉर्न संपूर्ण कारकिर्दीत अनेकदा वादात सापडलेला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झालेली आहे. सामन्यादरम्यान खेळपट्टी आणि हवामानाच्या स्थितीबद्दल माहिती देण्याच्या बदल्यात सट्टेबाजांकडून पैसे स्वीकारल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानं १९९५ मध्ये मार्क वॉ आणि शेन वॉर्नला दंड ठोठावला होता. हे प्रकरण ‘जॉन बुकमेकर’ नावानं ओळखलं जातं.

त्यानंतर १९९९ मध्ये, वॉर्ननं उघडपणे श्रीलंकन क्रिकेटर अर्जुन रणतुंगाबाबत असलेलं वैमनस्य दाखवलं होतं. त्यामुळं वर्ल्डकपच्या अगोदर आयसीसीनं वॉर्नवर दोन सामन्यांची बंदी घातली होती. २००३ मध्ये वॉर्नमुळं ऑस्ट्रेलियाची पुन्हा बदनामी झाली होती. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी केलेल्या शारीरिक चाचणीत वॉर्ननं बंदी असलेली औषधं घेतल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर संघ व्यवस्थापनानं त्याला ताबडतोब घरी पाठवलं.

नंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. इतके धक्के खाऊनही वॉर्ननं २०१३ मध्ये पुन्हा कांड केलं. लीग मॅचदरम्यान मार्लोन सॅम्युअल्सवर शाब्दिक आणि शारीरिक हल्ला केल्यामुळं त्याला बीबीएलच्या संपूर्ण हंगामातून निलंबित करण्यात आलं होतं. याशिवाय त्याच्यावर एका ब्रिटिश नर्सला त्रास दिल्याचेही आरोप झाले होते.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेला ‘पंटर’ देखील वादविवादातून सुटलेला नाही. १९९९मध्ये रिकी पाँटिंगमुळं ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मान खाली घालावी लागली होती. एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर तो एक डोळा काळ्या झालेल्या अवस्थेत पत्रकार परिषदेत दिसला होता. आदल्या रात्री तो सिडनीतील नाईट क्लबमध्ये टल्ली होऊन पडल्याच्या बातम्या नंतर समोर आल्या होत्या.

क्रिकेट बोर्डानं याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रिकीनं स्वत: आपण जास्त प्रमाणात दारू पित असल्याचं आणि ती सोडण्यासाठी समुपदेशन घेत असल्याचं कबुल केलं होतं. या प्रकरणामुळं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड तोंडावर पडलं होतं. यानंतर २००३ मध्ये, डॅरेन लेहमनवर श्रीलंकेच्या संघाविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती.

व्हीबी त्रिकोणी मालिकेच्या एकदिवसीय सामन्यात धावबाद झाल्यानंतर माघारी जाताना त्यानं श्रीलंकेच्या राखीव खेळाडूंना अश्लिल अपशब्द वापरले होते. नंतर त्यानं या घटनेबद्दल श्रीलंकेची माफी मागितली मात्र, प्रकरणाचं गांभीर्य पाहता त्याच्यावर पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध बॅड बॉय कोण असेल तर तो म्हणजे ॲन्ड्र्यू सायमंड्स. त्याच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कारनामे सावरता-सावरता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नाकीनऊ आल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ऑगस्‍ट २००८ मध्‍ये, सायमंड्‍सनं टीम मीटिंगला फाट्यावर मारून मासेमारी केली होती. या कारणामुळं त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरातच सायमंड्सला आयसीसी ट्वेंटी 20 विश्वचषक स्पर्धेच्या मध्यातून पुन्हा घरी पाठवण्यात आलं. यावेळी महाशयांनी दारू पिऊन धिंगाणा घातला होता.

हरभजन सिंग आणि त्याच्यातील वादाबद्दल तर कुणाला विशेष माहिती देण्याची गरज नाही इतकं ते प्रकरण गाजलं होतं. कॉमेडियन रॉय आणि एचजीला दिलेल्या कुप्रसिद्ध मुलाखतीनंतर सायमंड्सची खरी नाचक्की झाली होती. तिथं त्यानं मद्यधुंद अवस्थेत न्यूझीलंडचा बॅटर ब्रँडन मॅक्युलमबद्ल अपशब्द वापरले होते आणि सहकारी मॅथ्यू हेडनच्या पत्नीसाठी आपण किती डेस्परेट आहोत हे सांगितलं होतं. नंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं आचारसंहिता मोडल्याबद्दल कारवाई केली होती.

वरील सर्व प्रकरणांच्या धक्क्यांमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेट सावरत असतानाच २०१८ मध्ये आणखी एक मोठा बॉम्ब पडला. यामुळं फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर जागतिक क्रिकेट देखील हादरलं होतं. डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ चेंडूशी छेडछाड करताना आढळला होता. या प्रकरणामुळं मोठी खळबळ उडाली होती.

नंतर झालेल्या चौकशीत तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार, स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टनं त्यांच्यावरील आरोप मान्य केले. त्यांनी अक्षरश: रडत-रडत माध्यमांसमोर आपला गुन्हा कबुल केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. आता टीम पेनच्या रुपात आणखी एक कर्णधार वादात सापडला आहे. त्यानं आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून पीडित माजी महिला सहकारी, आपली पत्नी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची जाहिर माफी मागितली आहे.

अशा कितीतरी लहान मोठ्या घटना आहेत ज्यामुळं ऑस्ट्रेलियन क्रिकेटला बदनामी सहन करावी लागलेली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू इतिहासापासून काहीही धडा घेत नसल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. त्यांच्या स्वैर वागण्यामुळं बोर्डाची आणि परिणामी देशाची प्रतिमा मलिन होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

Next Post

‘गंगनम स्टाईल’ एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

'गंगनम स्टाईल' एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.