The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त आपल्याच नाही, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला पण बेवड्यांनीच आधार दिला होता..!

by Heramb
19 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दारू किंवा तत्सम पेये ही समाजामध्ये ‘वाईट सवय’ म्हणून प्रसिद्ध आहेत. पण दारूचे आणि अर्थव्यवस्थेचे नाते किती घट्ट आहे हे तुम्हाला सरकारच्या एका निर्णयावरून कळेल. कोव्हीड-१९च्या काळात सगळी आस्थापने बंद असल्याकारणाने अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. अशा परिस्थितीत राज्याचा महसूल वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं या प्रश्नावर उत्तर आलं ते म्हणजे ‘अल्कोहोल मार्केट’ पुन्हा सुरु करणे. लॉकडाऊन संपण्याच्या आधी आणि सर्व गोष्टी सुरु होण्याआधी सुरु झाली ती दारूची दुकानं.

असंच काहीसं, पण मोठ्या प्रमाणात घडलं होतं ते अमेरिकेत. पण तत्कालीन अमेरिकन सरकारने अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी व्हिस्कीवर कर लादला होता आणि याच्या निषेधार्थ सबंध अमेरिकेत पेनिसिल्व्हानियाच्या शेतकऱ्यांनी ‘व्हिस्की’चे बंड किंवा ‘व्हिस्की रेबेलियन’ घडवून आणले होते. तसं पाहायला गेलं तर अमेरिकेत स्वातंत्र्यपूर्व काळात व्हिस्की एवढी प्रसिद्ध नव्हती. त्यावेळी लोक रम, जिन किंवा ब्रँडीसारख्या मजबूत अल्कोहोलिक पेयांना प्राधान्य देत होते. मग या व्हिस्कीला अमेरिकेत एवढं महत्त्व मिळालं कसं, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा प्रपंच.

अमेरिकन स्वातंत्र्ययु*द्धादरम्यान लंडनबरोबर राजकीय आणि व्यापारी संबंधांमध्ये अनेक मोठे बदल झाले. याचाच परिणाम अल्कोहोल मार्केटवरसुद्धा झाला. आपांपसातील वादामुळे ब्रिटनने मोलॅसिस आणि ऊस हे रम तयार करण्यासाठी आवश्यक रॉ-मटेरियल अमेरिकेला पुरवणे बंद केले. यामुळे हे रॉ-मटेरियल कॅरिबियन बेटांमधून आयात करावे लागत होते.

विल्यम रोराबॉघ १९७९ साली प्रकाशित झालेल्या आपल्या ‘द अल्कोहोलिक रिपब्लिक: ॲन अमेरिकन ट्रेडिशन’ या पुस्तकात लिहितात, “ब्रिटिशांनी क्रांतीच्या काळात वेस्ट इंडिजमधून मोलॅसेस आणि रमची निर्यात बंद केली,”  व्हिस्कीसाठी प्रमुख रॉ-मटेरियल होते ते म्हणजे ‘कॉर्न’ किंवा ‘मका’. लष्करी संघर्षाच्या काळात व्हिस्की हा स्वदेशी पर्याय बनला असेही रोराबॉघ आपल्या पुस्तकात नमूद करतात.



शत्रुत्व सम्पल्यानन्तरही रॉ-मटेरियल्सचा पुरवठा पूर्ववत न झाल्याने वेगळा पर्याय शोधणे गरजेचे होते. अमेरिकेच्या पश्चिम भागात मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व्हिस्कीच्या उत्पादनासह लोकप्रियताही वाढायला सुरुवात झाली. अमेरिकन शेतकर्‍यांनी मक्याचे जास्त उत्पादन केले आणि ते खराब होऊ शकते म्हणून त्यांनी मक्याच्या एकूण उत्पादनापैकी अतिरिक्त उत्पादनाची व्हिस्की तयार केली.

व्हिस्कीचे मूळस्थान हे आयर्लंड आणि स्कॉटलँड आहे. त्या देशांमध्ये व्हिस्कीचे उत्पादन बटाटा, गहू, राई आणि जव वापरून होत असे. पण अमेरिकेमध्ये हवामानामुळे मक्यापासून तयार झालेली व्हिस्की एक अप्रतिम उत्पादन तयार झाले. कालांतराने, मक्यापासून तयार केलेल्या व्हिस्कीमध्ये गहू किंवा राई मिसळल्यास त्याचा परिणाम जास्त वेळ राहतो हे स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

किंबहुना, व्हिस्कीचे आर्थिक महत्त्व इतके वाढले की जेव्हा ट्रेझरी सेक्रेटरी अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसला स्वातंत्र्ययु*द्धात झालेल्या कर्जाची भरपाई करण्यासाठी अल्कोहोल उत्पादनावर कर लावणारा कायदा पास करण्यास प्रवृत्त केले तेव्हा एक नवा संघर्ष उभा राहिला, तो म्हणजे ‘व्हिस्की रेबेलियन’. या व्हिस्की रेबेलियनचं नेतृत्व पेनिसिल्व्हानियाच्या शेतकऱ्यांनी केलं होतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

युनायटेड स्टेट्समधील औद्योगिक उत्पादनाच्या वैविध्यतेसह व्हिस्कीचे महत्त्व कालांतराने कमी झाले. जास्त महसूल येऊ शकेल अशा वस्तू आणि सेवांवर लक्ष केंद्रित केले. व्हिस्कीचे महत्त्व कमी होण्यास कारणीभूत असलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे महिला हक्कांच्या चळवळी. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांसाठी, पतीद्वारे दारूचा गैरवापर हे कौटुंबिक समस्यांचे एक कारण होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रस्त्याच्या कोणत्या बाजूने ड्रायव्हिंग करायची यावरून पण इतिहासात बरेच राडे झालेत..!

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सहभागी झाल्या होत्या..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सहभागी झाल्या होत्या..!

भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर चिनी ड्रॅगनची वक्रदृष्टी आता भूतानवर पडली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.